वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१५ पृ. १०-१५
  • पालकहो, तुमच्या मुलांना विशेष काळजीची आवश्‍यकता आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पालकहो, तुमच्या मुलांना विशेष काळजीची आवश्‍यकता आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाळपणापासून दररोज लक्ष देणे
  • खास लक्ष अत्यावश्‍यक
  • एकत्र घालवत असलेल्या वेळेचे जतन करा
  • समृद्ध मोबदला
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • बालपणापासून मुलांना वळण लावणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पालकहो बाळपणापासूनच आपल्या मुलाच्या अंतःकरणास जाऊन भिडा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१५ पृ. १०-१५

पालकहो, तुमच्या मुलांना विशेष काळजीची आवश्‍यकता आहे

“तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखे होतील.”—स्तोत्रसंहिता १२८:३.

१. रोपे वाढवणे आणि मुलांचे संगोपन करणे याची तुलना कशी केली जाऊ शकते?

अनेक बाबतीत, मुले रोपांप्रमाणे वाढतात व पूर्णतेस येतात. यास्तव, पवित्र शास्त्र पुरूषाच्या पत्नीला “सफळ द्राक्षवेल” आणि त्याच्या मुलांना, ‘[त्याच्या] मेजाभोवती जैतुनाची रोपे’ संबोधते तेव्हा त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. (स्तोत्रसंहिता १२८:३) नव्याने उगवलेल्या पिकाची, विशेषतः जेव्हा वातावरण आणि माती प्रतिकूल असते तेव्हा निगा राखणे सोपे नाही, हे केवळ एक शेतकरीच तुम्हाला सांगू शकेल. त्याचप्रमाणे, या “शेवटल्या काळात” मुलांना यथायोग्य, देव-भीरू प्रौढ बनवण्यासाठी त्यांचे संगोपन करणे अतिशय कठीण आहे.—२ तीमथ्य ३:१-५.

२. चांगली कापणी करण्यासाठी बहुधा कशाची गरज आहे?

२ चांगल्या पिकाची कापणी करण्यासाठी, एका शेतकऱ्‍याला सुपीक जमीन, उबदार सूर्यकिरण आणि पाणी या गोष्टींची आवश्‍यकता आहे. त्यांची वाढ आणि त्यांच्यामध्ये उगवलेल्या रान गवताला उपटून टाकण्यासोबत, त्याला पिकांवर रोग न पडू देण्याची आणि इतर संरक्षक काळजी घेतली पाहिजे. वाढ होत असताना सुगीच्या दिवसांपर्यंत अनेक समस्या येऊ शकतात. आणि शेवटी पिकांची सर्व नासधूस होणे किती दुःखाचे आहे! परंतु, काबाडकष्ट केल्यानंतर चांगल्या पिकाची कापणी झाल्यावर एखादा किती समाधानी असू शकतो!—यशया ६०:२०-२२; ६१:३.

३. रोपे आणि मुलांची तुलना महत्त्वतेच्या बाबतीत कशी होते, आणि मुलांना कोणत्या प्रकारचे लक्ष मिळण्याची आवश्‍यकता आहे?

३ खरेच, यशस्वी, उत्पादनक्षम मानवी जीवन, शेतकऱ्‍याच्या कापणीपेक्षा अधिक बहुमुल्य आहे. यास्तव, विपुल पिकाची निगा राखण्यापेक्षा एखाद्या मुलाचे संगोपन यशस्वीरीत्या करण्यासाठी अधिक वेळ आणि प्रयत्न लागतात यात काही आश्‍चर्य नाही. (अनुवाद ११:१८-२१) जीवनाच्या बागेत पेरलेल्या लहान मुलाचे, प्रेमाने पाणी घालून पालनपोषण केल्याने आणि सुदृढ सीमा ठेवल्याने, नैतिक मूल्यांचा रोग पडलेल्या जगातही, आध्यात्मिकरीत्या वाढ व उत्कर्ष होईल. परंतु जर, त्यांच्यासोबत दुर्व्यवहार किंवा जुलूम केला तर, ते मूल आतमध्ये कोमेजून जाईल आणि कदाचित आध्यात्मिकरीत्या मरून जाईल. (कलस्सैकर ३:२१; पडताळा यिर्मया २:२१; १२:२.) निश्‍चितच, सर्व मुलांकडे खास लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे!

बाळपणापासून दररोज लक्ष देणे

४. मुलांना “बालपणापासून” कोणत्या प्रकारचे लक्ष देण्याची गरज आहे?

४ पालकांना, नवजात बालकाकडे निरंतर लक्ष द्यावे लागते. परंतु, बाळाला दररोज केवळ शारीरिक किंवा भौतिक गरजेची आवश्‍यकता आहे का? देवाचा सेवक तीमथ्य याला, प्रेषित पौलाने लिहिले: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, जे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१५) याचाच अर्थ, तीमथ्याला, बाळपणापासून मिळालेले पालकीय लक्ष आध्यात्मिक प्रकारचे होते. परंतु, बाळपणाची सुरवात केव्हापासून होते?

५, ६. (अ) जन्मास न आलेल्या बाळाविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते? (ब) काय सूचित करते की पालकांनी जन्मास न आलेल्या बाळाच्या हिताची काळजी केली पाहिजे?

५ पौलाने येथे वापरलेला ग्रीक शब्द (ब्रेʹफोस) जन्मास न आलेल्या मुलाला देखील लागू होतो. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाची आई, अलिशिबा हिने तिची नातलग मरिया हिला असे सांगितले: “तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील [ब्रेʹफोस] बाळकाने उल्हासाने उडी मारली.” (लूक १:४४) अशाप्रकारे, जन्मास न आलेल्या मुलांना देखील बालक म्हटले आहे, आणि पवित्र शास्त्र दाखवते की, ते गर्भाशयाच्या बाहेर होणाऱ्‍या कार्याला सुद्धा प्रतिसाद देऊ शकतात. यास्तव, आज अनेकदा उत्तेजन दिले जाते त्या, जन्मापूर्वी घेतल्या जाणाऱ्‍या काळजीमध्ये, जन्मास न आलेल्या बाळकाच्या आध्यात्मिक कल्याणाकडे लक्ष देणे समाविष्ट असले पाहिजे का?

६ ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. कारण, उपलब्ध असलेला पुरावा हे दाखवतो की, जन्मास न आलेले बाळ जे काही ऐकते त्यामुळे कदाचित त्याला लाभ होऊ शकतो, किंवा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एका संगीत दिग्दर्शकाला, तो ज्या गीताची तालीम करत होता त्या गीताची लय, विशेषकरून त्या गीतातील व्हायोलिनचा सूर नवलाईने ओळखीचा वाटत होता. त्याने त्याच्या आईला गायनाच्या लयीबद्दल सांगितले, तेव्हा त्याची आई जी स्वतः व्यावसायिक व्हायोलिन वादक होती, तिने म्हटले की, तो पोटात असताना ती ह्‍याच रचलेल्या गीताची तालीम करीत होती. त्याचप्रमाणे, जन्मास न आलेल्या बाळाच्या माता जेव्हा नेहमीच दूरदर्शनवरील दुपारच्या वेळी दाखवल्या जाणाऱ्‍या मालिका पाहतात तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम बाळावर होऊ शकतो. याकारणास्तव, एका वैज्ञानिक नियतकालिकाने, “मालिकांचे व्यसन लागलेले भ्रूण” यांचा उल्लेख केला.

७. (अ) अनेक पालकांनी त्यांच्या जन्मास न आलेल्या बाळाच्या हिताकडे लक्ष कसे दिले आहे? (ब) बाळामध्ये कोणत्या क्षमता आहेत?

७ होय, अनेक पालकांनी, बाळांना सकारात्मक प्रेरणा देणे लाभदायक असल्याचे ओळखले आहे. यास्तव, मूल जन्मण्याधीच ते त्याच्यासाठी वाचतात, बोलतात आणि गीत गाऊनही दाखवतात. तुम्ही देखील असेच करू शकता. तुमच्या बाळाला ते शब्द समजत नसले तरी, तुमचा सांत्वनपर आवाज व प्रेमळ स्वरामुळे त्याला नक्कीच फायदा होईल. जन्मानंतर, बाळ, तुम्ही कदाचित विचार कराल त्यापेक्षा लवकर तुमचे बोलणे समजू लागेल. दोन किंवा तीन वर्षांतच, बाळ एक जटील भाषा केवळ ऐकण्याद्वारे शिकते. बाळ, पवित्र शास्त्राची “शुद्ध भाषा” देखील शिकण्यास आरंभ करू शकते.—सफन्या ३:९, NW.

८. (अ) तीमथ्याला “बालपणापासून” पवित्र शास्त्राची माहिती होती असे उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर पवित्र शास्त्राचा बोलण्याचा काय अर्थ होतो? (ब) तीमथ्याच्या बाबतीत काय खरे ठरले?

८ तीमथ्याला, ‘बालपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती आहे’ असे पौलाने म्हटले तेव्हा त्याचा बोलण्याचा काय अर्थ होता? तीमथ्याला आध्यात्मिक प्रशिक्षण, केवळ बाळपणापासून नव्हे तर, बाल्यावस्थेपासून प्राप्त झाले असे, उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर त्याचा बोलण्याचा अर्थ होता. हे, ब्रेʹफोस या ग्रीक शब्दाच्या अर्थाच्या सुसंगतीत आहे, जे सर्वसामान्यपणे नवजात बालकाला सूचित करते. (लूक २:१२, १६; प्रे. कृत्ये ७:१९) तीमथ्याला, हे आध्यात्मिक शिक्षण, त्याची आई युनिके आणि त्याला आठवते त्याप्रमाणे त्याची आजी लोईसकडून मिळाले. (२ तीमथ्य १:५) ‘कोवळ्या रोपाला जसे वळण लावाल त्याचरीतीने झाड वाढते’ ही जी म्हण आहे ती, नक्कीच तीमथ्याला लागू झाली. त्याला ‘त्याच्या स्थितीच्या अनुरूप असे शिक्षण’ दिले होते व यामुळेच तो, देवाचा उत्तम सेवक बनला.—नीतीसूत्रे २२:६; फिलिप्पैकर २:१९-२२.

खास लक्ष अत्यावश्‍यक

९. (अ) पालकांनी काय करण्याचे टाळले पाहिजे, व का? (ब) मूल जसजसे वाढत जाते तसे पालकांनी काय करण्याची आवश्‍यकता आहे, आणि त्यांनी कोणाचे उदाहरण अनुसरले पाहिजे?

९ मुलेसुद्धा रोपांसारखी आहेत. सर्वांची गुणलक्षणे सारखीच नसतात. एकाच प्रकारची काळजी घेण्याची पद्धत सर्वांना लागू करता येत नाही. सुज्ञ पालक हा फरक लक्षात घेतील. ते एका मुलाची तुलना दुसऱ्‍यासोबत करण्याचा कधीच प्रयत्न करणार नाहीत. (पडताळा गलतीकर ६:४.) तुमच्या मुलांनी निरोगी प्रौढतेपर्यंत विकसित व्हावे अशी तुमची इच्छा आहे तर मग, तुम्हाला त्यांच्या भिन्‍नत्वदर्शक व्यक्‍तिमत्त्वाकडे खास लक्ष द्यावे लागेल. त्यांच्यामध्ये चांगले व्यक्‍तिमत्त्व वाढवून वाईटाला उपटून टाकले पाहिजे. जर तुम्हाला त्यांच्यामध्ये काही दोष, किंवा बेईमानी, भौतिकता, वा स्वार्थीपणा यासारखा अयोग्य मानसिक कल दिसून आला तर तुम्ही काय कराल? दयाळूपणे त्यांना सुधारा. येशूने पण त्याच्या शिष्यांचा दोष अशाचप्रकारे सुधारला. (मार्क ९:३३-३७) विशेषतः, वेळोवेळी प्रत्येक मुलाच्या भक्कमपणाची आणि चांगल्या गुणांची प्रशंसा करत राहा.

१०. मुलांना खासकरून कशाची गरज आहे, आणि ते कसे पुरवता येते?

१० मुलांना खास करून प्रेमळ व्यक्‍तिगत लक्ष देण्याची गरज आहे. येशूने, त्याच्या सेवाकार्यातील शेवटल्या व्यग्र दिवसांमध्ये असताना देखील लहान मुलांकडे अशा प्रकारचे खास लक्ष देण्यासाठी वेळ काढला. (मार्क १०:१३-१६, ३२) पालकांनो, ते उदाहरण अनुसरा! तुमच्या मुलांसोबत राहण्यासाठी निस्वार्थपणे वेळ काढा. शिवाय त्यांना खरे प्रेम देण्यासाठी कचरू नका. येशूने केले त्याप्रमाणे त्यांना आलिंगन द्या. त्यांना उबदारपणे, आणि ममतेने कुरवाळून त्यांचे मुके घ्या. यथायोग्य प्रौढ झालेल्या तरुणांच्या पालकांना एकदा असे विचारण्यात आले की, ते इतर पालकांना कोणता सल्ला देऊ शकतील. तेव्हा बहुतांश पालकांनी या रीतीने प्रतिसाद दिला: ‘विपुलतेने प्रेम करा,’ ‘एकमेकांसोबत वेळ घालवा,’ ‘परस्पर आदर विकसित करा,’ ‘त्यांचे लक्षपूर्वक ऐका,’ ‘लांबलचक भाषण देण्याऐवजी मार्गदर्शन द्या,’ आणि ‘व्यवहारी असा.’

११. (अ) पालकांनी त्यांच्या मुलांना खास प्रशिक्षण पुरविण्याकडे कोणत्या दृष्टिने पाहिले पाहिजे? (ब) पालक त्यांच्या मुलांसोबतच्या मौल्यवान दळणवळणाचा आनंद कधी उपभोगू शकतील?

११ अशाप्रकारचे खास लक्ष देण्यात आनंद असतो. एका यशस्वी पालकाने असे लिहिले: “आमची दोन्ही मुले लहान होती तेव्हा, त्यांना निजवताना, त्यांच्यासाठी काहीतरी वाचताना, त्यांच्यावर पांघरूण घालताना, आणि त्यांच्यासोबत प्रार्थना करताना, आम्ही त्यांच्यासोबत जो वेळ घालवत होतो तो खरोखरच सुखकर होता.” अशाप्रकारे एकत्र घालवलेला वेळ, शब्दांची देवाणघेवाण करण्यासाठी संधी पुरवितो. हे, पालक आणि मूल दोघांसाठी उत्तेजनकारक ठरू शकते. (पडताळा रोमकर १:११, १२.) एका जोडप्याने, त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाची प्रार्थना ऐकली. तो, ‘वॅलीवर’ आशीर्वाद देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. दररोज रात्री तो अशी प्रार्थना करत असे. वॅली म्हणजे, मलावी येथील बांधव असे त्यांना कळाले तेव्हा त्यांना खरोखरच उत्तेजन मिळाले. कारण, तेव्हा मलावीतील बांधव छळाचा सामना करीत होते. एका विवाहित स्त्री म्हणाली: ‘मी केवळ चार वर्षांची होते तेव्हा, ओट्याजवळ खुर्चीवर उभी राहून माझ्या आईने धुतलेली भांडी फडक्याने पुसून सुकवत असे. तेव्हा, माझी आई मला शास्त्रवचने पाठ करण्यासाठी व राज्य गीते गाण्यासाठी मदत करत असे.’ तुमच्या मुलांबरोबर मौल्यवान देवाणघेवाण करण्याचा आनंद उपभोगू शकाल अशा समयाचा तुम्ही विचार करता का?

१२. ख्रिस्ती पालक सुज्ञपणे त्यांच्या मुलांना काय देतील, आणि कोणत्या पद्धती उपयोगात आणता येतात?

१२ सुज्ञ खिस्ती पालक, नियमित अभ्यासाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करतात. तुम्ही औपचारिक प्रश्‍नोत्तराच्या पद्धतीचा उपयोग करत असला तरी, तुमच्या लहानग्यांसाठी अभ्यासाच्या सरावसत्रांची योजना करून समाधानकारक दळणवळणाला हातभार लावू शकाल का? तुम्ही, पवित्र शास्त्र देखाव्यांचे चित्र काढणे, पवित्र शास्त्रातील गोष्टी सांगणे, किंवा तुम्ही एखाद्या मुलाला तयारी करण्यास सांगितलेला अहवाल ऐकणे या गोष्टी समाविष्ट करू शकता. तुमच्या मुलांकरिता देवाच्या वचनाला होताहोईल तितके रूचकर बनवा, जेणेकरून ते त्याबद्दलची ओढ निर्माण करू शकतील. (१ पेत्र २:२, ३) एका पित्याने म्हटले: ‘आमची मुले लहान होती तेव्हा, आम्ही त्यांच्यासोबत जमिनीवर रांगत होतो आणि पवित्र शास्त्रातील प्रचलित पात्रांचा समावेश असलेल्या ऐतिहासिक घटनांचे नाटक करीत होतो. आमच्या मुलांना हे खूप आवडत असे.’

१३. सरावसत्रांचे काय महत्त्व आहे, आणि त्या दरम्यान तुम्ही कशाचा सराव करू शकता?

१३ सरावसत्रांमुळे, मौल्यवान दळणवळण होते. कारण ते तरुणांना, जीवनाच्या अस्सल परिस्थितीला तोंड देण्यासाठी, सज्ज होण्यास मदत करते. कुसरो कुटुंबातील सर्व ११ मुले, नात्झी छळाच्या वेळी देवाला विश्‍वासू राहिले, त्यातील एकीने तिच्या पालकांविषयी म्हटले: “त्यांनी आम्हाला, कृती कशी करावी आणि पवित्र शास्त्र घेऊन स्वतःचे समर्थन कसे करावे हे दाखवले. [१ पेत्र ३:१५] आम्ही नेहमी सरावसत्र ठेवून प्रश्‍न विचारून त्याची उत्तरे देत असू.” आम्ही देखील असेच का करू नये बरे? तुम्ही सेवाकार्यातील सादरतांचा सराव करू शकता. त्यामध्ये पालक घरमालकाची भूमिका करू शकतात. किंवा सरावसत्रामध्ये अस्सल जीवनात येणाऱ्‍या मोहाला कसे हाताळावे हे देखील चर्चिले जाऊ शकते. (नीतीसूत्रे १:१०-१५) एका स्त्रीने म्हटले: “कठीण परिस्थितीला तोंड कसे द्यावे त्याची तालीम, मुलाचे कौशल्य आणि आत्मविश्‍वास आणखी मजबूत करते, या तालमीत, एक मित्र तुमच्या मुलाला सिगरेट, दारू किंवा अंमली पदार्थ देत आहे अशा एका दृश्‍याचा समावेश करता येतो.” अशाप्रकारचे सरावसत्र तुम्हाला, तुमचे मूल अशा परिस्थितींना कसा प्रतिसाद देईल हे समजण्यास मदत करतील.

१४. तुमच्या मुलांसोबतच्या प्रेमळ आणि कनवाळू चर्चा इतक्या महत्त्वपूर्ण का आहेत?

१४ तुमच्या मुलासोबतच्या या दळणवळणाच्या दरम्यान, पुढील शब्दांच्या लेखकाने ज्या रीतीने हे शब्द उद्‌गारले आहेत त्याच कनवाळूपणे त्याला सांगा की, “माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील.” (नीतीसूत्रे ३:१, २) तुम्ही आज्ञाधारकतेची अपेक्षा यासाठी करता कारण, त्याचा परिणाम शांती आणि दीर्घ आयुष्य यात होईल—म्हणजेच, देवाच्या शांतीदायक नव्या जगात चिरकालिक जीवन मिळेल, असे जर तुम्ही प्रेमळपणे स्पष्टीकरण दिले तर ते तुमच्या मुलाच्या अंतःकरणाला स्पर्श करणार नाही का? देवाच्या वचनातून तर्क करताना, तुमच्या लहानग्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाकडे नीट लक्ष द्या. प्रार्थनापूर्वकतेने असे करा, आणि यहोवा तुमच्या परिश्रमांवर आशीर्वाद देईल. अशा प्रकारची प्रेमळ आणि कनवाळू पवित्र शास्त्र आधारित चर्चा, नक्कीच उत्तम परिणाम व कायमस्वरूपी फायदे आणील.—नीतीसूत्रे २२:६.

१५. पालक त्यांच्या मुलांना समस्या सोडवण्यासाठी कशी मदत करू शकतात?

१५ परंतु, तुमच्या नियोजित अभ्यासाच्या काळादरम्यान अशा प्रकारचे दळणवळण होत नसले तरी, इतर गोष्टींमुळे विचलित होऊ नका. तुमचे मूल काय सांगू इच्छिते ते नीट लक्ष देऊन ऐका. इतकेच नव्हे तर, ते मूल त्याचे मनोगत कसे व्यक्‍त करत आहे तेही पाहा. एका तज्ज्ञाने म्हटले, “तुमच्या मुलाकडे पाहा, त्याच्याकडे तुमचे पूर्ण लक्ष द्या. तो जे काही बोलतो ते नुसते ऐकणे पुरेसे नाही तर ते समजून घ्या. जे पालक अशा प्रकारचा जादा प्रयत्न करण्यासाठी झटतात ते त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणतात.” आज मुले अनेकदा शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. पालक या नात्याने, मुलाला मोकळेपणाने बोलण्यास प्रवृत्त करा, आणि त्याला देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहण्यासाठी मदत करा. तुम्हाला जर समस्या कशी सोडवावी याची खात्री नसेल तर, शास्त्रवचनांमध्ये आणि “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांनी पुरविलेल्या प्रकाशनांमध्ये त्याचे संशोधन करा. (मत्तय २४:४५) तुमच्या मुलाला, समस्या सोडवण्यासाठी लागणारे सर्व खास लक्ष अवश्‍य पुरवा.

एकत्र घालवत असलेल्या वेळेचे जतन करा

१६, १७. (अ) आज तरुण लोकांना विशेषकरून खास लक्ष आणि प्रशिक्षणाची गरज का आहे? (ब) मुलांना त्यांच्या पालकांकडून शिक्षा मिळते तेव्हा त्यांना काय माहीत असणे जरूरीचे आहे?

१६ तरुण लोकांकडे आज, पूर्वीपेक्षा अधिक खास लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे कारण, आम्ही “शेवटल्या काळात” जगत आहोत, आणि हे दिवस “कठीण” आहेत. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३-१४) पालक आणि मुलांना, एकाच प्रकारे खऱ्‍या ज्ञानाद्वारे मिळणारी सुरक्षा, जी “जिविताचे रक्षण” करते तिची गरज आहे. (उपदेशक ७:१२) ईश्‍वरी ज्ञानामध्ये पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या ज्ञानाचे योग्यप्रकारे अनुकरण करणे गोवलेले असल्यामुळे, मुलांना देवाच्या वचनातील प्रशिक्षणाची नियमित आवश्‍यकता आहे. यास्तव, तुमच्या तरुण बालकांसोबत शास्त्रवचनांचा अभ्यास करा. त्यांना यहोवाबद्दल सांगा, त्याच्या अपेक्षांचे लक्षपूर्वक स्पष्टीकरण द्या, व त्याच्या महान अभिवचनांच्या पूर्णतेची आनंदाने वाट पाहण्यासाठी त्यांच्यामध्ये तशी आस्था निर्माण करा. अशा गोष्टी, तुम्ही घरी असता तेव्हा, तुमच्यासोबत बाहेर असताना, होय, प्रत्येक योग्य प्रसंगी त्यांच्यासोबत बोला.—अनुवाद ६:४-७.

१७ शेतकऱ्‍यांना हे ठाऊक असते की, सर्व रोपे एकाच प्रकारच्या वातावरणात वाढत नाहीत. रोपांची खास निगा राखण्याची गरज आहे. त्याचप्रकारे, प्रत्येक मूल वेगळे आहे व त्याला खास लक्ष, प्रशिक्षण, आणि शिक्षेची आवश्‍यकता आहे. उदाहरणार्थ, एखादे तरुण मूल चूक करत असताना, पालकांची नापसंतीची केवळ एक नजर त्याला रोखण्यासाठी पुरेशी असू शकते. परंतु, दुसऱ्‍या मुलाला जरा कडक शिक्षेची आवश्‍यकता असेल. काही विशिष्ट शब्दांमुळे किंवा कार्यामुळे तुम्ही नाराज का होता हे, तुमच्या सर्व मुलांना माहीत असणे जरूरीचे आहे. आणि यामध्ये आई आणि वडिल दोघांनीही एकमेकांना साथ दिली पाहिजे, जेणेकरून ती शिक्षा मिळतीजुळती राहते. (इफिसकर ६:४) ख्रिस्ती पालकांनी, शास्त्रवचनांशी मेळ घालणारे स्पष्ट मार्गदर्शन देणे विशेष महत्त्वाचे आहे.

१८, १९. ख्रिस्ती पालकांना त्यांच्या मुलांबद्दलची कोणती जबाबदारी आहे, आणि जर ती योग्यपणे पार पाडली तर कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे?

१८ शेतकऱ्‍याने पेरणी करण्याचे व वाढवण्याचे काम योग्य वेळेवर केलेच पाहिजे. त्याने जर उशीर लावला किंवा त्याच्या पिकाकडे दुर्लक्ष केले तर, तो थोडीच किंवा काहीच कापणी करू शकणार नाही. तर, तुमची तरुण मुले वाढणारी “रोपे” आहेत ज्यांच्याकडे, पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी नव्हे तर आता, खास लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. देवाच्या वचनाच्या सुसंगतीत त्यांची आध्यात्मिक वाढ करण्याच्या व त्यांना निस्तेज होऊन आध्यात्मिकरीत्या मारून टाकणाऱ्‍या जगिक विचारांना उपटून टाकण्याच्या या मौल्यवान संधी तुमच्या हातून घालवू नका. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत घालवण्यासाठी मिळालेले तास आणि दिवस यांचे जतन करा, कारण असा वेळ भुश्‍याप्रमाणे फार लवकर उडून जातो. यहोवाचा विश्‍वासू सेवक या नात्याने आनंदी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्‍या ईश्‍वरी गुणांना तुमच्या अपत्यामध्ये वाढविण्यासाठी कठीण परिश्रम करा. (गलतीकर ५:२२, २३; कलस्सैकर ३:१२-१४) हे कोणा तिऱ्‍हाइताचे काम नाही; ती तुमची जबाबदारी आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला मदत करू शकतो.

१९ तुमच्या मुलांना समृद्ध आध्यात्मिक वारसा द्या. त्यांच्यासोबत देवाच्या वचनाचा अभ्यास करा, आणि यथायोग्य मनोरंजनाचा एकत्र मिळून आनंद उपभोगा. तुमच्या लहान मुलांना खिस्ती सभांना घेऊन जा. राज्य प्रचाराच्या कार्यात त्यांना तुमच्यासोबत घ्या. तुमच्या प्रिय अपत्यामध्ये यहोवाला स्वीकारयोग्य असलेले व्यक्‍तिमत्त्व निर्माण करा, आणि पुढील जीवनामध्ये ते तुम्हाला अधिक आनंद देतील. निश्‍चितच, “धार्मिकांचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो, त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतीसूत्रे २३:२४, २५.

समृद्ध मोबदला

२०. किशोरवयीन मुलांचे यशस्वी पालक होण्याची गुरूकिल्ली कोणती आहे?

२० मुलांचे संगोपन, जटील, दीर्घ पल्ल्याची नेमणूक आहे. राज्याचे फळ देणारे देव-भिरू प्रौढ होण्यासाठी, या ‘जैतुनाच्या रोपांना’ वाढवणे हा २०-वर्षांचा प्रकल्प आहे असे म्हटले जाते. (स्तोत्रसंहिता १२८:३; योहान १५:८) हा प्रकल्प बहुधा तेव्हा कठीण जातो जेव्हा मुले किशोरावस्थेत येतात. कारण तेव्हा त्यांच्यावर पुष्कळदा दबाव आणले जातात व पालक मुलांना अधिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यासाठी झटत असतात. पण यशाची गुरूकिल्ली तीच राहते—लक्षपूर्वक, उबदार, व समजदार असणे. तुमच्या किशोरवयीन मुलांना विशेष व्यक्‍तिगत लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे याची आठवण ठेवा. तुम्ही त्यांना अशाप्रकारचे लक्ष, त्यांच्या हितासाठी खरी कळकळ दाखवून प्रदर्शित करून पुरवू शकता. त्यांची मदत करण्यासाठी, तुम्हाला त्यांना आवश्‍यक असलेला वेळ, प्रेम, आणि काळजी पुरवून स्वतःचा वेळ खर्च केला पाहिजे.

२१. मुलांकडे खास लक्ष दिल्याबद्दल कोणता मोबदला मिळू शकतो?

२१ यहोवाने तुम्हाला सोपवलेल्या मौल्यवान फळांची निगा राखण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करता, त्याचा मोबदला शेतकऱ्‍याच्या विपुल कापणीपेक्षा किती तरी पटीने अधिक समाधानकारक असू शकतो. (स्तोत्रसंहिता १२७:३-५) तर पालकांनो, तुमच्या मुलांकडे खास लक्ष देत राहा. हे सर्व त्यांच्या भल्यासाठी आणि आमचा स्वर्गीय पिता, यहोवा याच्या गौरवासाठी करा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ रोपांना आणि मुलांना वाढविण्याची तुलना कशी केली जाऊ शकते?

▫ मुलाला बालपणापासून दररोज कोणत्या प्रकारचे लक्ष दिले पाहिजे?

▫ मुलांना कोणत्या विशेष काळजीची आवश्‍यकता आहे, आणि ती कशी केली जाऊ शकते?

▫ तुमच्या मुलांकडे खास लक्ष का द्यावे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा