पालकहो बाळपणापासूनच आपल्या मुलाच्या अंतःकरणास जाऊन भिडा
“तुम्ही आपल्या मुलांना . . . यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.”—इफिसकरांस पत्र ६:४.
१. येशूच्या जीवनात एका विशिष्ट त्रस्त परिस्थितीत काय घडले?
येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य यरुशलेमाकडे चालले होते. आधी निदान दोनदा तरी येशूने आपल्या शिष्यांना असे म्हटले की त्याला खूप त्रास सहन करावा लागणार आणि त्या शहरात शेवटी मरावे लागणार. (मार्क ८:३१; ९:३१) अशा या त्रस्त परिस्थितीत येशू असताना, पवित्र शास्त्र अहवाल म्हणतोः “लोकांनी आपली तान्ही बाळकेहि त्याने त्यांस स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणिली.”—लूक १८:१५.
२. (अ) शिष्यांनी लोकांना परत जाण्यास का सांगितले असावे? (ब) पण येशूने याविषयीची कशी प्रतिक्रिया दाखवली?
२ याविषयी कोणती प्रतिक्रिया दिसली? येशूला आणखीन अवघडल्यासारखे होईल व नसता त्रास वाटेल ही जाणीव राखून शिष्यांनी लोकांना धमकाविले व परत जाण्यास सांगितले. पण हे बघून येशूला रहावले नाही. तो शिष्यांवर रागावला व त्याने त्यांना म्हटलेः “‘बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांस मनाई करू नका’ . . . तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१३-१६) होय, मनात व अंतःकरणात त्रस्तता होती तरीही येशूने बाळकांसाठी वेळ काढला.
पालकांसाठी कोणता धडा?
३. या घटनेकरवी पालकांनी कोणता धडा शिकावयास हवा?
३ यावरुन पालकांसाठी हा धडा आहेः तुम्हाला इतर कोणतीही कामे असली वा तुम्ही कोणत्याही त्रासात असला तरीही आपल्या मुलांसोबत वेळ खर्च करणे याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. अशाप्रकारे एकत्रपणे घालविलेला वेळ तुमच्या मुलांना आध्यात्मिक मूल्ये शिकवील आणि त्यांच्या अंतःकरणांचे रक्षण करुन त्यांना योग्य दिशा दाखवील. (अनुवाद ६:४-९; नीतीसूत्रे ४:२३-२७) तीमथ्याची आई युनिके आणि आजी लोईस यांनी त्याला शिक्षण देण्यासाठी वेळ काढला, हे शिक्षण त्याच्या बालमनी जाऊन भिडले आणि त्याच्या जीवनाला वळण मिळाले व त्याचा परिणाम तो देवाचा भक्तीमान सेवक या अर्थाने मोठा झाला.—२ तीमथ्य १:५; ३:१५.
४. मुले किती मोलवान आहेत आणि मुलांविषयीची आत्मीयता आहे हे पालक कसे दाखवू शकतात?
४ ख्रिस्ती पालकांना यहोवा देवाने जी मुले प्रदान केली आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. होय, मुले ही यहोवाकडील बहुमूल्य देणगी आहे. (स्तोत्रसंहिता १२७:३) तद्वत, तीमथ्याची आई आणि आजी यांनी घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही आपल्या मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्या अंतःकरणास जाऊन भिडा. मुलांसोबत, ते कसे वागतात आणि त्यांनी कसे वागावे याविषयीचे भाष्य करण्यात केवळ वेळ देऊ नका; तर त्यांच्याबरोबर जेवण्यात, एकत्र वाचन करण्यात, खेळण्यात व रात्री झोपण्याची तयारी करताना एकत्रपणे सहवास द्या. मुलांबरोबर खर्च केलेला हा सर्व वेळ महत्वाचा आहे.
५. आपल्या पालकीय जबाबदाऱ्यांच्या बाबतीत रसिकता व्यक्त केलेल्या एका वडीलांचे उदाहरण स्पष्ट करा.
५ जपानमधील एक ख्यातनाम व्यावसायिक, जे आता यहोवाचे साक्षीदार झाले त्यांनी या गोष्टीची सत्यता ओळखली आहे. मेनेखी डेली न्यूज या जपानच्या वृत्तपत्राने फेब्रुवारी १०, १९८६ च्या अंकात “जे एन आर च्या उच्चपदस्थांचा कुटुंबासोबत राहण्यासाठी राजीनामा” या मथळ्याखाली कळविलेः “जपानी नॅशनल रेल्वे (जे एन आर) च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियापासून विभक्त असण्यापेक्षा कामाचा राजीनामा देणे पसंद केले. . . . श्री. तामुरा म्हणतातः ‘व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचे काम कोणालाही करता येईल, पण माझ्या मुलांचे व्यवस्थापन मलाच पहायचे आहे.’” तुम्हीही आपल्या पालकीय जबाबदाऱ्या इतक्याच गंभीरतेने घेता का?
सध्या खास प्रयत्नांची का गरज आहे
६. आज मुलांची वाढ योग्यपणे करणे इतके का कठीण होत आहे?
६ देवाचे वचन सांगते त्याप्रमाणे मुलांना “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढविणे मानवी इतिहासात इतके कठीण झाले नसेल जितके आज आहे. (इफिसकर ६:४) याचे कारण आम्ही “शेवटल्या काळी” राहात आहोत आणि सैतान व दुरात्म्यांना आपला काळ थोडाच राहिला आहे हे माहीत असल्यामुळे ते अत्यंत क्रोधाविष्ट होऊन मोठा अनर्थ सर्वत्र माजवीत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण १२:७-१२) या कारणास्तव, पालक आपल्या मुलांना इश्वरी भक्तीने वाढविण्याचे जे प्रयत्न घेत आहेत त्याला, सैतान ज्यावर सध्या प्रभुत्व राखून आहे त्या लाक्षणिक “हवे”द्वारे दूर सारले जात आहे. ही “हवा” किंवा स्वार्थ व बंडखोरपणाचा आत्मा, आपण ज्या खरोखरीच्या हवेचा श्वास घेतो तितकाच व्यापक होत चालला आहे.—इफिसकर २:२.
७, ८. (अ) दूरदर्शन घरात काय आणू शकतो, तरीही पुष्कळ पालक काय करतात? (ब) दूरदर्शनला मुलाला संभाळणाऱ्या दाईसारखे वापरणे हे पालकांना आपल्या जबाबदारीविषयी केवढा निष्काळजीपणा आहे हे दुःखदपणे का सांगते?
७ हा “जगाचा आत्मा” किंवा विषारी “हवा” ही खासपणे दूरदर्शनकरवी घरात शिरते. (१ करिंथकर २:१२) खरे म्हणजे दूरदर्शनवर जे काही दाखवण्यात येते त्यात मनोरंजन क्षेत्रातील प्रबळ अनैतिक व पुरुषगामी भागाचा जबर पगडा असतो. (रोमकर १:२४-३२) तुमची मुले जशी खरोखरीच्या प्रदुषित हवेने बाधली जातात तशीच ती येथे सादर करण्यात येणारी अभक्त विचारसरणी आणि अनीती यांना खासपणे विकारी होतात. पण मग, बहुतेक पालक काय करतात?
८ ते या दूरदर्शन संचाला मुलाला संभाळणाऱ्या दाईसारखे वापरतात. “हे बघ बाळा, मी आता कामात आहे, तर जा आणि टेलिव्हिजनवर काय कार्यक्रम चालला आहे तो बघ जरा,” असे ते आपल्या मुलांना म्हणतात. दूरदर्शनवर कार्यक्रम सादर करणारे एक विख्यात सादरकर्ते म्हणतात की “हेच शब्द अमेरिकेत बहुतेक घरात बोलले जातात.” पण मुलांना दूरदर्शनवर चालू आहे तो कार्यक्रम बघण्यासाठी पळायला लावणे हे त्यांना मोकळे सोडून देण्यासारखे आहे. (नीतीसूत्रे २९:१५) याकरवी पालकांठायी किती निष्काळजीपणा आहे तो प्रवर्तित होतो. वर नमूद केलेले तेच सादरकर्ते मुलांच्या वाढीविषयी असे परिक्षण देतातः “ते तर वेळ घेते आणि पालकीय व्यवसायावर मोठा भार टाकते. हे काम अर्थातच दूरदर्शन संचावर टाकता येणार नाही.”
९. मुलांना कोणत्या प्रदुषणापासून खासपणे संरक्षण हवे आहे?
९ तरीपण आम्ही ज्या काळात राहात आहोत त्याच्या दबावामुळे तुम्हाला शिष्यांनी केले त्याप्रमाणे मुलांना परतवून लावावेसे वाटत असते की ज्यामुळे, वाटते त्या अधिक महत्वाच्या गोष्टीत लक्ष घालता येईल. पण खरे पाहता आपल्या मुलांपेक्षा अधिक महत्वाचे ते काय आहे? त्यांचे आध्यात्मिक जीवन धोक्यात आहे! तुम्हाला हे आठवतच असेल की मागे १९८६ मध्ये चर्नोबील येथे जो अण्वस्त्र अपघात घडला त्यावेळी त्याच्या प्रदूषणापासून वाचविण्यासाठी मुलांना लगेच दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. याचप्रमाणे, तुम्हाला आपल्या मुलांचे आध्यात्मिक आरोग्य राखावयाचे आहे तर मग त्यांना, दूरदर्शन संचातून बाहेर सोडण्यात येते त्या या जगाच्या विषारी “हवे”पासून दूर ठेवलेच पाहिजे.—नीतीसूत्रे १३:२०.
१०. विषारी “हवे”च्या आणखी कोणत्या झळा मुलांना घातक आहेत आणि याचा प्रत्यय कोणत्या पवित्र शास्त्र उदाहरणात दिसतो?
१० तरीपण, लहानांच्या नीतीमूल्यांना नष्ट करणाऱ्या व त्यांची मने कठीण करणाऱ्या विषारी “हवे”चे आणखी काही प्रकार आहेत. शेजार व शाळा येथील मुलांसोबतचा अयोग्य सहवास यांच्या बालमनात रुजविलेल्या सत्याच्या रोपाची वाढ खुंटवितो. (१ करिंथकर १५:३३) याकोबाची तरुण कन्या दीना ही “देशातील मुलींना भेटावयास जात होती” त्यामुळे तिला एका युवकाकडून भ्रष्ट व्हावे लागले याकडून धडा घेण्यासारखा आहे. (उत्पत्ती ३४:१, २) आजचे हे जग पूर्वी नव्हते इतके हिणकस बनले असल्यामुळे यात नैतिक अधःपतन घडू नये म्हणून मुलांना चांगले शिक्षण व तालीम देणे जरुरीचे आहे.
बालपणापासून तालीम का द्यावी?
११. (अ) पालकाकरवीची तालीम केव्हा सुरु होण्यास हवी? (ब) यामुळे कोणते चांगले परिणाम अनुभवावयास मिळू शकतील?
११ पण पालकांनी ही तालीम केव्हापासून सुरु करावी? तीमथ्याला “बाळपणापासून” ही तालीम मिळाली असे पवित्र शास्त्र म्हणते. (२ तीमथ्य ३:१५) येथे वापरण्यात आलेला ग्रीक शब्द ब्रिफोस हा साधारणपणे अद्याप न जन्मलेल्या बालकासाठी वापरला जातो हे लक्षवेधी आहे. तो लूक १:४१, ४४ मध्येही वापरण्यात आला आहे. तेथे योहान या बालकाने आपल्या आईच्या उदरात उडी घेतली असे सांगितले आहे. तसेच, ब्रिफोस हा त्या नवजात इस्त्राएली अर्भकांसाठीही वापरला गेला ज्यांचे जीवन मोशे जन्मला तेव्हा मिसरात धोक्यात आले होते. (प्रे. कृत्ये ७:१९, २०) तीमथ्याबाबत पाहू जाता तो शब्द लहान मुलास नव्हे तर तान्ह्या बाळास किंवा बालकाच्या अनुषंगाने वापरला गेला. तीमथ्याला पवित्र लिखाणातून शिक्षण हे त्याला आठवत होते तितक्या पूर्वीपासून म्हणजे तो जेव्हा बालक होता तेव्हापासून लाभले. आणि या शिक्षणाचा केवढा उत्तम परिणाम दिसला! (फिलिप्पैकर २:१९-२२) पण इतक्या आरंभीच्या शिक्षणापासून नवजात बाळकांना खराच फायदा मिळू शकतो का?
१२. (अ) तान्हे बाळ माहिती व छटा केव्हा आत्मसात करण्यास आरंभ करते? (ब) पालकांनी आपल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देण्यास केव्हा व कशी सुरुवात करावी?
१२ “लहान बाळाची शिकण्याची क्षमता केवढी भव्य असते तिची आम्हाला लाभलेली समज ही सबंध मानसशास्त्राच्या क्षेत्रातील अत्यंत थरारक घटना होय” असे मागे १९८४ मध्ये याले विश्वविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एडवर्ड झिग्लर यांनी कळविले. वास्तविकपणे, हेल्थ या मासिकाने देखील म्हटलेः “नवे संशोधन सुचविते त्याप्रमाणे गर्भाशयातील बालकांना पाहता, ऐकता येते, स्वाद कळतो आणि भावना ‘जाणवतात.’” तर मग हे उघड आहे की पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी वेळ बघत बसण्याची गरज नाही, ते लवकरात लवकर सुरु केले पाहिजे. (अनुवाद ३१:१२) मुलांना पुस्तकातील चित्रे दाखवून आणि गोष्टी सांगून याची सुरुवात करता येईल. मासारु इबुका हे किंडरगार्टन इज टू लेट या पुस्तकाचे संपादक म्हणतातः “बाळाचा जन्म ते त्याचे तिसरे वर्ष येथपर्यंतचा काळ मोठ्या कसोटीचा असतो.” याचे कारण बालमन हे खूप लवचिक असते व ते माहिती सहजगत्या आत्मसात करते आणि याचा प्रत्यय आपल्याला बालके नवी भाषा केवढ्या जलदगतिने शिकून घेतात त्याकरवी मिळतो. न्यूयॉर्क महाविद्यालयातील बालकांच्या आरंभीच्या शिक्षणावर काम पाहणाऱ्या एका प्राध्यापकांनी असेही म्हटले की, “पालकांनी आपल्या बाळांना इस्पितळातून घरी आणल्यावर लगेचच वाचण्याच्या शिक्षणाचा आरंभ करावा”!
१३. बाळकाठायी शिकण्याची कुवत असते हे कोणते उदाहरण दाखवते?
१३ कॅनडामधील एक माता आपल्या मुलाच्या शिकण्याच्या क्षमतेविषयी असे लिहितेः “मी माझा साडे चार वर्षांचा मुलगा शाऊन याला एके दिवशी माय बुक ऑफ बायबल स्टोरीज या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवीत होते. मी एके ठिकाणी थोडा विराम घेतला तो काय आश्चर्य, माझा मुलगा पुढचा मजकूर स्वतःच सांगू लागला. बायबल स्टोरीज पुस्तकातील त्याने पुढचे अक्षर न अक्षर सांगितले. . . . मी दुसरी गोष्ट वाचण्यास आरंभ करुन थांबले तो ती त्याने पुरी करुन दाखवली. तिसरीही गोष्ट त्याने तशीच सांगितली. . . . अशाप्रकारे एक एक करता त्याने पहिल्या ३३ गोष्टी अक्षर न अक्षर सांगितल्या व त्यात जागेची व लोकांची कठीण नावेही सांगितली.”a
१४. (अ) बालकांचे कसब कोणाला आश्चर्यचकित करीत नाही? (ब) ख्रिस्ती पालकांचे ध्येय काय असावे? (क) मुलाची कशासाठी तयारी केली जाण्यास हवी आणि का?
१४ बालकाठायी शिकण्याची कुवत ज्यांना परिचयाची आहे त्यांना हे कसब आश्चर्याचे वाटणार नाही. “आम्ही मुलांना नव्हे तर बाळकांना शिकवण्यास आरंभ केला तर जगात आइनस्टाईन, शेक्सपीअर, बिथोवेन आणि लिओनार्डो डा विन्सी सारखे विद्वान दिसतील,” असा मानवी संभाव्यतेची साध्यता शोधणाऱ्या संघटनेचे चालक डॉ. ग्लेन डोमन यांचा दावा आहे. अर्थात, ख्रिस्ती पालकांचे ध्येय विद्वानांची निर्मिती करणे हे नाही, पण आपल्या मुलांच्या अंतःकरणाला जाऊन भिडणे हे आहे म्हणजे ती मुले देवाची सेवा करण्यापासून कधीही मागे हटणार नाहीत. (नीतीसूत्रे २२:६) हे प्रयत्न मुलगा शाळेला जाऊ लागण्याच्या बऱ्याच आधीपासून केले जाण्यास हवेत कारण शाळेत जाण्याचे सुरु झाल्यावर त्याला तेथे विविध समस्यांना तोंड द्यावयाचे असते. बालवाडीत किंवा दिवसभराचा सांभाळ करणाऱ्या संस्थांमध्ये वाढदिवस वा सणासुदीचे दिवस मुलांसाठी मोठे मनोरंजक करण्यात येतात. तेव्हा मुलाला, यहोवाचे सेवक यात का भाग घेत नाहीत ते आधीच कळले पाहिजे. तसे झाले नाहीतर मुलाची वाढ होण्यासोबत त्याला त्याच्या पालकांच्या धर्माविषयीचा द्वेषही वाटू व वाढू लागेल.
मुलाच्या अंतःकरणास कसे भिडावे
१५, १६. मुलांच्या अंतःकरणास जाऊन भिडण्यासाठी मदत व्हावी म्हणून पालक कशाचा वापर करु शकतात, आणि या तरतुदी प्रभावीपणे कशा वापरता येतील?
१५ मुलाच्या अंतःकरणास भिडता यावे म्हणून यहोवाच्या साक्षीदारांनी थोर शिक्षकाचे ऐका यासारख्या पुस्तकांची निर्मिती केली आहे. या पुस्तकात एक अध्याय आहे ज्याचे शिर्षक आहेः “वाढदिवस पाळणारी दोन माणसे.” तो मेळावे आणि त्यातील गंमतजंमत याविषयीची चर्चा करतो. तरीपण तो याचीही माहिती देतो की पवित्र शास्त्रात ज्या केवळ दोन वाढदिवसांचा उल्लेख आला आहे तो यहोवाची भक्ती न करणाऱ्या विदेशी मूर्तिपूजकांनी पाळला होता आणि प्रत्येक प्रसंगी कोणाचे तरी डोके छाटण्यात आले. (मार्क ६:१७-२९; उत्पत्ती ४०:२०-२२) मुलाच्या अंतःकरणास भिडण्यासाठी या माहितीचा तुम्हाला कसा वापर करता येईल?
१६ थोर शिक्षकाचे ऐका या पुस्तकात जी आर्जव करण्याची पद्धत वापरण्यात आली आहे तिचा येथे तुम्हाला वापर करता येईल. तुम्ही कदाचित असे म्हणू शकालः “आपल्याला माहीत आहे की पवित्र शास्त्रात जे लिहिले आहे त्यामागे काही कारण आहे.” मग विचाराः “तर मग, देव आपल्याला वाढदिवसाविषयी काय म्हणतो असे तुला वाटते?” याकरवी मुलाला त्या विषयावर विचार करण्यास मदत मिळून बरोबरचा निर्णय घेता येऊ शकतो. थोर शिक्षकाचे ऐका या पुस्तकाशिवाय पालकांनी वापर करावा असे माय बुक ऑफ बायबल स्टोरीज आणि टेहळणी बुरुज यात जानेवारी १९८६ पासून “येशूचे जीवन व उपाध्यपण” याविषयी प्रसिद्ध होणारे साहित्य देखील आहे. या लेखांना तुम्ही मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच स्वतःलाही शिक्षण मिळावे म्हणून वापरता का?
१७. पालकांसाठी येथे कोणते व्यावहारिक प्रस्ताव मांडण्यात आले आहेत?
१७ शाळेत जी परिस्थिती आणि वादविषयाला तोंड द्यावे लागते त्याविषयीच्या साहित्याची मुलासोबत वेळोवेळी चर्चा केली पाहिजे. तुम्ही स्वतः व मुलेही यहोवाला जबाबदार आहेत हे मुलांना कळू द्या. (रोमकर १४:१२) यहोवा आम्हासाठी ज्या चांगल्या गोष्टी करुन आहे त्या त्यांच्यापुढे ठळकपणे मांडा व याकरवी मुलाला, त्याने यहोवाला अंतःकरणापासून संतुष्ट करावे अशी इच्छा त्याच्यामध्ये जागवा. (प्रे. कृत्ये १४:१७) शिक्षणाचा प्रसंग आनंदमय बनवा. मुलांना गोष्टी आवडतात तेव्हा सजीवतेने शिक्षणाचे धडे त्यांच्यापुढे मांडा, जे त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतील. अशी ही अद्भूत संधि कित्येक पालक नियमितरित्या एकत्रित जेवण न केल्यामुळे वाया घालवतात. तुम्ही कुटुंब या अर्थी एकत्र जेवण घेता का? नाही तर ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही योजना करा.—पडताळा प्रे. कृत्ये २:४२, ४६, ४७.
१८, १९. (अ) मुलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत पालकांनी कोणता आराखडा अनुसरावा, आणि कशाची अधिक जोर देऊन सांगण्याची गरज नाही? (ब) पालकीय शिक्षणाविषयीच्या आधुनिक उदाहरणातील कोणती वैशिष्ठ्ये तुम्हावर छाप पाडतात आणि पालकांनी त्या अवलंबिल्या तर काय परिणाम होईल असे तुम्हास वाटते?
१८ शिकविण्याची कालमर्यादा मुलाच्या वयोमानाप्रमाणे राखली पाहिजे. तेच, ज्याची लक्ष देण्याची क्षमता अल्प आहे त्या बाळकाच्या बाबतीत देखील तसेच आहे. दररोज थोडे थोडे काही बोला. मग, यात प्रगति करुन त्याला थोडे लांब बनवा व त्यात अधिक माहिती समाविष्ठ करा. मुलांना शिक्षण देण्याविषयीचे नियमित तास ठेवावेत हे आणखीन जोर देऊन सांगावयास नको. (उत्पत्ती १८:१९; अनुवाद ११:१८-२१) आता सत्तरीमध्ये असणाऱ्या एका वडीलांनी मुलाच्या संगोपनाच्या बाबतीत चांगले उदाहरण ठेवले, कारण हाच मुलगा आता ख्रिस्ती वडील आहे. काही वर्षांआधी त्यांनी आपला कार्यक्रम असा विवेचीत केला होताः
१९ “माझा मुलगा एक वर्षाचा होता तेव्हा मी त्याला रात्री झोपण्याच्या वेळी पवित्र शास्त्राच्या गोष्टी सांगू लागलो. त्या अधिक बिंबविण्यासाठी त्या सुंदरपणे कथित केल्या. दुसऱ्या वर्षी तो बोलू लागला तेव्हा रात्री मी खाटेसमोर गुडघे टेकून त्याला “प्रभुच्या प्रार्थने”चा प्रत्येक शब्द माझ्यामागे बोलण्यास सांगू लागलो. . . . तो तीन वर्षांचा झाल्यावर मी त्याच्याबरोबर पवित्र शास्त्र अभ्यास आरंभिला . . . तो त्याच्या पुस्तकात बघून माझ्या मागे शब्द उच्चारी. अशाप्रकारे तो शब्द नीट उच्चारु शकला आणि मोठे शब्दही त्याला स्पष्ट म्हणता आले. . . . पवित्र शास्त्रीय सत्ये त्याच्या अंतःकरणावर बिंबविण्याकरता तो तीन वर्षांचा असताना त्याला काही साधी पवित्र शास्त्र वचने पाठ करायला लावली. तो बालवाडीत जायला लागला तेव्हा सुमारे तीस वचने त्याने पाठ केली, आणि आता तो पहिल्या इयत्तेत गेला तेव्हा त्याने सत्तर वचने पाठ केली. . . . मुलगा झोपण्याआधी मी त्याला पाठ केलेली काही वचने म्हणावयास सांगतो. याचप्रमाणे तो सकाळी उठतो तेव्हा सकाळचे अभिवादन करण्यासोबत तो काही पवित्र शास्त्रवचने बोलून दाखवितो.”
२०. शैक्षणिक कार्यक्रमात कशाचा समावेश असावा आणि मुलाला घरोघरचे कार्य कसे आवडू शकेल?
२० अशाप्रकारचा शिक्षणाचा हा प्रगतिशील कार्यक्रम सोबत पालकांचे योग्य उदाहरण आणि शिस्तीचा योग्य वापर यामुळे तुमच्या मुलाला जीवनात चांगली सुरुवात करुन दिली जाईल आणि यासाठी तो तुमचा नेहमीच ऋणी राहील. (नीतीसूत्रे २२:१५; २३:१३, १४) या कार्यक्रमातील महत्वाचा भाग, मुलाला कोवळ्या वयापासूनच जाहीर उपाध्यपणामध्ये सोबत नेऊन त्याला त्याविषयीची तालीम द्यावी. तुमच्या मुलाने अर्थभरीत सहभाग घ्यावा यासाठी त्याची तयारी करा व त्याला सुखद अनुभव घेऊ द्या. वर उल्लेखिलेल्या अनुभवातील पिता आपल्या मुलाविषयी पुढे म्हणतोः “शास्त्रवचने काढून दाखविण्याची क्षमता त्याला त्याच्या क्षेत्रकार्यात खूपच प्रभावी करते. त्यामुळे घरमालकावर खूप चांगली छाप पडते आणि तो जी पवित्र शास्त्रीय मासिके त्यांना सादर करतो ती त्यांना नाकारता येत नाही. तो तीन वर्षांचा होता तेव्हापासूनच ख्रिस्ती कार्यात सहभाग घेऊ लागला. आता तो [सहा वर्षांचा असताना] मजपेक्षा व माझ्या बायकोपेक्षा अधिक प्रभावीपणे पवित्र शास्त्रीय साहित्याची सादरता करतो.”—अवेक!, जानेवारी २२, १९६५, पृष्ठे ३-४.
२१. (अ) पालक आपल्या मुलांना सर्वात मोठे बक्षिस कोणते देऊ शकतात? (ब) पालकांना कोणता सल्ला दिलेला आहे आणि लहान मुले असणाऱ्या पालकांनी काय केलेच पाहिजे?
२१ होय, ख्रिस्ती पालकांना फार मोठा ठेवा लाभला आहे व तो आहे यहोवाविषयीच्या ज्ञानाचा. हाच ठेवा ते आपल्या मुलांना वैभवी नवीन जगातील शांती व आनंदाच्या अक्षय जीवनासह देऊ शकतात. (नीतीसूत्रे ३:१-६; १३-१८; १३:२२) या भव्य भवितव्याविषयीच्या खरेपणाचा आत्मविश्वास आणि यहोवाची सेवा करण्याविषयीची इच्छा तुमच्या मुलांच्या बालमनात उभारा. खरी उपासना ही त्यांच्यासाठी एक स्वाभाविक आणि आनंदाचा अनुभव बनवा. (१ तीमथ्य १:११) बाळपणापासूनच त्यांच्यामध्ये यहोवाविषयीचा भाव बिंबवा. आणि हो, तुम्ही देत असलेल्या नियमित शिक्षणाच्या वर्गाला कधीही दुर्लक्षित करू नका! याला नेहमी प्रथम प्राधान्य द्या, आपल्या मुलांच्या गरजेचे ते काय याविषयीची माहिती घेण्यात नित्य परीक्षण करीत राहा आणि ती सादर करताना त्यांच्या अंतःकरणास कशारितीने ती भिडवता येईल ते पाहा. तुम्ही इतर गोष्टीत व भाराखाली मग्न असावे याकडे दियाबल सैतान व त्याच्या जगताचे लक्ष आहे. पण येशूचे उदाहरण ध्यानात ठेवा! आपल्या मुलांसोबत नियमित रुपाचा करावा लागणारा अभ्यास पुढे ढकलण्याची सबब सांगावी लागेल इतके स्वतःला इतर गोष्टींत मग्न बनवू नका!
[तळटीपा]
a त्याला वाचायला येण्याआधी त्याने पुस्तकातील त्या गोष्टींचे ध्वनिफितींवर नियमितपणे श्रवण केले होते.
तुमचा काय प्रतिसाद असेल?
◻ पालकांनी आपल्या मुलांच्या गरजेला प्राधान्य द्यावे हे कोणत्या पवित्र शास्त्रीय पुराव्यावरून दिसते?
◻ मुलांचे संरक्षण करण्यासाठी आज पालकांनी खास प्रयत्न का करण्यास हवेत?
◻ मुलांना बाळपणापासूनच तालीम देणे इतके महत्वपूर्ण का आहे?
◻ मुलाच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडता यावे यासाठी पालकांकरता कोणते व्यावहारिक प्रस्ताव सांगता येतील?
◻ ख्रिस्ती पालकांनी कशाकडे कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नये?
[१२ पानांवरील चित्रं]
पालकाकरवीची तालीम लवकरात लवकर सुरु झाली पाहिजे