सभा लाभदायक बनविण्यामध्ये तुमचा सहभाग
१ यहोवासोबत चांगले परिचित होण्यामध्ये आमच्या सभा आम्हाला खूप मदत देतात. त्याचे नियम व तत्त्वे समजावण्यात आणि त्यानुरुपचे जीवन जगण्याची मदत त्या आम्हाला देतात. सभा जीवनदायी प्रचारकार्य हालचालीत अधिक प्रभावी सहभाग घेण्यासाठी आम्हाला तयार करतात. शिवाय त्या देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवनाचे उद्दिष्ट गाठण्यात आम्हास साहाय्य देतात. सभांना उपस्थित राहण्यामध्ये आम्ही जितका वेळ खर्च करतो तो, आम्ही सभा लाभदायक बनविण्यामध्ये आमचा वैयक्तीक सहभाग दिला तर निश्चितपणे सार्थी लागू शकतो.
२ सभा लाभदायक बनवायच्या आहे तर त्यासाठी तीन प्रमुख किल्ल्या आहेत—तयारी, सहभाग आणि व्यावहारिक अवलंब. या गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या आहेत. चांगली तयारी सभेत सहभाग घेण्यास सोपे व आनंददायी करते. विश्वासाची आनंदी व उत्साही वक्तव्ये ऐकणाऱ्या सर्वांना उत्तेजन व चालना देतात. (इफिस ४:२९) सभेत जे सादर करण्यात येते ते समजले व आणि ती माहिती स्वतःच्या वैयक्तीक जीवनात तसेच इतरांना शिष्य बनविताना मदत देण्यात कशी व्यवहार्य मार्गांनी लागू करता येते याची रसिकता वाढविल्यास सभागृहातील सर्वांनाच ते करण्याची चालना मिळेल.
टेहळणी बुरुज आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास
३ साप्ताहिक टेहळणी बुरुज अभ्यास तसेच मंडळीचा पुस्तक अभ्यास या महत्त्वपूर्ण सभा आहेत कारण या सभांकरवी “विश्वासू व बुद्धीमान दास” विश्वास राखणाऱ्या घराण्याची भरवणूक करीत आहे. (मत्तय २४:४५-४७) ज्या साहित्याचा विचार या सभांत केला जातो त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही वेळ बाजूला काढता का? सभेत उत्तर देण्याची तुमची तयारी असते का? अर्थातच, तुम्ही स्वतःच या बाबतीत प्रमुख भूमिका पार पाडीत असता.
४ टेहळणी बरुज अभ्यासाचे किंवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचे साहित्य तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासले तर देण्यामध्ये जी धन्यता लाभत असते त्यात तुम्ही सहभागी होऊ शकाल. (प्रे. कृत्ये २०:३५) पुष्कळांना मुख्य शब्द अधोरेखित करणे लाभदायक वाटते. परिच्छेदात लिहिण्यात न आलेली पण कंसात दाखविलेली शास्त्रवचने काढून वाचली व ती कशी लागू करता येतात याचा विचार केल्यास तुम्हाला उत्तरे देण्यात कोणता शास्त्रवचनीय आधार आहे त्याची समज प्राप्त होईल. तुम्ही उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दात सांगू शकता का, किंवा ती तुम्हाला परिच्छेदातून वाचून दाखवावी लागतात? ईश्वरशासित अभ्यासातील प्रमुख उद्दिष्ट हे असते की ती माहिती तुम्ही आपलीशी करावी, व तिच्याविषयी हृदयपूर्वकतेची रसिकता व समज व्यक्त करून त्यानुरुप कृति आचरावी.—नीतीसूत्रे २:५; ४:७, ८.
ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा व सेवा सभा
५ शाळेत तुम्हाला नेमून दिलेले विद्यार्थी भाषण हे यहोवाकडील नेमणूक आहे असे पत्करता का व हे तुम्ही जी तयारी करता त्यामध्ये प्रवर्तित होते का? नेमून दिलेले साहित्य तुम्हाला कळते आहे व ते अपीलकारक पद्धतीने तुम्हाला सादर करता येऊ शकते याची खात्री करा. तथापि, जरी तुम्हाला नेमणूक दिली नसेल तरीही नेमून दिलेल्या पवित्र शास्त्र अध्यायाचे तसेच इतर साहित्याचे दर आठवडी वाचन करा. हेच सेवा सभा या सभेत हाताळल्या जाणाऱ्या साहित्याबाबत करता येईल. हे जर आधीच करून ठेवले तर सभेमध्ये जे सादर होत असते त्यानुरुप तुम्ही आपल्या विचारांना गति देऊ शकाल. सभेत पहिल्यांदाच ते साहित्य नजरेखालून घालावे लागत आहे व त्यातील माहिती जाणण्याची पराकाष्ठा करावी लागत आहे असे काही अशावेळी घडणार नाही.
६ सेवा सभेतील प्रात्यक्षिके आणि विद्यार्थी भाषणाची दृश्य रचना या गोष्टी वास्तविक, सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या स्थानिक परिस्थितीला अनुलक्षून असल्या पाहिजेत. तुम्हास मिळालेल्या भागाचा सराव चांगला करा. याशिवाय तुमचा पेहराव नीटनेटका असावा की, जो इतरांसाठी चांगला उदाहरणशील ठरू शकेल.
७ चांगल्या तयारीनिशी सिद्ध असणारे भाग उत्साहपूर्ण रितीने सादर करण्याचे ध्येय ठेवा. पालकांनो, तुमच्या मुलांची तयारी करण्यात व जेव्हा उत्तर द्यायला संधि मिळते तेव्हा ते ती स्वतःच्या शब्दात देता येण्यासाठी त्यांची तयारी करा. खरेच, सर्वांनी वेळेवर येण्याचा आणि सहभाग घेण्याचा वैयक्तीक कयास बांधला तर मग आमच्या सभेत सादर होणारे सर्व भाग महत्त्वपूर्ण रितीने व कार्यवाहित पद्धतीने हाताळले जातील की ज्याद्वारे सर्व सभागृहाचे लक्ष खेचून धरले जाईल. याबाबतीत तुम्हाला स्वतःचा सहभाग पूर्ण करता येईल का की, ज्याद्वारे तुम्हाखेरीज जे इतर उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी “सर्व काही उन्नतीसाठी” होऊ शकेल?—१ करिंथकर १४:२६.