वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९३ पृ. ७
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९४
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km १२/९३ पृ. ७

विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

१ मत्तय ६:३३ मधील येशूच्या शब्दांच्या आज्ञापालनात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी नेहमीच त्यांच्या जीवनात राज्याला प्रथमस्थानी ठेवले आहे. यास्तव, जानेवारी १९९४ मध्ये सुरू होणाऱ्‍या विभागीय संमेलनाच्या कार्यक्रमासाठी, “पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळवण्यास झटा” हा उचित विषय आहे.

२ कार्यक्रमाच्या अगदी सुरवातीपासूनच, राज्याची वास्तविकता ठळकपणे दाखवली जाईल व कार्यक्षेत्र, राज्यकर्ते, प्रजा आणि नियम असलेले ते कार्यशील सरकार आहे यावर जोर दिला जाईल. वास्तविक पाहता, आज समाजाला लाभदायक ठरणारे मानवी सरकारांचे पुष्कळ नियम, पवित्र शास्त्रीय नियमांवरच आधारित आहेत.

३ आमच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये, राज्याला प्रथमस्थान दिल्यामुळे आम्हाला मिळणाऱ्‍या संरक्षणाला आणि आशीर्वादांना विचारात घेतले जाईल. अनावश्‍यक चिंता आम्ही कशी टाळू शकतो ते दाखवण्यासाठी मदतदायी सल्ला पुरवला जाईल. आमची नजर साधी राखणे इतके महत्त्वाचे का आहे याविषयी, भाषणे, प्रात्यक्षिके आणि चर्चा याद्वारे दाखवून दिले जाईल.

४ संमेलनाच्या शनिवारच्या दिवशी, पात्र असलेले बाप्तिस्म्याचे सदस्य, यहोवाला केलेल्या त्यांच्या समर्पणाची जाहीर घोषणा करू शकतील. आणि रविवारी, “देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करील,” या शिर्षकाच्या जाहीर भाषणाला उपस्थित राहण्यास आम्हा सर्वांना आवडेल.

५ विभागीय संमेलनाच्या दोन्ही दिवशी उपस्थित राहण्याची योजना करण्यासाठी निश्‍चित असा. संमेलनाच्या कार्यक्रमासोबतच, मनःप्रिय बंधुत्वाचा सहवास, कुणालाही चुकवावयास आवडणार नाही असे उभारणीकारक आणि उत्साहवर्धक प्रोत्साहन पुरवील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा