“अशांना मान द्या”
करिंथ मंडळीमध्ये सर्व काही सुरळीत चालले नव्हते. अनैतिकतेची एक धक्कादायक घटना तेथे घडली होती आणि बांधवांमध्ये फुटी होत्या. काही जण गंभीर व्यक्तिगत समस्यांचा सामना करत होते किंवा त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवे होती. काही बांधव एकमेकांना कोर्टात खेचत होते; इतर आणखी तर पुनरुत्थान नाकारत होते.
त्यासोबतच गंभीर प्रश्न देखील उद्भवले. धार्मिक विश्वासामुळे विभाजित झालेल्या घरांमध्ये सत्यात नसलेल्या आपल्या सोबत्याशी राहावे की विभक्त व्हावे? मंडळीमध्ये भगिनींची भूमिका कोणती होती? मूर्तीला अर्पिलेले मांस खाणे उचित होते का? सभा तसेच प्रभूचे सांजभोजन कसे चालवले जावे?—१ करिंथकर १:१२; ५:१; ६:१; ७:१-३, १२, १३; ८:१; ११:१८, २३-२६; १४:२६-३५.
यात काही शंका नाही, की अशा त्रस्त आध्यात्मिक वातावरणात राहणाऱ्या आपल्या बांधवांच्या कल्याणाची चिंता लागलेले आखायिक, फर्तूनात व स्तेफना, इफिसमध्ये असणाऱ्या पौलाची भेट घेण्यासाठी प्रवासाला निघाले. अशा धक्कादायक बातमीसोबत त्यांच्याकडे कदाचित, पौलाला देण्याकरता मंडळीकडून एक पत्र असावे ज्यामध्ये या वादविषयांवर असलेले प्रश्न होते. (१ करिंथकर ७:१; १६:१७) उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असे सांगता येते की केवळ या तीन बांधवांनाच परिस्थितीची चिंता लागली होती असे नाही. वास्तविक पाहता, पौलाला “ख्लोवेच्या माणसांकडून,” मंडळीच्या सदस्यांमध्ये फुटी होत्या, याची आधीच बातमी मिळाली होती. (१ करिंथकर १:११) निःशंक, या तीन बांधवांकडून आलेल्या संदेशामुळे पौलाला परिस्थितीची आणखी स्पष्ट समज मिळण्यास, कोणता सल्ला द्यावा याचा निर्णय घेण्यास व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत मिळाली. असे दिसते, की आपण ज्याला पहिले करिंथ म्हणतो ते पौलाचे, देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला मार्गदर्शित केलेले उत्तर आहे. आखायिक, फर्तूनात व स्तेफना, यांनी कदाचित मंडळीला हे पत्र दिले असावे.
आखायिक, फर्तूनात व स्तेफना, हे होते तरी कोण? शास्त्रवचने त्यांच्याविषयी जे काही सांगतात त्याचा अभ्यास केल्यावर त्यातून आपण काय शिकू शकतो?
स्तेफनाचे घराणे
स्तेफनाचे घराणे, दक्षिण ग्रीस, रोमच्या प्रांताच्या अखयातील सा. यू. ५० या वर्षी पौलाच्या सेवेचे “प्रथमफळ” होते व त्यांना स्वतः पौलाने बाप्तिस्मा दिला होता. स्पष्टतः, पौलाने त्यांना करिंथकरांसाठी एक उदाहरण, प्रौढ स्थिर प्रभाव असे मानले. मंडळीकरिता त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्याने त्यांची अशी ऊबदारपणे प्रशंसा केली: “बंधुजनहो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; ते अखयाचे प्रथमफळ आहे आणि त्यांनी आपणांस पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करितो व श्रम करितो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करितो.” (१ करिंथकर १:१६; १६:१५, १६) स्तेफनाच्या ‘घराण्यात’ नक्की कोण कोण होते हे सांगितलेले नाही. या अभिव्यक्तीचा सरळ अर्थ कौटुंबिक सदस्य असा होऊ शकतो पण त्यामध्ये दास किंवा कामगार यांचाही समावेश होऊ शकतो. आखायिक हे लॅटिन नाव खासकरून एका दासासाठी व फर्तूनात हे खासकरून एका स्वतंत्र मनुष्यासाठी असले तरीसुद्धा काही विवेचनकर्ते असा तर्क करतात, की हे दोघे कदाचित एकाच घराण्यातील सदस्य असावेत.
असो, पौलाने स्तेफनाच्या घराण्याला उदाहरणीय समजले. त्यातील सदस्यांनी स्वतःला “पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले” होते. स्तेफनाच्या कुटुंबाने कदाचित हे जाणले असावे, की मंडळीच्या भल्यासाठी त्यांनी कार्य केले पाहिजे आणि म्हणून त्यांनी ही सेवा व्यक्तिगत जबाबदारी या नात्याने स्वेच्छेने स्वीकारली. पवित्र जनांची अशाप्रकारे सेवा करण्याची त्यांची इच्छा नक्कीच नैतिक पाठिंबा व मान्यतेला पात्र होती.
“त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे”
करिंथमधील परिस्थितीची पौलाला चिंता लागली होती तरीदेखील, तीन संदेशवाहकांच्या आगमनामुळे त्याची उभारणी होऊ शकली. पौल म्हणतो: “स्तेफना, फर्तूनात व आखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे.” (१ करिंथकर १६:१७, १८) करिंथमधील परिस्थितींचा विचार करताना, करिंथकरांपासून शारीरिकरीत्या वेगळे होण्यामुळे पौलाला चिंता लागली असावी, पण आता त्यांच्या दूतांच्या उपस्थितीने संपूर्ण मंडळीच्या अनुपस्थितीची उणीव भरून काढली. त्यांच्याकडून आलेल्या बातमीने कदाचित, पौलाला परिस्थितीविषयी पूर्ण माहिती मिळाली असावी व काही प्रमाणात त्याच्या मनातून भीती गेली असावी. नाही तरी, त्याने जसा विचार केला होता त्या इतकी परिस्थिती बिकट झालेली नव्हती.
पौलानुसार, या तीन संदेशवाहकांच्या कार्याने केवळ त्याच्या आत्म्यास हुरूप आणला नाही तर करिंथमधील मंडळीच्या आत्म्याची सुद्धा उभारणी केली. आपल्या दूतांनी परिस्थितीचे अगदी सविस्तर वर्णन दिले व त्याचा सल्ला घेऊनच ते परततील हे माहीत झाल्याने ते चिंतामुक्त झाले यात काही शंका नाही.
यास्तव, स्तेफना आणि त्याच्या इतर दोन साथीदारांची, करिंथकरांसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमासाठी ऊबदारपणे प्रशंसा करण्यात आली. या माणसांबद्दल पौलाने दाखवलेली गुणग्राहकता अशा प्रकारे होती, की त्यांनी विभागलेल्या करिंथमधील मंडळीत नेतृत्व करावे. प्रेषित या बांधवांना आर्जवतो: “अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करितो व श्रम करितो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करितो. . . . तुम्ही अशांना मान द्या.” (१ करिंथकर १६:१६, १८) या जोरदार शिफारशींवरून, मंडळीत तणाव असूनसुद्धा या पुरुषांची पूर्ण निष्ठा स्पष्टपणे सूचित होते. अशा प्रकारच्या लोकांना प्रिय मानले पाहिजे.—फिलिप्पैकर २:२९.
विश्वासू सहकार्यामुळे उत्तम प्रतिफळे मिळतात
यहोवाच्या संघटनेसोबत आणि त्याच्या प्रतिनिधींसोबत निकट सहकार्यामुळे उत्तम प्रतिफळे मिळतात यात काही शंका नाही. पहिल्या पत्रानंतर लगेचच पौलाने जेव्हा, आता ज्ञात असलेले दुसरे करिंथकर हे पत्र लिहिले तेव्हा मंडळीमधील परिस्थितीत आधीच थोडीफार सुधारणा झाली होती. आखायिक, फर्तूनात व स्तेफना यांसारख्या बांधवांच्या निरंतर व सहनशील कार्यामुळे तसेच तीताच्या भेटीमुळे चांगले परिणाम घडले होते.—२ करिंथकर ७:८-१५; पडताळा प्रेषितांची कृत्ये १६:४, ५.
यहोवाच्या लोकांच्या आधुनिक दिवसांतील मंडळ्यांचे सदस्य, शास्त्रवचनातील या विश्वासू पुरुषांच्या संक्षिप्त उल्लेखावर मनन करून लाभ मिळवू शकतात. उदाहरणार्थ समजा, स्थानिक मंडळीमध्ये एखाद्या रेंगाळणाऱ्या परिस्थितीचे निरसन काही कारणामुळे लगेचच करता येत नाही व त्यामुळे बांधव चिंतीत आहेत. अशा वेळी काय केले पाहिजे? आखायिक, फर्तूनात व स्तेफना यांच्या उदाहरणाचे अनुकरण करा. त्यांनी परिस्थितीविषयी पौलाला सांगण्यासाठी त्यांच्या जबाबदारीपासून माघार घेतली नाही. त्यानंतर पूर्ण भरवशाने सर्वकाही यहोवाच्या हाती सोपवून द्या. त्यांनी कदापी धार्मिकतेच्या आवेशाला, त्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्यास किंवा “परमेश्वरावर रुष्ट” होण्यास अनुमती दिली नाही.—नीतिसूत्रे १९:३.
मंडळ्या या येशू ख्रिस्ताच्या मालकीच्या आहेत, व करिंथप्रमाणे तो त्याच्या नियुक्त वेळी, त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाला व शांतीला धोका असलेल्या कोणत्याही अडचणींचे निरसन करण्यास कार्य करील. (इफिसकर १:२२; प्रकटीकरण १:१२, १३, २०; २:१-४) या वेळेपावेतो, स्तेफना, फर्तूनात व आखायिक यांच्या उत्तम उदाहरणाचे अनुसरण केल्यास व आपल्या बांधवांची सेवा करत राहिल्यास, आपणही मंडळीच्या व्यवस्थेला निष्ठेने पाठिंबा देणारे असू, आपल्या बांधवांची उभारणी करणारे, “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देणारे असू.—इब्री लोकांस १०:२४, २५.