वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१ पृ. ४-७
  • लवकरच कोणीही दरिद्री नसेल!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लवकरच कोणीही दरिद्री नसेल!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दरिद्र्‌यांसाठी मदत
  • दारिद्र्‌याचा सामना करण्यासाठी मदत
  • सरतेशेवटी दारिद्र्‌य नाही!
  • येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • दारिद्र्‌यावर कायमचा उपाय शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • गोरगरिबांना आशा द्या
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१ पृ. ४-७

लवकरच कोणीही दरिद्री नसेल!

“भिऊ नका, कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो.” (लूक २:१०) हे उभारणीकारक शब्द, येशू जन्मला त्या रात्री बेथलेहेमजवळील आश्‍चर्यचकित झालेल्या मेंढपाळांनी ऐकले होते. त्या घोषणेच्या सुसंगतेत, येशूने त्याच्या पार्थिव सेवेदरम्यान ‘सुवार्तेवर’ अधिक जोर दिला. आज, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पैश्‍यावर इतके अवलंबून राहतो, तेव्हा येशूविषयीच्या सुवार्तेचा आपल्याला कसा फायदा आहे?

येशू ख्रिस्ताने “दीनांस सुवार्ता” घोषित केली. (लूक ४:१८) मत्तय ९:३५ नुसार, “येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत . . . नगरातून व गावातून फिरत होता.” त्याची सुवार्ता विशेषकरून दारिद्र्‌याने गांजलेल्यांसाठी उत्तेजनपर होती. “लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) “गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत,” असे येशूने म्हटले हे खरे. परंतु त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू नये, की गरजवंतांसाठी काहीच आशा नाही. (योहान १२:८) हे दुष्ट व्यवस्थीकरण आहे तोपर्यंत लोक, त्यांच्या दयनीय स्थितीला काहीही कारणीभूत असले तरी, गरीबच राहतील. देवाचे वचन दारिद्र्‌याच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करीत नाही तसेच ते नकारात्मक पैलूंवरही लक्ष केंद्रित करत नाही. उलट, जीवनाच्या चिंतांचा सामना करण्यास ते दारिद्र्‌यांना मदत पुरवते.

दरिद्र्‌यांसाठी मदत

लक्षात ठेवण्याजोगी एक गोष्ट म्हणजे, असे म्हटले जाते: “आपली चिंता कोणी करत नाही किंवा आपल्याला समजून घेत नाही ह्‍यापेक्षा, दुसरे कोणतेही मोठे ओझे एखाद्याला सहन करावे लागत नाही.” बहुतांश लोक सहानुभूती दाखवण्यात उणे पडत असले तरी देखील, सध्या आणि भवितव्यात दरिद्र्‌यांसाठी एक सुवार्ता आहे.

दुःखाची गोष्ट म्हणजे, काहींनाच गरिबांना मदत करण्यास आवडते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया याच्यानुसार काहींना वाटते, की “समाजातील लोक बचावासाठी झटत असतात . . . आणि वरिष्ठ लोक सामर्थ्यशाली आणि श्रीमंत होतात.” सामाजिक डार्विनवाद असे म्हटल्या जाणाऱ्‍या सिद्धांतावर विश्‍वास ठेवणारे, गरिबांकडे आळशी लोक किंवा उधळपट्टी करणारे या दृष्टिकोनातून पाहतील. तरीसुद्धा, ग्रामीण कामगार, स्थलांतर करणारे कामगार आणि इतर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कमी पगार मिळत असतानाही बहुधा काबाडकष्ट करतात.

अनेक राष्ट्रांमध्ये गरिबी सर्वसामान्य आहे. याकारणास्तव, बहुतांश गरिबांना ते अपयशी ठरल्याचे वाटत नाही. तरीसुद्धा, अशा राष्ट्रांमध्ये गरीब आणि श्रीमंत लोक देखील राहतात. दाटीवाटीच्या बाधक झोपड्यांशेजारी सोईस्कर, थाटाची घरे असतात. भरपूर पगार असलेले लोक दरिद्री आणि बेकार लोकांनी गजबजलेल्या रस्त्यांवरून आपल्या महागड्या मोटार गाड्या चालवतात. अशा राष्ट्रांमध्ये दरिद्र्‌यांना त्यांची दयनीय स्थिती यातनामयरीत्या जाणवते. खरेच, “दरिद्री, केवळ निकस आहार, अपुरी घरे आणि वैद्यकीय काळजी यामुळेच दुःखी होत नाहीत तर त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीच्या चिंतेमुळे देखील दुःखी होतात. चांगल्या नोकऱ्‍या मिळवण्यास व त्या टिकून ठेवता येत नसल्यामुळे ते स्वतःची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान गमावतात,” असे द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो. तर मग, अगदीच गरीब लोक त्यांच्या परिस्थितीचा सामना कशाप्रकारे करतात? येशूबद्दलच्या सुवार्तेचा, तोंड देण्याच्या विषयाशी काय संबंध आहे?

प्रथम, हे आठवणीत ठेवा, की निर्बुद्ध सवयींमुळे एखादा आणखीनच दरिद्र होऊ शकतो. काही उदाहरणांचा विचार करा. वॉलडेसीर कबूल करतो, की त्याच्या पत्नीला आणि मुलांना पुरेसे खाण्यासाठी नसतानाही तो अनैतिक जीवनासाठी पैसे उधळत होता. तो म्हणतो: “मला नोकरी होती परंतु माझ्या खिश्‍यात माझ्या कुटुंबासाठी पैसे नव्हे तर वेगवेगळी लॉटरीची तिकीटे होती.” मिल्टनने दारूबाजी आणि धुम्रपानामुळे २३ कामगार असलेला त्याचा व्यापार गमावला. तो म्हणतो: “मी पुष्कळ वेळा रात्री रस्त्यावरच झोपलो, मी घरी जाऊ शकलो नाही आणि माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला पुष्कळ सहन करावे लागले.”

झाऊनने देखील त्याचा पगार व्यसनापायी उडवला. “मी पुष्कळ रात्री घराबाहेर घालवल्या. माझा पगार माझ्या व्यसनासाठी आणि प्रकरणांसाठी पुरेसा नव्हता. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि माझ्या पत्नीला माझ्यापासून विभक्‍त व्हायचे होते.” त्याच्या आर्थिक आणि वैवाहिक समस्यांव्यतिरिक्‍त आणखी अनेक समस्या होत्या. तो म्हणतो: “माझे नातेवाईकांबरोबर आणि शेजाऱ्‍यांबरोबर पटत नव्हते. खासकरून मी जेथे काम करत होतो तेथे मला समस्या होत्या. परिणामस्वरूप, मी पुष्कळ वेळा बेकार होतो.” झुल्यो मादक पदार्थांच्या व्यसनाधीन झाला होता. परंतु तो म्हणतो: “माझा पगार मादक पदार्थ घेण्याच्या माझ्या सवयीला पुरत नसल्यामुळे, मी गुंगीकारक द्रव्य विकू लागलो जेणेकरून मला मादक पदार्थ विकत घ्यावे लागणार नव्हते.”

आठ मुलांच्या एका गरीब कुटुंबात वाढल्यामुळे जोसला स्वतःसाठी काही तरी हवे होते. त्याची परिस्थिती आणखी बिकट होणार नाही असा निष्कर्ष काढून तो इतर तरुणांबरोबर लोकांना लुटू लागला. निराशेमुळे, आणखी एक युवक हेडबँगर्स नावाच्या एका टोळीत सामील झाला. तो म्हणतो: “आमच्यातील बहुतेक जण गरीब असल्यामुळे, वस्तुंची तोडफोड करून लोकांवर हल्ला करण्यात आम्हाला एक विशिष्ट प्रकारचे समाधान मिळत असे.”

परंतु आज, या सर्व लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना आवश्‍यक गोष्टींचा अभाव किंवा कटूपणा आणि संतापाच्या खोल भावनांचा सामना करावा लागत नाही. ते असहाय्य किंवा आशाहीन नाहीत. का नाहीत? कारण त्यांनी येशूने प्रचार केलेल्या सुवार्तेचा अभ्यास केला. त्यांनी बायबलचा सल्ला लागू केला आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील एकाच प्रकारचा विचार मनी बाळगणाऱ्‍या लोकांबरोबर सहवास राखला. शिवाय त्यांनी धन आणि दारिद्र्‌य याबद्दलच्या काही अतिमहत्त्वपूर्ण गोष्टी शिकून घेतल्या.

दारिद्र्‌याचा सामना करण्यासाठी मदत

प्रथम, त्यांनी शिकून घेतले की बायबलची तत्त्वे लागू केल्यावर, दारिद्र्‌याचे वाईट प्रभाव कमी केले जाऊ शकतात. बायबल अनैतिकता, दारूबाजी, जुगार आणि मादक पदार्थांचा दुरूपयोग यांचा धिक्कार करते. (१ करिंथकर ६:९, १०) या गोष्टींसाठी पैसा लागतो. या गोष्टी एका श्रीमंताला गरीब आणि गरिबाला कंगाल बनवू शकतात. ही आणि त्यांच्यासारखीच इतर व्यसने सोडल्यावर एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधरण्यात नक्कीच मदत मिळते.

दुसरी गोष्ट, धनापेक्षा जीवनात आणखी पुष्कळ महत्त्वपूर्ण गोष्टी असल्याचे त्यांना दिसून आले. “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते,” या प्रेरित शब्दांमध्ये समतोल दृष्टिकोन व्यक्‍त केला आहे. (उपदेशक ७:१२) पैसा आवश्‍यक आहे हे खरे आहे. परंतु बायबल आधारित बुद्धी आणि देवाच्या उद्देशांचे ज्ञान याहूनही अधिक उपयोगी आहे. खरेच, बुद्धीचा अभाव असणाऱ्‍याजवळ जास्त पैसा असणे एका ओझ्याप्रमाणे आहे. बायबल लेखकाने सूज्ञपणे प्रार्थना केली: “दारिद्र्‌य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्‍यक तेवढे अन्‍न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि परमेश्‍वर कोण आहे, असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित्‌ चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.”—नीतीसूत्रे ३०:८, ९.

तिसरी गोष्ट, त्यांना दिसून आली की येशूने प्रचार केलेल्या सुवार्तेनुसार एखाद्या व्यक्‍तीने जीवन व्यतीत केले तर तिला त्यागल्यासारखे वाटण्याचे काही कारण नाही. या सुवार्तेत देवाच्या राज्याच्या समावेश आहे. सुवार्तेच्या संदेशाला ‘राज्याची सुवार्ता’ असे संबोधले आहे आणि आमच्या दिवसांमध्ये ती सर्व जगामध्ये गाजवली जात आहे. (मत्तय २४:१४) येशूने आपल्याला सांगितले की आपण आपली आशा त्या राज्यावर ठेवली तर आपल्याला आधार दिला जाईल. तो म्हणाला: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) देव भपकेदार मोटार गाड्या किंवा चैनीची घरे देण्याचे वचन देत नाही. येशू अन्‍न आणि वस्त्र यासारख्या जीवनाश्‍यक गोष्टींबद्दल बोलत होता. (मत्तय ६:३१) पण आज लाखो लोक येशूचे अभिवचन विश्‍वसनीय असल्याचे सांगू शकतात. एखाद्या व्यक्‍तीला, मग ती अत्यंत गरीब असली तरी, तिने राज्याला प्रथमस्थानी ठेवल्यावर, त्यागले जाणार नाही.

चौथी गोष्ट, त्यांना असे दिसून आले, की देवाच्या राज्याला प्रथमस्थान देणारा आर्थिक संकटामुळे क्षोभित होत नाही. होय, एका गरीब व्यक्‍तीला काबाडकष्ट करावे लागतात. परंतु तिने देवाची सेवा केली तर तिला, तिच्या निर्माणकर्त्यासोबत नातेसंबंध ठेवण्याचा विशेषाधिकार आहे ज्याच्याबद्दल बायबल म्हणते: “कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखिली नाही व तिचा वीट मानिला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर त्याने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.” (स्तोत्र २२:२४) यासोबतच, गरीब व्यक्‍तीला जीवनाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी मदत मिळते. ती सहख्रिश्‍चनांच्या उबदार सहवासाचा आनंद लुटते आणि तिच्याकडे यहोवाच्या प्रकट इच्छेबद्दलचे ज्ञान आणि खात्री असते. अशा प्रकारच्या गोष्टी, “सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत.”—स्तोत्र १९:१०.

सरतेशेवटी दारिद्र्‌य नाही!

शेवटी, सुवार्तेकडे लक्ष देणाऱ्‍या लोकांना कळून येते, की यहोवा देवाने त्याच्या राज्याकरवी दारिद्र्‌याच्या समस्येचे कायमचे निरसन करण्याचे उद्देशिले आहे. बायबल अभिवचन देते: “कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही.” (स्तोत्र ९:१८) ते राज्य एक वास्तविक सरकार आहे, जे स्वर्गात स्थापन केले आहे व ज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे. लवकरच, मानवी कारभारांची व्यवस्था पाहणाऱ्‍या मानवी सरकारांऐवजी ते राज्य सर्व व्यवस्था पाहील. (दानीएल २:४४) तेव्हा, सिंहासनाधिष्ठ राजा या नात्याने येशू “दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर . . . दया करील, दरिद्र्‌याचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१३, १४.

त्या समयाची वाट पाहत असताना मीखा ४:३, ४ म्हणते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.” येथे कोणाबद्दल बोलण्यात आले आहे? ते देवाच्या राज्याच्या अधीन होणारे लोक आहेत. मानवजातीला पीडित करणाऱ्‍या सर्व समस्या—होय, आजारपण आणि मृत्यूची समस्या देखील ते राज्य दूर करील. “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो.” (यशया २५:८; ३३:२४) ते जग किती निराळे असेल! आणि लक्षात ठेवा, आपण ह्‍या अभिवचनांवर विश्‍वास ठेवू शकतो कारण ही अभिवचने स्वतः देवाने प्रेरित केली आहेत. तो म्हणतो: “माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.”—यशया ३२:१८.

देवाच्या राज्यावरील भरवसा, दारिद्र्‌यामुळे अनेकदा होणाऱ्‍या स्वाभिमानाच्या अभावावर मात करतो. एखाद्या गरीब ख्रिश्‍चनाला माहीत आहे, की एका समृद्ध ख्रिश्‍चनाप्रमाणे तोही देवाच्या नजरेत तितकाच महत्त्वपूर्ण आहे. देव दोघांना समान प्रीती करतो आणि दोघांना एकच आशा आहे. दोघेही अतिशय उत्कंठतेने त्या समयाची वाट पाहतात जेव्हा देवाच्या राज्यात दारिद्र्‌य गतकाळातील गोष्टींमधील एक असेल. तो समय किती उत्कृष्ट असेल! सरतेशेवटी कोणीही दरिद्री नसेल!

[५ पानांवरील चित्रं]

जुगार, धुम्रपान, दारूबाजी, मादक पदार्थांचा दुरूपयोग किंवा अनैतिक जीवनशैलीसाठी संपत्तीची उधळपट्टी का करावी?

[७ पानांवरील चित्रं]

यहोवा देव त्याच्या राज्याकरवी मानवाच्या दारिद्र्‌याची समस्या सोडवील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा