वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. २
  • स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा बायबल अभ्यासासाठी उपयोग
    आमची राज्य सेवा—२०१०
  • सावध राहा! च्या या अंकात: बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?
    सावध राहा!—२०१९
  • आधुनिक काळासाठी उपयोगी असलेलं एक प्राचीन पुस्तक
    सावध राहा!—२०१९
  • “देवाच्या प्रेमात टिकून राहा”
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. २

स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो

१ स्वच्छेतेची खात्री करण्यासाठी मोशेच्या नियमात या गरजा कडकपणे सांगितल्या होत्या. त्यामुळे इस्राएल लोकांना वेगळे केले गेले आणि त्यांच्याकडून शारीरिकरित्या व आध्यात्मिकरित्या स्वच्छ असण्याची अपेक्षा केली जात होती. (लेवी. ११:३५, ३६; १५:१-११; यश. ५२:११) या स्वच्छ स्थितीमुळे यहोवाचा सन्मान झाला. त्याने त्या राष्ट्राच्या आरोग्याला देखील हातभार लावला.

२ आज देखील, स्वच्छता हे यहोवाच्या लोकांचे ओळखचिन्ह आहे. ते, समूह या नात्याने यहोवाच्या लोकांची ओळख पटवून देत असले तरी, व्यक्‍तिगतपणे तुमच्या बाबतीत हे खरे आहे का? आम्हाला नीटनेटकेपणा आणि व्यक्‍तिगत स्वच्छतेबद्दल जितके वाटते, तितकीच यहोवाच्या गरजांबद्दल आम्हाला किती गुणग्राहकता आहे ते प्रतिबिंबित होते.

३ आमच्या घराच्या स्वरुपाबद्दल काय? त्यामुळे आम्ही देत असलेल्या राज्य संदेशाबद्दल लोक वाईट बोलतात का? आमचे घर घाण आणि आवार गवत व जंगली झुडपांनी भरलेले असताना, पृथ्वी एका नंदनवनात बदलेल याबद्दल आम्ही बोलतो तेव्हा, आमच्या प्रामाणिकतेवर काहींनी शंका घेणे शक्य आहे का? आमचे घर अव्यवस्थित दिसत असले किंवा अस्वच्छ सवयींमुळे दुर्गंधी येत असली तर, “देव राज्याखालील नवीन जगासाठी योग्य अशा स्वच्छतेच्या सवयी” आम्ही वाढवल्या आहेत असे म्हटले जाऊ शकते का?—om पृ. १३०-१.

४ क्षेत्र सेवेसाठी आम्ही वापरत असलेल्या कोणत्याही वाहनाबद्दल काय? आमच्या कार्याविषयी वाईट विचार केला जाणार नाही अशाप्रकारे ती स्वच्छ आहे का? आमचे कपडे, पुस्तकाची बॅग, व व्यक्‍तिगत केशभूषा यांच्याबद्दल काय? ते नीट व योग्य आहेत का? त्यामुळे अडथळ्यासाठी काही कारण तर होत नाही ना? आम्ही नियमित आंघोळ व धुण्याने स्वतःला व आमच्या कपड्यांना स्वच्छ ठेवावे हे उचित आहे.—wMR९१ ४/१ पृ. १४-१८.

५ एखाद्या बांधवाच्या निष्काळजीपणामुळे त्याचे वैयक्‍तिक आरोग्य किंवा आजूबाजूच्या गोष्टी, मंडळीवर निंदा आणण्याचे कारण ठरल्या असतील तर मग काय? कदाचित वय किंवा दुर्बळतेमुळे त्यांना फक्‍त प्रेमळ मदतीची गरज असेल. असे असल्यास, त्यांना मदत करणे हा चांगुलपणा असेल. कोणालाही ही समस्या असेल व त्यांना त्याची जाणीव देखील नसेल. केवळ प्रेमळ सल्ल्यामुळे ते परिस्थिती सुधारण्यास प्रवृत्त होतील. या बाबतीत नेहमीच वाईट उदाहरण ठेवणाऱ्‍या व्यक्‍ती, मंडळीतील खास विशेषाधिकार घेण्यास योग्य ठरणार नाहीत. अर्थात, वडिलांनी त्यांच्या स्वतःचे व्यक्‍तिगत प्रमाण किंवा आवडीनिवडी लादणे टाळावे.

६ नवीन आस्थेवाईक व्यर्क्‍तिना आमच्या राज्य सभागृहात आध्यात्मिक मेजवान्यांचा उपभोग घेण्यास आमंत्रित केले जाते. बहुधा, सभागृह आकर्षक आणि स्वच्छ असल्यामुळे आमंत्रण देण्यास आम्ही उत्सुक असतो. तरीपण, ते तसे ठेवण्यास काम करावे लागते. तुमच्या सभागृहाभोवती पाहा. खुर्च्या, फरशी आणि भिंती स्वच्छ आहेत का? शौचालये नियमितपणे साफ करण्यात येतात का? आम्हाला घाणेरडी फरशी किंवा रंगाचे पापुद्रे निघत असलेल्या भिंती पाहून सवय झाली तर, कालांतराने आम्हाला ते स्वीकारणीय वाटायला लागेल. तथापि, पहिल्याच वेळी भेट देणाऱ्‍या अनोळखी व्यर्क्‍तिवर त्याची प्रतिकूल छाप पडेल. अपीलकारक आणि आकर्षक सभागृह टिकवून ठेवण्यात आम्ही होईल तितके केले पाहिजे. साफसफाई किंवा स्वच्छेतेची वेळ येते तेव्हा, आम्ही आमचा वाटा पूर्ण केला पाहिजे.

७ वैयक्‍तिक पेहरावावरून आणि आमची घरे, वाहने आणि राज्य सभागृहांच्या स्वच्छतेद्वारे, एकही शब्द न बोलता आम्ही देवाचे गौरव करू शकतो. आमच्या चांगल्या उदाहरणामुळे कोणत्याही अडखळणास कारण राहणार नाही. परंतु त्यामुळे आमची उपासना स्वच्छ व सरळ आहे याची साक्ष दिली जाईल.—१ करिं. १०:३१, ३२; याको. १:२७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा