प्रथम सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे
“प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.”—मार्क १३:१०.
१, २. साक्षीदारांचे ओळखचिन्ह कोणते आहे, आणि का?
यहोवाचे साक्षीदार इतके चिकाटीने प्रचार का करतात? नक्कीच, आमच्या जाहीर सेवेबद्दल जगभरात आमची ख्याती आहे, मग ती सेवा घरोघरची, मार्गांवरील, किंवा अनौपचारिक संपर्कात असताना केलेली असो. प्रत्येक सोयीस्कर प्रसंगी, आम्ही साक्षीदार असल्याची स्वतःची ओळख देतो व आम्हाजवळ असलेल्या सुवार्तेच्या ठेव्याची सहभागिता युक्तीने करण्याचा प्रयत्न करतो. वस्तुतः, या सेवेला आपले ओळखचिन्ह आपण म्हणू शकतो.—कलस्सैकर ४:६.
२ याचा जरा विचार करा—लोक जेव्हा जेव्हा त्यांच्या परिसरात, चांगला पेहराव घातलेल्या व हातात बॅग असलेल्या पुरूष, स्त्रिया, आणि मुलांना पाहतात तेव्हा तेव्हा, त्यांच्या मनात प्रथम कोणता विचार येतो बरे? त्यांना वाटते का, ‘हं, आले पुन्हा हे कॅथलिक (किंवा कर्मठवादी)!’ किंवा ‘हे पाहा आले ते पेन्टेकॉस्टचे (किंवा बॅप्टिस्ट) पुन्हा!’ नाही. अशा धर्माचे लोक घरोघरची सेवा संपूर्ण कुटुंब मिळून करीत नसल्याचे लोकांना माहीत आहे. कदाचित काही धार्मिक गट विशिष्ट ठिकाणी दोन वर्षे कार्य करण्यासाठी काही “मिशनऱ्यांना” पाठवितात. परंतु, संघटनेच्या मंडळातील सर्वसाधारण लोक मात्र अशा कोणत्याही सेवेत भाग घेत नाहीत. प्रत्येक योग्य प्रसंगी, केवळ यहोवाच्या साक्षीदारांनाच लोकांसोबत त्यांच्या संदेशाची सहभागिता करण्याच्या आवेशाबद्दल संपूर्ण जगभरात ओळखले जाते. त्यांना टेहळणी बुरुज व अवेक! या त्यांच्या नियतकालिकांवरून ओळखले जाते.—यशया ४३:१०-१२; प्रेषितांची कृत्ये १:८.
ख्रिस्ती धर्मजगतामधील पाळकांपासून विपरीत
३, ४. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांचे वर्णन, माध्यमात वारंवार कसे केले आहे?
३ याच्या अगदी विपरीत, वृत्त अहवालाने काही राष्ट्रांत अनेक पाळकांच्या लैंगिक विकृती, अनैतिक ठक, व फसवणूक याबद्दल वारंवार दाखवले आहे. त्यांची देहाची कर्मे व त्यांची अतिशय चैनबाजीची जीवनशैली सर्वांना दिसत आहे. एका लोकप्रिय गीतकाराने याचे वर्णन, “येशू दूरदर्शनवरील त्याच्या कार्यक्रमात रोलेक्स घड्याळ [सोन्याचे अतिशय महागडे घड्याळ] घालेल का?” असे शीर्षक असलेल्या गाण्यात योग्यपणे केले. तो प्रश्न विचारतो: “येशू परत पृथ्वीवर आल्यावर तो राजकारणी व्यक्ती होईल का? त्याचे दुसरे घर पाम र्स्प्रिग [धनाढ्य कॅलिफोर्निया समाज] येथे असेल का? व त्याच्या धनसंपत्तीचा विस्तार तो लपवील का?” याकोबाचे शब्द किती उचित आहेत: “तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ति केली.”—याकोब ५:५; गलतीकर ५:१९-२१.
४ पाळकांची राजकीय पुढाऱ्यांसोबतची घसरट, इतकेच नव्हे तर राजकीय उमेदवार म्हणून निवडणूकीतील सहभागाने ते आधुनिक दिवसातील शास्त्री व परूश्यांसारखेच असल्याचे दिसून आले आहेत. यासोबतच, अमेरिका व कॅनडा या सारख्या शहरातील धार्मिक गटातील पाळकांनी, मुले व युवकांबरोबर केलेल्या स्वैरवर्तनामुळे त्यांच्याविरूद्ध असलेला महागडा खटला व न्यायदंडामुळे अधिक पैसे गमावले आहेत.—मत्तय २३:१-३.
५. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी स्वतःला “विश्वासू बुद्धिमान दास” का शाबीत केले नाही?
५ अगदी योग्यपणे येशू त्याच्या दिवसातील पाळकांना हे म्हणू शकला: “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहां; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत; तसे तुम्हीहि बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहा.” अशाप्रकारे, देवाने ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांना, मग ते कॅथलिक, प्रॉटेस्टंट, कर्मठवादी, किंवा औपचारिक कोणत्याही धार्मिक संघटनेचे नसले तरी, त्याने सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा त्यांना दिली नाही. त्यांनी भाकीत केलेले “विश्वासू बुद्धिमान दास” असल्याचे स्वतःला शाबीत केले नाही.—मत्तय २३:२७, २८; २४:४५-४७.
प्रथम सुवार्तेची घोषणा का केली पाहिजे?
६. लवकरच कोणत्या घटना होतील?
६ सर्व राष्ट्रांना सुवार्तेचा प्रचार करण्याच्या येशूच्या आज्ञेला केवळ मार्कने संक्षिप्त व मुद्देसूद आवृत्तीत “प्रथम” हा शब्द वापरला. (मार्क १३:१०; पडताळा मत्तय २४:१४.) सुबोध भाषांतर असे वाचले जाते: “शेवटला काळ येण्यापूर्वीच सर्व राष्ट्रांना शुभवर्तमान सांगितले गेलेच पाहिजे.” “प्रथम” यासाठी असलेल्या अव्ययाचा वापर, जगभरातील सुवार्तिक कार्यानंतर इतर घटना होणार असल्याचे सूचित करतो. त्या घटनांमध्ये, अभिवचन दिलेले मोठे संकट व नवीन जगावरील ख्रिस्ताच्या धार्मिक राजवटीचा समावेश होतो.—मत्तय २४:२१-३१; प्रकटीकरण १६:१४-१६; २१:१-४.
७. सुवार्तेचा प्रचार प्रथम केला जावा अशी देवाची इच्छा का आहे?
७ यास्तव, सुवार्तेचा प्रचार प्रथम व्हावा अशी देवाची इच्छा का आहे? एक कारण तो प्रीतीचा, न्यायी, बुद्धिमान, व सामर्थ्यशाली देव आहे, हे होय. मत्तय २४:१४ व मार्क १३:१० मध्ये नमूद केलेल्या येशूच्या विधानाच्या पूर्णतेत, आम्ही यहोवाच्या या गुणांचे परिणामकारक प्रकटन पाहतो. त्यांचे एक एक करून आपण संक्षिप्तपणे परीक्षण करु या व त्यांचा सुवार्तेच्या प्रचाराशी काय संबंध आहे ते पाहू या.
सुवार्ता व यहोवाची प्रीती
८. सुवार्तेचा प्रचार हे देवाच्या प्रीतीचे प्रकटन कसे आहे? (१ योहान ४:७-१६)
८ सुवार्तेचा प्रचार देवाची प्रीती कशाप्रकारे प्रदर्शित करतो? सर्वात प्रथम म्हणजे, तो संदेश हेतुपुरस्सर निवडक जातीसाठी किंवा समुदायासाठी नाही. ही सुवार्ता ‘सर्व राष्ट्रांसाठी’ आहे. देवाची मानवी कुटुंबावर इतकी प्रीती आहे की, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, केवळ एका जातीसाठी नव्हे तर सर्व पापी मानवजातीसाठी खंडणी बलिदान देण्याकरता पृथ्वीवर पाठविले. प्रेषित योहानाने लिहिले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.” (योहान ३:१६, १७) नक्कीच ही सुवार्ता, म्हणजे शांतीच्या नव्या जगाचे मित्रभाव व न्यायाचे अभिवचन देणारा संदेश देवाच्या प्रीतीचा पुरावा आहे.—२ पेत्र ३:१३.
सुवार्ता आणि यहोवाचे सामर्थ्य
९. यहोवा देवाने सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी ख्रिस्ती धर्मजगतामधील शक्तिशाली धर्मांचा वापर का केला नाही?
९ सुवार्तेच्या प्रचाराद्वारे यहोवाचे सामर्थ्य कसे प्रदर्शित होत आहे? खालील गोष्टींचा विचार करा. या आज्ञेला बजावण्यासाठी त्याने कोणाचा वापर केला? त्या ख्रिस्ती धर्मजगतामधील रोमन कॅथलिक चर्च, किंवा प्रसिद्ध प्रॉटेस्टंट धर्मांच्या शक्तिशाली धार्मिक संघटना आहेत का? नाही, राजकारणातील त्यांचा भाग ही कामगिरी बजावण्यास ते अपात्र असल्याचे दाखवतो. (योहान १५:१९; १७:१४; याकोब ४:४) यहोवा देवावर त्यांच्या सापेक्ष धनसंपत्तीने व त्यांचे संबंध आणि शासनकर्त्या श्रेष्ठ लोकांच्या वर्गासोबतच्या प्रभावाने किंवा संप्रदायाला पूर्णपणे जडून असलेल्या त्यांच्या वेदान्ताने देखील छाप पाडली नाही. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवी सामर्थ्याची जरूरी नाही.—जखऱ्या ४:६.
१०. प्रचारकार्य करण्यासाठी देवाने कोणाची निवड केली?
१० हे, प्रेषित पौलाने करिंथ मंडळीला लिहिलेल्या त्याच्या पत्रात म्हटल्याप्रमाणेच आहे: “बंधुजनहो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहीत; तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे निवडले, आणि जे बलवान् ते लाजवावे म्हणून देवाने जगातील दुर्बळ ते निवडले; आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्या करिता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाहि मनुष्याने अभिमान बाळगू नये.”—१ करिंथकर १:२६-२९.
११. साक्षीदारांच्या कोणत्या वस्तुस्थितींनी त्यांना अतुलनीय बनवले आहे?
११ यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेमध्ये फारच तुरळक धनाढ्य सदस्य आहेत व ते राजकारणी शक्तिशाली लोक तर मूळीच नाहीत. राजकीय बाबतीत त्यांच्या पूर्ण तटस्थतेचा अर्थ ते राजकीय प्रभावाचा वापर करु शकत नाही असा होतो. उलटपक्षी, या २० व्या शतकात धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी चिथावणी दिलेल्या क्रूर छळामध्ये ते बळी पडले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध नात्सी मतप्रणाली, फॅसिस्ट मतप्रणाली, कम्युनिस्ट मतप्रणाली, राष्ट्रीयवाद, व खोटा धर्म यांच्या शिष्यांनी हा क्रूर विरोध उठवला असताना देखील, ते केवळ सुवार्तेचा प्रचारच करीत नाहीत, तर त्यांच्यामध्ये अद्भुतरित्या वाढ देखील झाली आहे.—यशया ६०:२२.
१२. साक्षीदार यशस्वी का झाले आहेत?
१२ साक्षीदार, त्यांच्या यशाचे श्रेय कशाला देतात? येशूने त्याच्या शिष्यांना अभिवचन दिले: “परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” यास्तव, त्यांच्या यशाचा स्रोत नक्की कोणता असेल बरे? येशूने म्हटले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल.” अशाचप्रकारे आज, साक्षीदारांच्या जगभरातील सेवेत त्यांना यश मिळण्यासाठी शक्य करुन देणारी प्रमुख गोष्ट म्हणजे मानवी क्षमता नव्हे, तर देवाचे सामर्थ्य आहे. देव, दुर्बळ लोकांचा वापर करुन इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण शैक्षणिक कार्य पूर्ण करीत आहे.—प्रेषितांची कृत्ये १:८; यशया ५४:१३.
सुवार्ता आणि यहोवाची बुद्धी
१३. (अ) साक्षीदार स्वयंसेवक व विनामूल्य सेवा का करतात? (ब) यहोवाने सैतानाच्या आरोपाला कसे उत्तर दिले?
१३ सुवार्तेचा प्रचार स्वयंसेवकांमार्फत केला जात आहे. येशूने म्हटले: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्तय १०:८) अशाप्रकारे, देवाची सेवा करण्यासाठी कोणाही यहोवाच्या साक्षीदारांना पगार मिळत नाही. किंवा तो मिळण्याची अपेक्षा देखील ते करीत नाहीत. वस्तुतः, त्यांच्या सभेत पैसे देखील गोळा केले जात नाही. त्यांच्या निष्ठावान निःस्वार्थी सेवेमुळे देव त्याचा विरोधक, दियाबल सैतानाला उत्तर देऊ शकतो याबद्दल ते आनंदी आहेत. देवाच्या या आत्मिक विरोधकाने परिणामांती असे म्हटले होते की, मानव देवाची सेवा निःस्वार्थी वृत्तीने करु शकणार नाहीत. घरोघरी, मार्गावर, व अनौपचारिकपणे सुवार्तेचा प्रचार करीत असलेल्या लाखो निष्ठावंत ख्रिस्ती साक्षीदारांकरवी देवाने त्याच्या बुद्धीने सैतानाच्या आरोपाला निर्विवाद उत्तर पुरवले.—ईयोब १:८-११; २:३-५; नीतीसूत्रे २७:११.
१४. पौलाने उल्लेख केलेले “गुढ ज्ञान” काय आहे?
१४ सुवार्तेचा प्रचार करण्यात देवाच्या बुद्धीचा आणखी एक पुरावा म्हणजे, राज्य अभिवचन हेच देवाच्या बुद्धीचे प्रकटन आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही बुद्धी सांगतो; पण ती बुद्धी या युगाची नव्हे, आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचीही नव्हे; तर देवाची बुद्धी आम्ही सांगतो; ती गुप्त ठेवलेली होती, देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरिता नेमली होती.” ती “बुद्धी” एदेनमध्ये सुरू झालेल्या बंडाळीचा अंत करण्यासाठी देवाच्या सुज्ञ माध्यमाला सूचित करते. त्या पवित्र गुजाच्या बुद्धीचे प्रकटन येशू ख्रिस्तामध्ये झाले. तो देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे.a—१ करिंथकर २:६, ७, NW; कलस्सैकर १:२६-२८.
सुवार्ता आणि देवाचा न्याय
१५. यहोवा देव, न्यायी असल्याचे आम्ही कशाप्रकारे जाणतो? (अनुवाद ३२:४; स्तोत्र ३३:५)
१५ विशेषपणे न्याय यासंबंधाने मार्क १३:१० मधील “प्रथम” या शब्दाचे महत्त्व आम्हाला दिसते. यहोवा देव न्यायी असून, तो आपल्या प्रेमदयेने न्यायास सौम्य करतो. तो त्याच्या यिर्मया संदेष्ट्याद्वारे असे म्हणतो: “परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो असा की जो पृथ्वीवर प्रेमदया, न्याय व न्यायीपण चालवतो तो मी यहोवा आहे; कारण या गोष्टीमध्ये मला संतोष आहे, असे यहोवा म्हणतो.”—यिर्मया ९:२४,पं. रमाबाई भाषांतर.
१६. प्रथम इशारा देण्यासाठी न्यायाची आवश्यकता आहे, याचे स्पष्टीकरण कसे दिले जाऊ शकते?
१६ यहोवाचा न्याय सुवार्तेच्या प्रचारासंबंधाने कशाप्रकारे दिसून येतो? यासाठी आपण एका मातेचे उदाहरण पाहू या. तिने स्वादिष्ट चॉकलेट केक बनवला व तो संध्याकाळी घरी पाहुणे आल्यावर खावयाचा होता. तो केक कधी खावयाचा हे मुलांना न सांगता जर तिने स्वयंपाकाच्या ओट्यावर तसाच ठेवून दिला, तर त्याविषयी मुलांची स्वाभाविक ओढ काय असेल? आम्ही सर्वच एके काळी मुले होतो! त्या लहान बोटांना त्या केकची चव पाहण्याची इच्छा असेल! आता, मातेने मुलांना इशारा दिला नसल्यास, कडक शिस्त लावण्यासाठी तिच्याकडे काहीही आधार नसेल. दुसऱ्या बाजूला पाहता, जर तिने स्पष्टपणे सांगितले की पाहुणे आल्यावर केक खावयाचा आहे, तर यामुळे त्याला हात लावू नका, मग स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. आज्ञा मोडली गेली तर, योग्य कार्य करण्याचा तिला पूर्ण हक्क आहे.—नीतीसूत्रे २९:१५.
१७. यहोवाने १९१९ पासून विशेष मार्गाने न्याय कशाप्रकारे दाखवला आहे?
१७ यहोवा, या दुष्ट व्यवस्थिकरणाविरूद्ध त्याच्या न्यायाच्या बाबतीत प्रथम, आवश्यक इशारा दिल्याशिवाय न्यायदंडाची कारवाई करणार नाही. अशाप्रकारे, विशेषपणे “वेदनांचा प्रारंभ” आणलेल्या पहिल्या महायुद्धानंतर १९१९ पासून, यहोवाने त्याच्या साक्षीदारांना संपूर्ण जगभरात आवेशाने सुवार्तेची घोषणा करण्यासाठी जाऊ दिले. (मत्तय २४:७, ८, १४) रा या अतुलनीय इशाऱ्याच्या बाबतीत रास्तपणे अज्ञानतेचा आव आणू शकत नाहीत.
जगातील क्षेत्राचा उरक किती विस्तृत प्रमाणात केला जात आहे?
१८. (अ) साक्षीदारांनी दूरच्या क्षेत्रात केलेल्या कार्यांविषयी काय पुरावा आहे? (ब) तुम्हाला आणखी कोणती उदाहरणे माहीत आहेत?
१८ जगभरातील या शैक्षणिक कार्याचा परिणाम शेवटली ठिकाणे—उत्तरेतील प्रवास (इंग्रजी) या पुस्तकात दिसून येऊ शकतो. या पुस्तकाचे लेखक सांगतात की, एकाकी असलेल्या फुला या बेटाकरता त्यांनी समुद्र तक्ता तपासला तेव्हा, स्कॉटलंडच्या उत्तरेकडील शेथलंडचे एक बेट, तक्त्याने “बेटाच्या सभोवती डब्यू के एस (नाश), आर के एस (खडक), एल डी जी एस (सपाट भाग), व ओ बी एस (अडथळे) दर्शवले.” तक्त्यावरील या चिन्हांनी “त्यापासून दूर राहण्यासाठी अपेक्षित खलाशाला इशारा दिला. फुला याच्या सभोवतालचा समुद्र, स्फोटक पदार्थ लपविलेल्या क्षेत्राविषयी अतिशय भीतीजन्य होता. यामुळे हे बेट नौकाविहार करणाऱ्यांना, दिवसा प्रवास करणाऱ्यांना व इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या राणीची सार्वजनिक कामे करणाऱ्या सैन्याच्या तुकडीला येथे येणे मुश्कील होते. परंतु मला काही दिवसानंतर कळले की, यहोवाच्या साक्षीदारांना यामुळे कसला अटकाव आला नाही.” त्यांनी पुढे म्हटले: “परिवर्तन करण्यासाठी ज्याप्रकारे ते मोठ्या शहरातील गलिच्छ वस्ती व आशिया आणि आफ्रिकेतील कम्युनिस्ट किंवा कम्युनिस्ट नसणाऱ्या देशांच्या गटांना शोधतात, अशाचप्रकारे ते फुला या दुरवरील बेटावर त्यांच्या विश्वासाचे मतांतर घडवून आणतात.” काही महिन्यांआधी स्थानिक रहिवाशी, ॲन्ड्रू याने त्याच्या घराच्या पायरीवर टेहळणी बुरुजची एक प्रत ठेवली होती असे म्हटले. मग त्याने पुढे म्हटले: “एक आठवड्यानंतर मला फेइरोज [उत्तर समुद्री बेटांवर] [डॅनिशमधील अवेक!] याची एक प्रत पहायला मिळाली व दोन महिन्यांनंतर त्यानंतरची [डॅनिशमधील टेहळणी बुरूज] प्रत ग्रीनलंडमधील नूक [गॉडथॉब असेही नाव असलेल्या शहरात], दिसली.” त्या उत्तरेकडील प्रदेशात यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशी कार्यांची किती परिणामकारी साक्ष!
प्रचारकार्य सतत करीत राहण्यासाठी साक्षीदारांना काय प्रवृत्त करते?
१९, २०. (अ) यहोवाच्या साक्षीदारांना प्रचार करीत राहण्यासाठी काय प्रवृत्त करते? (ब) पुढे कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील?
१९ एखादा व्यक्ती कितीही काळापासून साक्षीदार असला तरी, घरोघर जाऊन अनोळखी लोकांना प्रचारकार्य करणे नक्कीच सोपे नाही. मग या ख्रिश्चनांना ते करीत राहण्यासाठी काय प्रवृत्त करते? ते आहे, त्यांचे ख्रिस्ती समर्पण व जबाबदारीची जाणीव. पौलाने लिहिले: “जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी जर सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” खऱ्या ख्रिश्चनांजवळ असणाऱ्या संदेशाचा अर्थ जीवन असल्यामुळे, तो संदेश ते स्वतःकडेच कसे ठेवतील बरे? धोक्याच्या समयी इशारा देण्यात उणे पडण्यामुळे जसा रक्तदोष लागतो तेच रक्तदोषाचे तत्त्व सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी भाग पाडणारे एक कारण आहे.—१ करिंथकर ९:१६; यहेज्केल ३:१७-२१.
२० मग सुवार्तेचा प्रचार कशाप्रकारे होत आहे? साक्षीदारांच्या यशाची गुरूकिल्ली कोणती आहे? त्यांच्या सेवेच्या व संघटनेच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचा धर्म खरा असल्याचे ओळखण्यास मदत होते? आमचा पुढील लेख या प्रश्नांची उत्तरे देईल.
[तळटीपा]
a देवाच्या बुद्धीचे पुढील स्पष्टीकरण व “पवित्र गुज” यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट् सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंक. यांनी प्रकाशित केलेला शास्त्रवचनांवरील सुक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड २, पृष्ठ ११९० पाहा.
तुम्हाला आठवते का?
▫ यहोवाचे साक्षीदार पाळकांपेक्षा वेगळे असल्याचे कोणती गोष्ट दाखवते?
▫ प्रचारकार्य देवाची प्रीती, सामर्थ्य, व बुद्धी कसे प्रदर्शित करते?
▫ सुवार्तेचा प्रचार देवाच्या न्यायाचे प्रदर्शन कसे करतो?
▫ यहोवाच्या साक्षीदारांना त्यांची सेवा करीत राहण्यासाठी काय प्रवृत्त करते?
[१५ पानांवरील चित्रं]
लोक कितीही दूरवर असले तरी, यहोवाचे साक्षीदार त्यांच्याप्रत पोहंचण्याची इच्छा बाळगतात