वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. १२-१४
  • तुमचे दूरध्वनीवरील शिष्टाचार कसे आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे दूरध्वनीवरील शिष्टाचार कसे आहेत?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दूरध्वनी व तुम्ही
  • इतरांबद्दल विचारपूर्वक कदर
  • दर्जेदार वक्‍तृत्व
  • चांगले ऐकणारे असा
  • विचारात घेण्याजोग्या शेवटल्या गोष्टी
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • यशस्वी टेलिफोन साक्षकार्य
    आमची राज्य सेवा—२००१
  • टेलिफोनवरून साक्षकार्य करणे परिणामकारक ठरू शकते
    आमची राज्य सेवा—२००९
  • देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. १२-१४

तुमचे दूरध्वनीवरील शिष्टाचार कसे आहेत?

“कौटुंबिक जिव्हाळा, आरोग्य व कामाबद्दलचे प्रेम या खालोखाल जीवनाचे सुख, स्वाभिमानाला पुनःनिर्माण करणे किंवा तो वाढवणे याला दयाळू संभाषणांची देवाणघेवाण करण्याइतकी आणखी एखादी गोष्ट हातभार लावते का?”

तो प्रश्‍न विचारून, अलीकडचीच अमेरिकी लेखिका व शिक्षिका, लूसी एलीयट कीलर, मानवाला निर्मितीच्या वेळी प्रेमळतेने प्रदान केलेल्या क्षमतेकरवी म्हणजे, तोंडी देवाणघेवाणीकरवी मिळू शकणाऱ्‍या वैयक्‍तिक सुखाला व साध्यतेला अधिक महत्त्व देत होती.—निर्गम ४:११, १२.

मागील १२ दशकांदरम्यान, ॲलेक्सांडर ग्रॅहम बेल यांनी लावलेल्या दूरध्वनीच्या शोधाने मानवी भाषेच्या प्रवाहाची वाढ करण्यामध्ये खूप हातभार लावला. आज, पृथ्वीच्या कोट्यवधी रहिवाशांकरता, व्यापारसंबंधाने किंवा मौज म्हणून उपयोगात आणलेला दूरध्वनी मानवांमधील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतो.

दूरध्वनी व तुम्ही

दूरध्वनीच्या उपयोगामुळे तुमच्या जीवनाचा दर्जा कितपत वाढतो? या प्रश्‍नाचे उत्तर, त्या यंत्रापेक्षा संबंधित लोकांवर अधिककरून अवलंबून आहे याजशी तुम्ही सहमत नसणार का? खरे पाहता, तुमचे दूरध्वनीवरील शिष्टाचार कसे आहेत, हा प्रश्‍न आम्ही तुम्हाला विचारतो ते समयोचित आहे.

दूरध्वनीवरील शिष्टाचारात मनोवृत्ती, संभाषणाचा दर्जा व ऐकण्याची क्षमता ही क्षेत्रे समाविष्ट होतात. एखादा दूरध्वनी वापरण्याच्या पद्धती व त्रासदायक कॉल्स हाताळण्याचे मार्ग देखील प्रसंगोचित असतील.

इतरांबद्दल विचारपूर्वक कदर

मानवांच्या सर्व देवाणघेवाणीत खरे आहे त्यानुसार दूरध्वनीवरील शिष्टाचार देखील बंधुभावामुळे परिणीत होतात. प्रेषित पौलाने लिहिले: “केवळ आपल्या स्वतःच्याच हिताविषयी विचार करू नये, तर इतरांच्या हिताविषयीही विचार करा.”—फिलिप्पैकर २:४, सुबोध भाषांतर.

“दूरध्वनीवरील अशिष्टाचाराची सर्वात सामान्य उदाहरणे कोणती?,” असा प्रश्‍न केल्यावर, दूरध्वनीच्या स्वीचबोर्ड ऑपरेटरने म्हटले, की तिच्या यादीत सर्वप्रथम, “‘मी सुनीता बोलतेय’ (तुम्हाला किती सुनीता माहीत आहेत?) किंवा याहून वाईट म्हणजे, ‘मी बोलतेय,’ अथवा ‘कोण बोलतंय ओळखा पाहू.’ असे फोनवर बोलणाऱ्‍या व्यक्‍तीचे नाव होते.” कदाचित सद्धेतुपूर्वक परंतु अविचारीपणाच्या अशा बोलण्यामुळे गोंधळ होऊ शकतो किंवा एखादी व्यक्‍ती अधीर होऊ शकते. ऑपरेटरने पुढे म्हटले: “स्वतःची स्पष्ट ओळख देऊन शिवाय, बोलवलेल्या व्यक्‍तीबद्दल विचारपूर्वकता असल्यामुळे त्याजशी बोलण्याची ही सोयीस्कर वेळ आहे का असे विचारून फोनची सुरवात सुखकारक का ठेवू नये?”

हे लक्षात ठेवा, की तुमच्या चेहऱ्‍यावरील हावभाव दिसू शकत नाहीत परंतु तुमची मनोवृत्ती प्रकट होईल. ती कशी? तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून. अधीरता, कंटाळा, राग, उदासीनता, प्रांजळपणा, आनंद, मदतदायी मनोवृत्ती व उबदारपणा—हे सर्व प्रकट होते. एखाद्याच्या कार्यात व्यत्यय आणल्यावर चीड येणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया असते हे खरे आहे. शिष्टाचार म्हणून, अशा परिस्थितीत अंमल थांबून उत्तर देण्याआधी तुमच्या आवाजात “स्मित” व्यक्‍त करा. नापसंतीच्या स्वरात न बोलता असहमती दर्शवणे शक्य आहे.

विचारपूर्वक कदर आणि आवाजातील सुखकारक स्वर यांच्या मिलापामुळे “गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच” व “ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त” होईल असे काही प्रकट करणारे बोल बाहेर पडतील.—इफिसकर ४:२९.

दर्जेदार वक्‍तृत्व

होय, आपण ज्या प्रकारची भाषा वापरतो ते महत्त्वाचे आहे. तुम्ही खालील नियमांशी सहमत आहात का व त्यांचे पालन करता का? स्वाभाविकपणे, स्पष्टपणे व अस्खलितपणे बोला. तोंडातल्या तोंडात पुटपुटू नका. दीर्घपल्ल्याचा कॉल असला तरीही—ओरडू नका. तुमचे शब्द अर्धवटच उच्चारू नका. अर्धवट शब्दांचा उच्चार किंवा मध्येच शब्द गाळून बोलण्याची निष्काळजीपणाची भाषा टाळा; तसेच “स्वरांचा दीर्घोच्चार करण्याचे” आणि एखादे वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारण्याचे टाळा जे गोंधळवणारे व चीड आणणारे असू शकते. निर्जीवपणे एकाच स्वरात बोलू नका. अर्थावर योग्य जोर दिल्यामुळे व स्वरनियमनामुळे भाषा अर्थपूर्ण, सजीव व तजेला देणारी वाटते. त्याचप्रमाणे, हेही लक्षात ठेवा की, दूरध्वनीवरील संभाषणाच्या वेळी तोंडात काही चघळत असल्यामुळे वक्‍तृत्वाचा दर्जा वाढत नाही तसेच त्यावरून शिष्टाचारही दिसून येत नाहीत.

शब्दांची निवड करणे देखील विचारात घेण्याजोगे आहे. यासाठी समजबुद्धीची गरज आहे. लगेच समजण्याजोगे साधे, सरळ शब्द वापरा. शब्दांना अर्थ असतो. ते मायाळू किंवा निष्ठुर, सांत्वनदायक किंवा कठोर, उत्तेजनात्मक किंवा निराश करणारे असू शकतात. शिवाय, एखादी व्यक्‍ती कठोर नसूनही मार्मिक असू शकते, फटकळ किंवा असभ्य नसूनही स्पष्ट असू शकते आणि टाळाटाळ न करता व्यवहारचातुर्याने बोलू शकते. “कृपया” व “आभारी आहे” अशा सौजन्यशील अभिव्यक्‍ती नेहमीच आनंदाने स्वीकारल्या जातात. “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे,” असे प्रेषित पौलाने लिहिले तेव्हा तो दयाळू, कदर दाखवणाऱ्‍या व रुचकर शब्दांबाबतीत विचार करत होता.—कलस्सैकर ४:६.

चांगले ऐकणारे असा

एका तरुण व्यक्‍तीने आपल्या पित्याला चांगला संभाषणकर्ता होण्यामागील रहस्य विचारले. “माझ्या मुला ऐक,” असे त्याचे उत्तर होते. “मी ऐकत आहे,” असे तो तरुण म्हणाला. “मला आणखी सांगा.” “आणखी काहीच नाही,” असे उत्तर पित्याने दिले. खरोखर, आस्थेवाईक, सहानुभूतीपूर्वक ऐकणारा असणे, दूरध्वनीवरील शिष्टाचाराच्या कृतीतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

एक साधा नियम न पाळल्यास तुम्हाला दूरध्वनीवरील कंटाळवाणा मनुष्य असे संबोधले जाईल. तो कोणता? संभाषणावर पूर्ण मक्‍ता मिळवू नका. बोलण्यात पूर्ण दंग होऊन जाऊ नका; उदाहरणार्थ, क्षुल्लक संभाषणाचा अंतहीन, शब्दाशब्दाचा अहवाल देण्यात किंवा स्वतःच्या किरकोळ दुखण्याखुपण्यांची लांबलचक कथा सांगण्यात दंग होऊ नका. आपल्याकडे पुन्हा एकदा एक अवलंबण्याजोगा संक्षिप्त बायबल नियम असून ह्‍यावेळी तो शिष्य याकोबाकडील आहे. “प्रत्येकाने ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश . . . असावे.”—याकोब १:१९, सुबोध भाषांतर.

विचारात घेण्याजोग्या शेवटल्या गोष्टी

आता दूरध्वनीवरील शिष्टाचाराच्या संबंधी दोन शेवटल्या प्रश्‍नांकडे आपण लक्ष देऊ या. दूरध्वनी हाताळण्याच्या पद्धतीविषयी काय म्हटले जाऊ शकते? नको असलेले कॉल हाताळण्यात काही सुचवलेले मार्गदर्शन आहे काय?

दूरध्वनीवर बोलताना, दुसऱ्‍या बाजूने बोलणाऱ्‍या व्यक्‍तीचा आवाज अधूनमधून अस्पष्ट होत असल्याचे तुम्हाला आढळले आहे का? यावरून तुम्ही फोनमध्ये बोलावे व तो तुमच्या तोंडापासून दोन सेंटीमीटर दूर ठेवावा याची आठवण तुम्हाला झाली पाहिजे. या व्यतिरिक्‍त, पार्श्‍व आवाज होऊ न देणे सभ्यतेचे आहे. तुम्ही फोन करता तेव्हा, नीट लक्ष देऊन नंबर फिरवा जेणेकरून चुकीचा नंबर लागणार नाही व तुमचा कॉल संपल्यावर रिसीव्हर त्याच्या जागी अलगद ठेवा.

तुम्हाला त्रासदायक कॉल आले आहेत का? दुःखाची गोष्ट अशी आहे की, हे आता वाढत चालले आहे. असभ्य, अश्‍लील गोष्टींना सूचित करणारा किंवा दुर्भाषणाला एकच प्रतिसाद द्यायचा असतो—फोन खाली ठेवणे. (पडताळा इफिसकर ५:३, ४.) फोन करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीने स्वतःची ओळख देण्यास नाकारले, तर त्याबाबतीतही हेच खरे ठरेल. तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल शंका वाटत असल्यास, उत्तमरित्या कसे लिहावे व बोलावे (इंग्रजी) हे प्रकाशन असे म्हणते, “एखाद्या अनोळखी आवाजाने, ‘कोण बोलत आहे?,’ असे विचारल्यास त्यास उत्तर देऊ नका” त्याचप्रमाणे एखाद्या अनोळख्याबरोबर तुमच्या योजनांची चर्चा करू नका.

शेवटी, दूरध्वनीवरील शिष्टाचारांचा अवलंब करताना नियम किंवा कायद्यांच्या लांबलचक यादीची जरूरी नाही हे पाहणे किती चांगले आहे! लोकांसोबतच्या सर्व व्यवहारात, ज्यास सुवर्ण नियम म्हणतात त्याचा अवलंब केल्याने सुखकारक व प्रतिफळदायी नातेसंबंध निर्माण होतात. येशू ख्रिस्त म्हणाला: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) ज्याने मानवाला वक्‍तृत्वाची क्षमता प्रदान केली त्याला खूष करण्याची इच्छा देखील ख्रिश्‍चनाला असते. स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.”—स्तोत्र १९:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा