वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१५ पृ. ८-९
  • गॉथिक पवित्र शास्त्र एक विलक्षण संपादन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गॉथिक पवित्र शास्त्र एक विलक्षण संपादन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उलफ्लॉस—मिशनरी आणि पवित्र शास्त्र अनुवादक
  • गॉथिक पवित्र शास्त्राचा सुरवातीचा इतिहास
  • टिकून राहिलेली हस्तलिखिते
  • गॉथिक पवित्र शास्त्र वचनाला पूर्ववत करणे
  • कोडेक्स बझाय एक अप्रतिम हस्तलिखाण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • शुभवर्तमानाचा वॉशिंग्टन कोडेक्स
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१५ पृ. ८-९

गॉथिक पवित्र शास्त्र एक विलक्षण संपादन

गॉथ्स हे जर्मन जमातीतील संघ होते, कदाचित त्यांचा उगम स्कॅनडीनेविया येथून झाला असेल. आमच्या सामान्य युगाच्या सुरवातीच्या शतकात, त्यांनी दक्षिणेकडील काळा समुद्र तसेच रोमी साम्राज्याच्या दूरवरील वसाहतींच्या डान्यूब नदीपर्यंत देशांतर केले.

कोणत्याही जर्मन भाषेतील सर्वात पहिले वाङ्‌मयीन लेखन गॉथिक पवित्र शास्त्र हे होते. आज तो अनुवाद तुकड्या तुकड्यांच्या रूपात आहे. परंतु, ती पवित्र शास्त्रवचनांची अतुलनीय आणि मौल्यवान आवृत्ती म्हणून आहे. का बरे?

उलफ्लॉस—मिशनरी आणि पवित्र शास्त्र अनुवादक

या पवित्र शास्त्राचे अनुवादक उलफ्लॉस, हे वुलफ्ला या त्यांच्या गॉथिक नावाने ओळखले जात होते. इतिहासकार फिलेसटॉरगीज यांच्यानुसार, उलफ्लॉस हे गॉथिकांवर धाड टाकून, आता पूर्व तुर्कचा भाग असलेल्या कप्पादुकियात कैद करून नेलेल्या कैद्यांचे वंशज होते. त्यांचा जन्म सुमारे सा. यु. ३११ मध्ये झाला व ३० वर्षांनंतर त्यांना निकोमेडियाच्या युसेबियसद्वारे, गॉथ्स्‌ लोकांमध्ये मिशनरी म्हणून काम करण्यासाठी विधिपूर्वकतेने नेमले व प्रशिक्षण दिले गेले.

इतिहासकार वील ड्युरन्ट म्हणतात, “धर्मांतर केलेल्या त्यांच्या लोकांना प्रशिक्षण व बहुगुणित करण्यासाठी त्यांनी राजांचे पुस्तक सोडून संपूर्ण पवित्र शास्त्राचे ग्रीक भाषेतून गॉथिक भाषेत अगदी सबुरीने भाषांतर केले.” (विश्‍वासाचे युग, इंग्रजी) आज, नहेम्याच्या पुस्तकाच्या तुकड्यांशिवाय, इतर गॉथिक पवित्र शास्त्राची अस्तित्वात असलेली हस्तलिखिते, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचेच केवळ काही भाग आहेत.

गॉथिक ही लिखित भाषा नव्हती. यास्तव उलफ्लॉस यांनी भाषांतराच्या आव्हानाचा सामना केला, कारण त्यांना अपवादात्मक चातुर्य दाखवावे लागले. प्राचीन धर्मोपदेशक इतिहासकार त्यांना, २७ संकेतचिन्ह असलेली गॉथिक मुळाक्षरे, जी मुख्यता ग्रीक आणि लॅटिन मुळाक्षरांवर आधारित आहेत, त्यांचा शोध लावल्याबद्दल सन्मान देतात. शिवाय, द न्यू एन्साक्लोपिडिया ब्रिटॅनिका असे निरीक्षण करतो की, “त्यांनी जर्मनांची ख्रिस्ती परिभाषा तयार केली, त्यातील काही आजही वापरण्यात येत आहे.”

गॉथिक पवित्र शास्त्राचा सुरवातीचा इतिहास

उलफ्लॉस यांनी त्यांचे भाषांतर, सा. यु. ३८१ आधी संपविले, व दोन वा तीन वर्षांनंतर मरण पावले. त्यांच्या कार्याच्या लोकप्रियतेची साक्ष, द एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना देत म्हणतो की, “हे भाषांतर सामान्यतः स्पेन आणि इटली येथे देशांतर झालेले गॉथ लोक वापरत होते.” निश्‍चितच, उरलेल्या तुकड्यांच्या संख्येचा अंदाज लावून पाहिले तर असे दिसते की, या गॉथिक पवित्र शास्त्राच्या पुष्कळ प्रती बनवण्यात आल्या होत्या. कदाचित, गॉथ लोकांनी त्यांचे साम्राज्य जेथे स्थापन केले होते त्या क्षेत्रात म्हणजे, रवेन्‍ना आणि वेरोन्‍नाच्या ग्रंथलेखन शाळेत अनेक हस्तलिखिते बनविण्यात आली होती. ही ग्रंथलेखनाची शाळा, हस्तलिखिते जेथे लिहिल्या जातात व त्यांची नक्कल केली जाते त्या मठातील खोल्या होत्या.

बायझनटाईन सम्राट जस्टिनियन पहिले यांनी इटलीला पुन्हा जिंकले तेव्हा, ही गॉथ जमात एक राष्ट्र या नात्याने, सा. यु. ५५५ च्या सुमारास समाप्तीस आली. ती नाहीशी झाल्यावर टोन्स क्लेबर्ग म्हणतात की, “इटलीतील गॉथिक भाषा आणि गॉथिक रूढी, एक विरळ खूण मागे सोडून दिसेनाशी झाली. गॉथिक भाषेतील हस्तलिखितांची आवड राहिली नाही. . . . त्यांना विस्तृत प्रमाणावर बाजूला नेण्यात आले, व त्यावरचे लिखाण काढून टाकण्यासाठी त्यांना खोडून टाकण्यात आले. मग ही महाग चर्मपत्रे नव्या साहित्याला लिहिण्यासाठी वापरण्यात आली.”

टिकून राहिलेली हस्तलिखिते

या काही हस्तलिखितांवरचे लिखाण पूर्णपणे खोडून टाकले नव्हते. त्यावरचे मूळ लिखाण पुसटपणे दिसत होते. अशा प्रकारची अनेक चर्मपत्रे सापडली व त्यांचा सांकेतिक अर्थ लावण्यात आला आहे. असामान्यपणे, मत्तय, योहान, लूक, मार्क आणि असे क्रमानुसार चार शुभवर्तमान असलेले प्रचलित कोडेक्स ऑरजेन्टेओस, सहिसलामत टिकून राहिले.

या भव्य कोडेक्सचा उगम, सा. यु. च्या सहाव्या शतकाच्या सुरवातीला रवेन्‍नाच्या ग्रंथलेखनशाळेत झाला आहे असा विचार केला जातो. त्याला कोडेक्स ऑरजेन्टेओस असे म्हणण्यात येते, ज्याचा अर्थ “रूपेरी पुस्तक” असा होतो, कारण ते रूपेरी शाहिने लिहिलेले आहे. त्या पुस्तकाचे पृष्ठ, जांभळा रंग दिलेले चर्मपत्र आहेत, ज्यावरून असे सूचित होते की कदाचित एका बादशाही व्यक्‍तीसाठी ती नेमून दिली होती. प्रत्येक शुभवर्तमानाच्या पहिल्या तीन ओळी तसेच विविध विभागांची सुरवात, सोनेरी अक्षरांनी केल्यामुळे त्याचे सौंदर्य वाढले आहे. शुभवर्तमानाच्या लेखकांची नावेसुद्धा, हस्तलिखिताच्या प्रत्येक समासाखाली वरील चार समांतर “वक्रमार्गात” सोनेरी अक्षरात आहेत. ते, शुभवर्तमानातील समांतर उताऱ्‍यांसाठी संदर्भ पुरविते.

गॉथिक पवित्र शास्त्र वचनाला पूर्ववत करणे

गॉथिक राष्ट्राच्या शेवटानंतर, मौल्यवान कोडेक्स ऑरजेन्टेओस नाहीसे झाले. १६ व्या शतकाच्या मध्यात, कोलोन, जर्मनी जवळील वर्डनच्या मठात ते उजेडात येइपर्यंत कोठेच पाहावयास मिळाले नव्हते.

प्रभूच्या प्रार्थनेचे गॉथिक भाषांतर १५६९ या वर्षी, प्रकाशित करण्यात आले, व ज्या पवित्र शास्त्रातून ते घेण्यात आले होते त्याकडे लक्ष आकर्षित केले गेले. कोडेक्स ऑरजेन्टेओस हे नाव प्रथमच १५९७ मध्ये छापील रूपात दिसून आले. वर्डनपासून नंतर हे हस्तलिखित, प्रेग येथील सम्राटाच्या कलासंग्रहात आले. परंतु, १६४८ मध्ये, तीस वर्षांच्या संग्रामाच्या शेवटी, विजयी स्वीडनच्या रहिवाश्‍यांनी इतर खजिन्यासोबत हे हस्तलिखित नेले; १६६९ पासून हे कोडेक्स कायमसाठी स्वीडन येथील उपसॉल युनिव्हर्सिटी लायब्ररी, येथे एकाच ठिकाणी आहे.

सुरवातीला कोडेक्स ऑरजेन्टेओसची ३३६ पृष्ठांची रचना होती, आणि त्यातील १८७ पाने आता सध्या उपसॉल येथे आहेत. आणखी एक पान—मार्कच्या शुभवर्तमानाचे शेवटले पान—१९७० मध्ये, जर्मन येथील स्पेअर शहरात आढळून आले.

कोडेक्स पुन्हा दिसून आले त्या क्षणापासून, लुप्तप्रय झालेल्या गॉथिक भाषेच्या अर्थाची गुंतागुंत सोडवण्यासाठी विद्वान त्या हस्तलिखिताचा अभ्यास करू लागले. जर्मन विद्वान विलहेल्म स्ट्राईटबर्ग यांनी १९०८ मध्ये, उपलब्ध असलेले सर्व हस्तलिखित आणि वचनांना पूर्ववत करण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नांना एकत्र संगृहीत करून, समोरासमोरील पानांवर, प्रत्येकी ग्रीक आणि गॉथिक भाषेत वचने लिहून “डी गॉटिस्के बिबल” (द गॉथिक बायबल) प्रकाशित केले.

आज, हे गॉथिक पवित्र शास्त्र विशेषतः विद्वानांच्या आस्थेचे आहे. परंतु, पवित्र शास्त्र भाषांतराच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्याला बनवण्याची आणि कवटाळून ठेवण्याची वस्तुस्थिती या गोष्टीची साक्ष देते की, एके काळी आधुनिक असलेल्या भाषेत देवाच्या वचनाचे भाषांतर करण्याची उलफ्लॉस यांची इच्छा होती व तो त्यांचा दृढनिश्‍चिय होता. त्यांनी अगदी अचूकतेने हे ओळखले की, केवळ याच मार्गाने गॉथिक लोक ख्रिस्ती सत्य समजून घेण्याची आशा करतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा