वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ६/१५ पृ. १७-२१
  • यहोवाची संघटना तुमच्या सेवेस आधार देते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची संघटना तुमच्या सेवेस आधार देते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगव्याप्त विरोधातही बचाव
  • आवेशी प्रचारावर यहोवा आशीर्वाद देतो
  • लोकांच्या गरजेनुसार जुळवून घेणे
  • यहोवाच्या साक्षीदारांची प्रेरणा?
  • साक्ष पूर्ण करण्याचा आपला आवेश
  • “सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • प्रथम सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा केला जात आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ६/१५ पृ. १७-२१

यहोवाची संघटना तुमच्या सेवेस आधार देते

“मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ . . . सार्वकालिक सुवार्ता होती.”—प्रकटीकरण १४:६.

१. यहोवाच्या साक्षीदारांची कोणकोणत्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली व ते हे सर्व पार का करू शकले?

ख्रिस्ती सेवेला आधार देण्यात यहोवाच्या स्वर्गीय संघटनेची भूमिका ओळखून घेणे इतके महत्त्वाचे का आहे? यहोवाचे साक्षीदार एका प्रतिकूल जगात यहोवाच्या स्वर्गीय सैन्याच्या आधाराविना देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार साध्य करू शकले असते का? साक्षीदारांनी कमालीच्या राष्ट्रवादाच्या, एकपक्षीय राजकीय व्यवस्थेच्या, जागतिक युद्धांच्या आणि विविध विपत्तींच्या शतकांदरम्यान असा प्रचार केला आहे. साक्षीदार, त्यांच्याविरुद्ध होणाऱ्‍या अंतरराष्ट्रीय कलुषितपणाचा, पक्षपाताचा भडिमार आणि बहुतेकदा हिंसक छळ यहोवाच्या मदतीविना सहन करू शकले असते का?—स्तोत्र ३४:७.

जगव्याप्त विरोधातही बचाव

२. पहिल्या शतकातील ख्रिस्ती आणि आजचे खरे ख्रिस्ती यांमध्ये काय साम्य आहे?

२ या २० व्या शतकात, धार्मिक आणि राजकीय स्वरूपाच्या शत्रूंनी यहोवाचे कार्य थांबवण्यासाठी किंवा दाबून टाकण्यासाठी, कायदेशीररीत्या अथवा दुसऱ्‍या रीतीने शक्य ते सर्व अडथळे निर्माण केले आहेत. ख्रिस्ती बंधुभगिनींना छळण्यात आले, त्यांच्याविषयी खोटेनाटे उठवण्यात आले, त्यांची लेखी बदनामी केली, निंदा करण्यात आली—अनेकांना ठारही मारण्यात आले; हे बहुधा मोठ्या बाबेलच्या पाळकांनी चेतवल्यामुळे घडले. प्रारंभिक ख्रिश्‍चनांबद्दल जे म्हटले गेले ते आजच्या ख्रिश्‍चनांबद्दलही म्हणता येते की, “ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” ख्रिस्ताच्या काळातील यहुदी पुढारी येशूची सेवा थांबवण्यासाठी जसे निकराने लढले त्याचप्रमाणे, आपल्या राजकीय जारासह पाळकांनी आणि धर्मत्यागी लोकांनी यहोवाच्या लोकांचे महान शैक्षणिक साक्षीकार्य थांबवण्याचा निकराने प्रयत्न केला आहे.—प्रेषितांची कृत्ये २८:२२; मत्तय २६:५९, ६५-६७.

३. हेन्रीका झूर हिच्या सचोटीच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

३ पोलंडमध्ये, मार्च १, १९४६ मध्ये जे घडले त्याचेच उदाहरण घ्या. केल्म येथील एक १५ वर्षीय साक्षीदार युवती, हेन्रीका झूर, आणखी एका साक्षीदार बांधवाबरोबर एका जवळपासच्या गावातील आस्थेवाईक लोकांना भेटण्यासाठी गेली. नारोडोव्ह शीवी झ्ब्रॉयन (राष्ट्रीय सशस्त्र बल) नावाच्या एका कॅथलिक सैनिकी तुकडीच्या सदस्यांनी त्यांना पकडले. बांधवाला बेदम मारण्यात आले; पण तो वाचला. पण हेन्रीका वाचू शकली नाही. क्रूसाचे कॅथलिक चिन्ह ती जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत अनेक तासांसाठी तिला त्यांनी छळले. तिला छळणाऱ्‍या एकाने तिला म्हटले: “तू फक्‍त क्रूसाचं चिन्ह केल्याचं नाटक कर. नाहीतर ही बघ गोळी तयार आहे!” तिची सचोटी डळमळली का? नाही. त्या धार्मिक भेकडांनी तिला एका जवळच्या जंगलात फरफटत नेले आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. तरी, विजय तिचाच झाला! ते तिच्या सचोटीचा भंग करू शकले नाहीत.a—रोमकर ८:३५-३९.

४. राजकीय आणि धार्मिक घटकांनी राज्य प्रचाराचे काम दाबून टाकण्याचा कसा प्रयत्न केला आहे?

४ शंभर पेक्षा अधिक वर्षांपासून, देवाच्या आधुनिक सेवकांना क्रूरपणे व अनादराने वागवण्यात आले आहे. यहोवाचे साक्षीदार सैतानाच्या प्रमुख धर्मांचे भाग नाहीत व होऊही इच्छित नाहीत म्हणून त्यांना कोणत्याही पक्षपाती टीकेचे किंवा अंध विरोधाचे भक्ष्य बनवले जाते. राजकीय तत्त्वांनी त्यांच्यावर हिंसक हल्ले चढवले आहेत. अनेक साक्षीदारांना त्यांच्या विश्‍वासासाठी हुतात्मिक मरण पत्करावे लागले. तथाकथित लोकशाहींनी सुद्धा सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य थांबवण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. सन १९१७ मध्ये पाळकांनी, कॅनडा आणि संयुक्‍त संस्थानांत, त्यावेळी बायबल विद्यार्थी म्हटल्या जाणाऱ्‍या साक्षीदारांविरुद्ध घातपाताचा आरोप चेतवला. यामुळे चुकीने वॉच टावर संस्थेच्या अधिकाऱ्‍यांना तुरुंगात टाकण्यात आले, पण नंतर त्यांना दोषमुक्‍त करून त्यांची सुटका करण्यात आली.—प्रकटीकरण ११:७-९; १२:१७.

५. कोणत्या शब्दांनी यहोवाच्या सेवकांना उत्तेजन मिळाले आहे?

५ सैतानाने, ख्रिस्ताच्या बांधवांचे आणि त्यांच्या एकनिष्ठ सोबत्यांचे साक्षीकार्य थांबवण्यासाठी त्याच्याजवळ असलेल्या सर्व माध्यमांचा उपयोग केला आहे. तरीसुद्धा, इतक्या अनुभवांवरून दिसून येते त्याप्रमाणे, धमक्या, धाकदपटशा, शारीरिक हिंसा, तुरुंगवास, छळछावण्या किंवा मरणसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांना शांत करू शकले नाही. संपूर्ण इतिहासात हे घडत आले आहे. “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत,” हे अलीशाचे शब्द वारंवार धाडस बांधणारे ठरले आहेत. एक कारण, विश्‍वासू देवदूतांची संख्या दियाबलाच्या समूहापेक्षा अधिक आहे!—२ राजे ६:१६; प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४१, ४२.

आवेशी प्रचारावर यहोवा आशीर्वाद देतो

६, ७. (अ) सुवार्तेचा प्रचार करण्याकरता प्रारंभिक काळात कोणते प्रयत्न करण्यात आले होते? (ब) सन १९४३ च्या सुरवातीला कोणता फायदेकारक बदल घडला?

६ या २० व्या शतकात, यहोवाच्या साक्षीदारांनी अंत येण्याआधी, साक्षीचे मोठे कार्य विस्तारित करण्यासाठी व त्याचा वेग वाढवण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. मागे, १९१४ मध्ये, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे पहिले अध्यक्ष पास्टर रस्सल यांनी, “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशनचा” उपयोग करण्याचे प्रोत्साहन दिले; हा आठ तासांचा बायबल आधारित स्लाईड्‌स आणि चलचित्रपटाचा कार्यक्रम होता ज्याच्याबरोबरच फोनोग्राफ रेकॉर्डवर बायबल आधारित कॉमेंट्री होती. त्या काळी अनेक देशांतील श्रोतृसमाज यामुळे चकित झाला होता. नंतर, १९३० आणि १९४० च्या दशकात, पोर्टेबल फोनोग्राफ नेऊन घरोघरी प्रचार कार्य करणारे साक्षीदार सर्वांच्या परिचयाचे झाले; ते, संस्थेचे दुसरे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांच्या बायबल आधारित भाषणांच्या रेकॉड्‌र्सचा उपयोग करीत होते.

७ संस्थेचे तिसरे अध्यक्ष, नेथन एच. नॉर यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९४३ मध्ये एक धाडसी पाऊल उचलण्यात आले; प्रत्येक मंडळीतील सेवकांसाठी एक प्रशाला सुरू करण्याचे ठरवण्यात आले. साक्षीदारांना फोनोग्राफ रेकॉर्डींगचा उपयोग न करता घरोघरी प्रचार करण्यास व शिक्षण देण्यास प्रशिक्षित करण्यात येणार होते. तेव्हापासून, वॉच टावर संस्थेच्या शाखेतील मिशनऱ्‍यांना, पूर्ण वेळेच्या सेवकांना, मंडळीतील वडिलांना आणि जबाबदार पदी असलेल्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याकरता इतर प्रशाला योजल्या आहेत. याचा परिणाम?

८. सन १९४३ मध्ये साक्षीदारांनी मोठा विश्‍वास कसा प्रकट केला?

८ मागे १९४३ मध्ये, ऐन दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी, ५४ राष्ट्रांत केवळ १,२९,००० साक्षीदार क्रियाशील होते. तरीसुद्धा, त्यांचा विश्‍वास आणि खात्री होती, की अंत येण्याआधी मत्तय २४:१४ ची पूर्णता होईलच. या भ्रष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करणाऱ्‍या क्रमवार घटनांआधी यहोवा महत्त्वपूर्ण इशारेवजा संदेशाची घोषणा करील अशी त्यांची पक्की खात्री होती. (मत्तय २४:२१; प्रकटीकरण १६:१६; १९:११-१६, १९-२१; २०:१-३) त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले का?

९. साक्षीकार्य वाढले आहे हे कोणत्या वस्तुस्थिती दाखवून देतात?

९ सध्या निदान १३ असे राष्ट्र आहेत ज्यांत प्रत्येकी १,००,००० पेक्षा अधिक साक्षीदार क्रियाशील आहेत. यांपैकी बहुतेक राष्ट्रांत कॅथलिक चर्चचे वर्चस्व आहे. तरीसुद्धा, तेथील परिस्थिती कशी आहे ते पाहा. ब्राझीलमध्ये सुवार्तेचे ४,५०,००० प्रचारक आहेत आणि १९९७ साली १२,००,००० पेक्षा अधिक लोक ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित होते. दुसरे उदाहरण मेक्सिकोचे आहे; तेथे, जवळजवळ ५,००,००० साक्षीदार आहेत आणि १६,००,००० पेक्षा अधिक लोक स्मारक सण साजरा करण्यासाठी उपस्थित होते. इतर कॅथलिक राष्ट्रे आहेत इटली (सुमारे २,२५,००० साक्षीदार), फ्रान्स (सुमारे १,२५,०००), स्पेन (१,०५,००० पेक्षा अधिक) आणि अर्जेंटिना (१,१५,००० पेक्षा अधिक). प्रोटेस्टंट, कॅथलिक आणि यहुदी धर्मांचे वर्चस्व असलेल्या संयुक्‍त संस्थानांत सुमारे ९,७५,००० साक्षीदार आहेत आणि २०,००,००० पेक्षा अधिक लोक स्मारक विधीला उपस्थित राहिले. होय, गूढ शिकवणुकी असलेल्या खोट्या धर्माच्या साम्राज्यातून अर्थात मोठ्या बाबेलमधून लोकांचे समूहाचे समूह बाहेर पडत आहेत व “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांविषयी असलेल्या देवाच्या सोप्या आणि खात्रीलायक अभिवचनांकडे वळत आहेत.—२ पेत्र ३:१३; यशया २:३, ४; ६५:१७; प्रकटीकरण १८:४, ५; २१:१-४.

लोकांच्या गरजेनुसार जुळवून घेणे

१०. काही क्षेत्रांमधील परिस्थितीत कशाप्रकारे बदल झाला आहे?

१० ख्रिस्त येशूद्वारे यहोवाकडे वळालेले बहुतेकजण घरोघरच्या कार्यात भेटले होते. (योहान ३:१६; प्रेषितांची कृत्ये २०:२०) पण, इतर पद्धतींचा वापरही करण्यात आला आहे. काळ बदलला आहे आणि आजच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रियांना घराबाहेर पडून काम करावे लागत आहे. पुष्कळवेळा, आठवड्यादरम्यान फार कमी लोक घरी भेटतात. म्हणून यहोवाच्या साक्षीदारांनी या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतले आहे. येशू आणि आरंभीच्या शिष्यांप्रमाणे ते शक्य त्या वेळी आणि शक्य त्या ठिकाणी लोकांना भेटतात.—मत्तय ५:१, २; ९:३५; मार्क ६:३४; १०:१; प्रेषितांची कृत्ये २:१४; १७:१६, १७.

११. आज यहोवाचे साक्षीदार कोठे प्रचार करतात व याचा परिणाम काय आहे?

११ साक्षीदार स्वतःहून व हुशारीने, पार्किंग क्षेत्रांत, शॉपिंग सेंटर, कारखाने, कार्यालये आणि व्यापार क्षेत्रात, शाळा, पोलिस स्टेशन, सर्व्हिस स्टेशन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व रस्त्यांवर लोकांना प्रचार करीत आहेत. किंबहुना, लोक जेथे भेटतील तेथे ते प्रचार करतात. लोक घरी असतात तेव्हा साक्षीदार त्यांना घरी जाऊन भेटतात. या साजेशी व व्यवहारचतुर पद्धतीमुळे बायबल साहित्यांचे वाढत्या प्रमाणात वाटप होत आहे. मेंढरासमान लोक आढळत आहेत. नवीन बायबल अभ्यास चालू करण्यात येत आहेत. मानवी इतिहासातील सर्वात महान शैक्षणिक कार्य, पंचावन्‍न लाखांपेक्षा अधिक स्वयंसेवकांद्वारे आवेशाने पार पाडले जात आहे! त्यांच्यापैकी एक होण्याचा तुम्हाला सुहक्क मिळाला आहे का?—२ करिंथकर २:१४-१७; ३:५, ६.

यहोवाच्या साक्षीदारांची प्रेरणा?

१२. (अ) यहोवा आपल्या लोकांना कसे शिकवत आहे? (ब) या शिक्षणाचा कोणता परिणाम होतो?

१२ या सर्वांमध्ये यहोवाच्या स्वर्गीय संघटनेची काय भूमिका आहे? “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल,” असे यशयाने भाकीत केले. (यशया ५४:१३) यहोवा पृथ्वीवरील आपल्या दृश्‍य संघटनेमार्फत, राज्य सभागृहांत, अधिवेशनांत आणि संमेलनांत या जगव्याप्त संयुक्‍त बंधुसमाजाला शिकवत आहे. याचे फलित ऐक्य आणि शांती हे आहे. यहोवाचे शिक्षण घेतलेले लोक अनन्य लोक बनतात; ते या विभाजक आणि विभक्‍त जगात जगत असले तरी, त्यांना आपल्या शेजाऱ्‍यांचा द्वेष करण्यास नव्हे, तर स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्‍यांवर आणि एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवण्यात आले आहे.—मत्तय २२:३६-४०.

१३. प्रचार कार्यात देवदूतांचे मार्गदर्शन आहे याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?

१३ निरुत्साह असो किंवा छळ असो, प्रेम, यहोवाच्या साक्षीदारांना प्रचार करीत राहण्यास प्रवृत्त करते. (१ करिंथकर १३:१-८) प्रकटीकरण १४:६ नुसार, त्यांचे जीवन वाचवण्याचे कार्य स्वर्गातून नियंत्रित होते हे त्यांना माहीत आहे. देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली घोषित होणारा संदेश कोणता आहे? “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.” राज्याच्या सुवार्तेचा प्रचार यहोवाच्या नावाला महिमा आणतो. निर्मितीचे किंवा निराधार उत्क्रांतीचे गौरव करण्याऐवजी निर्माणकर्त्या देवाचे गौरव करण्यास लोकांना आमंत्रित केले जात आहे. आणि प्रचार कार्य इतके निकडीचे का आहे? कारण न्यायनिवाडा करण्याची घटका—मोठ्या बाबेलविरुद्ध आणि सैतानाच्या दृश्‍य व्यवस्थीकरणाच्या इतर सर्व घटकांविरुद्ध न्यायनिवाडा करण्याची घटका जवळ आली आहे.—प्रकटीकरण १४:७; १८:८-१०.

१४. या महान शैक्षणिक कार्यक्रमात कोणाचा सहभाग आहे?

१४ कोणत्याही समर्पित ख्रिश्‍चनाला या प्रचार कार्यापासून सूट नाही. आध्यात्मिक वडील मंडळीबरोबर प्रचारात पुढाकार घेतात. प्रशिक्षित पायनियर या कार्यात पूर्णपणे उतरले आहेत. राज्य संदेशाचे आवेशी प्रचारक, प्रत्येक महिन्याला फार कमी किंवा अधिक तास खर्च करू शकत असले तरी, पृथ्वीच्या प्रत्येक टोकापर्यंत संदेशाचा प्रचार करीत आहेत.—मत्तय २८:१९, २०; इब्री लोकांस १३:७, १७.

१५. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचाराचा परिणाम कशावरून सूचित होतो?

१५ या सर्व परिश्रमाचा जगावर काही प्रभाव पडला आहे का? एक साधासाच पुरावा घ्या, टीव्ही कार्यक्रमांमध्ये आणि बातम्यांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा कितीतरी वेळा उल्लेख येतो. यांमध्ये, सर्वांपर्यंत पोहंचण्याची आपली चिकाटी आणि निश्‍चय यांवर जोर दिला जातो. होय, बहुतेक लोक संदेशाला आणि संदेशवाहकांना नाकारत असले तरी, आपला आवेश आणि नित्य उपस्थितीचा लोकांवर खोल प्रभाव पडतो!

साक्ष पूर्ण करण्याचा आपला आवेश

१६. उरलेल्या सीमित वेळेत कोणती मनोवृत्ती दाखवणे जरूरीचे आहे?

१६ यहोवाची सेवा करण्याचा आपला हेतू जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत, या व्यवस्थीकरणाचे अजून किती दिवस बाकी आहेत हे आपल्याला माहीत नाही किंवा माहीत करूनही घ्यायची गरज नाही. (मत्तय २४:३६; १ करिंथकर १३:१-३) परंतु यहोवाची प्रीती, शक्‍ती आणि न्याय प्रकट होण्यासाठी “प्रथम” सुवार्तेचा प्रचार होणे आवश्‍यक आहे हे आपल्याला माहीत आहे. (मार्क १३:१०) यास्तव, या दुष्ट, अन्यायी आणि हिंसक जगाचा शेवट पाहण्याची आपण कितीही वर्षे वाट पाहत असलो तरी, आपल्या परिस्थितीनुसार आपण आवेशाने आपल्या समर्पणाला जगले पाहिजे. आपले कदाचित वय झाले असेल किंवा आपण आजारी असू, तरीपण, आपल्या तरुणपणी किंवा निरोगी असताना आपण यहोवाची सेवा जशी आवेशाने केली होती तशीच आताही करू शकतो. कदाचित पूर्वीप्रमाणे सेवेमध्ये अधिक वेळ खर्च करणे आता आपल्याला जमत नसेल, तरीपण यहोवाला द्यावयाच्या स्तुतीच्या यज्ञाचा दर्जा आपण निश्‍चितच तसाच ठेवू शकतो.—इब्री लोकांस १३:१५.

१७. आपणा सर्वांना लाभ होईल असा एखादा उत्तेजनात्मक अनुभव सांगा.

१७ तेव्हा, आपण तरुण असो वा वृद्ध, आपण आवेश दाखवत राहू आणि आपल्याला भेटणाऱ्‍या सर्वांना आपला सकारात्मक नवीन जगाचा संदेश सांगत राहू. ऑस्ट्रेलियातील त्या लाजऱ्‍या सात वर्षीय मुलीप्रमाणे आपण होऊ या जी आपल्या आईबरोबर दुकानात गेली होती. सर्वांनी प्रचार करणे किती महत्त्वाचे आहे हे तिने राज्य सभागृहात ऐकल्यामुळे जाताना तिने आपल्या बॅगेत दोन बायबल माहितीपत्रके घातली. आई काऊन्टरवर असताना ती लहान मुलगी गायब झाली. तिच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने तिला आजूबाजूला शोधले, तर ती एका बाईला एक माहितीपत्रक देत होती! आईला वाटले, की कदाचित आपल्या मुलीने त्या बाईला त्रास दिला असावा म्हणून ती तिची क्षमा मागू लागली. परंतु, त्या बाईने ते माहितीपत्रक अगदी आनंदाने स्वीकारले. आईने नंतर मुलीला विचारले, की एका अनोळख्या व्यक्‍तीबरोबर बोलण्यास तिला भीती कशी वाटली नाही. ती म्हणाली, “मी मनातल्या मनात, एक, दोन, तीन म्हणाले आणि गेले!”

१८. आपण सर्व जण एक प्रशंसनीय आत्मा कसा प्रदर्शित करू शकतो?

१८ आपल्या सर्वांठायी, विशेषकरून अनोळख्यांबरोबर किंवा अधिकाऱ्‍यांबरोबर सुवार्तेबद्दल बोलण्यास त्या ऑस्ट्रेलियन मुलीसारखा आत्मा असणे आवश्‍यक आहे. आपल्याला नाकारले जाईल याची कदाचित आपल्याला भीती असेल. परंतु, येशूने काय म्हटले ते आपण विसरता कामा नये: “कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्‍याविषयी काळजी करू नका; कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकवील.”—लूक १२:११, १२.

१९. तुम्हाला तुमच्या सेवेबद्दल काय वाटते?

१९ यास्तव, सुवार्ता घेऊन तुम्ही लोकांसोबत प्रेमाने बोलायला जाता तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला साहाय्य करील असा भरवसा बाळगा. कोट्यवधी लोक बहुधा, आज आहेत आणि उद्या नाहीत अशा अपात्र पुरुष आणि स्त्रियांवर भरवसा ठेवतात. अनंतकाळसाठी जिवंत असलेला यहोवा आणि त्याची स्वर्गीय संघटना—ख्रिस्त येशू, पवित्र देवदूत आणि पुनरुत्थित अभिषिक्‍त ख्रिस्ती—यांवर आपण भरवसा ठेवतो. म्हणून, “त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत,” हे नेहमी ध्यानात ठेवा.—२ राजे ६:१६.

[तळटीप]

a आणखी अनुभवांसाठी, यहोवाच्या साक्षीदारांचे १९९४ वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २१७-२० पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवाच्या लोकांच्या बचावात देवाच्या स्वर्गीय संघटनेची काय भूमिका राहिली आहे?

◻ कोणत्या राजकीय व धार्मिक घटकांनी यहोवाच्या साक्षीदारांवर या २० व्या शतकात हल्ला केला आहे?

◻ यहोवाच्या साक्षीदारांनी परिस्थितीनुरूप आपली सेवा कशी जुळवून घेतली आहे?

◻ प्रचार करावयास तुम्हाला काय प्रवृत्त करते?

[१७ पानांवरील चित्र]

हेन्रीका झूर

[१८ पानांवरील चित्र]

जपान

मार्टिनिक

संयुक्‍त संस्थाने

केनिया

संयुक्‍त संस्थाने

यहोवाचे साक्षीदार शक्य त्या वेळी आणि शक्य त्या ठिकाणी लोकांना प्रचार करतात

[२० पानांवरील चित्र]

या शतकाच्या सुरवातीला, राज्य संदेशाचा प्रसार करण्याकरता फोनोग्राफचा उपयोग केला जात असे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा