राज्य घोषकांचा वृत्तान्त
आर्यलंडमध्ये बायबल सत्यांचा प्रचार चालूच आहे
अलीकडील वर्षांमध्ये प्रेक्षणीय आयर्लंड देश बऱ्याचशा गोंधळाचे रंगमंच बनले आहे. त्यासोबतच, आईरिश लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांद्वारे त्यांच्याकडे आणलेल्या बायबलमधील आशेच्या संदेशाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. आयर्लंडमधील पुढील अनुभव याची पुष्टी देतात:
▪ डब्लिनमध्ये यहोवाचा एक साक्षीदार आपल्या लहान मुलीसोबत दारोदारचे प्रचार कार्य करीत होता. त्यांची गाठ कॅथी नामक एका स्त्रीसोबत पडली जी आपल्या मुलांमध्ये अतिशय व्यग्र होती. साक्षीदाराने तिला विचारले, आपल्या मुलीने तिला एक संक्षिप्त संदेश सांगितला तर चालेल का. ही मुलगी प्रचार करण्यास शिकत होती. कॅथी कबूल झाली आणि त्या लहान मुलीने सुस्पष्ट आणि योग्यप्रकारे विचार करून प्रस्तुती सादर केली. या लहान मुलीची स्पष्ट प्रामाणिकता व आदर पाहून कॅथी प्रभावित झाली आणि तिने दिलेली बायबल पत्रिका स्वीकारली.
नंतर कॅथीने तिला भेट देणाऱ्या त्या मुलीच्या चांगल्या तयारीचा व शिष्टाचाराचा विचार केला. ती म्हणाली, “एक लहान मुलगी खूपच प्रौढ असल्यासारखे न वागताही इतका चित्तवेधक संदेश सांगू शकते हे पाहून मी प्रभावित झाले. तेव्हा मी निर्धार केला, की पुढच्या वेळी जेव्हा यहोवाचे साक्षीदार माझ्याकडे येतील तेव्हा मी त्यांचे नक्की ऐकून घेईन.”
कालांतराने, कॅथी कॉर्क व केरीच्या परगण्याच्या सीमेजवळ नैर्ऋत्य आयर्लंड येथील एका लहानशा नगरात राहायला गेली. काही दिवसांनंतर, यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आले तेव्हा तिने त्यांना आत बोलावले. तिने एक नियमित बायबल अभ्यास स्वीकारला आणि आता आपल्या अनेक मुलांसोबत ती मंडळीच्या सभांना उपस्थित राहते. त्या लहान मुलीने कॅथीला सुवार्ता सांगण्याची प्रामाणिक इच्छा दाखवल्याबद्दल ती तिचे आभार मानते.
▪ टुल्लामोरच्या क्षेत्रात, साक्षीदारांनी जेन नामक स्त्रीबरोबर सुमारे सात वर्षांच्या कालावधीपर्यंत बायबल चर्चा केल्या. कधीकधी ती आवड दाखवून साहित्य घेत असे, पण इतर वेळी तिची आस्था क्षीण झाली. एके दिवशी, फ्रान्सेस आणि दुसरी एक साक्षीदार जेनला भेटल्या, पण ती तेव्हा चांगल्या मनस्थितीत नसल्याचे या दोघींना आढळून आले. साक्षीदार बहिणींने सांगितले, “आम्ही जेनला काही जरी बोललो तरी ती चिडत होती. शेवटी अगदी उर्मटपणे तिने आम्हाला घराबाहेर जाण्यास सांगितले व जोराने दार आपटले.”
फ्रान्सेसला वाटू लागले, की पुढील भेटींमध्येही ती त्यांना अशीच वागवते की काय. ‘तिला संदेशामध्ये खरोखरच आस्था नसल्यास तिच्याकडे पुन्हा जाणे कदाचित आता उचित नाही’ असा फ्रान्सेसने विचार केला. तथापि तिने ही बाब आपला पती, थॉमससोबत चर्चिली मात्र तो याबद्दल आशादायक होता. पुढील वेळी ते त्या भागात गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जेनला भेट दिली. यावेळेस ती स्नेही होती आणि तिने टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकाच्या प्रती स्वीकारल्या. त्यानंतरच्या भेटी अतिशय सुखावह होत्या, तसेच फ्रान्सेस व थॉमसने तिच्याबरोबर एक नियमित बायबल अभ्यास चालू केला.
एवढा बदल? जेनने स्पष्टीकरण दिले, की साक्षीदार जेव्हा तिच्या घरी आले व ती त्यांच्यासोबत उद्धटपणे बोलली तेव्हा ती नुकतीच बाळंत होऊन हॉस्पिटलमधून घरी आली होती. तिला तिच्या नवजात बाळाला अंगावर पाजावे लागत होते; आधीच्या बाळाला चमच्याने भरवावे लागत होते त्यामुळे रात्री तिला फक्त एक दीड तास झोप मिळत असे. ती पुढे म्हणते, “आणि शेवटी काय तर धर्मांविषयी बोलणे.”
दोन महिन्यांच्या आत, जेन मंडळीच्या सभांना उपस्थित राहू लागली, आणि चार महिन्यांत ती क्षेत्र सेवेत भाग घेऊ लागली. बायबलचा अभ्यास चालू करून दहा महिन्यांनंतर तिचा बाप्तिस्मा झाला. आता जेनचा स्वतःचा अनुभव तिला सेवेत मदत करतो. ती कथन करते: “माझ्याशी कोणी उद्धटपणे बोलल्यास मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. मी नेहमी त्याबद्दल लिहून ठेवते. पुढच्या वेळी मी जाईन तेव्हा कदाचित परिस्थितीत बदल होईल; त्या व्यक्तीला बरे वाटत असेल व ती अधिक ग्रहणशील असेल.”