एका पुनर्स्थापित ‘देशात’ एकत्र वास्तव्य करणारे
“तुम्हास तर परमेश्वराचे [यहोवा, NW] याजक असे नाव पडेल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील.”—यशया ६१:६.
१, २. (अ) इस्राएलमधील यहुदीयमतानुसारी लोकांची स्थिती काय होती? (ब) आधुनिक दिवसातील ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांनी कोणता आत्मा प्रदर्शित केला आहे?
प्राचीन काळात, विश्वासू असताना इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या वैभवाचे साक्षीदार या नात्याने जागतिक दृश्यामध्ये कार्य केले. (यशया ४१:८, ९; ४३:१०) पुष्कळ विदेशी लोकांनी प्रतिसाद दिला आणि यहोवाच्या निवडलेल्या लोकांसोबत त्याची उपासना करण्याकरता येऊन मिळाले. खरे पाहता, रूथने नामीला जे म्हटले त्याचप्रमाणे तेही इस्राएलला म्हणाले: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) पुरुषांनी सुंता करावी या सारख्या नियमशास्त्र कराराच्या अटी त्यांनी मान्य केल्या. (निर्गम १२:४३-४८) काही स्त्रियांनी इस्राएली पुरुषांसोबत विवाह केला. यरीहोची राहाब व मवाबी रूथ येशू ख्रिस्ताच्या पूर्वज झाल्या. (मत्तय १:५) अशा प्रकारचे यहुदीयमतानुसारी इस्राएलच्या मंडळीचे भाग होते.—अनुवाद २३:७, ८.
२ इस्राएलमधील यहुदीयमतानुसारी लोकांप्रमाणेच आजच्या ‘मोठ्या लोकसमुदायाने’ अभिषिक्तांच्या शेषाला असे म्हटले: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (प्रकटीकरण ७:९; जखऱ्या ८:२३) हे अभिषिक्त ख्रिस्ती यहोवाचे ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ असल्याचे ते ओळखतात आणि त्यांच्याबरोबर ते इतके निकट कार्य करतात, की अभिषिक्त आणि “दुसरी मेंढरे” दोघेही “एक कळप, एक मेंढपाळ” असे आहेत. (मत्तय २४:४५-४७; योहान १०:१६) सर्व अभिषिक्त बांधवांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त झाल्यावर मोठ्या लोकसमुदायाचे काय होईल? त्यांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही. ‘या शेवटल्या दिवसांदरम्यान,’ यहोवाने त्या काळासाठी काही तयारी करून ठेवली आहे.—२ तीमथ्य ३:१.
आध्यात्मिक “देश”
३. पेत्राने भविष्यवाणी केलेले “नवे आकाश” काय आहे व त्याची स्थापना कधी करण्यात आली?
३ प्रेषित पेत्राने, १,४४,००० अभिषिक्त ख्रिस्ती ज्या स्वर्गीय शासन व्यवस्थेचे भाग होतील त्याविषयी भाकीत केले होते. तो म्हणाला: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) हे “नवे आकाश,” येशू ख्रिस्ताला स्वर्गीय राज्यामध्ये राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ करण्यात आले तेव्हा, म्हणजे १९१४ मध्ये स्थापण्यात आले. परंतु मग ‘नव्या पृथ्वीबद्दल’ काय?
४. (अ) सन १९१९ मध्ये कोणती अनपेक्षित घटना घडली? (ब) “एका क्षणात जन्मास” आलेले राष्ट्र कोणते व “एका दिवसात जन्म” घेणारा देश कोणता?
४ सन १९१९ मध्ये यहोवाने, अभिषिक्तांच्या शेष वर्गाला मोठ्या बाबेलच्या दास्यत्वातून बाहेर आणले. (प्रकटीकरण १८:४) ख्रिस्ती धर्मजगताच्या नेत्यांसाठी ही नाट्यमय घटना अगदीच अनपेक्षित होती. त्याच्याविषयी बायबल म्हणते: “अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय?” (यशया ६६:८) अभिषिक्तांची मंडळी राष्ट्रांसमोर मुक्त लोक या नात्याने सामोरी आली तेव्हा खरोखर एक राष्ट्र ‘क्षणात जन्माला’ आल्यासारखे झाले. परंतु मग तो “देश” कोणता होता? एका अर्थी, ते प्राचीन इस्राएल राष्ट्राच्या तुल्य आध्यात्मिक राष्ट्र होते. ते, नवीन जन्मलेल्या राष्ट्राला मान्य करण्यात आलेल्या कार्यहालचालींचे राज्य होते, ते यशयाच्या पुस्तकातील परादीसच्या भविष्यवाण्यांची आधुनिक, आध्यात्मिक पूर्णता होणारे ठिकाण आहे. (यशया ३२:१६-२०; ३५:१-७; पडताळा इब्रीयांस १२:१२-१४) एखादा ख्रिस्ती कोठेही असला तरी तो त्या ‘देशात’ आहे.
५. सन १९१९ मध्ये कोणते केंद्र अस्तित्वात आले? स्पष्टीकरण द्या.
५ पेत्राने ‘नव्या पृथ्वीबद्दल’ जे भाकीत केले होते त्याच्याशी याचा काय संबंध आहे? सन १९१९ मधील एका पुनर्स्थापित ‘देशात’ जन्मलेल्या त्या नव्या राष्ट्राला, यहोवाचे अभिषिक्त आणि गैर-अभिषिक्त स्तुतीकर्त्यांचे मिळून बनलेल्या एका जगव्याप्त संघटनेत विकसित व्हावयाचे होते. ही संघटना हर्मगिदोनातून बचावून देवाच्या नव्या जगात प्रवेश करील. अशा प्रकारे त्या राष्ट्राकडे, सैतानाच्या जगाचा नाश झाल्यावर अस्तित्वात राहणारी, नवी पृथ्वी, म्हणजेच धार्मिक मानवी समाजाचे केंद्र या दृष्टिकोनातून पाहता आले असते.a सन १९३० च्या दशकाच्या मध्यंतरात अभिषिक्तांना, गट या नात्याने, एका पुनर्स्थापित देशात एकत्र करण्यात आले होते. तेव्हापासून, दुसऱ्या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे. या मोठ्या लोकसमुदायाची संख्या आज जवळजवळ ५० लाख इतकी आहे. (प्रकटीकरण १४:१५, १६) या ‘देशाची’ अत्याधिक लोकसंख्या आहे का? नाही. त्याच्या चतुःसीमा आवश्यकतेनुसार होता होईल तितक्या वाढवता येतात. (यशया २६:१५) अभिषिक्त शेष या ‘देशाला’ ‘फळांनी’—आरोग्यदायक, उत्तेजनदायक आध्यात्मिक अन्न—देत असताना तेथील लोकसंख्येतील वाढ पाहणे निश्चितच रोमांचकारी आहे. (यशया २७:६) परंतु, देवाच्या लोकांच्या पुनर्स्थापित ‘देशात’ या दुसऱ्या मेंढरांचा कोणता दर्जा आहे?
त्या ‘देशातील’ सक्रिय विदेशी
६. देवाच्या लोकांच्या ‘देशात’ परके लोक सक्रिय कसे राहिले आहेत?
६ इस्राएल देशातील यहुदीयमतानुसारी जसे मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन होते त्याचप्रमाणे आजही, पुनर्स्थापित ‘देशातील’ मोठा लोकसमुदाय यहोवाच्या आज्ञांचे पालन करतो. त्यांच्या अभिषिक्त बांधवांकडून शिक्षण प्राप्त करून ते खोट्या उपासनेच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहतात आणि रक्ताला पवित्र मानतात. (प्रेषितांची कृत्ये १५:१९, २०; गलतीकर ५:१९, २०; कलस्सैकर ३:५) ते यहोवावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने आणि शक्तीने आणि स्वतःसारखीच त्यांच्या शेजाऱ्यांवर प्रीती करतात. (मत्तय २२:३७; याकोब २:८) प्राचीन इस्राएलमध्ये यहुदीयमतानुसारी लोकांनी शलमोनाचे मंदिर बांधण्यासाठी हातभार लावला व खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेला आधार दिला. (१ इतिहास २२:२; २ इतिहास १५:८-१४; ३०:२५) आज, मोठा लोकसमुदाय देखील बांधकाम प्रकल्पांमध्ये भाग घेतो. उदाहरणार्थ, ते मंडळ्या आणि विभाग बनवण्यात मदत करतात; एवढेच नव्हे तर, राज्य सभागृहे, संमेलन सभागृहे व शाखा तरतुदींच्या भौतिक बांधकाम प्रकल्पांची कामे देखील हाती घेतात.
७. जेरूसलेममध्ये दास्यत्वातून परतल्यावर मंदिरातील सेवा पार पाडण्यासाठी पुरेसे लेवीय नव्हते तेव्हा काय झाले?
७ सा. यु. पू. ५३७ मध्ये इस्राएल बॅबिलोनच्या दास्यत्वातून परतले तेव्हा, त्यांनी मंदिराच्या ठिकाणी संघटनात्मक सेवेची सुरवात केली. परंतु, परत आलेले लेवीय अधिक नव्हते. यास्तव, नेथीनीम—सुंता झालेले परदेशी रहिवासी जे पूर्वी लेवीयांची मदत करत असत—त्यांना मंदिराच्या सेवेत अधिक विशेषाधिकार देण्यात आले. परंतु ते अभिषिक्त अहरोनी याजकांच्या बरोबरीचे नव्हते.b—एज्रा ७:२४; ८:१५-२०; नहेम्या ३:२२-२६.
८, ९. शेवटल्या दिवसांदरम्यान दुसऱ्या मेंढरांनी पवित्र सेवेच्या कार्यात मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे भाग घेतला आहे?
८ अभिषिक्त ख्रिश्चनांनी आज हा नमुना अनुसरला आहे. ‘अंतसमय’ जसजसा जवळ येत राहतो तसे देवाच्या लोकांच्या ‘देशातील’ अभिषिक्त शेष कमी झाले आहेत. (दानीएल १२:९; प्रकटीकरण १२:१७) या वस्तुस्थितीमुळे मोठा लोकसमुदाय आता, ‘पवित्र सेवेचा’ जास्तीतजास्त भार साध्य करतात. (प्रकटीकरण ७:१५) आपल्या अभिषिक्त बांधवांच्या नेतृत्वाचे अनुसरण करून तेही ‘त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करतात.’ ते “चांगले करण्यास व दान करण्यास” विसरत नाहीत कारण “अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो” हे त्यांना माहीत आहे.—इब्रीयांस १३:१५, १६.
९ शिवाय, प्रत्येक वर्षी मोठा लोकसमुदाय लाखोंनी वाढत असल्यामुळे देखरेखीसाठी अधिकाधिक आवश्यकता आहे. एके काळी हे केवळ अभिषिक्त ख्रिस्ती हाताळत होते. आता, बहुतेक मंडळ्या तसेच विभाग, प्रांत व शाखांची देखरेख करण्याची जबाबदारी आवश्यकतेमुळे दुसऱ्या मेंढरांवर सोपवली आहे. सन १९९२ मध्ये, यांच्यातील काहींना नियमन मंडळाच्या समितीच्या सभांना उपस्थित राहण्याचा व अदेयमती साहाय्यक म्हणून कार्य करण्याचा विशेषाधिकार देण्यात आला होता. तरीदेखील, दुसरी मेंढरे त्यांच्या अभिषिक्त सहख्रिश्चनांबरोबर निष्ठावान राहतात व त्यांना यहोवाचे विश्वासू व बुद्धिमान दास या नात्याने पाठिंबा देण्याचा सुहक्क मानतात.—मत्तय २५:३४-४०.
“सरदारासारखा”
१०, ११. काही फिलीस्टाईन लोकांचे अनुकरण करून देवाच्या लोकांच्या काही भूतपूर्व शत्रूंच्या हृदयाचा पालट कसा झाला? त्याचा परिणाम काय झाला?
१० विश्वासू व बुद्धिमान दासाने दुसऱ्या मेंढरांचा उपयोग जबाबदार पदांसाठी केला त्या पद्धतीविषयी जखऱ्या ९:६, ७ मध्ये भविष्यवाणी केली होती. तेथे आपण वाचतो: “मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन. मी त्यांच्या मुखातले रक्त व त्याच्या दातातले अमंगळ पदार्थ काढून टाकीन, तोहि आमच्या देवासाठी बचावून राहील; तो यहूदातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबूश्यासारखा होईल.”c सैतानाचे जग आज ज्याप्रमाणे यहोवाच्या लोकांचे कट्टे वैरी होते त्याचप्रमाणे फिलीस्टाईन लोकही होते. (१ योहान ५:१९) फिलीस्टाईन लोकांचा सरतेशेवटी जसा सर्वनाश करण्यात आला त्याचप्रमाणे, हे जग त्याच्या धार्मिक, राजनैतिक आणि व्यापारी घटकांसोबत लवकरच यहोवाच्या नाशकारक क्रोधाचा अनुभव घेईल.—प्रकटीकरण १८:२१; १९:१९-२१.
११ परंतु, जखऱ्याच्या शब्दांनुसार फिलीस्टाईनच्या काही लोकांच्या हृदयाचा पालट झाला व हे, आजही काही जगीक लोकांचे यहोवाबरोबर शत्रूत्व राहणार नाही याचे पूर्वचिन्ह होते. ते, किळसवाण्या विधी आणि अमंगळ बलिदाने असलेल्या धार्मिक मूर्तिपूजा सोडून देऊन यहोवाच्या नजरेत शुद्ध ठरतील. आपल्या दिवसामध्ये अशा प्रकारचे सुधारित ‘पलिष्टी’ मोठ्या लोकसमुदायात पाहावयास मिळतात.
१२. आधुनिक दिवसात, ‘एक्रोन यबूश्यांसारखा’ कसा झाला आहे?
१२ भविष्यवाणीनुसार, एक्रोनचे मोठे फिलीस्टाईन शहर ‘यबूश्यांसारखे’ होणार होते. यबूशी लोक देखील एके काळी इस्राएलचे शत्रू होते. दावीदाने विजय मिळवूपर्यंत जेरूसलेम त्यांच्या सत्तेखाली होते. तरीदेखील, इस्राएलबरोबर झालेल्या युद्धातून बचावलेले काही स्पष्टपणे यहुदीयमतानुसारी झाले. त्यांनी इस्राएल देशामध्ये दास या नात्याने काम केले व मंदिराच्या बांधकामात हातभार लावण्याची देखील त्यांना सुसंधी मिळाली. (२ शमुवेल ५:४-९; २ इतिहास ८:१-१८) आज, यहोवाची उपासना करण्यासाठी वळालेल्या “एक्रोनी” लोकांना विश्वासू व बुद्धिमान दास यांच्या देखरेखीखाली असलेल्या ‘देशात’ सेवा करण्याचे अनेक सुहक्क आहेत.
१३. प्राचीन जगामध्ये सरदार कोण होते?
१३ फिलीस्टाईन, यहुदामध्ये सरदारासारखे असेल असे जखऱ्या म्हणतो. ʼअल·लुफʹ, या इब्री शब्दाचे भाषांतर ‘सरदार’ असे करण्यात आल्यावर त्याचा अर्थ “हजारोंचा (किंवा, ‘चिलीआर्कांचा’) सरदार” असा होतो. तो अतिशय उच्च दर्जा होता. अदोमच्या पूर्वीच्या राष्ट्रात प्रत्यक्षात केवळ १३ सरदार होते. (उत्पत्ती ३६:१५-१९) इस्राएलबद्दल बोलताना ‘सरदार’ हा शब्द बहुतेक वेळा वापरला जात नाही, परंतु “हजारोंचा प्रमुख (किंवा मुख्य)” ही अभिव्यक्ती अनेकवेळा आढळते. मोशेने इस्राएल राष्ट्राच्या प्रतिनिधींना एकत्र केले तेव्हा त्याने “इस्राएलच्या हजारहजारांच्या पथकांचे प्रमुख” यांना बोलावले.d ते १२ होते व स्पष्टतः केवळ मोशेच्या अधिकाराखाली होते. (गणना १:४-१६) त्याचप्रमाणे, सैन्यातील संघटनेत, हजारोंचे प्रमुख केवळ सेनापती किंवा राजाच्या दुय्यम होते.—२ शमुवेल १८:१, २; २ इतिहास २५:५.
१४. आज फिलीस्टाईन सरदारासारखा कसा झाला आहे?
१४ पश्चात्तापी फिलीस्टाईन इस्राएलमध्ये खरोखरच एक सरदार होईल अशी भविष्यवाणी जखऱ्याने केली नाही. ते योग्यही ठरले नसते; कारण तो एक स्वाभाविकपणे जन्मलेला इस्राएली नव्हता. परंतु तो एक सरदार याप्रमाणे असेल, एका सरदाराच्या तूल्य अधिकाराचा दर्जा प्राप्त करील. आणि तसेच झाले. अभिषिक्त ख्रिश्चनांचे शेष जसजसे संख्येने कमी होत जातात व जे जिवंत आहेत त्यांचेही उरलेले आयुष्य मर्यादितच असल्यामुळे योग्यप्रकारे प्रशिक्षित केलेली दुसरी मेंढरे जणू काय ती उणीव भरून काढतात. त्यांना त्यांच्या अभिषिक्त बांधवांची जागा घ्यायची नाही. परंतु विश्वासू व बुद्धिमान दास त्या ‘देशात’ त्यांना आवश्यक तो अधिकार देतो जेणेकरून देवाची संघटना संघटित मार्गाने प्रगती करत राहू शकते. अशा प्रकारची प्रगतीशील प्रक्रिया आणखी एका भविष्यवाणीतून दिसून येते.
याजक आणि शेतकरी
१५. (अ) यशया ६१:५, ६ च्या पूर्णतेत “परमेश्वराचे याजक” कोण आहेत आणि ते या योग्यतेत पूर्णार्थाने कधी सेवा करतात? (ब) इस्राएलातील शेतीची कामे करणारे हे “परके” लोक कोण आहेत आणि—आध्यात्मिक अर्थाने—या कामात काय गोवले आहे?
१५ यशया ६१:५, ६ असे वाचते: “परके उभे राहून तुमचे कळप चारितील. परदेशी तुमचे नांगऱ्ये व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ति तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.” आज अभिषिक्त लोक “परमेश्वराचे याजक” आहेत. शेवटल्या व पूर्ण अर्थाने, स्वर्गीय राज्यामध्ये ते “परमेश्वराचे याजक . . . आमच्या देवाचे सेवक” या नात्याने कार्य करतील. (प्रकटीकरण ४:९-११) शेतीच्या कामासाठी जबाबदार असलेले हे “परके” लोक कोण आहेत? ते देवाच्या इस्राएलच्या ‘देशात’ वस्ती करणारे दुसरी मेंढरे आहेत. त्यांना सोपवलेली चारण्याची, शेतीची व द्राक्षांची मळे लावण्याची कामे काय आहेत? महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अर्थाने, या कामांचा संबंध लोकांना मदत करणे, पालनपोषण करणे व कापणी करणे याजशी आहे.—यशया ५:७; मत्तय ९:३७, ३८; १ करिंथकर ३:९; १ पेत्र ५:२.
१६. देवाच्या लोकांच्या ‘देशातील’ सर्व कामे सरतेशेवटी कोण हाताळतील?
१६ सध्या, आध्यात्मिकरीत्या चारण्याच्या, शेतीच्या व द्राक्षांचे मळे लावण्याच्या कामात भाग घेणारे थोडकेच आध्यात्मिक इस्राएली पृथ्वीवर उरले आहेत. अभिषिक्तांची मंडळी समग्रपणे ख्रिस्तासोबत एक झाल्यावर, हे सर्व काम दुसऱ्या मेंढरांवर सोपवण्यात येईल. यहेज्केलच्या पुस्तकात अधिपती वर्गाचे असे ज्यांना संबोधले आहे त्या योग्यता प्राप्त दुसऱ्या मेंढरांच्या हातात ‘देशाची’ मानवी देखरेख देखील असेल.—यहेज्केल, अध्याय ४५, ४६.e
तो “देश” सहन करतो
१७. या शेवटल्या काळादरम्यान यहोवा कोणती तयारी करत आहे?
१७ होय, मोठ्या लोकसमुदायाला घाबरण्याचे काहीच कारण नाही! यहोवाने त्यांच्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. या शेवटल्या काळादरम्यान, अभिषिक्त लोकांचे एकत्रीकरण व त्यांच्यावर शिक्का मारणे हा पृथ्वीवरील सर्वात महत्त्वपूर्ण विकास आहे. (प्रकटीकरण ७:३) परंतु हे कार्य साध्य होत असताना, यहोवाने एका पुनर्स्थापित आध्यात्मिक देशात दुसऱ्या मेंढरांना त्यांच्या सहवासात आणले. तेथे या दुसऱ्या मेंढरांना आध्यात्मिकरीत्या अन्न देण्यात आले आणि ख्रिस्ती जीवनचर्येत प्रशिक्षित करण्यात आले. पुढे, ते पवित्र सेवेत ज्यामध्ये देखरेखीचा देखील समावेश होतो उत्तमप्रकारे शिक्षण दिलेले असे आहेत. त्यासाठी ते यहोवाचे आणि त्यांच्या आध्यात्मिक बांधवांचे मनापासून आभार मानतात.
१८. कोणत्या घटनांद्वारे दुसरी मेंढरे आध्यात्मिक इस्राएलच्या ‘देशात’ निष्ठेने राहतील?
१८ मागोगचा गोग देवाच्या लोकांवर त्याचा शेवटला हल्ला चढवेल तेव्हा, दुसरी मेंढरे अभिषिक्त शेषांबरोबर ‘तटबंदी नसलेल्या प्रदेशातील गावांत’ निष्ठेने उभे राहतील. दुसरी मेंढरे, राष्ट्रांच्या नाशातून बचावून देवाच्या नव्या जगात प्रवेश करतात तेव्हाही ते त्या ‘देशातच’ असतील. (यहेज्केल ३८:११; ३९:१२, १३; दानीएल १२:१; प्रकटीकरण ७:९, १४) विश्वासू राहिल्यामुळे त्यांना ते रम्य ठिकाण कधीही सोडावे लागणार नाही.—यशया ११:९.
१९, २०. (अ) नव्या जगामध्ये, त्या ‘देशाचे’ रहिवासी कोणत्या महान देखरेखीचा आनंद लुटतील? (ब) आपण मोठ्या उत्सुकतेने कशाची वाट पाहत आहोत?
१९ प्राचीन इस्राएलवर मानवी राजांनी राज्य केले व तेथे लेवीय याजक होते. नव्या जगात, ख्रिश्चनांना त्याहूनही अधिक देखरेख करावयास मिळेल. यहोवा देवाच्या सत्तेखाली ते, थोर महायाजक व राजा येशू ख्रिस्त आणि १,४४,००० सहयाजक व राजे यांच्या अधीन होतील—ज्यामधील काही व्यक्तींना ते पृथ्वीवर आधी त्यांचे ख्रिस्ती बंधू आणि बहिणी म्हणून ओळखत होते. (प्रकटीकरण २१:१) आध्यात्मिक देशातील विश्वासू रहिवाशी पुनर्स्थापित केलेल्या खऱ्याखुऱ्या परादीसमध्ये राहतील व नव्या जेरूसलेमद्वारे मिळणाऱ्या बरे करणाऱ्या आशीर्वादांचा आनंद लुटतील.—यशया ३२:१; प्रकटीकरण २१:२; २२:१, २.
२० यहोवाचा महान वैभवी रथ त्याचे उद्देश साध्य करण्यासाठी जसजसा अविरत पुढे जात राहतो तसे आपण सर्व आपल्याला नेमून दिलेल्या भूमिकेच्या पूर्णतेची उत्सुकतेने वाट पाहतो. (यहेज्केल १:१-२८) हे सर्व उद्देश एकदाचे पूर्ण झाल्यावर, यहोवाचे विजयी पवित्रीकरण किती उल्हासाने साजरे केले जाईल त्याचा विचार करा! तेव्हा प्रकटीकरण ५:१३ मध्ये लिखित असलेले शक्तिशाली स्तुतिगीत सर्व निर्मिती गाईल: “राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत!” आपण स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोठेही असलो तरीही, त्या वैभवी स्तुतिगीतामध्ये आपला सूर मिळवण्याची आतुरतेने वाट पाहत नाही का?
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने १९५३ मध्ये प्रकाशित केलेले नवे आकाश व नवी पृथ्वी (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे ३२२-३ पहा.
b पूर्ण चर्चेसाठी, टेहळीबुरूज नियतकालिकाच्या एप्रिल १५, १९९२ मधील “यहोवाची तरतूद, ‘वाहिलेले लोक’” हा लेख पहा.
c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने १९७२ मध्ये प्रकाशित केलेले ईश्वरी शासनाने—मानवजातीसाठी पुनर्स्थापित केलेले परादीस! (इंग्रजी) या पुस्तकाची पृष्ठे २६४-९ पहा.
d इब्री: राʼ·शेहʹ ʼअल·पेहʹ यीस·रा·ʼएलʹ, याचे भाषांतर सेप्टुजेंटमध्ये खि·लीʹआ·र्कोई इस·रा·एलʹ “इस्राएलमधील खिलीआर्क” असे करण्यात आले आहे.
e वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने १९७१ मध्ये प्रकाशित केलेले “तेव्हा राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे”—कसे? (इंग्रजी) या पुस्तकाची पृष्ठे ४०१-७ पहा.
तुम्ही कसे उत्तर देता?
◻ सन १९१९ मध्ये कोणता “देश” पुनर्स्थापित करण्यात आला व तो रहिवाश्यांनी कसा भरला होता?
◻ देवाच्या पुनर्स्थापित लोकांच्या ‘देशात’ दुसऱ्या मेंढरांना अधिक जबाबदाऱ्या कशा प्रकारे देण्यात आल्या आहेत?
◻ मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य कशा प्रकारे ‘यबूश्यांसारखे’? ‘यहुदातल्या सरदारासारखे’ आहेत?
◻ विश्वासू दुसरी मेंढरे त्या ‘देशात’ किती काळ राहतील?
[२३ पानांवरील चित्रं]
आधुनिक फिलीस्टाईन “यहूदातल्या सरदारासारखा” होईल
[२४ पानांवरील चित्रं]
अभिषिक्त आणि दुसरी मेंढरे आध्यात्मिक देशात एकत्र मिळून सेवा करतात