वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ८/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • न्यायाचा दिवस—म्हणजे काय?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाचा न्यायाचा दिवस —त्याचा आनंदी परिणाम!
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा कसा असू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ८/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

अलीकडील टेहळणी बुरूज अंकावर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला आहे का? असल्यास, खालील गोष्टींना उजाळा देणे तुम्हाला मनोरंजक वाटेल:

◻ पूर्वनियोजनाचा सिद्धान्त अयोग्य का आहे?

आदाम पाप करील याचे देवाला पूर्वज्ञान असते, तर मानवाला निर्माण केले तेव्हा तोच पापाची सुरवात करणारा ठरला असता आणि सर्व मानवी दुष्टता आणि दुःख यांच्यासाठी तो जबाबदार ठरला असता. या गोष्टीचा, यहोवा प्रीतीचा देव असून त्याला दुष्टतेचा वीट आहे या वास्तविकतेशी मेळ बसत नाही. (स्तोत्र ३३:५; नीतिसूत्रे १५:९; १ योहान ४:८)—४/१५, पृष्ठे ७, ८.

◻ यशया २:२-४ च्या पूर्णतेत अनेक राष्ट्रांतील लोक काय करत आहेत?

ही राष्ट्रे देवाच्या मंदिराकडे येतात तेव्हा ती ‘युद्धकला शिकण्याचेही’ सोडून देतात कारण त्यांनी त्यांचा विश्‍वास देवाच्या स्वर्गीय सैन्याच्या संरक्षणावर ठेवला आहे जे शांतीच्या शत्रूंना नाश करण्यासाठी सज्ज आहे.—४/१५, पृष्ठ ३०.

◻ योएल ३:१०, ११ येथे सांगण्यात आलेले देवाचे वीर कोण आहेत?

बायबलमध्ये सुमारे २८० वेळा खऱ्‍या देवाला ‘सेनाधीश परमेश्‍वर’ असे संबोधण्यात आले आहे. (२ राजे ३:१४) हे स्वर्गातील शक्‍तिशाली स्वर्गदूतीय सैन्य आहे; यहोवा त्यांना जे सांगतो त्याप्रमाणे करण्यासाठी ते सदैव तयार असतात.—५/१, पृष्ठ २३.

◻ ईयोबाविरुद्ध पाप करणाऱ्‍यांच्यावतीने त्याने प्रार्थना करावी अशी यहोवाने त्याच्याकडून जी अपेक्षा केली त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? (ईयोब ४२:८)

ईयोबाची तब्येत सुधारण्याआधी, त्याच्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांकरता त्याने प्रार्थना करावी अशी यहोवाने त्याच्याकडून अपेक्षा केली. यावरून हे स्पष्ट होते, की आपली पातके क्षमा होण्याआधी आपण इतरांची पातके क्षमा करावीत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (मत्तय ६:१२; इफिसकर ४:३२)—५/१, पृष्ठ ३१.

◻ “धीराला आपले कार्य करू द्या,” असे याकोबाने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? (याकोब १:४)

धीराला काहीतरी करायचे आहे अर्थात, “कार्य.” आपल्याला प्रत्येक क्षेत्रात परिपूर्णता प्राप्त करून देणे हे धीराचे कार्य आहे. यास्तव, परीक्षांना कोणत्याही अशास्त्रवचनीय पद्धतीने संपुष्टात आणण्याऐवजी त्यांस पूर्ण होऊ दिल्याने आपल्या विश्‍वासाची पारख होते आणि त्यात सुधारणाही होते.—५/१५, पृष्ठ १६.

◻ मानवाच्या समस्या काढून टाकण्यासाठी देव अद्याप का थांबून आहे?

वेळेच्या बाबतीत देवाचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. आदामाची उत्पत्ती केल्यापासून आतापर्यंतचा काळ सनातन देवाकरता एका आठवड्याचाही नाही. (२ पेत्र ३:८) परंतु वेळेच्या बाबतीत आपला कोणताही दृष्टिकोन असता तरी भूतकाळात जमा होणारा प्रत्येक दिवस आपल्याला यहोवाच्या दोषनिवारणाच्या दिवसाच्या आणखी जवळ नेतो.—६/१, पृष्ठे ५, ६.

◻ यहोवाच्या साक्षीदारांना कशामुळे प्रेरणा मिळते?

यहोवाच्या शिक्षणामुळे अनन्य लोक तयार झाले आहेत, स्वतःप्रमाणे एकमेकांवर आणि आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्यास त्यांना शिकवले जाते. (यशया ५४:१३) लोक त्यांच्या संदेशाला प्रतिसाद देत नाहीत किंवा त्यांचा विरोध करतात तेव्हा देखील त्यांना प्रचार करत राहण्यास प्रेम यहोवाच्या साक्षीदारांना प्रवृत्त करते. (मत्तय २२:३६-४०; १ करिंथकर १३:१-८)—६/१५, पृष्ठ २०.

◻ “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा;” येशूचे असे म्हणण्याचे काय तात्पर्य होते? (लूक १३:२४)

येशूच्या शब्दांतून संघर्ष करण्याचा, झटण्याचा अर्थ सूचित होतो. त्याच्या शब्दांवरून असेही सूचित होते, की काहीजण आपल्याच सोयीनुसार, आपल्याला मानवेल त्याप्रमाणे “दरवाजाने आत जाण्याचा” प्रयत्न करतात. म्हणून आपल्यांतील प्रत्येकजण स्वतःला विचारू शकतो, ‘मी मेहनत, कष्ट करण्याचा प्रयत्न करतो का?’—६/१५, पृष्ठ ३१.

◻ पुनरुत्थित लोकांचा ‘न्याय पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ कशाप्रकारे करण्यात येईल? (प्रकटीकरण २०:१२)

हे पुस्तक त्यांच्या पूर्व कर्मांची नोंद ठेवणारे पुस्तक नाही; हे लोक मरण पावले तेव्हाच त्यांच्या आयुष्यभरात केलेल्या पापांतून दोषमुक्‍त झाले आहेत. (रोमकर ६:७, २३) परंतु, पुनरुत्थित मानव तरीसुद्धा आदामाच्या पापाच्या ओझ्याखाली राहतील. आणि तेव्हा, ही पुस्तके ईश्‍वरी सूचना देतील ज्यांचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे जेणेकरून त्यांना येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा पूर्ण फायदा मिळू शकेल.—७/१, पृष्ठ २२.

◻ चांगला शोमरोनी, या येशूच्या दाखल्यात आपल्याकरता कोणते धडे आहेत? (लूक १०:३०-३७)

येशूचा दाखला दाखवून देतो, की खरा प्रामाणिक मनुष्य देवाच्या नियमांचे केवळ पालनच करीत नाही तर त्याचे गुणही प्रदर्शित करतो. (इफिसकर ५:१) हा दाखला हेही दाखवून देतो, की आपला शेजारधर्म राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा यांपासून मुक्‍त असण्यास हवा. (गलतीकर ६:१०)—७/१, पृष्ठ ३१.

◻ कोणत्या तीन क्षेत्रांत तुमच्या मुलांना समजून घेऊन त्यांना पालकीय मार्गदर्शन पुरवण्याची गरज आहे?

(१) उचित प्रकारचा व्यवसाय निवडण्यास आपल्या मुलांना मदत करा; (२) शाळेत आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्‍या मानसिक ताणावर मात करण्याकरता त्यांना तयार करा; (३) स्वतःच्या आध्यात्मिक गरजा कशा पूर्ण करायच्या ते त्यांना दाखवा.—७/१५, पृष्ठ ४.

◻ “सातव्या दिवशी” देवाने विसावा कोणत्या उद्देशाने घेतला? (उत्पत्ति २:१-३)

थकवा आल्यामुळे देवाने विसावा घेतला नाही. उलटपक्षी, निर्मिलेली सृष्टी वाढत जाऊन पूर्ण गौरवात यावी आणि त्याकरवी तो आराधला जावा, गौरविला जावा यासाठी त्याने पृथ्वीसंबंधीचे कार्य थांबवले होते.—७/१५, पृष्ठ १८.

◻ आपण न्यायाने वागू शकतो अशा तीन गोष्टी कोणत्या आहेत?

पहिली गोष्ट म्हणजे, आपण देवाच्या नैतिक दर्जांनुरूप वागले पाहिजे. (यशया १:१७) दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने आपल्याला जसे वागवावे, असे आपल्याला वाटते तसे आपण इतरांना वागवतो तेव्हा आपण न्यायानुसार चालत असतो. (स्तोत्र १३०:३, ४) तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण प्रचारकार्यात प्रामाणिकपणे सहभाग घेतो तेव्हा आपण ईश्‍वरी न्याय प्रदर्शित करत असतो. (नीतिसूत्रे ३:२७)—८/१, पृष्ठे १४, १५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा