वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ८/१५ पृ. १६-२१
  • “सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा आत्मा आणि सुवार्ता
  • आध्यात्मिक गरजेची जाणीव
  • राज्याची सुवार्ता कळविण्यासाठी यशस्वी पद्धती
  • ख्रिस्ती वर्तन देखील एक साक्ष
  • दास वर्ग उचित साधनांना पुरवतो
  • आम्हा सर्वांची जबाबदारी आहे
  • यहोवाची संघटना तुमच्या सेवेस आधार देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • आपल्याजवळ सत्य आहे याची तुम्हाला खात्री आहे का? जर आहे, तर का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • प्रथम सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ८/१५ पृ. १६-२१

“सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे

“सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

१. मत्तय २४:१४ मध्ये लिखित असणारे येशूचे शब्द त्याच्या अनुयायांना आश्‍चर्यकारक का वाटले असावे?

येशूच्या यहुदी शिष्यांना वरील शब्दांमुळे किती आश्‍चर्य वाटले असावे! यहुदी पवित्र आहेत या कल्पनेमुळे, “अशुद्ध” यहुदेत्तर, ‘परराष्ट्रीयांकडे’ जाऊन त्यांच्याशी बोलणे ही गोष्ट नवी व तिरस्करणीय देखील होती.a आपल्या विवेकाप्रमाणे करण्याची जाणीव असलेले यहुदी परराष्ट्रीयांच्या घरात प्रवेश करण्याचा विचारही करणार नाही! त्या यहुदी शिष्यांना येशूबद्दल, त्याची प्रीती, व त्याच्या आज्ञेविषयी अजूनही पुष्कळ शिकायचे होते. तसेच त्यांना यहोवाच्या निःपक्षपातीपणाबद्दल देखील अधिक काही शिकायचे होते.—प्रेषितांची कृत्ये १०:२८, ३४, ३५, ४५.

२. (अ) साक्षीदारांची सेवा किती विस्तृत झाली आहे? (ब) साक्षीदारांच्या प्रगतीला कोणत्या तीन मूलभूत कारणांनी हातभार लावला?

२ यहोवाच्या साक्षीदारांनी सुवार्तेचा प्रचार आधुनिक दिवसातील इस्राएलमध्येही केला आहे. तसेच आता पूर्वीपेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये ते प्रचार करतात. १९९४ मध्ये ४५ लाखांपेक्षा अधिक साक्षीदार अंदाजे २३० देशात प्रचारकार्य करीत आहेत. ते आस्थेवाईक लोकांसोबत जवळजवळ ४५ लाख पवित्र शास्त्राभ्यास चालवित आहेत. हे कार्य, त्यांच्याविषयी जगभरातील कलुषितपणा असताना देखील चालू आहे. हा कलुषितपणा अनेकदा साक्षीदारांच्या शिकवणीकडे व हेतूंकडे केलेल्या दुर्लक्षीतपणामुळे असतो. आरंभीच्या ख्रिश्‍चनांविषयी म्हटल्याप्रमाणे, यांच्याविषयी देखील असेच म्हटले जाऊ शकते: “कारण ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरूद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २८:२२) त्यांच्या यशस्वी सेवेबद्दल आपण कशाला श्रेय देऊ शकतो? त्यांच्या वाढीला कारणीभूत ठरणारी निदान तीन कारणे आहेत—यहोवाच्या आत्म्याच्या नेतृत्त्वाला अनुसरणे, ख्रिस्ताच्या व्यावहारिक पद्धतींचे अनुकरण करणे, व प्रभावकारी दळणवळणासाठी योग्य साधनांचा वापर करणे.

यहोवाचा आत्मा आणि सुवार्ता

३. साध्य केलेल्या कार्याबद्दल आम्ही अभिमान का बाळगू नये?

३ यहोवाचे साक्षीदार, कदाचित त्यांच्याकडे असलेल्या काही विशिष्ट योग्यतेमुळे त्यांना यश मिळाल्याचा अभिमान बाळगतात का? नाही, येशूचे शब्द लागू होतात: “तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.” यहोवाचे साक्षीदार समर्पित, बाप्तिस्मा घेतलेले ख्रिश्‍चन या नात्याने, त्यांच्या वैयक्‍तिक परिस्थिती कोणत्याही असल्या तरी त्यांनी देवाची सेवा करण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. काहींसाठी त्याचा अर्थ, मिशनरी किंवा शाखा दप्तरात व ख्रिस्ती प्रकाशनांच्या छपाई सुविधांमध्ये स्वयंसेवक या नात्याने पूर्ण वेळेची सेवा करणे होय. अशी ख्रिश्‍चन स्वेच्छा, काहींना धार्मिक इमारतींचे बांधकाम करण्यास, पायनियर सेवक या नात्याने पूर्ण वेळ प्रचार करण्यास, किंवा स्थानिक मंडळीत सुवार्तेचे प्रचारक म्हणून अर्धवेळेचे प्रचारकार्य करण्यास मार्गदर्शित करते. आम्हातील कोणीही आमच्या कर्तव्याबद्दल अभिमान बाळगू शकत नाही, याचा अर्थ, “आम्ही आमचे कर्तव्य केले आहे.”—लूक १७:१०; १ करिंथकर ९:१६.

४. ख्रिस्ती सेवेबद्दल असणाऱ्‍या जगभरातील विरोधावर कशी मात करण्यात आली आहे?

४ आम्हाला कोणतेही यश मिळाले असले तरी, त्याचे श्रेय यहोवाच्या आत्म्याला, किंवा क्रियाशील शक्‍तीला दिले जाऊ शकते. ते संदेष्टा जखऱ्‍याच्या दिवसात होते त्याप्रमाणेच आज देखील सांगणे महत्त्वाचे आहे: “जरुब्बाबेलास परमेश्‍वराचे [यहोवा, NW] हे वचन आहे: बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धि होईल असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो.” अशाप्रकारे, जगभरात साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर असलेल्या विरोधावर मात केली जात आहे. ती कोणा मानवी प्रयत्नांमुळे नव्हे, तर यहोवाचे मार्गदर्शन आणि संरक्षण यामुळे आहे.—जखऱ्‍या ४:६.

५. राज्याचा संदेश प्रसारित करण्यात यहोवा कोणती भूमिका बजावतो?

५ राज्य संदेशास आवड दाखवणाऱ्‍यांबद्दल येशूने म्हटले: “संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने [यहोवा, NW] शिकविलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. . . . पित्याने कोणाहि मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४५, ६५) यहोवा हृदय आणि मन वाचू शकतो. व जरी काहींना अद्यापि त्याची ओळख नसली, तरी ते त्याच्या प्रीतीला कदाचित प्रतिसाद देतील हे तो जाणतो. तो या अतुलनीय सेवेचे मार्गदर्शन करण्यासाठी देवदूतांचाही वापर करतो. याच कारणामुळे योहानाने दृष्टांतात देवदुतीय सहभाग पाहिला व लिहिले: “नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.”—प्रकटीकरण १४:६.

आध्यात्मिक गरजेची जाणीव

६. एखाद्या व्यक्‍तीने सुवार्तेला प्रतिसाद देण्यासाठी कोणत्या मूलभूत प्रवृत्तीची गरज आहे?

६ यहोवा, एखाद्या व्यक्‍तीने सुवार्तेचा स्वीकार करावा म्हणून त्याला संधी देण्यासाठी आणखी एक कारण प्रदान करतो. हेच येशूने व्यक्‍त केले: “आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले धन्य, कारण स्वर्गांचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३, NW) स्व-संतुष्ट असणारा व्यक्‍ती, किंवा सत्याचा शोध न करणारा व्यक्‍ती आध्यात्मिक गरजांची जाणीव असणारा नसेल. तो किंवा ती केवळ भौतिक दृष्ट्या अथवा दैहिक दृष्ट्या विचार करतात. आत्मसंतुष्टता प्रतिबंध करते. अशाप्रकारे, आम्ही घरोघरी गेल्यावर अनेक लोक संदेशाला नाकारतात तेव्हा, लोक असे करण्याची अनेक कारणे असू शकतात हा विचार आम्ही केला पाहिजे.

७. अनेक लोक सत्याला प्रतिसाद का देत नाहीत?

७ अनेक लोक ऐकण्याचे नाकारतात, कारण ते वारशाने त्यांना मिळालेल्या धर्माला हट्टीपणाने जडून राहतात व चर्चा करण्याची त्यांची इच्छा नसते. इतर लोक त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला साजेशा असलेल्या धर्माकडे आकर्षित झाले आहेत. काही जणांना गूढवादाचे धर्म पाहिजेत, तर इतर जण विकारवशता याची आवड दाखवितात, तर काही जण त्यांच्या चर्चमध्ये सामाजिक कार्याची आवड दाखवतात. आज अनेक लोकांची जीवनशैली देवाच्या दर्जांच्या विरुद्ध आहे. ते लोक, “मला यात आवड नाही,” असे म्हणतात तेव्हा त्याचे एक कारण कदाचित ते अनैतिक जीवन व्यतित करीत असतील, हे असू शकते. तरीही, इतरजण, स्वतःला शिक्षित व वैज्ञानिक असल्याचा दावा करीत असले तरी, पवित्र शास्त्राला फारच साधे व सोपे समजून त्याचा अस्वीकार करतात.—१ करिंथकर ६:९-११; २ करिंथकर ४:३, ४.

८. अस्वीकृतीने आमचा आवेश कमी का होऊ नये? (योहान १५:१८-२०)

८ अनेकांनी अस्वीकृती दाखविल्यामुळे जीवन रक्षक सेवेतील आमचा विश्‍वास व आवेश कमी होऊ दिला पाहिजे का? पौलाने रोमकरास लिहिलेल्या शब्दांमुळे आम्हाला सांत्वन मिळू शकते की: “कित्येकांनी विश्‍वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्‍वास देवाची विश्‍वास पात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातहि लिहिलेले आहे की, ‘तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.’”—रोमकर ३:३, ४.

९, १०. अनेक देशात विरोधावर मात केल्याचा काय पुरावा आहे?

९ संपूर्ण जगभरातील काही देश अस्वीकृती दाखविणारे वाटत असताना, त्यांनी अगदी याच्या विपरीत शाबीत केल्यामुळे, अशा देशातील अनुभवांपासून आपणाला उत्तेजन मिळू शकते. तेथे चांगल्या अंतःकरणाचे लोक सापडतील हे यहोवा आणि देवदूतांना माहीत आहे—परंतु यहोवाच्या साक्षीदारांना सेवा करीत व सहनशील राहावयाचे आहे. उदाहरणार्थ, अर्जेंटिना, आयर्लंड, इटली, कोलंबिया, पोर्तुगाल, ब्राझील, मेक्सिको, व स्पेन—या काही देशात, ५० वर्षांपूर्वी कॅथलिक मतप्रणाली एक दुर्निवार्य अडथळ्यासारखी वाटत होती. १९४३ मध्ये संपूर्ण जगभरात केवळ १,२६,००० साक्षीदार होते. यातील ७२,००० साक्षीदार अमेरिकेत होते. साक्षीदारांना त्यांच्या समोरील अज्ञान, कलुषितपणा सहजपणे पाडता येऊ शकत नसलेल्या विटांच्या भींतीसारखा वाटत होता. तरीही, आज, या देशांत अधिक यशस्वी प्रचारकार्याची फळे मिळाली आहेत. हीच गोष्ट, आधी कम्युनिस्ट असलेल्या देशांच्या बाबतीत देखील सत्य आहे. १९९३ मध्ये किव, युक्रेन येथे झालेल्या अधिवेशनात ७,४०२ चा बाप्तिस्मा याचा पुरावा देतो.

१० राज्याच्या सुवार्तेची सहभागिता त्यांच्या शेजाऱ्‍यांसोबत करण्यासाठी साक्षीदारांनी कोणत्या पद्धतींचा वापर केला आहे? काहींनी आरोप लावल्याप्रमाणे, मतांतर करण्यासाठी त्यांनी भौतिक आमिषाचा वापर केला का? इतरांनी दावा केल्याप्रमाणे त्यांनी केवळ गरीब व अशिक्षित लोकांनाच भेटी दिल्या आहेत का?

राज्याची सुवार्ता कळविण्यासाठी यशस्वी पद्धती

११. येशूने त्याच्या सेवेत कोणते उत्तम उदाहरण मांडले? (पाहा योहान ४:६-२६.)

११ येशू आणि त्याच्या शिष्यांनी ठेवलेल्या आदर्शाला, साक्षीदार आज देखील त्यांच्या शिष्य बनविण्याच्या कार्यात अनुसरतात. जेथे कोठे श्रीमंत, गरीब लोक होते त्या ठिकाणी—घरी, सार्वजनिक ठिकाणी, तळ्याजवळ, डोंगराजवळ, सभास्थानात देखील येशू गेला.—मत्तय ५:१, २; ८:१४; मार्क १:१६; लूक ४:१५.

१२, १३. (अ) पौलाने ख्रिश्‍चनांसाठी कशाप्रकारे आदर्श मांडला? (ब) यहोवाच्या साक्षीदारांनी पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे केले?

१२ प्रेषित पौल उचितपणे त्याच्या सेवेबद्दल म्हणू शकला: “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो . . . मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला ठाऊक आहे; जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.”—प्रेषितांची कृत्ये २०:१८-२०.

१३ यहोवाचे साक्षीदार, घरोघरच्या सेवेच्या बाबतीत प्रेषितीय नमुन्याचे अनुकरण करीत असल्याचे जगभर ज्ञात आहे. साक्षीदार, महागडे, वरकरणी, व व्यक्‍तिभावरहित टीव्ही धर्मोपदेशक सेवेवर केंद्रित होण्याऐवजी, गरीब व श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन समक्ष भेटतात. ते देव आणि त्याच्या वचनाबद्दल संभाषण करतात.b ते, लोकांचे मतांतर करण्यासाठी त्यांना मोफत वस्तु देऊन शिधेवर जगणारे ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न करीत नाही. इच्छूक लोकांबरोबर तर्क करण्यासाठी, ते मानवजातीच्या समस्यांवरील खरा तोडगा देवाच्या राज्याचे अधिपत्य असण्याकडे अंगुली दर्शवतात, तेच राज्य चांगल्या कारणासाठी पृथ्वीवरील परिस्थिती बदलून टाकील.—यशया ६५:१७, २१-२५; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४.

१४. (अ) अनेक मिशनरी व पायनियरांनी कशाप्रकारे मजबूत पाया बांधला? (ब) आम्ही जपानमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या अनुभवापासून काय शिकतो?

१४ शक्य होईल तसे अधिक देशात कार्य उरकण्यासाठी, अनेक देशात मिशनरी व पायनियरांनी प्रथम आधार स्थापन केले आहेत. त्यांनी पाया बांधला आहे, मग स्थानिक साक्षीदारांनी नेतृत्त्व केले. अशाप्रकारे, प्रचारकार्य चालू राहण्यासाठी व उत्तम प्रकारे संघटित ठेवण्यासाठी विदेशातील साक्षीदारांच्या मोठ्या संख्येची यासाठी आवश्‍यकता नाही. एक उल्लेखनीय उदाहरण जपानच्याबाबतीत आहे. मागे १९४० च्या दशकात ऑस्ट्रेलियन व ब्रिटीश मिशनरी तेथे गेले, भाषा शिकले, व त्या युद्धानंतरच्या युगात आधीच्या परिस्थितीशी काहीअंशी जुळवून घेतले, व घरोघरचे साक्षकार्य करायला लागले. जपानमध्ये दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान, साक्षीदारांवर बंदी होती व त्यांचा छळ केला गेला. यास्तव, मिशनरी आले तेव्हा त्यांना थोडकेच जपानी साक्षीदार क्रियाशील असलेले दिसले. परंतु आज, त्यांच्यात १,८७,००० तसेच ३,००० पेक्षाही अधिक मंडळ्यात वाढ झाली आहे! आधीच्या यशाचे गुपित काय होते? तेथे २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या एका मिशनऱ्‍याने म्हटले: “लोकांसोबत संभाषण करण्याचे शिकणे अधिक महत्त्वपूर्ण होते. आम्ही त्यांची भाषा बोलण्याद्वारे, त्यांच्या जीवनमानाची गुणग्राहकता बाळगण्यासाठी व त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जवळीक राखू शकलो. आम्हाला जपानी लोकांवर प्रीती करतो हे दाखवायचे होते. अर्थातच, आमच्या ख्रिस्ती मूल्ल्यांची हातमिळवणी न करता, आम्ही स्थानिक समाजाचा भाग बनण्याचा नम्रपणे प्रयत्न केला.”

ख्रिस्ती वर्तन देखील एक साक्ष

१५. साक्षीदारांनी ख्रिस्ती वर्तन कसे प्रदर्शित केले आहे?

१५ तथापि, लोक केवळ पवित्र शास्त्राच्या संदेशालाच आकर्षित झाले नाहीत. त्यांनी ख्रिस्ती विश्‍वासाचे कार्य देखील पाहिले. त्यांनी मुलकी युद्धे, जातीय झगडे, व भिन्‍न राष्ट्रांसंबंधीची शत्रूता यासारख्या अधिक खडतर परिस्थितीत देखील साक्षीदारांनी दाखविलेली प्रीती, मेळ, व एकता पाहिली. साक्षीदारांनी सर्व मतभेदामध्ये ख्रिस्ती तटस्थतेची स्पष्ट भूमिका राखली व येशूच्या शब्दांची पूर्ती केली: “मी तुम्हांस नवी आज्ञा देती की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहां.”—योहान १३:३४, ३५.

१६. कोणता अनुभव व्यावहारिक ख्रिस्ती प्रीतीचे विदारण करतो?

१६ शेजाऱ्‍यावरील प्रीती, एका वयस्कर गृहस्थाच्या बाबतीत दिसून आली, त्याने स्थानिक वृत्तपत्रात “श्रीमान व श्रीमती सभ्य लोक” असे संबोधून लिहिले. त्याने खुलासा केला की, त्याची पत्नी मृत्युशय्येवर असताना, त्याचे शेजारी त्याच्यासोबत अधिक दयाळू होते. त्याने लिहिले, “तिचे निधन झाल्यापासून . . . ते खूपच चांगले राहिले आहेत. तेव्हापासून त्यांनी मला ‘दत्तक’ घेतले आहे . . . , सर्व प्रकारची लहान सहान कामे करत व ७४ वयाच्या निवृत्त मनुष्याच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करत आहेत. याला आणखी असामान्य बनविणारी गोष्ट म्हणजे ते काळे, व मी श्‍वेत आहे, ही होय. ते यहोवाचे साक्षीदार आहेत तर मी एक निष्क्रिय कॅथलिक आहे.”

१७. आम्ही कोणता मार्ग टाळला पाहिजे?

१७ हा अनुभव दाखवतो की, आम्ही आमच्या दैनंदिन वर्तणूकीसह अनेक मार्गांनी साक्ष देऊ शकतो. वस्तुतः, आमची वर्तणूक ख्रिस्तासारखी नसल्यास, आमची सेवा कोणत्याही प्रभावाविना परुश्‍यांसारखी होईल. आमची येशूने वर्णन केलेल्यांप्रमाणे होण्याची इच्छा नाही: “ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करु नका.”—मत्तय २२:३७-३९; २३:३.

दास वर्ग उचित साधनांना पुरवतो

१८. आम्हाला, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्यासाठी पवित्र शास्त्राचे साहित्य कसे सुसज्ज करते?

१८ राज्याच्या सुवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांना करण्याचे आणखी एक कारण, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटीने प्रकाशित केलेल्या पवित्र शास्त्राच्या साहित्याची उपलब्धता हे आहे. प्रामाणिक प्रश्‍न विचारणाऱ्‍या जवळजवळ प्रत्येकाचे समाधान करण्यासाठी आमच्याकडे पुस्तके, माहितीपत्रके, हस्तपत्रिका, व नियतकालिके आहेत. आम्ही एखाद्या मुसलमान, हिंदू, बौद्ध, टोइस्ट, किंवा यहूदी व्यक्‍तीला भेटलो तर, देवासाठी मानवजातीचा शोध (इंग्रजी) या पुस्तकाचा वापर करु शकतो किंवा विविध पत्रिका व पुस्तिकांचा उपयोग करून संभाषण किंवा शक्य तर पवित्र शास्त्राभ्यास सुरू करू शकतो. एखाद्या उत्क्रांतीवाद्याने निर्मितीविषयी विचारणा केल्यास आम्ही, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक वापरू शकतो. एखाद्या तरुणाने ‘जीवनाचा उद्देश काय आहे?’ याची विचारणा केल्यास, त्याला तरूण लोक विचारत असलेले प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकाचा उल्लेख आम्ही करू शकतो. एखादी व्यक्‍ती—निराशा, थकवा, बलात्कार, घटस्फोट—यासारख्या वैयक्‍तिक समस्यांनी अधिक ग्रासलेली असल्यास अशा विषयांना व्यावहारिक मार्गाने हाताळलेली नियतकालिके आम्हाजवळ आहेत. खरेच, येशूने भाकीत केलेला, ‘यथाकाळी खावयास’ देणारा विश्‍वासू दास वर्ग आपली भूमिका पूर्ण करीत आहे.—मत्तय २४:४५-४७.

१९, २०. अल्बेनियात राज्य कार्याने कशी गती घेतली?

१९ परंतु राष्ट्रांप्रत पोहंचण्यासाठी अनेक भाषांमध्ये साहित्य प्रकाशित करणे अधिक आवश्‍यक बनले आहे. पवित्र शास्त्र आणि शास्त्रवचनीय साहित्य २०० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत करणे कसे शक्य आहे? अधिक समस्या असताना व अन्य भाषेत तात्कालिक ज्ञान देण्यासाठी आधुनिक पेन्टेकॉस्टविना देखील विश्‍वासू बुद्धिमान दास वर्गाने सुवार्तेला कसे वाढवले आहे, हे अल्बेनियाचे एक उदाहरण थोडक्यात दाखवते.—प्रेषितांची कृत्ये २:१-११.

२० केवळ काही वर्षांआधी, अल्बेनियाकडे तोच फक्‍त नास्तिक समाज असलेला देश आहे म्हणून पाहिले जात होते. नॅशनल जॉगरॅफिक नियतकालिकाने १९८० मध्ये म्हटले: “अल्बेनिया [धर्माला] मनाई करतो, १९६७ मध्ये ‘जगातील पहिले नास्तिक राष्ट्र’ म्हणून घोषणा करते. . . . अल्बेनियातील नव्या पिढीला केवळ नास्तिकता माहीत आहे.” आता कम्युनिस्ट मतप्रणालीचा ऱ्‍हास झाला आहे, अल्बेनियातील आध्यात्मिक गरजा जाणणारे लोक, यहोवाचे साक्षीदार करीत असलेल्या प्रचाराविषयी प्रभावित होत आहेत. इटालियन व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्‍या तरुण साक्षीदारांसहित एक लहान भाषांतर गट १९९२ मध्ये तिरानॉ येथे तयार झाला आहे. इतर देशातून भेट देणाऱ्‍या बांधवांनी त्यांना लॅपटॉप संगणकाचा वापर करुन अल्बेनियन भाषेतील मजकूर टंकलिखित करण्याचे शिकवले. त्यांनी पत्रिका व वॉचटावर नियतकालिकांचे भाषांतर करण्यास आरंभ केला आहे. त्यांना जसजसा अनुभव मिळत जाईल, तसतसे ते पवित्र शास्त्राच्या इतर बहुमोल साहित्यांचे भाषांतर करण्यास कार्य करतील. सध्या त्या (३२,६२,००० लोकसंख्येच्या) लहानशा देशात २०० क्रियाशील साक्षीदार आहेत, व १९९४ च्या स्मारकविधीला १,९८४ लोक उपस्थित होते.

आम्हा सर्वांची जबाबदारी आहे

२१. आम्ही कोणत्या काळात जगत आहोत?

२१ जागतिक घटना कळसाला पोहंचत आहेत. गुन्हे, हिंसा, संहार, व स्थानिक युद्धातील बलात्कार, स्वैर नैतिकता व लैंगिक संक्रमणाद्वारे मिळालेल्या आजाराची फळे, कायदेशीर अधिकाराला अनादर या वाढीमुळे जग अराजकता व अकार्यक्षम झाले आहे. आम्ही उत्पत्तीमध्ये जलप्रलयाआधीच्या काळाचे वर्णन केलेल्या समयासारख्याच काळात आहोत: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्‍वराने [यहोवा, NW] पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्‍न केल्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] खेद झाला.”—उत्पत्ती ६:५, ६; मत्तय २४:३७-३९.

२२. यहोवाच्या सर्व साक्षीदारांना कोणती ख्रिस्ती जबाबदारी आहे?

२२ नोहाच्या दिवसांप्रमाणेच, यहोवा कारवाई करील. परंतु त्याच्या न्याय आणि प्रीतीमुळे, सुवार्ता व इशारा देणारा संदेश सर्व राष्ट्रांना प्रथम प्रचार करावयाची त्याची इच्छा आहे. (मार्क १३:१०) याविषयी, देवाच्या शांतीसाठी योग्य असणाऱ्‍यांचा शोध करणे व त्यांना त्याचे शांतीचे मार्ग शिकवण्याची यहोवाच्या साक्षीदारांची जबाबदारी आहे. लवकरच देवाच्या नियुक्‍त वेळी, प्रचारकार्याची आज्ञा यशस्वीपणे पूर्ण केली जाईल. “तेव्हा शेवट होईल.”—मत्तय १०:१२, १३; २४:१४; २८:१९, २०.

[तळटीपा]

a परराष्ट्रीयांसंबंधीच्या अधिक माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंक. यांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सुक्ष्मदृष्टी, खंड २ पृष्ठे ४७२-४ वरील “नेशन्स्‌” हे शीर्षक पाहा.

b ख्रिस्ती सेवेवरील व्यावहारिक सल्ल्यासंबंधी, ऑगस्ट १५, १९८४ वॉचटावर मधील पृष्ठ १५ वरील “प्रभावी सेवक कसे होऊ शकतात,” व पृष्ठ २१ वरील, “प्रभावी सेवा अधिक शिष्यांप्रत निरवते” हे पाहा.

तुम्हाला आठवते का?

▫ आधुनिक दिवसातील साक्षीदारांना त्यांच्या सेवेत कोणते यश मिळाले आहे?

▫ अनेक लोक ख्रिस्ती संदेशाचा अस्वीकार का करतात?

▫ साक्षीदार प्रचारकार्याच्या कोणत्या प्रेषितीय पद्धतीचा उपयोग करतात?

▫ परिणामकारक सेवेसाठी आमच्याजवळ कोणती साहित्ये आहेत?

▫ मार्क १३:१० च्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी काय केले पाहिजे?

[१९ पानांवरील चौकट]

देश साक्षीदार १९४३ मध्ये क्रियाशील १९९३ मध्ये

अर्जेंटिना ३७४ १,०२,०४३

ब्राझील ४३० ३,६६,२९७

चिली ७२ ४४,६६८

कोलंबिया ?? ६०,८५४

फ्रान्स दुसरे महायुद्ध—अहवाल नाही १,२२,२५४

आर्यंलंड १५०? ४,२२४

इटली दुसरे महायुद्ध—अहवाल नाही २,०१,४४०

मेक्सिको १,५६५ ३,८०,२०१

पेरु कार्याचा अहवाल नाही ४५,३६३

फिलिपाईन्स दुसरे महायुद्ध—अहवाल नाही १,१६,५७६

पोलंड दुसरे महायुद्ध—अहवाल नाही १,१३,५५१

पोर्तुगाल कार्याचा अहवाल नाही ४१,८४२

स्पेन कार्याचा अहवाल नाही ९७,५९५

ऊरुग्वे २२ ९,१४४

व्हेन्झुयेला कार्याचा अहवाल नाही ६४,०८१

[१७ पानांवरील चित्रं]

यहोवाच्या साक्षीदारांची, स्पेनप्रमाणे अनेक कॅथलिक देशांमध्ये वाढ होत आहे

[१८ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार सर्व जगभरातील राष्ट्रांत क्रियाशील आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा