वाचकांचे प्रश्न
पार्थिव आशा असलेल्या आजच्या देवाच्या सेवकांकडे अभिषिक्त ख्रिश्चनांसारखाच देवाचा आत्मा आहे, असे आपण म्हणू शकतो का?
हा प्रश्न काही नवखा नाही. एप्रिल १५, १९५२ च्या द वॉचटावर मध्ये, “वाचकांचे प्रश्न” या सदराखाली हीच बाब हाताळण्यात आली होती. तेव्हापासून अनेक जण साक्षीदार झाले आहेत, यास्तव आपण या प्रश्नावर पुनर्विचार करू आणि असे करत असताना पहिल्या सदराने काय म्हटले त्याची उजळणी करू या.
मूलतः, त्याचे उत्तर होय, असे आहे. दुसऱ्या मेंढरांतील विश्वासू बंधू आणि भगिणी अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत समभावाने देवाचा पवित्र आत्मा प्राप्त करू शकतात.—योहान १०:१६.
अर्थात याचा अर्थ, आत्मा सर्वांवर एकाच प्रकारे कार्य करतो असे नाही. ख्रिस्त पूर्व काळांतील विश्वासू सेवकांचा विचार करा ज्यांना खरोखरच देवाचा आत्मा मिळाला होता. आत्म्याकडून मिळालेल्या सामर्थ्यामुळे काहींनी हिंस्र श्वापदांना ठार मारले, रोग्यांना बरे केले आणि मृतांना देखील जिवंत केले. शिवाय बायबलची प्रेरित पुस्तके लिहिण्यासाठी त्यांना आत्म्याची आवश्यकता होती. (शास्ते १३:२४, २५; १४:५, ६; १ राजे १७:१७-२४; २ राजे ४:१७-३७; ५:१-१४) द वॉचटावर ने म्हटले: “हे अभिषिक्त वर्गाचे नसले तरीसुद्धा ते पवित्र आत्म्याने भरले.”
एका दुसऱ्या दृष्टिकोनातून, पवित्र आत्म्याने अभिषिक्त झालेल्या व स्वर्गीय आशा असलेले देवाचे आध्यात्मिक पुत्र झालेल्या पहिल्या शतकातील पुरुष आणि महिलांचा विचार करा. सर्वांचा अभिषेक झाला होता परंतु याचा अर्थ पवित्र आत्मा तेथून पुढे सर्वांवर एकाच प्रकारे कार्य करीत होता असे नाही. ही गोष्ट १ करिंथकर च्या १२ अध्यायात स्पष्ट होते. तेथे प्रेषित पौलाने आत्म्याच्या देणग्यांविषयी चर्चा केली आहे. आपण ८, ९ आणि ११ वचनात ह्याप्रमाणे वाचतो: “कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने . . . तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करितो; तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.”
महत्त्वाची गोष्टी म्हणजे, तेव्हाच्या सर्वच अभिषिक्त जनांना आत्म्याच्या अद्भुत देणग्या मिळालेल्या नव्हत्या. १ करिंथकर अध्याय १४ मध्ये पौलाने मंडळीच्या एका सभेचा उल्लेख केला आहे जिला अन्य भाषा बोलण्याची देणगी होती, पण तेथे उपस्थित असलेल्या एकालाही भाषांतर करण्याची देणगी नव्हती. तरीसुद्धा, आधीच्या एका प्रसंगी, प्रत्येकाने आत्म्याने अभिषिक्त होण्याचा अनुभव घेतला होता. अन्य भाषा बोलण्याची देणगी असलेल्या बांधवाकडे उपस्थित असलेल्या इतरांपेक्षा जादा आत्मा होता असे म्हणणे तर्कशुद्ध ठरेल का? नाही. ते इतर अभिषिक्त लोक वंचित नव्हते, जणू काय ते बायबलचा अर्थ समजू शकत नव्हते तसेच परीक्षांना तोंड देऊ शकत नव्हते. अन्य भाषा बोलू शकणाऱ्या बांधवावर आत्मा एका खास तऱ्हेने कार्य करीत होता. तरीदेखील, त्याला आणि त्यांना यहोवाच्या समीप राहण्याची व पौलाने लिहिल्याप्रमाणे “आत्म्याने परिपूर्ण” होण्याची गरज होती.—इफिसकर ५:१८.
आजच्या शेषांच्या बाबतीत पाहता, त्यांच्याकडे निश्चितच देवाचा पवित्र आत्मा आहे. जेव्हा त्यांचा अभिषेक झाला होता व आध्यात्मिक पुत्र या नात्याने त्यांना दत्तक घेण्यात आले होते तेव्हा—एकेप्रसंगी पवित्र आत्म्याने त्यांच्यावर एका खास तऱ्हेने कार्य केले. त्यानंतर, ते “आत्म्याने परिपूर्ण” होत राहतात, त्यांना बायबलची आणखी स्पष्ट समज मिळण्यास, प्रचार कार्यात पुढाकार घेण्यास, व्यक्तिगत किंवा संघटने संबंधित परीक्षांना तोंड देण्यास मदत मिळत राहते.
परंतु ‘दुसऱ्या मेंढरातील’ सदस्यांनी अभिषिक्त होणे अनुभवले नसले तरी इतर क्षेत्रांमध्ये त्यांनाही पवित्र आत्मा मिळतो. एप्रिल १५, १९५२ च्या द वॉचटावर ने निरीक्षले:
“‘दुसरी मेंढरे’ आज शेषांप्रमाणे तेच प्रचार कार्य, त्यांच्यासारख्या कठिण परिस्थितींत करतात व तोच विश्वासूपणा आणि तीच निष्ठा प्रदर्शित करतात. ते त्याच आध्यात्मिक मेजावरील भोजन खातात, एकाचप्रकारचे अन्न खातात, एकाच प्रकारचे सत्य आत्मसात करतात. पार्थिव वर्गाचे, पार्थिव आशा व पार्थिव गोष्टींमध्ये अधिक रस असल्यामुळे ते कदाचित नवीन जगात पार्थिव परिस्थितींशी संबंधित असलेल्या शास्त्रवचनांमध्ये आस्था घेतील; पण त्याऐवजी, स्वर्गीय आशा असलेले व आत्म्याच्या गोष्टींमध्ये तीव्र व्यक्तिगत आस्था असलेले अभिषिक्त शेष देवाच्या वचनातील आत्मिक गोष्टींचा अधिक तत्परतेने अभ्यास करतील. . . . तरीही वस्तुस्थिती हीच आहे, की एकाच प्रकारची सत्ये आणि एकाच प्रकारची समज दोन्ही वर्गांच्या लोकांसाठी उपलब्ध आहे आणि त्यांना मिळत असलेल्या स्वर्गीय व पार्थिव गोष्टींची समज हे त्या व्यक्ती स्वतःला अभ्यासात कितपत गोवतात यावरून केवळ ठरवले जाते. प्रभूचा आत्मा दोन्ही वर्गांच्या लोकांकरता समप्रमाणात उपलब्ध आहे व ज्ञान आणि समज दोघांना समानतेने सादर केली जाते तसेच आत्मसात करण्यासाठी समानतेने संधी दिल्या जातात.”