वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९२ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट १० ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १७ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २४ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ३१ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९२
km ८/९२ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

सूचना: अधिवेशन काळादरम्यान आमची राज्य सेवा दर आठवडी एका सेवा सभेचा आराखडा योजील. यास्तव, मंडळ्या त्यामध्ये आवश्‍यक बदल करू शकतात, ज्यामुळे त्यांना प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहता येईल व मग पुढील आठवडी होणाऱ्‍या सेवा सभेत अधिवेशन कार्यक्रमाच्या ठळक मुद्यांची ३० मिनिटे उजळणी ठेवता येईल. प्रत्येक दिवसाची उजळणी दोन वा तीन लायक बांधवांना आधीच नेमून देऊ शकतात, जे मुख्य मुद्यांवर आपले लक्ष केंद्रित करतील. ही उत्तम तयारी केलेली उजळणी बांधवांना प्रमुख मुद्दे व्यक्‍तिगत अवलंबनासाठी आणि क्षेत्रावर उपयोगात आणण्यासाठी लक्षात ठेवता येतील. सभागृहाकडून मिळणारे अभिप्राय व निवेदित केलेले अनुभव त्रोटक व मुद्याला अनुलक्षून असावे.

ऑगस्ट १० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १२३ (६३)

१० मि: आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा, तसेच स्थानिक घोषणा. याचप्रमाणे ऑगस्ट १, १९९२ चा वॉचटावर सादर करताना वापरु शकू असे विशिष्ट दोन बोलके ठळक मुद्दे प्रस्तुत करा.

२० मि: “आपल्या राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी माहितीपत्रके सादर करा.” प्रश्‍नोत्तराची चर्चा व प्रात्यक्षिके. मंडळीत कोणत्या माहितीपत्रकांचा साठा उपलब्ध आहे ते बांधवांना कळवा; आणि स्थानिक क्षेत्रात जे माहितीपत्रक अधिक उपयोगी ठरू शकते अशाबद्दल सभागृहाकडून अभिप्राय मिळवा. परिच्छेद ३चा विचार करताना आपल्या समस्या हे माहितीपत्रक अनौपचारिक वातावरणात शेजाऱ्‍याला, मित्राला, कामावर किंवा इतर ठिकाणी कसे सादर करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. वेळ मिळेल तसा आधीच नेमून दिलेल्या प्रचारकांना माहितीपत्रकाचा वापर केल्याचे अनुभव सांगू द्या. ऑगस्टमध्ये माहितीपत्रके सादर करण्यात पूर्ण सहभाग घेण्याबद्दल बांधवांना उत्तेजन द्या.

१५ मि: सुटीवरील आपला वेळ सूज्ञपणे वापरा. सुटी व अधिवेशन काळादरम्यान आपणास मिळणारा अधिक वेळ ईश्‍वरशासित आस्थेला वाढविण्यासाठी वापरण्यासाठी प्रचारकांना उत्तेजन द्या. प्रवास करताना अनौपचारिक साक्षीसंबंधाने दिलेले प्रस्ताव उपयोगात आणा. प्रत्येकाला साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन, संस्थेची प्रकाशने वाचणे आणि सुटीदरम्यान मिळणारा अधिक वेळ सूज्ञपणे घालविण्यासाठी सर्वांना उचित ध्येये ठेवण्याचे उत्तेजन द्या.

गीत १६५ (८१) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९३ (१०३)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. ईश्‍वरशासित वृत्त. मंडळीला क्षेत्रकार्याची योजना सांगा.

२० मि: “आमच्या सादरतेला अनुलक्षून आमची प्रस्तावना जोडणे.” त्रोटक भाषण व प्रात्यक्षिके. परिच्छेद २ मधील सुचविलेल्या प्रस्तावांचा वापर करून शास्त्रवचनीय सादरतेचे प्रात्यक्षिक करण्यासाठी तरुण प्रचारकांना नेमणूक द्या. यशया ६५:२१-२३ प्रस्तुत करताना परिच्छेद ६ मधील पवित्रा वापरण्यास सांगा. आणखी एक प्रचारक आपल्या समस्या या सादरतेचे प्रात्यक्षिक परिच्छेद ३ मध्ये असलेले प्रस्ताव वापरुन दाखवतो. दोन्ही प्रकरणात सादरता प्रकाशनाच्या प्रस्तुतीसोबत कशी जोडण्यात आली हे अध्यक्षांनी जोर देऊन सांगावे. मंडळीला माहितीपत्रके व मासिके सोबत घेऊन जाण्यास सांगावे.

१५ मि: आर्मगिदोनबद्दल प्रश्‍न. रिझनिंग पुस्तकावर पृष्ठे ४४-९ वरील साहित्यावर आधारीत भाषण.

गीत १३७ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ८ (८८)

१५ मि: स्थानिक घोषणा. मंडळीच्या जुलैच्या क्षेत्र अहवालाची चर्चा करा. प्रशंसा करा व जरुरीच्या ठिकाणी प्रोत्साहनपर उत्तेजन द्या. वार्षिक वचन व त्यावरील संदर्भावर विचार करणे हे क्षेत्र सेवेत सहभागी होणे आणि मंडळीसोबत सहभागी होणे यामध्ये खरा आनंद मिळविण्यासाठी कसे पूरक ठरते ते दर्शवा. (रोमकर १२:९-१६) वेळ असल्यास, या सप्ताहाच्या शेवटी क्षेत्रकार्यात जे बोलके मुद्दे वापरु शकतो ते एक किंवा दोन सांगा.

१५ मि: “तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास सादर करता का?” प्रश्‍नोत्तराद्वारे चर्चा व यानंतर पहिल्याच किंवा पुनर्भेटीत पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु केला जाऊ शकतो यासंबंधीचे निवडक अनुभव कथन.

१५ मि: स्थानिक गरजा, किंवा तीन अथवा चार प्रचारकांना सत्याकडे कशामुळे आकर्षण वाटले त्याबद्दलचे अनुभव. यामध्ये, ज्या अडखळणांवर त्यांना मात करावी लागली त्याचाही उल्लेख करू देऊ शकता.

गीत १८४ (४१) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ३१ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८० (१००)

१० मि: स्थानिक घोषणा. प्रश्‍न पेटी. या भागाची हाताळणी करण्यासाठी सेवा देखरेख्यांना नेमू शकता.

२० मि: “आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरु करणे.” त्रोटक प्रस्तावनेनंतर या पुनर्भेटीची प्रात्यक्षिके सादर करा: (१) आपल्या समस्या माहितीपत्रक घेतलेल्या व्यक्‍तिची पुनर्भेट, (२) ज्याने प्रकाशन स्वीकारले नाही पण आस्था मात्र दाखवली अशा व्यक्‍तिची पुनर्भेट. दोन्ही प्रकरणात आणखी एका पुनर्भेटीचा पाया घालावा.

१५ मि: “देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे.” सर्वसाधारण विभागीय संमेलनासाठी वाटणाऱ्‍या आत्मीयतेचे त्रोटक अभिप्राय विचारा. मागील विभागीय संमेलनात जे महत्त्वपूर्ण मुद्दे शिकलो ते लक्षात आणू शकता. मग, पृष्ठ १ वरील लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. पुढील विभागीय संमेलनाच्या तारखेची, माहिती असल्यास, घोषणा करा; आणि सर्वांनी उपस्थित राहावे म्हणून उत्तेजन द्या.

गीत १५७ (७३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा