इथियोपियातील “ईश्वरी शिक्षण” अधिवेशन खास आनंदाचा एक समय
इथियोपियातील बंदी उठवल्यानंतर ते पहिले अधिवेशन नव्हते तर, निश्चितच खास अधिवेशन होते. नोव्हेंबर ११, १९९१ रोजी कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर यहोवाचे साक्षीदार, तिसऱ्यांदा आदीस अबाबाच्या केंद्रभागी असणाऱ्या राष्ट्राच्या अवाढव्य सिटी स्टेडियम येथे एकत्रित झाले होते. सुरवातीला हे पटांगण रविवारसाठी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे, चार दिवसांचा कार्यक्रम तीन दिवसात, जानेवारी १३-१५, १९९४ गुरुवार ते शनिवारपर्यंत पार पाडण्यात आला.
हे तीन दिवस, निळ्या आकाशाखाली समशीतोष्ण हवामानाचाच नव्हे तर, “ईश्वरी शिक्षण” याच्या आध्यात्मिक प्रज्वलितपणाच्या पूर्ण प्रभावाचा देखील उपभोग घेत होते. व्यासपीठाभोवती फुलांची आकर्षक सजावट केली होती आणि त्यात अधिवेशनाचा विषय ॲमहरिक लिपीत ठळकपणे उठून दिसत होता.
परंतु कशामुळे ते अधिवेशन खास बनले? पोषक कार्यक्रमासोबत, सर्वांचे विचार आणि भावना आमच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वावर, तसेच देवाच्या लोकांवर तो जो आशीर्वाद राज्याच्या वाढीच्या रूपात देत आहे त्याच्या स्पष्ट प्रकटीकरणावर केंद्रित करण्यात आले होते. तेथे, जिबुती आणि येमन यांना मिळून १६ राष्ट्रांतून जवळजवळ २७० विदेशी प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित असलेल्यांपैकी अर्धे लोक, हिवाळ्याच्या हवामानात युरोप आणि उत्तर अमेरिकेतून आले होते. अभ्यागतांपैकी, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे दोन सदस्य, लॉयड बॅरी व डॅनिएल सिडलिक हे होते.
भेट देणाऱ्या त्यांच्या बांधवांबद्दलचे पारंपारिक इथियोपियन आदरातिथ्य आणि हृदयपूर्वक प्रीतीच्या विपुलतेने भाषेच्या अडखळणावर मात केली. हस्तांदोलनच नव्हे तर, सहापटीने, एकमेकांना आलिंगन देऊन चुंबन देण्याद्वारे अभिवादन केले जात होते! अनेक अभ्यागतांनी इथियोपियातील राज्य कार्याबद्दल वाचले होते आणि त्यांना माहीत होते की, त्यांचे इथियोपियाचे बांधव, तुरुंगवास आणि छळाच्या इतर प्रकारांमध्ये सत्वनिष्ठेची परीक्षा घेतलेले असे आहेत.a परंतु भेटी देणाऱ्या प्रतिनिधींना, आनंदी आणि सभ्य तरुणांना पाहून आश्चर्य वाटले, कारण आज अनेक राष्ट्रांमध्ये असे कमी प्रमाणात पाहण्यास मिळते. इथियोपियाच्या पुष्कळ भगिणींनी शुभ्र, पारंपारिक कलात्मक नक्षीकाम केलेला पोशाख घातला होता. यामुळे खरोखर उत्सवाच्या आत्म्यात आणखी भर पडली.
शुक्रवारी झालेला बाप्तिस्मा रोमांचकारी ठरला. १० ते ८० वयोगटातील ५३० नव्या समर्पित लोकांची रांग, स्टेडियममधील खेळण्याच्या मैदानाच्या मध्यभागापर्यंत लांब होती. इतक्या लोकांचा बाप्तिस्मा होईल हे अगदी अपेक्षेच्या पलिकडे होते—राष्ट्रातील प्रत्येकी ७ साक्षीदारांमागे १ पेक्षा अधिक. यहोवाने येथील त्याच्या लोकांवर दिलेल्या आशीर्वादाचा हा केवढा पुरावा होता! या क्षणी ४० पेक्षा अधिक इटालियन प्रतिनिधींच्या सुंदर गीताने सुरूवात झालेल्या या दृश्यामुळे अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येत होते. अनेकांनी यशया ६०:५ मधील भविष्यवादित शब्दांचा विचार केला: “हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुजकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ति तुजकडे येईल.”
आनंदासाठी खास कारणे
शुक्रवारी इथियोपियातील राज्य कार्याच्या लहान आरंभाला मुलाखतीत पुन्हा सांगितले, तेव्हा यहोवाचा आशीर्वाद आणखी दिसला. १९५० च्या दशकात व १९७० च्या दशकात तेथे सेवा केलेल्या आरंभीच्या मिशनरी समुदायाने संचालित केले होते. रा केसन, जॉन कँफेस, व हेवूड वर्ड यांनी त्यांच्या पवित्र शास्त्रीय शिक्षणाच्या कार्याचे वर्णन केले, तेव्हा ८,००० पेक्षा अधिकांनी ते ऐकले. सप्टेंबर १४, १९५० मध्ये सुरवात करुन ते आदीस अबाबा येथे पोहंचले. त्यांनी सार्वजनिक शिक्षणात कार्यशील असण्याची त्या दिवसातील बादशाही सरकारची अपेक्षा होती. यास्तव, त्यांनी शहराच्या मध्यभागी प्रौढ शिक्षणासाठी शाळा काढली. अनेक विविध विषयांना सादर केले. परंतु त्यांच्या फावल्या वेळेत, या मिशनऱ्यांनी ईश्वरी शिक्षणावर केंद्रित असणाऱ्या शिक्षणाला वाढविण्याचा प्रयत्न केला. २५० मुळाक्षरांचे वर्ण असलेली ॲमहारिक ही अवघड भाषा शिकण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली. त्यांना पहिला पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्याचे यश मिळेपर्यंत जवळजवळ सहा महिने निघून गेले. अंदाजे ४३ वर्षांनंतर, रस्त्यावर भेटलेल्या लोकांनी त्यांना पूर्वीच्या शाळा शिक्षक असल्याचे ओळखले. तथापि, अधिवेशनात त्यांना पूर्वीचे पुष्कळ पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना पुनः भेटण्यास आनंद वाटला. हे विद्यार्थी आता विश्वासात दृढ झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक मुलांची व नातवंडांचीही ओळख करून दिली.—१ थेस्सलनीकाकर २:१९, २०.
आनंदी व लक्षपूर्वक ऐकणाऱ्या श्रोत्यांनी आधीच्या मिशनऱ्यांच्या मुलाखतीमुळेच नव्हे, तर विदेशातून—ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इस्राएल, इटली, केनिया, नेदरलंड, व अमेरिकेतून आलेल्या प्रतिनिधींनी आणलेल्या शुभेच्छांमुळे बराच वेळ टाळ्यांचा गजर केला. याने देवाच्या लोकांच्या जगभरातील प्रेमळ बंधुत्वाला पुन्हा अधोरेखित केले. नियमन मंडळाच्या अभिषिक्त बांधवांनी प्रस्तुत केलेली प्रमुख भाषणे तसेच त्यांच्या मनःपूर्वक प्रार्थनांनी श्रोत्यांवर चांगलाच प्रभाव पाडला. स्टेडियममधील तरुण लोक, त्यांच्या निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण या विषयाच्या नाटकातील पात्रात स्वतःला पाहू शकले. नाटक फार स्वाभाविक व हुबेहुब असे प्रस्तुत केले गेले. इंग्रजीतील नव्या प्रकाशनांशिवाय, ॲमहारिक मधील तीन प्रकाशनांनी अधिक उत्साह वाढवला.b
मध्यंतरात व इतर वेळी, अनेक प्रिय व्यक्तींसोबत ओळख करुन घेण्याच्या चांगल्या संधी होत्या. उदाहरणार्थ, इथियोपियातील तूलू मेकूर्य हे वयोवृद्ध प्रचारक पुढील रांगेतील हाताने विणलेल्या वेताच्या खूर्चीवर बसले होते. मागील वर्षी, वयाच्या ११३ व्या परिपक्व वर्षी यहोवाचा साक्षीदार या नात्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला. या अधिवेशनात, त्यांनी त्यांच्या ८० वर्षाच्या पत्नीला त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करताना तसेच त्यांची आध्यात्मिक बहीण होताना पाहून अतिशय आनंद झाला. कार्यक्रमादरम्यान असलेली त्यांची उपस्थिती तरुणांसाठी उत्तम प्रेरणा देणारी ठरली. त्यातील एक, अजूनही शाळेतील विद्यार्थी असलेल्या योहानस् गॉरमस् याने १६ व्या वर्षांपर्यंत नियमित पायनियर प्रचारक या नात्याने चार वर्षे सेवा केली आहे. त्याने व शालेयवयीन पायनियरांनी तरुण असतानाच, सकाळी शाळेत जात असताना साक्ष देण्याद्वारे किंवा मध्यंतराचा वापर करण्याद्वारे व शाळेनंतरच्या वेळेचा वापर करुन वेळेला बहुमोल समजण्याचे शिकले आहेत.
सचोटीची ती किती उदाहरणे!
हजारो श्रोत्यांनी आधीच्या सरकारांकडून तुरूंगवास व यातनांचा अनुभव घेतला. माँडाफ्रो इफ्रू तुरुंगातील त्या पाच वर्षांविषयी विचार करतो, परंतु आता आदीस अबाबा येथे भाषांतर, छपाई, व प्रकाशने पाठवण्याची काळजी घेण्यासाठी नव्यानेच स्थापन केलेल्या दप्तरात सेवा करीत असल्याचा आनंद त्याला होत आहे. त्याच्यासोबत काम करीत असलेला जकर्याह एसहातू हा आणखी एक तरुण आहे, त्याच्या वडिलाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेत आपली ख्रिस्ती तटस्थता टिकवून ठेवल्यामुळे त्यांचा वध करण्यात आला तेव्हा जकर्याह एसहातूच्या तटस्थतेत बदल झाला नाही. वडिलांना तुरुंगात नेले तेव्हा जकर्याह एसहातू दहा वर्षाचा होता. तो पाच मुलांपैकी एक होता. मासवत गरमा व त्याची बहीण, यॉलन आता किशोरावस्थेत आहेत व त्या अजूनही शाळेत आहेत. त्यांच्या वडिलांचा ख्रिस्ती तटस्थतेमुळे अचानक वध केला तेव्हा त्या लहान असल्यामुळे केवळ फोटोवरूनच त्यांच्या वडिलांना ओळखू शकतात. वडिलांच्या निष्ठावंतपणाने त्यांना प्रेरणा दिली, व त्यांचे वडील मृत्युच्या समयी करीत होते त्याचप्रमाणे दोघेही नियमित पायनियर या नात्याने सेवा करीत आहेत.
आणखी एक सचोटी रक्षक, टॉमरॉत यॉदित आता खास पायनियर या नात्याने रीफ्ट या सुंदर दरीच्या प्रदेशात सेवा करीत आहे. त्याच्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे सात विविध तुरुंगात त्याने तीन वर्षे काढली. अनेकदा त्याला साखळीने केलेली तीव्र मारहाण सहन करावी लागली. तरीही, तुरुंगात असताना देवाच्या राज्यास्तव भूमिका घेण्यासाठी त्याने बारा पेक्षा अधिक लोकांना मदत केली.
टेसफू टामेलसो आता विभागिय पर्यवेक्षक या नात्याने सेवा करीत आहे. खास पायनियर म्हणून सेवा करताना त्यांना १७ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. मारल्यामुळे त्याच्यावर व्रण पडले, परंतु आधीच्या नेमणूकीत मंडळ्या असल्याचे पाहिल्याने त्याला आनंद झाला. ऑकॉकी मंडळीतील पुष्कळ बंधु व बहिणींनी तुरुंगवास, व क्रूरतेचा अनुभव घेतला तरीही, मंडळीत शंभर प्रचारकांपर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी इथियोपियात यहोवाच्या साक्षीदारांचे पहिले राज्य सभागृह बांधले. राजधानीच्या उत्तरेकडे ३०० किलोमीटर असलेल्या मनोहर डेसे शहरातून पाच जणांचा एक गट आला, व ते मृत्युच्या सामोरे गेले व त्यांनी एका स्थानिक बांधवाचा छळ होत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पाहिले. त्यांच्यातील एक वडील, मासरशा कॉसा यांनी सांगितले की, सहा वर्षांच्या तुरुंगवासात त्यांचे रक्षण झाले, ते काही बाबतीत खास व्यक्ती होते म्हणून नव्हे तर फक्त यहोवावर विसंबून राहण्याचे शिकल्यामुळे होय.—रोमकर ८:३५-३९; पडताळा प्रेषितांची कृत्ये ८:१.
अलिकडे देखील, इतरांनी परीक्षेत असताना त्यांचा विश्वासूपणा दाखवला. अधिवेशनासाठी शेजारील देशातून एक मोठा समुदाय आला. त्या देशात साक्षीदारांच्या तटस्थतेमुळे त्यांना पोलिसांचे संरक्षण, प्रवास दस्ताऐवज, विवाह शिफारसपत्रे, इस्पितळातील उपचार व नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. तांबड्या समुद्राच्या इरीट्रीयन बंदराजवळील मेसॉवॉ येथे युद्ध चालू असताना, आधीच्या सरकारकडून त्यांच्या घरांवर बॉम्बचा वर्षाव होईल म्हणून मंडळीतील मुलांसहित सर्व ३९ जण घरे सोडून निर्जन ठिकाणी पळून गेले व चार महिने पुलाखाली राहिले. अशा या उष्णता, वंचित परिस्थितीत दैनिक वचनाची चर्चा व इतर सभांनी त्यांना अधिक बळकट केले आणि यहोवासोबत तसेच एकमेकांसोबतच्या नातेसंबंधाची घनिष्टता वाढविली. ब्ल्यू नाईल नदीच्या उगमाजवळ सेवा करणाऱ्या दोन खास पायनियर बहिणींनी कर्मठवादी चर्चने चिथावणी दिलेल्या जमावांच्या धमक्यांना व छळवणूकीला सहन केले. परंतु, या दोघींनी त्यांची सेवा चालू ठेवली व या अधिवेशनात अनेक पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना त्यांच्या समर्पणाला बाप्तिस्म्याद्वारे प्रकट केल्याचे त्यांनी पाहिले.
एका बांधवाने सोमालियापासून फार दूर नसलेल्या ऑगॅडनच्या ओसाड प्रदेशातील एकटेपणाच्या परीक्षेत असताना केलेल्या कामाचे कथन केले. प्रचार करण्याद्वारे व आस्थेवाईकांबरोबर सभा चालविण्याद्वारे त्याने स्वतःला आध्यात्मिकतेत जिवंत ठेवले. आस्थेवाईकांमध्ये डॉक्टरांचा देखील समावेश होता, ईश्वरी शिक्षणापासून त्यांनाही लाभ मिळाला व आता ते इतरांना शिकवतात. सचोटी रक्षकाचे आणखी एक उदाहरण आदीस अबाबा येथील खास पायनियराचे आहे. त्याला १९९२ मध्ये कर्मठवादी पाळकांनी चेतवलेल्या जमावाने क्रूरपणे मारहाण केली व मेला असे समजून ते निघून गेले. ही आनंदाची गोष्ट आहे की, तो बरा झाला व त्याच क्षेत्रात पुन्हा सेवा करीत आहे. त्याचा आनंदी हसरा चेहरा, कटूतेचा कोणताही मागमूस प्रकट करीत नाही. “ईश्वरी शिक्षण” अधिवेशन त्याच्यासाठी व तसेच परीक्षा घेतलेल्या इतर सर्व व नवोदित जणांसाठी देखील आनंदाचा सण होता.
अधिवेशनाच्या संघटनाने सुरळितपणे कारभार पाहिला, भाग घेतलेल्या स्वयंसेवकांनी अनेक वर्षांचा अनुभव असल्याचे भेट देणाऱ्यांना भासवले. वस्तुतः, मागील दोन वर्षांमध्ये त्यांनी वेगाने प्रगती केली. तीन दिवसांचे अधिवेशन फार लवकर संपले. शनिवारी उपस्थितीचा उच्चांक ९,५५६ होता. राष्ट्रीय दूरदर्शन, रेडियो, व वृत्तपत्रांनी अनुकूल माहिती दिली. यहोवा त्याच्या लोकांना आध्यात्मिकतेत समृद्ध करीत असल्याचे सर्व जण पाहू शकले. श्रोत्यांमध्ये ‘ईश्वरी शिक्षणापासून’ लाभ प्राप्त करुन घेण्यास सुरवात केलेले हजारो आस्थेवाईक लोक होते. यहोवाच्या साक्षीदारांसाठी या देशात पाच कोटी लोकसंख्येचे मोठे क्षेत्र उघडले आहे. या अधिवेशनाने, सद्य व्यवस्थिकरणाच्या उरलेल्या वेळेचा उपयोग, ईश्वरी शिक्षणापासून प्रामाणिक लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या सर्वांच्या निश्चयास दृढ केले.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. ने छापलेले यहोवाच्या साक्षीदारांचा १९९२ वार्षिक अहवाल, (इंग्रजी) पहा.
b तुमचे तरुणपण—त्यातून चांगले ते मिळवा (इंग्रजी), तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे व यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत.
[२३ पानांवरील चित्रं]
आदीस अबाबा, जानेवारी १३-१५, १९९४
[२४ पानांवरील चित्रं]
आदीस अबाबा येथील पायनियर समूह (उजवीकडे); पूर्वी तुरुंगामध्ये असलेले सर्व सचोटी रक्षक (खाली); त्याच्या पत्नीसह ११३ वर्षे वय असलेला साक्षीदार