अधिक काळजी—अधिक उत्तम सेवा
▪ वर्गण्यांची हाताळणी त्वरेने करावी यासाठी पुढील मुद्यांकडे तुम्ही अधिक लक्ष दिल्यास बरे होईल.
१. वर्गणीदारांना पहिला अंक मिळण्यासाठी ८-१० आठवडे लागतात.
२. कृपया पत्ता सुवाच्य अक्षरात कॅपिटल्समध्ये लिहावा किंवा टाईप करावा.
३. वर्गणी कपट्यांमध्ये पीन कोड तसेच भाषेचा उल्लेख स्पष्ट असावा.
४. वर्गणीदाराचा पत्ता तुमच्या मंडळीच्या क्षेत्राबाहेर असला तर मंडळीचा क्रमांक या ओळीवर एक रेघ ओढावी. (तथापि, बक्षिस म्हणून पाठवण्यात येणाऱ्या वर्गण्यांवर तुमचा मंडळीचा क्रमांक असावा.)
५. वर्गणीचे नूतनीकरण करताना कृपया “वर्गणी संपत आहे” या कपट्याचा (एम-९१ व एम-१९१) वापर करावा व ते मंडळीला द्यावेत व मंडळीने हे संस्थेला पाठवावेत.
६. वर्गणीदार जेव्हा पत्ता बदल करावा अशी विनंती करतो तेव्हा पत्ता बदल या कपट्याचा (एम-२०५) वापर करावा.
▪ सचिवांनी पुढील गोष्टीकडे कृपया लक्ष द्यावे:
१. वर्गणीचे जे फॉर्म्स संस्थेला पाठविले जातात त्यामध्ये नमूद असणारी वर्गणीची रक्कम एम-२०३ बरोबर जुळणारी असावी.
२. वर्गणी फॉर्म्स पिनांनी एकत्र जोडू नयेत.
३. डिस्ट्रिब्युटर ऑर्डर (एम-एबी-२०२) फॉर्मवर मंडळीचा पत्ता लिहू नये. तुमच्या मंडळीचे नाव व क्रमांक तेवढा असावा. काही बदल करायचा असल्यास तो “डिस्ट्रिब्युटर मॅगजीन चेंज ऑफ ॲड्रेस ओन्ली” (एम-२०६) यावर कळवावा.
वरील मुद्यांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास आमच्या मासिकांची वर्गणी भरणाऱ्या लोकांना उत्तम प्रतीची सेवा सादर करण्यामध्ये तसेच द वॉचटावर व अवेक! मासिकांच्या मागण्यांची हाताळणी करण्यात मोठी मदत होऊ शकेल.