वाचकांचे प्रश्न
शौलाच्या सैनिकांनी रक्तासकट मांस खाल्यावरही त्यांना ठार का मारले गेले नाही कारण देवाच्या नियमाशास्त्रानुसार त्यासाठी तर तीच शिक्षा होती?
रक्ताविषयीच्या देवाच्या नियमाचा या लोकांनी भंग केला हे निश्चित, परंतु, रक्ताविषयी त्यांना आदर होता व हा आदर प्रकट करून दाखवण्यात त्यांनी अधिक तत्पर असावयास हवे होते तरीही त्यांना दया दाखवली असेल.
त्या घटनेचा जरा विचार करा. इस्त्राएल लोक राजा शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या नेतृत्वाखाली पलिष्टी लोकांच्या विरूद्ध लढाई करत होते. एकदा युद्धाच्या वेळी “इस्त्राएल लोक अति क्लेश पावले” तेव्हा, शौलाने अविचारीपणाने एक शपथ घेतली की, जोपर्यंत शत्रुंचा नाश होत नाही तो पर्यंत कोणीही अन्नाला स्पर्श करायचा नाही. (१ शमुवेल १४:२४) लवकरच त्याच्या ह्या शपथेने एक समस्या उभी केली.
त्याचे लोक कठीण युद्धात जय मिळवत होते परंतु, याचा त्यांच्या ह्या परिश्रमी प्रयत्नावर अपायकारक परिणाम होत होता. ते भुकेने व्याकुळ झाले व दमले होते. त्या बिकट परिस्थितीत त्यांनी काय केले? “ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.”—१ शमुवेल १४:३२.
ती कृती देवाने रक्ताविषयी दिलेल्या नियमाचा भंग करणारी होती, यामुळेच शौलाच्या काही लोकांनी त्याला येऊन सांगितले, “लोक रक्तासहीत मांस खाऊन यहोवाचा अपराध करीत आहेत.” (१ शमुवेल १४:३३, NW) होय, नियमशास्त्रात असे म्हटले होते की प्राण्यांचा वध केल्यावर, मांस खाण्याआधी त्याचे रक्त जमिनीवर ओतून द्यायचे होते. रक्त ओतण्याविषयीची आज्ञा देताना देवाने अत्याग्रही पद्धत अनुसरण्याची मागणी केली नव्हती. रक्त ओतण्याविषयीची तर्कशुद्ध पावले उचलल्यावर, त्याचे सेवक रक्ताच्या महत्त्वाला योग्य आदर दाखवू शकत होते. (अनुवाद १२:१५, १६, २१-२५) प्राण्याचे रक्त वेदीवर बलिदानाद्वारे वापरण्यात येऊ शकत होते, परंतु त्याचे सेवन करावयाचे नव्हते. ह्या नियमाचा जाणूनबुजून आज्ञाभंग करणाऱ्याला मृत्यूदंड होता, कारण देवाच्या लोकांना सांगितले होते: “कोणीही कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. शरीराचे जीवन तर रक्तात असते.”—लेवीय १७:१०-१४.
शौल राजाचे सैनिक मुद्दामहून नियमाचा भंग करीत होते का? रक्ताविषयीच्या ईश्वरी नियमाला ते पूर्णपणे अनादर दाखवत होते का?—पडताळा गणना १५:३०.
असा निष्कर्ष काढण्याची आपल्याला गरज नाही. वृत्तांत सांगतो की ते ‘प्राण्यांना जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.’ म्हणजेच रक्ताला ओतण्याचा त्यांनी थोडाफार तरी प्रयत्न केला असावा. (अनुवाद १५:२३) परंतु, त्यांच्या ह्या दमलेल्या आणि व्याकुळ स्थितीत त्यांनी ज्या प्राण्यांना कापले त्यांची शवे त्यांना सामान्यपणे रक्त जाऊ देण्यासाठी जशी लटकवली जातात त्याप्रमाणे लटकवली नाहीत. त्यांनी मेंढरे आणि गुरांना ‘जमिनीवर’ कापले ज्यामुळे रक्ताच्या ओतण्याला अडथळा झाला असेल. शिवाय, कदाचित रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शवाचे मांस त्यांनी लगेच कापून खाल्ले. यास्तव, देवाचा नियम मानणे हे त्यांच्या मनात असले तरी, त्यांनी तो योग्य मार्गाने किंवा पुरेशा प्रमाणात पाळला नाही.
याचा परिणाम असा झाला की, लोक “रक्तासहित मांस” खाऊ लागले जे पाप होते. शौलाने हे ओळखले आणि एक मोठा दगड त्याच्याजवळ आणण्याची त्याने आज्ञा केली. त्याने त्याच्या सैनिकांना असे फर्माविले: “आपआपले बैल व मेंढरे माझ्याकडे घेऊन या आणि येथेच कापून खा. रक्तासहित मांस खाऊन यहोवाचा अपराध करू नका.” (१ शमुवेल १४:३३, ३४, NW) त्या दोषी सैनिकांनी ही आज्ञा मानली, आणि “शौलाने परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.”—१ शमुवेल १४:३५.
दगडावर प्राण्यांना कापल्यामुळे कदाचित रक्ताचे पुरेसे ओतणे झाले. कापलेल्या ठिकाणापासून जरा दूरवर प्राण्यांचे मांस खाता येऊ शकले असते. ज्यांनी पाप केले त्यांच्यासाठी देवाची दया प्राप्त करण्यासाठी शौलाने कदाचित सांडलेल्या काही रक्ताचा वापर वेदीवर केला असेल. यहोवाने दया दाखवली हे स्पष्ट दिसते कारण, सैनिक थकलेले व भुकेलेले असले तरी त्यांनी जे काही प्रयत्न केले होते ते सर्व त्याला माहीत होते. शौलाच्या ह्या अविचारी शपथेने लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, याचा देखील देवाने विचार केला असेल.
हा वृत्तांत हेच दाखवतो की, कोणतीही निकडीची परिस्थिती ईश्वरी नियमाला अनादर दाखवण्यासाठी सबब असू शकत नाही. शपथ घेण्याआधी काळजीपूर्वकतेने विचार करण्यास हा वृत्तांत आम्हाला मदत करू शकतो, कारण अविचारीपणे घेतलेली शपथ आमच्या वैयक्तिकासाठी आणि इतरांसाठी त्रासदायक असू शकते.—उपदेशक ५:४-६.