वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१ पृ. ८-१३
  • बायबलचा स्वीकार करा कारण ते विश्‍वसनीय आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलचा स्वीकार करा कारण ते विश्‍वसनीय आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वाचन करण्याच्या आणि समजून घेण्याच्या उद्देशास्तव
  • सभास्थानात शास्त्रवचनांचे वाचन
  • वैयक्‍तिक प्रतिसाद आणि अवलंब
  • देखरेखीचा हुद्दा असणाऱ्‍यांची जबाबदारी
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • पवित्र शास्त्र—वाचण्याजोगे पुस्तक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा
    उपासनेतील ऐक्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१ पृ. ८-१३

बायबलचा स्वीकार करा कारण ते विश्‍वसनीय आहे

“आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुति ह्‍यामुळे करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे.”—१ थेस्सलनीकाकर २:१३.

१. बायबलमधील कोणती माहिती त्याला खरोखर एक उल्लेखनीय पुस्तक बनविते?

पवित्र बायबल जगातील विस्तृत प्रमाणात भाषांतरीत केलेले आणि मोठ्या प्रमाणावर वाटप केलेले पुस्तक आहे. वाङ्‌मयातील एक मोठे साहित्य म्हणून त्याला सहजगत्या मान्यता मिळाली आहे. तथापि, यापेक्षाही अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे, लोकांचा पेशा किंवा त्यांच्या जीवनातील स्थान कोणतेही असले, तरी प्रत्येक जातीच्या, प्रत्येक राष्ट्राच्या लोकांना अत्यंत आवश्‍यक असलेले मार्गदर्शन बायबल पुरवते. (प्रकटीकरण १४:६, ७) मानवी जीवनाचा उद्देश काय आहे? यासारख्या प्रश्‍नांची उत्तरे मन आणि अंतःकरणाचे समाधान करणाऱ्‍या पद्धतीने बायबल देते. (उत्पत्ती १:२८; प्रकटीकरण ४:११) मानवजातीची सरकारे चिरस्थायी शांती व सुरक्षितता का आणू शकली नाहीत? (यिर्मया १०:२३; प्रकटीकरण १३:१, २) लोक का मरतात? (उत्पत्ती २:१५-१७; ३:१-६; रोमकर ५:१२) या त्रस्त जगात आपण जीवनाच्या समस्यांना यशस्वीपणे कसे तोंड देऊ शकतो? (स्तोत्र ११९:१०५; नीतीसूत्रे ३:५, ६) आपल्यासाठी भविष्यात काय ठेवले आहे?—दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:३-५.

२. बायबल आपल्या प्रश्‍नांची संपूर्ण विश्‍वसनीय उत्तरे का पुरवते?

२ बायबल अशा प्रश्‍नांची उत्तरे अधिकृतपणे का देते? कारण ते देवाचे वचन आहे. लिहिण्यासाठी त्याने मानवांचा उपयोग केला. परंतु २ तीमथ्य ३:१६ मध्ये स्पष्ट म्हटल्याप्रमाणे, ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आहे.’ ते, मानवी घटनांबद्दल स्वतःच्या मताप्रमाणे अर्थ सांगण्याचे फळ नव्हे. “संदेश [येणाऱ्‍या गोष्टींची घोषणा, ईश्‍वरी आज्ञा, बायबलचे नैतिक दर्जे] मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२१.

३. (अ) बायबलला विविध प्रदेशातील लोकांनी किती मोलाचे समजले हे दाखविणारी उदाहरणे द्या. (ब) शास्त्रवचनांचे वाचन करण्यासाठी काही वैयक्‍तिक त्यांचे जीवन धोक्यात घालण्यास इच्छूक का होते?

३ बायबलच्या मोलाची गुणग्राहकता दाखवून त्याला जवळ बाळगल्याबद्दल, तसेच त्याचे वाचन केल्याबद्दल अनेक लोकांनी तुरूंगवास इतकेच नव्हे तर मृत्यूची देखील जोखीम पत्करली. हे कॅथलिक स्पेन येथे गतवर्षांमध्ये खरे ठरले. त्यावेळी लोकांनी बायबल स्वतःच्या मातृभाषेत वाचल्यास पाळकांना त्यांचा प्रभाव कमी होण्याची भीती वाटत होती. ही गोष्ट अल्बेनियात देखील खरी ठरली; तेथे सर्व धार्मिक प्रभावांचा अंत करण्यासाठी नास्तिक राज्यकारभाराद्वारे कठोर पावले उचलण्यात आली. तरीही, देवभिरू वैयक्‍तिकांनी शास्त्रवचनांच्या प्रती जवळ बाळगल्या, त्यांचे वाचन केले आणि इतरांसोबत त्यांची सहभागिता केली. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान, झॉकसेनहाऊसन छळछावणीत बायबलची प्रत एका कोठडीतून दुसऱ्‍या कोठडीत (असे करण्याला मनाई असतानाही) चतुराईने पाठवली जात असे आणि ती ज्यांना मिळत असे ते कंठस्थ केलेल्या भागाची सहभागिता इतरांसोबत करीत. सन १९५० च्या दशकात तेव्हाच्या कम्युनिस्ट पूर्व जर्मनीत आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात कैद असणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनी रात्रीच्या वेळी वाचन करण्यासाठी बायबलचा लहान भाग एका कैद्याकडून दुसऱ्‍याकडे देताना दीर्घकालीन एकान्त कोठडीतील तुरूंगवासाची जोखीम पत्करली. त्यांनी असे का केले? कारण बायबल देवाचे वचन असल्याचे त्यांनी ओळखले आणि “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल,” याची त्यांना जाणीव होती. (अनुवाद ८:३) विश्‍वास न बसण्याजोगी क्रूरता भोगत असताना देखील बायबलमध्ये नमूद करण्यात आलेल्या या वक्‍तव्यांनी त्या साक्षीदारांना आध्यात्मिकरीत्या जिवंत ठेवले.

४. आपल्या जीवनात बायबलचे स्थान कोणते असले पाहिजे?

४ बायबल प्रासंगिक संदर्भ पाहण्यासाठी केवळ कपाटात ठेवण्यासारखे पुस्तक नाही. किंवा समविश्‍वासू उपासनेसाठी एकत्र येतात केवळ तेव्हाच त्याचा वापर करावयासाठी ते नाही. आपण ज्या गोष्टींचा सामना करतो त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक दिवशी त्याचा वापर केला पाहिजे.—स्तोत्र २५:४, ५.

वाचन करण्याच्या आणि समजून घेण्याच्या उद्देशास्तव

५. (अ) शक्य असल्यास, आपल्या प्रत्येकाजवळ काय असले पाहिजे? (ब) प्राचीन इस्त्राएलात, शास्त्रवचनात काय दिले आहे हे लोकांनी कसे शोधले? (क) तुमच्या बायबल वाचनाच्या मनोवृत्तीवर स्तोत्र १९:७-११ चा कसा परिणाम होतो?

५ आपल्या दिवसात बहुतेक देशांमध्ये बायबलच्या प्रती सहजपणे मिळू शकतात. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक वाचकांना त्याची प्रत प्राप्त करण्याचे आम्ही आर्जवतो. बायबल लिहिले जात असताना छापखाने नव्हते. सर्वसामान्य लोकांजवळ स्वतःच्या वैयक्‍तिक प्रती नव्हत्या. परंतु जे लिहिले गेले आहे ते आपल्या सेवकांनी ऐकावे म्हणून यहोवाने व्यवस्था केली. यास्तव, यहोवाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे मोशेने लिखाण केल्यावर निर्गम २४:७ सांगते की त्याने, “कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले.” सीयोन पर्वताच्या पायथ्याजवळ अद्‌भुत प्रदर्शनाचे साक्षीदार होऊन त्यांच्यासाठी मोशेने जे काही वाचन केले ते देवाकडून होते व त्यांना ही माहिती जाणण्याची आवश्‍यकता होती, हे त्यांनी जाणले. (निर्गम १९:९, १६-१९; २०:२२) आपल्याला देखील देवाच्या वचनात काय लिखित केले आहे ते जाणण्याची गरज आहे.—स्तोत्र १९:७-११.

६. (अ) इस्त्राएल राष्ट्र वाग्दत्त देशात पोहंचण्याआधी, मोशेने काय केले? (ब) आपण मोशेच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

६ इस्त्राएल राष्ट्र, अरण्यवासातील आपले भटके जीवन मागे सोडून, वाग्दत्त देशात प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी ओलांडण्याच्या तयारीत असताना त्यांनी यहोवाच्या नियमशास्त्राची आणि त्यांच्यासोबतच्या त्याच्या व्यवहाराची उजळणी करणे उचित होते. देवाच्या आत्म्याने प्रवृत्त होऊन मोशेने त्यांच्यासोबत नियमशास्त्राची उजळणी केली. त्याने त्यांना नियमशास्त्राच्या सविस्तर माहितीची आठवण करून दिली तसेच यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम घडवून आणणाऱ्‍या मूलभूत तत्त्वांचे आणि मनोवृत्तींचे देखील स्पष्टीकरण केले. (अनुवाद ४:९, ३५; ७:७, ८; ८:१०-१४; १०:१२, १३) आज आपण नव्या नेमणूकीला अंगीकारतो किंवा जीवनातील नव्या परिस्थितींना तोंड देत असतो तेव्हा जे काही करत आहोत त्यावर शास्त्रवचनाच्या सल्ल्याने कसा परिणाम केला पाहिजे याचा विचार करणे आपल्या फायद्याचे असेल.

७. इस्त्राएल लोकांनी यार्देन ओलांडल्यावर लगेचच, यहोवाचे नियमशास्त्र त्यांच्या मनावर व अंतःकरणावर ठसविण्यासाठी काय करण्यात आले?

७ इस्त्राएल लोकांनी यार्देन नदी ओलांडल्यावर लगेच काही काळाने यहोवाने मोशेच्याद्वारे त्यांना जे सांगितले होते त्याचा पुनर्विचार करण्यासाठी ते पुन्हा एकत्र जमले. ते राष्ट्र जेरुसलेमच्या उत्तरेकडे सुमारे ५० किलोमीटरवर एकत्र जमले. निम्मे गोत्र एबाल डोंगरासमोर आणि निम्मे गरिज्जीम डोंगरासमोर होते. तेथे यहोशवाने ‘नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने वाचून दाखविली.’ अशारितीने पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे आणि त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांनी, वर्तनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास यहोवाची अस्वीकृती येईल आणि यहोवाचे आज्ञापालन केल्यास त्यांना आशीर्वाद मिळण्याबद्दल समयोचितपणे पुन्हा सांगितल्याचे ऐकले. (यहोशवा ८:३४, ३५) यहोवाच्या दृष्टीने काय चांगले आणि काय वाईट हे त्यांच्या मनात स्पष्टपणे असण्याची गरज होती. याशिवाय, आज आपणातील प्रत्येकजण करतो त्याप्रमाणे त्यांनी आपल्या अंतःकरणावर चांगल्या गोष्टींची प्रीती आणि वाईटाचा द्वेष करण्याविषयी बिंबवायचे होते.—स्तोत्र ९७:१०; ११९:१०३, १०४; आमोस ५:१५.

८. इस्त्राएलातील विशिष्ट राष्ट्रीय संमेलनात ठराविक काळानंतर होणाऱ्‍या देवाच्या वचनाच्या वाचनाचा काय लाभ होता?

८ नियमशास्त्राचे वाचन त्या ऐतिहासिक प्रसंगी करण्याव्यतिरिक्‍त, अनुवाद ३१:१०-१२ मध्ये देवाच्या वचनाचे नियमित वाचन करण्याची व्यवस्था दिली होती. प्रत्येक सातव्या वर्षी देवाच्या वचनाचे वाचन ऐकण्यासाठी संपूर्ण राष्ट्राला एकत्र यावे लागत असे. याद्वारे त्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवले जात होते. याने त्यांच्या मनात आणि अंतःकरणात संतानाविषयीच्या अभिवचनांना सजीव ठेवले आणि अशारीतीने विश्‍वासू जणांना मशीहापर्यंत मार्गदर्शित करण्यासाठी मदत केली. आध्यात्मिक भरवणूकीच्या व्यवस्थेची स्थापना इस्त्राएल लोक अरण्यवासात असताना केली होती तरी वाग्दत्त देशात पोहंचल्यावरही ती बंद झाली नाही. (१ करिंथकर १०:३, ४) उलटपक्षी, संदेष्ट्यांच्या पुढील प्रकटीकरणासहित देवाचे वचन समृद्ध झाले.

९. (अ) इस्त्राएल लोक मोठ्या समुहाने जमल्यावरच, शास्त्रवचनांचे वाचन करीत होते का? स्पष्ट करा. (ब) प्रत्येक कुटुंबात शास्त्रवचनांतील मार्गदर्शन कसे दिले जात होते आणि कोणत्या उद्देशास्तव?

९ देवाच्या वचनातील सल्ल्याचा पुनर्विचार, लोक मोठ्या समुहाने एकत्र जमले होते केवळ त्या काळापुरताच मर्यादित असावयाचा नव्हता. प्रत्येक दिवशी देवाच्या वचनाचा काही भाग आणि त्यात अंतर्भूत असलेल्या तत्त्वांची चर्चा करावयाची होती. (अनुवाद ६:४-९) आज बहुतेक ठिकाणी, तरुणांनी बायबलची वैयक्‍तिक प्रत बाळगणे शक्य आहे आणि असे करणे त्यांच्याकरिता अधिक लाभदायक आहे. परंतु प्राचीन इस्त्राएलात असे नव्हते. त्या काळी, पालक देवाच्या वचनातून मार्गदर्शन देताना त्यांनी जे काही पाठांतर केले होते त्यावर तसेच आपल्या अंतःकरणात जोपासत असलेल्या सत्यावर शिवाय स्वतः लिहून घेतलेल्या लहान उताऱ्‍यांवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. वारंवार पुनरुक्‍ती करण्याद्वारे यहोवाबद्दल व त्याच्या मार्गांबद्दलची प्रीती ते आपल्या मुलांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करीत. याचा हेतू, केवळ ज्ञानानेच डोके भरणे असा नव्हता तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य यहोवा आणि त्याच्या वचनाबद्दल प्रीती प्रदर्शित करू शकेल अशा मार्गाने राहण्यासाठी मदत करणे होता.—अनुवाद ११:१८, १९, २२, २३.

सभास्थानात शास्त्रवचनांचे वाचन

१०, ११. सभास्थानात शास्त्रवचने वाचण्याचा कोणता कार्यक्रम अनुसरला जात होता आणि येशूने या प्रसंगांकडे कोणत्या दृष्टीने पाहिले?

१० यहुद्यांना बाबेलच्या दास्यत्वात नेल्याच्या काही काळानंतर, उपासनेसाठी सभास्थानांची प्रस्थापना करण्यात आली. त्या सभांच्या ठिकाणी देवाच्या वचनाचे वाचन आणि चर्चा करण्यासाठी शास्त्रवचनांच्या अधिक प्रती बनवल्या गेल्या. इब्री शास्त्रवचनांचा भाग असलेल्या सुमारे ६,००० प्राचीन हस्तलिखित प्रतींचे अवशेष टिकून राहण्याचे हे एक कारण होते.

११ सभास्थानातील उपासनेच्या सभेचा महत्त्वपूर्ण भाग, आधुनिक बायबलमधील पहिल्या पाच पुस्तकांसारखाच तोराहचे वाचन हा होता. सामान्य युगाच्या पहिल्या शतकात प्रेषितांची कृत्ये १५:२१ अहवाल देते की, अशाप्रकारचे वाचन प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी केले जात असे. तसेच मिश्‍ना दाखवतो, की दुसऱ्‍या शतकापासून सप्ताहाच्या दुसऱ्‍या व पाचव्या दिवशी तोराहचे वाचन होत असे. अनेक वैयक्‍तिक आळीपाळीने नेमलेल्या भागाचे वाचन करीत. बाबेलमध्ये वास्तव्य करून राहिलेल्या यहुद्यांची संपूर्ण तोराहचे वर्षातून एकदा वाचन करण्याची रीत होती. पॅलेस्टाईनमध्ये वाचनाचा आराखडा तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत करण्याची रीत होती. संदेष्ट्याकडील लिखाणाचे देखील वाचन करून स्पष्टीकरण दिले जात असे. येशू ज्या ठिकाणी राहत होता तेथील शब्बाथ बायबल वाचनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्याची रीत होती.—लूक ४:१६-२१.

वैयक्‍तिक प्रतिसाद आणि अवलंब

१२. (अ) मोशेने लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवल्यावर, त्यांना कसा लाभ झाला? (ब) लोकांनी कसा प्रतिसाद दिला?

१२ प्रेरित शास्त्रवचनांचे वाचन केवळ शिष्टाचारपालनासाठी करावयाचे नव्हते. लोकांच्या कुतूहलाचे समाधान करण्यासाठीच ते केले जात नव्हते. मोशेने सीयोन डोंगरासमोर असलेल्या मैदानावर इस्त्राएलांना “कराराचे पुस्तक” वाचून दाखवले तेव्हा देवासमोरील त्यांच्या जबाबदाऱ्‍या ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्याने तसे केले. ते त्या पूर्ण करतील का? वाचनाने प्रतिसादाची गरज भासवली. लोकांनी ते ओळखले व असे म्हटले: “जे काही परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”—निर्गम २४:७; पडताळा निर्गम १९:८; २४:३.

१३. यहोशवाने अवज्ञाविषयीचे शाप वाचल्यावर लोकांना काय करावयाचे होते, कोणत्या उद्देशास्तव?

१३ मग यहोशवाने राष्ट्राला अभिवचन दिलेले आशीर्वाद आणि शाप वाचून दाखवले तेव्हा प्रतिसादाची आवश्‍यकता होती. प्रत्येक शापानंतर, असा बोध दिला गेला: “तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.” (अनुवाद २७:४-२६) अशाप्रकारे, उद्धृत केलेल्या चुकांबद्दल यहोवाच्या निषेधाला त्यांनी प्रत्येक मुद्याला आपली सहमती दाखवली. संपूर्ण राष्ट्राने मोठ्या आवाजाने आपली सहमती दर्शवली तेव्हाची ती घटना किती प्रभावकारी असावी!

१४. नहेम्याच्या दिवसात, नियमशास्त्राचे जाहीर वाचन विशेषपणे लाभदायक का ठरले?

१४ नहेम्याच्या दिवसात, सर्व लोक नियमशास्त्र ऐकण्यासाठी जेरूसलेमात जमा झाले, तेव्हा त्यात लिहिलेल्या बोधाप्रमाणे करीत नसल्याचे त्यांच्या दृष्टीपथात आले. त्या प्रसंगी त्यांनी शिकलेल्या गोष्टींचा लगेचच अवलंब केला. त्याचा परिणाम काय झाला? “आनंदच आनंद झाला.” (नहेम्या ८:१३-१७) सणा दरम्यान एक आठवड्याच्या दैनिक बायबल वाचनानंतर, अधिक गोष्टींची जरूरी असल्याची जाणीव त्यांना झाली. तेव्हा त्यांनी अब्राहामाच्या दिवसांपासून यहोवाच्या व्यवहाराच्या इतिहासाचा त्याच्या लोकांसोबत प्रार्थनापूर्वक पुनर्विचार केला. या सर्व गोष्टींनी, नियमशास्त्रातील गरजांनुरूप राहण्याची, परराष्ट्रीयांसोबत अंतर्विवाह करण्याचे टाळण्याची आणि मंदिर व त्याची सेवा चालू ठेवण्यासाठी त्याच्या जबाबदाऱ्‍यांचा स्वीकार करण्याची शपथ घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.—नहेम्या, अध्याय ८-१०.

१५. अनुवाद ६:६-९ मधील माहिती, कुटुंबात देवाच्या वचनाचे शिक्षण केवळ शिष्टाचारपालन एवढेच असावयाचे नव्हते, हे कसे दाखवते?

१५ अशाचप्रकारे, कुटुंबामध्ये शास्त्रवचने शिकवण्याचा अर्थ केवळ शिष्टाचारपालन असा नव्हता. अनुवाद ६:६-९ मधील अलंकारिक शब्दांमध्ये आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, लोकांना ‘देवाचे वचन हाताला चिन्हादाखल बांधावयाचे’—यहोवाच्या मार्गांबद्दलचे प्रेम, हे उदाहरण आणि कार्यांद्वारे दाखवायचे होते. तसेच देवाच्या वचनाला त्यांनी ‘डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावायचे होते’—अशाप्रकारे शास्त्रवचनात अंतर्भूत असलेल्या तत्त्वांना ते सतत आपल्या दृष्टीपथात ठेवून त्यांचा उपयोग निर्णय घेण्यासाठी आधार म्हणून करावयाचा होता. (निर्गम १३:९, १४-१६ मध्ये वापरण्यात आलेली भाषा पडताळा.) त्यांना ‘दाराच्या बाह्‍यांवर व त्यांच्या फाटकांवर ते लिहावयाचे’ होते—याद्वारे त्यांची घरे आणि समाज देवाच्या वचनाचा आदर व अवलंब करणारी ठिकाणे असल्याची ओळख होणार होती. दुसऱ्‍या शब्दात सांगावयाचे तर, त्यांच्या राहणीमानाने ते यहोवाच्या धार्मिक नियमांवर प्रीती करतात आणि त्यांचा अवलंब करतात याचा विपुल पुरावा त्यांना द्यावयाचा होता. ते किती लाभदायक असणार होते! देवाच्या वचनाला आपल्या कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात याप्रकारचे प्रथम स्थान आहे का? यहुद्यांनी शास्त्रवचनांचे उतारे असलेली मंत्रपत्रे ताईताप्रमाणे समजून बांधण्यामुळे त्यांनी या गोष्टींचा बदल, केवळ पोकळ शिष्टाचारात केला, हे दुःखाचे आहे. त्यांची भक्‍ती अंतःकरणातून येण्याची थांबली आणि यहोवाने ती नाकारली.—यशया २९:१३, १४; मत्तय १५:७-९.

देखरेखीचा हुद्दा असणाऱ्‍यांची जबाबदारी

१६. शास्त्रवचनाचे नियमित वाचन करणे यहोशवासाठी महत्त्वपूर्ण का होते?

१६ शास्त्रवचनाच्या वाचनाच्या बाबतीत, राष्ट्राच्या पर्यवेक्षकांकडे खास लक्ष दिले जात होते. यहोवाने यहोशवाला म्हटले: “नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ.” ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्याला सांगण्यात आले: “रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल.” (यहोशवा १:७, ८) शास्त्रवचनांच्या नियमित वाचनामुळे यहोवाने त्याच्या लोकांना दिलेल्या विशेष आज्ञा त्याच्या मनात स्पष्ट ठेवण्यासाठी यहोशवाला मदत होणार होती, हेच आज कोणत्याही ख्रिस्ती पर्यवेक्षकाच्या बाबतीत खरे आहे. यहोवाने विविध परिस्थितीत त्याच्या सेवकांसोबत कसा व्यवहार केला हे देखील जाणून घेण्याची यहोशवाला गरज होती. त्याने देवाच्या उद्देशाच्या वक्‍तव्यांचे वाचन केले तसे त्या उद्देशाच्या बाबतीत स्वतःच्या जबाबदारीविषयी विचार करणे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण होते.

१७. (अ) राजांना यहोवाने सांगितलेल्या मार्गाने शास्त्रवचनांचे वाचन करण्यापासून लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या वाचनासोबत आणखी कशाची गरज होती? (ब) ख्रिस्ती वडिलांसाठी नियमित बायबल वाचन आणि मनन अधिक महत्त्वपूर्ण का आहे?

१७ आपल्या लोकांवर राजा म्हणून सेवा करणाऱ्‍याला, राज्य करण्याच्या आरंभास याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्रावरून देवाच्या नियमशास्त्राची एक नक्कल तयार करण्यासाठी यहोवाने मार्गदर्शित केले. त्यानंतर त्याला “तिचे जन्मभर अध्ययन” करावयाचे होते. याचा उद्देश त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्‍या गोष्टींचे केवळ पाठांतर करण्याचाच नव्हता, तर “तो आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय बाळगावयाला शिकेल” आणि “त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही” हा होता. (अनुवाद १७:१८-२०) यासाठी त्याला वाचन करीत असलेल्या गोष्टींवर सखोल मनन करण्याची गरज होती. उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर असे दिसते की, हे करण्यासाठी, काही राजांनी प्रशासनाच्या कारभारात ते अतिशय व्यग्र आहेत असा विचार केला. त्यांनी असे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण राष्ट्राला त्रास सहन करावा लागला. ख्रिस्ती मंडळीतील वडिलांची भूमिका राजांच्या भूमिकेसारखी नक्कीच नाही. तरीपण, देवाचे वचन वाचणे आणि त्यावर मनन करणे जसे राजांच्या बाबतीत खरे होते तसेच वडिलांसाठी देखील महत्त्वाचे आहे. असे केल्याने, ज्यांची काळजी घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आहे त्याबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास त्यांना मदत होईल. देवाचा खचित सन्मान होणाऱ्‍या आणि आध्यात्मिकरित्या सह ख्रिश्‍चनांना दृढ करणाऱ्‍या पद्धतीने शिक्षक म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी देखील यांची मदत होईल.—तीत १:९; पडताळा योहान ७:१६-१८; १ तीमथ्य १:६, ७ बरोबर तुलना करा.

१८. नियमित वाचन आणि बायबल अभ्यास, प्रेषित पौलाने मांडलेल्या कोणत्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास आपल्याला मदत करील?

१८ पहिल्या शतकातील ख्रिस्ती पर्यवेक्षक प्रेषित पौलाला, प्रेरित वचनांची उत्तम माहिती होती. प्राचीन थेस्सलनीकातील लोकांना साक्ष देताना तो त्यांच्यासोबत शास्त्रवचनातून परिणामकारकपणे वादविवाद आणि त्याचा अर्थ समजण्यास त्यांना मदत करू शकला. (प्रेषितांची कृत्ये १७:१-४) तो प्रामाणिक रसिकांच्या अंतःकरणाप्रत पोहंचला. यामुळे त्याचे ऐकणारे अनेक जण विश्‍वासू झाले. (१ थेस्सलनीकाकर २:१३) तुमचा बायबल वाचनाचा कार्यक्रम व अभ्यास, यामुळे तुम्ही शास्त्रवचनातून प्रभावीपणे वादविवाद करू शकता का? बायबल वाचनाने आणि ज्याप्रकारे तुम्ही ते करता या गोष्टीने तुमच्या जीवनात जी जागा घेतली आहे ती, तुमच्या जवळ जे देवाचे वचन आहे त्याचा अर्थ काय होतो, याची तुम्ही खरोखर गुणग्राहकता बाळगत असल्याचे शाबीत करते का? ज्यांचा आराखडा पूर्णपणे भरलेला आहे ते देखील या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरे कशी देऊ शकतात याचा विचार आपण पुढील लेखात करू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ बायबलचे वाचन करण्यासाठी लोकांनी आपले जीवन आणि स्वातंत्र्य धोक्यात घालण्यास का इच्छिले आहे?

◻ देवाचे वचन ऐकण्यासाठी प्राचीन इस्त्राएलात ज्या तरतुदी केल्या होत्या त्यांचा पुनर्विचार केल्याने आपल्याला कशाप्रकारे लाभ होतो?

◻ बायबलमध्ये आपण जे वाचतो त्याचे काय केले पाहिजे?

◻ ख्रिस्ती वडिलांसाठी बायबल वाचन आणि मनन विशेषपणे महत्त्वपूर्ण का आहे?

[९ पानांवरील चित्रं]

यहोवाने यहोशवाला सांगितले: “रात्रंदिवस त्याचे मनन कर.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा