वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९० पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • मंडळीच्या नवीन सभेचा आराखडा
    आमची राज्य सेवा—२००८
  • उत्तेजन मिळवणे व देणे
    आमची राज्य सेवा—२००७
  • फिरते देखरेखे सत्यातील सहकारी
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ६/९० पृ. २

प्रश्‍न पेटी

● विभागीय देखरेख्यांच्या भेटीच्या वेळी पुस्तक अभ्यासाच्या दिवशी होणाऱ्‍या खास सभेत कोणता क्रम अनुसरण्यास हवा?

विभागीय देखरेख्यांच्या भेटी दरम्यान, पुस्तक अभ्यास होणाऱ्‍या दिवशी जी खास सभा होते त्यासाठी सबंध मंडळीला राज्य सभागृहात एकत्र केले जाते. या सभेतील “शिकलेल्या गोष्टी दृढ धरुन राहा” या शिर्षकाखाली शास्त्रवचनीय तसेच संस्थेविषयीच्या माहितीची चर्चा होते. तसेच यावेळी विभागीय देखरेख्यांचे एक सेवा-भाषण होते. ही सभा गुरुवारी किंवा शुक्रवारी सायंकाळी होते.

सभेची सुरवात गीत व प्रार्थनेकरवी होते व मग एक वडील ४५ मिनिटांचा मंडळीचा पुस्तक अभ्यास घेतो. येथे, नियमित पुस्तक अभ्यासाच्या वेळी होते तसेच नेमलेल्या वेळेत सर्व परिच्छेदांचे वाचन होऊन आठवड्यासाठी नेमून दिलेला सर्व भाग पूर्ण करायचा प्रयत्न होण्यास हवा. हा पुस्तक अभ्यास झाल्यावर आणखी एक गीत होते. यानंतरच्या ३० मिनिटांसाठी विभागीय देखरेखे “शिकलेल्या गोष्टी दृढ धरुन राहा” हा भाग हाताळतात. यानंतर ते खासपणे मंडळीच्या गरजांना अनुलक्षून असणारे सेवा भाषण ३० मिनिटांसाठी देतात. या सेवा भाषणात ते मंडळीची उबदार प्रशंसा करतात आणि मंडळीची उभारणी होण्यासाठी सूचना सादर करतात व बंधूंना राज्य सेवेत दृढ राहण्याचे उत्तेजन देतात.

सभेची समाप्ती गीत व प्रार्थनेने होते. येथे गाण्यात येणारी सर्व गाणी विभागीय देखरेख्यांनी निवडावीत. गीत व प्रार्थनांसह असणारा हा एकंदर कार्यक्रम दोन तासांच्या पुढे जाऊ नये.

१९७७ मध्ये स्थापण्यात आलेल्या या व्यवस्थेने विभागीय देखरेख्यांच्या भेटीदरम्यान खासपणा आणला, त्याने सबंध मंडळीला फायदा दिला आणि यहोवाच्या संस्थेमार्फत आयोजलेल्या या खास तरतुदीस उपस्थित राहून त्यात भाग घेणाऱ्‍या वैयक्‍तीक प्रचारकांना सुद्धा मोठा लाभ दिला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा