आरंभीच्या प्रभावशाली भेटी
१ दररोजच्या व्यवहारात लोक अतिशय मग्न असल्यामुळे आणि धर्माबद्दल त्यांनी आपल्या रूढ कल्पना राखल्या असल्यामुळे सेवा कार्यात त्यांच्याशी संभाषण सुरु करणे कधी कधी खूप आव्हानदायक जाते. तर मग, आमची आरंभीची भेट प्रभावशाली ठरण्यासाठी आपण आपल्या मनात काय असू द्यावे?
२ इंग्रजी मासिकाच्या एप्रिल १ या अंकातील “ट्रु फ्रीडम—फ्रॉम व्हॉट सोर्स?” हा लेख सादर करताना तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “लोक जगभर स्वातंत्र्यासाठी धडपड करीत आहेत. पण मानवी सरकारांनी स्वातंत्र्याबद्दल दिलेली अभिवचने पूर्ण होण्यात अपयश आले आहे. खरे स्वातंत्र्य केवळ खरा देव यहोवा याच्या उपासनेमुळे मिळते.” करिंथकरास दुसरे पत्र ३:१७ वाचा आणि द वॉचटावरचा हा अंक देवाची अभिवचने कशी ठळकपणे मांडतो ते आणि जागतिक घटना आमची मुक्तता समीप आल्याचे का दाखवते याकडे निर्देश करा.
३ प्रार्थनेचा विषय ठळकपणे मांडून तुम्हाला एप्रिल १५, १९९२चा “वॉचटावर”चा अंक याप्रकारे प्रस्तुत करता येईल:
▪ युद्धप्रसंगी विजय मिळावा म्हणून लोक प्रार्थना करतात. देव अशा प्रार्थना ऐकतो व एखादी बाजू घेतो असे तुम्हाला वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] पवित्र शास्त्राचे उत्तर विचारात घ्या.” मग, १ले पेत्र ३:१२ वाचून त्यावर विवेचन मांडा. थोड्या विवेचनानंतर वॉचटावरमधील अशा माहितीकडे निर्देश करा की, ज्यामुळे घरमालकाची आस्था, ते मासिक वाचण्यासाठी वाढवली जाईल. मग, वर्गणी सादर करा.
४ “टेहळणी बुरुज” याच्या एप्रिल १ च्या अंकातील “तुम्ही वेळ निघून गेल्यावर विचार करता का?” हा लेख दाखवताना तुम्ही असे म्हणू शकाल:
▪ “लोक सर्वत्र शांतीचे नवे पर्व सुरु होण्याची आशा बाळगून आहेत. पण मानवी सरकारांनी शांतीची दिलेली अभिवचने अपयशी ठरली आहेत. खरी व टिकाऊ शांती केवळ देवाकडून येऊ शकते.” स्तोत्रसंहिता ४६:८, ९ वाचा व हे दर्शवा की, कित्येकांना वाटते त्यापेक्षा शांतीमय नवे जग अधिक जवळ आले आहे. “याबद्दलचा पुरावा या मासिकात आढळतो.”
५ आपले ध्येय पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे आहे हे लक्षात असू द्या. वस्तुतः पुष्कळ जण मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग करणार असल्यामुळे पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यात रस बाळगणाऱ्या अनेक लोकांना शोधून काढण्याची यामुळे चांगली संधी मिळेल. तथापि, मे मध्ये आमची परिस्थिती साहाय्यक पायनियरींग करण्याची नसली तरी एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे ध्येय आपल्याला राखता येईल.
६ आरंभीच्या भेटीत पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी काही प्रचारकांनी हस्तपत्रिकांचा उपयोग केला आहे.
“शांतीमय नव्या जगातील जीवन” ही हस्तपत्रिका सादर करताना तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “आम्ही या वसाहतीत स्वयंसेवकांचे कार्य करीत आहोत. ही हस्तपित्रका घ्या, ती आमच्या कामाचे स्वरुप तुम्हाला सांगू शकेल. जग कधी असे दिसू शकेल असे तुम्हाला वाटते का?” प्रतिसाद मिळाल्यावर त्या व्यक्तिसोबत पहिल्या काही परिच्छेदांची चर्चा करून मत्तय ६:९, १० व स्तोत्रसंहिता ३७:२९ ठळकपणे मांडा.
७ स्वतःची ओळख कशाप्रकाराने करून द्याल याबद्दल काळजीपूर्वक विचार करा. याबद्दलचे सुंदर प्रस्ताव रिझनिंग पुस्तकात पृष्ठे ९-१५वर आहेत. या प्रस्तावनांचा कुशलतेने उपयोग केल्यामुळे तुमची आरंभीची भेट प्रभावी ठरेल.