वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ८/१ पृ. ४-७
  • पुढे सुकाळ आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुढे सुकाळ आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अन्‍नटंचाई भाकीत करण्यात आली
  • यहोवाने त्याच्या लोकांची गतकाळात काळजी घेतली
  • आज देव त्याच्या सेवकांना आधार देतो
  • पुढे सुकाळ आहे
  • गरीब तरीही श्रीमंत—ते कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • खरी सुरक्षितता आज व सर्वदा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • धावा करणाऱ्‍यांना कोण सोडवू शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ८/१ पृ. ४-७

पुढे सुकाळ आहे

“आम्हाला सकाळी व संध्याकाळी जेवायला मिळते,” असे एक स्त्री म्हणते. “पण आमचे तर याहीपेक्षा वाईट आहे,” तिची मैत्रिण तिला म्हणते. “मला केवळ संध्याकाळचेच जेवण मिळते.”

दक्षिण आफ्रिकेतील काही भागांत अशा प्रकारे होत असलेल्या संभाषणाला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. दिवसातून तीनदा (सकाळ-दुपार-संध्याकाळ) जेवण्याऐवजी जो केवळ सकाळी व संध्याकाळी जेवू शकतो तो केवळ दोनदा—एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी—जेवतो. पण केवळ संध्याकाळी जेवण करणारा एक माणूस आपली स्थिती अशी सांगतो: “मी एकदाच जेवतो. मी माझा फ्रीज पाण्याने भरतो. रात्री झोपण्यापूर्वी गॉरी [कंदमुळे] खातो. अशा प्रकारे मी दिवस काढत आलो आहे.”

आज अधिकाधिक लोकांची अशी दैन्यावस्था होत आहे. किंमती वाढतात व पैसे अपुरे पडू लागतात.

अन्‍नटंचाई भाकीत करण्यात आली

आज कित्येकांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या कठीण परिस्थितींचे भाकीत देवाने प्रेषित योहानाला एका दृश्‍याच्या मालिकेद्वारे दिले. यापैकीची एक स्थिती अन्‍नटंचाई असणार होती. योहान सांगतो: “मी पाहिले तो एक काळा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातांत तराजू होते.” (प्रकटीकरण ६:५) अनिष्टसूचक घोडा व त्याचा स्वार, दुष्काळ—अन्‍नाची अतिशय टंचाई असेल व ते तराजूने तोलून देण्यात येईल—याचे चित्र देतो.

प्रेषित योहान पुढे म्हणतो: “आणि . . . वाणी मी ऐकली, ती अशी: ‘रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्‍यांची खराबी करू नको.’” योहानाच्या काळी, शेरभर गहू एका सैनिकाची दिवसाची शिधा होती आणि पावली ही दिवसभराच्या कामाची मजूरी होती. यामुळेच रिचर्ड वेमाऊथ यांचे या वचनाचे भाषांतर असे म्हणते: “एका भाकरीसाठी सबंध दिवसाचा पगार व तीन जवाच्या भाकऱ्‍यांकरता सबंध दिवसाचा पगार.”—प्रकटीकरण ६:६.

आज एका दिवसाचा पगार किती आहे? जगाच्या लोकसंख्येची स्थिती, १९९४ (इंग्रजी) हा अहवाल परीक्षण करतो: “विकसनशील जगाच्या लोकसंख्येपैकी साधारण ३० टक्के लोक, म्हणजे ११० कोटी लोक दिवसाला एका डॉलरवर जगतात.” अशा प्रकारे, जगातील गरीब लोकांसाठी एका दिवसाचा पगार थोड्या बहुत प्रमाणात, अक्षरश: भाकरीचा तुकडा विकत घेतो.

अर्थातच, याचे अत्यंत गरीब लोकांना काहीच आश्‍चर्य वाटत नाही. “भाकरी!” एक माणूस आश्‍चर्याने उद्‌गारला. “भाकरी कोणास परवडते? सध्या तर भाकरी हा खास प्रसंगीच खाण्यात येणारा अन्‍नपदार्थ आहे!”

उपरोधिकपणे, अन्‍नाचा तुटवडा नाही. संयुक्‍त राष्ट्राच्या मते, गेल्या दहा वर्षांत जगातील अन्‍नाचे उत्पादन २४ टक्क्यांनी वाढले, हे जगातील लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अधिक होते. तथापि, अन्‍नातील ह्‍या वाढीचा सर्वांना उपभोग घेता आला नाही. उदाहरणार्थ, आफ्रिकेत अन्‍नाचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटले, तर लोकसंख्या ३४ टक्क्यांनी वाढली. तेव्हा, साधारणपणे जगभर अन्‍नाची मुबलकता दिसत असली तरी कित्येक राष्ट्रांत अन्‍नटंचाई अस्तित्वात आहे.

अन्‍नटंचाई म्हणजे वाढत्या किंमती. बेकारी, कमी पगार व वाढती महागाई या गोष्टी, जे उपलब्ध आहे त्यांना विकत घेण्याकरता पैसा उपलब्ध करू शकत नाही. मानव विकास अहवाल १९९४ (इंग्रजी) कळवतो: “लोक उपाशी राहतात ते अन्‍न उपलब्ध नाही म्हणून नव्हे—तर त्यांना ते घेता येत नसल्यामुळे.”

या कारणामुळे निराशा, विफलता व औदासिन्य वाढत आहे. “आजची स्थिती लोकांसाठी वाईट आहे, पण उद्या तर ती अधिकच वाईट होईल, असे वाटते,” असे पश्‍चिम आफ्रिकेत राहणाऱ्‍या ग्लोरी नावाच्या स्त्रीने म्हटले. आणखी एक स्त्री म्हणाली: “एक भयंकर संकट जवळ येत आहे असे लोकांना वाटते. त्यांना वाटते, असा एक दिवस येईल जेव्हा बाजारात काहीच दिसणार नाही.”

यहोवाने त्याच्या लोकांची गतकाळात काळजी घेतली

यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांच्या गरजा भागवून व कठीण काळास तोंड देण्यासाठी शक्‍ती देऊन त्यांना प्रतिफळ देतो, हे देवाच्या लोकांना ठाऊक आहे. देवाठायी तरतूद करण्याची क्षमता आहे असा आत्मविश्‍वास त्यांच्या विश्‍वासाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्रीयांस ११:६.

यहोवाने आपल्या विश्‍वासू सेवकांची नेहमीच काळजी घेतली आहे. साडेतीन वर्षांच्या दुष्काळामध्ये यहोवाने एलीया संदेष्ट्याला अन्‍न पुरवले. आरंभाला देवाने एलियाला भाकरी व मांस देण्याची कावळ्यांना आज्ञा केली. (१ राजे १७:२-६) नंतर, एलियाला अन्‍न देणाऱ्‍या विधवेच्या पिठाचा व तेलाचा साठा यहोवाने अद्‌भुतरित्या जतन केला. (१ राजे १७:८-१६) याच दुष्काळात जेव्हा ईजबेल राणीने यहोवाच्या संदेष्ट्यांचा भयंकर धार्मिक छळ चालवला तेव्हा त्यांना भाकरी व पाणी पुरवण्यात आल्याचे त्याने पाहिले.—१ राजे १८:१३.

नंतर बॅबिलोनच्या राजाने धर्मत्यागी जेरूसलेमला वेढा घातला तेव्हा लोकांना ‘कष्टी होऊन भाकरी तोलून खावी’ लागली. (यहेज्केल ४:१६) ही स्थिती इतकी भयंकर झाली की, काही स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या लहान मुलांचे मांस खाल्ले. (विलापगीत २:२०) तथापि, यिर्मया संदेष्टा त्याच्या प्रचारामुळे कैदेत होता तरी “नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज [यिर्मयाला] एक रोटी मिळत” आहे याकडे यहोवाने लक्ष दिले.—यिर्मया ३७:२१.

मग, जेव्हा भाकरीचा साठा संपला तेव्हा यहोवा यिर्मयाला विसरला का? नाही, कारण जेव्हा शहर बॅबिलोन्यांपुढे पडले तेव्हा त्याला “अन्‍नसामग्री, व इनाम देऊन रवाना केले.”—यिर्मया ४०:५, ६; स्तोत्र ३७:२५ देखील पाहा.

आज देव त्याच्या सेवकांना आधार देतो

गतकाळातील पिढ्यांमध्ये यहोवाने त्याच्या सेवकांना सांभाळले तसेच तो आज त्याच्या सवेकांची भौतिक तसेच आध्यात्मिक काळजी घेऊन सांभाळ करतो. उदाहरणार्थ, पश्‍चिम आफ्रिकेत राहणारा लॉमिटुनड याचा अनुभव लक्षात घ्या. तो सांगतो: “माझे कुक्कुट पालनाचे मोठे केंद्र होते. एके दिवशी शस्त्रधारी दरोडेखोर आले व त्यांनी बहुतेक कोंबड्या आणि पर्यायी जनरेटर तसेच आम्हापाशी असणारी रक्कम चोरून नेली. त्यानंतर काही काळातच उरलेल्या कोंबड्या रोगाने मेल्या. यामुळे माझा कुक्कुट पालनाचा धंदा एकदमच बसला. दोन वर्षे मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही यश मिळेना. एकंदर परिस्थिती बिकट होती; पण यहोवाने आम्हाला आधार दिला.

“यहोवा आमचे नैतिक दोष काढून टाकण्याकरता आम्हावर अशा गोष्टी येऊ देण्याची मुभा देतो याची मला जाणीव होती व तिनेच मला कठीण काळाला तोंड देण्यास मदत दिली. मी व माझ्या पत्नीने आमचा बायबल अभ्यासाचा नित्यक्रम जारी ठेवला व यामुळे आम्हाला खरी मदत मिळाली. प्रार्थना देखील शक्‍तीचा मोठा उगम ठरली. कधीकधी वाटे की, प्रार्थना करू नये, पण मी ती करत असे तेव्हा मला अधिक चांगले वाटत असे.

“या कठीण काळातच मला शास्त्रवचनांवर मनन करण्याचे महत्त्व कळले. मी २३ वे स्तोत्र, ज्यात यहोवा आपला मेंढपाळ आहे असे सांगण्यात आले आहे, त्याचा नेहमीच विचार करीत असे. आणखी ज्या एका शास्त्रवचनाने मला उत्तेजन दिले ते फिलिप्पैकर ४:६, ७ आहे, जे ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्‍या देवाच्या शांतीचा’ उल्लेख करते. तसेच १ पेत्र ५:६, ७ मधील उताऱ्‍याने सुद्धा मला बळकट केले, तेथे म्हटले आहे: ‘देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.’ या सर्व वचनांनी मला त्या कठीण काळी मदत दिली. तुम्ही मनन करता तेव्हा तुमच्या मनाला निराश करणाऱ्‍या विचारांच्या जागी काहीतरी वेगळ्या गोष्टी भरवणे शक्य होते.

“मला पुन्हा नोकरी मिळाली आहे, पण खरे सांगायचे तर, परिस्थिती अद्यापही बिकट आहे. बायबलने २ तीमथ्य ३:१-५ मध्ये भाकीत केल्यानुसार आपण ‘कठीण दिवसांनी’ चिन्हीत असणाऱ्‍या ‘शेवटल्या काळी’ जगत आहोत. शास्त्रवचने जे सांगतात त्यात आपल्याला बदल करता येत नाही. या कारणामुळे जीवन सुखकर असण्याची अपेक्षा मी धरीत नाही. तरीसुद्धा या परिस्थितीला तोंड देण्यास यहोवाचा आत्मा मला मदत करीत आहे असे मला वाटते.”

आपण सध्याच्या कठीण काळात राहात असलो तरी, जे यहोवा व त्याचा राजपुत्र, ख्रिस्त येशूवर भाव ठेवतात अशांची निराशा होणार नाही. (रोमकर १०:११) येशू स्वतः आपल्याला खात्री देतो: “ह्‍यास्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्‍याची चिंता करीत बसू नका. अन्‍नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारांत साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यांपेक्षा श्रेष्ठ आहा की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता?”—मत्तय ६:२५-२८.

हे प्रश्‍न या कठीण काळात निश्‍चितपणे हृदयाचा वेध घेणारे आहेत. तरी, येशूने या खात्रीदायक उद्‌गारांनी पुढे म्हटले: “रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत; तरी मी तुम्हांस सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारिखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्‍वासी, तो विशेषेकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही काय? ह्‍यास्तव, ‘काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे,’ असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.”—मत्तय ६:२८-३३.

पुढे सुकाळ आहे

जगातल्या कित्येक भागांत खालावत जाणारी आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती अधिक बिकट होत जाईल असा भरपूर संकेत आहे. तरीपण, ह्‍या परिस्थिती तात्कालिक आहेत असे देवाचे लोक ओळखून आहेत. शलमोन राजाच्या वैभवी कारकीर्दीने, शलमोनापेक्षा थोर असणाऱ्‍या व सबंध पृथ्वीवर आधिपत्य करणाऱ्‍या राजाच्या नीतिमान आधिपत्याची पडछाया पुरवली. (मत्तय १२:४२) तो राजा, ख्रिस्त येशू, “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु” आहे.—प्रकटीकरण १९:१६.

शलमोन राजासंबंधाने प्राथामिक पूर्णता दाखवणारे ७२ वे स्तोत्र येशू ख्रिस्ताच्या भव्य आधिपत्याचे वर्णन करते. राजा या नात्याने ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली पृथ्वीच्या भवितव्याबद्दल ते ज्या अद्‌भुत गोष्टींचे भाकीत करते त्यापैकी काहींचा विचार करा.

जगव्याप्त शांतीमय परिस्थिती: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.”—स्तोत्र ७२:७, ८.

दीनांबद्दल चिंता: “धावा करणारी दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.

विपुल अन्‍न: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरापर्यंत ते डोलो.”—स्तोत्र ७२:१६.

यहोवाच्या वैभवाने सर्व पृथ्वी भरेल: “परमेश्‍वर [यहोवा] देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्‌भुत कृत्ये करितो; त्याचा धन्यवाद होवो. त्याचे गौरवयुक्‍त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो.”—स्तोत्र ७२:१८, १९.

यास्तव, पुढे खरोखरी सुकाळ आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा