वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ३/१ पृ. १६-२०
  • रक्‍ताविषयीचा इश्‍वरी आदर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रक्‍ताविषयीचा इश्‍वरी आदर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ताचे रक्‍त
  • रक्‍त—एक नैतिक वाद
  • ख्रिस्ती मंडळीत
  • “सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी”
  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • रक्‍त–जीवनासाठी अत्यावश्‍यक
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ३/१ पृ. १६-२०

रक्‍ताविषयीचा इश्‍वरी आदर

“आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे.”—प्रे. कृत्ये २०:२६.

१. प्रे. कृत्ये २०:२६ मधील पौलाचे शब्द रक्‍ताविषयी यहोवाचा कोणता दृष्टीकोण व्यक्‍त करतात?

प्रेषित पौलाचे वर नमूद असलेले शब्द, त्याचा ख्रिस्ती या नात्याने रक्‍त या जीवनी द्रवाविषयीचा आदरयुक्‍त दृष्टीकोण व्यक्‍त करतात. आमच्या चर्चेत पौलाच्या या विधानाचा काय अर्थ होत होता ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण त्या आधी प्रथम, पशुव मानवाचा निर्माता रक्‍ताविषयी काय म्हणतो त्याचा आपण विचार करू या. रक्‍त हे जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे आहे या अर्थी यहोवा देव ते पवित्र मानतो हे आपण आधीच पाहिले आहे. जे अविचाराने व निरर्थकपणे रक्‍त, खासपणे मानवी रक्‍त सांडतात असे लोक देवासमोर रक्‍तदोषी ठरतात. पण मग, रक्‍ताचा मानवजातीस लाभदायक ठरेल या मार्गाने वापर करण्याचे काही मार्ग नाहीत का?

२. (अ) रक्‍ताचे सेवन करणे हा इस्त्राएलांमध्ये मरणदंडाचा गुन्हा का होता? (ब) त्या कायद्याच्या पालनाद्वारे इस्त्राएलांचा कसा फायदा होत होता?

२ देवाने इस्त्राएलांना रक्‍ताविषयी दिलेला कायदा स्पष्टरित्या म्हणतो: “(तू) कोणत्याहि प्राण्याचे रक्‍त सेवन करू नये. कारण सर्व प्राण्यांचा जीव [जीवन, किंग जेम्स व्हर्शन, अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन] हाच त्यांचे रक्‍त होय. ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा.” आरोग्यदायकता प्राप्त व्हावी या कारणास्तव रक्‍ताचे सेवन करणे हा इस्त्राएलांकरता तसेच उपऱ्‍यांसाठी मरणदंड प्राप्त होणारा गुन्हा होता. मांस खाण्याआधी त्यांनी त्यातील रक्‍त जमिनीवर ओतून देऊन त्यावर माती झाकायची होती; असे करणे ते, जीवन देवास सुपुर्द करीत आहोत असे सुचवित होते. (लेवीय १७:१३, १४) तो इश्‍वरी कायदा होता. त्याच्या पालनाने इस्त्राएल जीवनाचा उगम यहोवा याच्याबरोबर सुदृढ असे आध्यात्मिक नातेसंबंध राखू शकणार होते. याबरोबरच, स्वतःच्या शारिरीक आरोग्याचे रक्षण हा आणखी एक लाभ त्यांना यासोबत अनुभवण्यास मिळत होता.

ख्रिस्ताचे रक्‍त

३. (अ) येशूचे रक्‍त उल्लेखनीयपणे “मोलवान” का आहे? (ब) येशूच्या यज्ञार्पणाकडे इब्री शास्त्रवचने कसा निर्देश करतात?

३ तथापि, यहोवाच्या मनात रक्‍ताविषयीचा एक अप्रतिम वापर होता. हा वापर, ख्रिस्त येशूच्या “मोलवान रक्‍ता”द्वारे मानवजातीची पाप व मरण यापासून सुटका घडवून आणणे हा होता. “जगाच्या स्थापनेच्या” (म्हणजे, आदाम व हव्वेकरवीच्या मुक्‍तता प्राप्त हक्काच्या संतानाचा जन्म होण्याच्या) आधी मानवजातीची सुटका कशी संभवनीय आहे याचे पूर्वज्ञान यहोवाला होते. (१ पेत्र १:१८–२०; रोमकर ६:२२, २३) ते “त्याचा पुत्र येशू ह्‌याचे रक्‍त (आहे जे) आपल्याला सर्व पापापासून शुध्द करते.” (१ याहोन १:७) रक्‍ताचा असा हा वापर इतका महत्वपूर्ण होता की याविषयी देवाने इब्री शास्त्रवचनात पुष्कळसे नमुने व पडछाया दिल्या ज्या येशूच्या परिपूर्ण यज्ञार्पणाकडे निर्देश करीत होत्या.—इब्रीयांस ८:१, ४, ५; रोमकर १५:४.

४. उत्पत्तीच्या २२ व्या अध्यायात जे नाट्य लिखित आहे त्यामध्ये कोणता पूर्वदृष्टांत देण्यात आला?

४ इस्त्राएलांना नियमशास्त्र देण्याच्या काही शतकाआधी, यहोवाने अब्राहामाला त्याचा पुत्र इसहाक याचे मोरिया डोंगरावर अर्पण केले जावे अशी आज्ञा केली. याद्वारे देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू याचे तो कसे यज्ञार्पण करणार होता ते चित्रित केले. त्या नाट्यमय घटनेत इसहाकाने स्वेच्छेने व्यक्‍त केलेली आज्ञाधारकता, येशूने अर्पणात आपले जीवनी रक्‍त ओतून त्याच्या पित्याच्या इच्छेस कशी आज्ञाधारकता दाखविली त्याचे चित्र देते.—उत्पत्ती २२:१–३, ९–१४; इब्रीयांस ११:१७–१९; फिलिप्पैकर २:८.

५. मोशेच्या नियमशास्त्रातील यज्ञार्पणे कसा खोल आध्यात्मिक अर्थ राखून होती?

५ मोशेच्या नियमशास्त्राने सुध्दा “ज्या पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची . . . छाया” दाखवून, मानवजातीखातर असलेल्या येशूच्या यज्ञार्पणाकडे निर्देश केला. नियमशास्त्राने रक्‍ताचा केवळ एकमेव वापर–यहोवास प्राण्यांचे यज्ञापर्ण करणे–यास मुभा दिली होती. ही यज्ञार्पणे निव्वळ वहिवाटी वा विधि नव्हत्या. त्यामध्ये खोल आध्यात्मिक अर्थ होता. सर्व बारीक तपशीलासह ते येशूच्या यज्ञापर्णाकडे व त्याकरवी सिध्द होऊ शकणाऱ्‍या सिध्दतांकडे अंगुली दाखवीत होते.—इब्रीयांस १०:१; कलस्सैकर २:१६, १७.

६. प्रायश्‍चिताच्या दिवशी वाहिली जाणारी अर्पणे कोणत्या दोन गटाच्या मुक्‍ततेची पडछाया दाखवीत होती? व कशाप्रकारे?

६ उदाहरणार्थ, अहरोन प्रायश्‍चिताच्या दिवशी जी यज्ञार्पणे वाही ती, थोर असा महायाजक येशू, त्याच्या स्वतःच्या मोलवान रक्‍ताची किंमत प्रथमत: त्याच्या याजक “घराण्या”च्या १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिस्ती सदस्यांच्या तारणाकरता कशी वापरील याचे प्रतीक दाखवीत होती. याकरवी त्या अभिषिक्‍तांना नीतीमत्व प्राप्त होऊन ते येशूसोबत स्वर्गात राजे व याजक याअर्थी आपले वतन मिळवितात. यानंतर “लोकांसाठी” जी अर्पणे वाहिली जात ती, मानवजातीतील ज्या लोकांना या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे वतन मिळेल त्यांची येशू जी मुक्‍तता करील त्याचे चित्र दाखवीत होती. आता सुध्दा यापैकीचा “एक मोठा लोकसमुदाय” येत असलेल्या मोठ्या संकटातून बचाव मिळवावा याकरता नीतीमान म्हणून गणला जात आहे. याचे कारण असे की, “ह्‌यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत”, आणि देवास पवित्र सेवा सादर करण्याद्वारे ते आपला विश्‍वास प्रदर्शित करीत आहेत.—लेवीय १६:६, १५, १८–२२; इब्रीयांस ९:११, १२; प्रकटीकरण १४:१, ४; ७:४, ९, १४, १५.

७. त्या प्राचीन नमुन्याच्या पूर्णतेविषयी आम्हाला आनंद का वाटावा?

७ ‘रक्‍तात जीवन असते.’ येशूचे रक्‍त परिपूर्ण होते त्यामुळेच त्याचे यज्ञार्पण विश्‍वास राखणाऱ्‍या सर्वांसाठी परिपूर्ण जीवन बहाल करू शकते. तर मग ते प्राचीन नमुने येशूच्या प्रेमळ यज्ञार्पणात पूर्ण होऊ शकले याचा आम्हाला केवढा आनंद वाटावा बरे!—लेवीय १७:१४; प्रे. कृत्ये २०:२८.

रक्‍त—एक नैतिक वाद

८, ९. (अ) रक्‍ताच्या काही अद्‌भूत हालचाली कोणत्या आहेत? (ब) दावीदाप्रमाणे आम्हीही, आमची घडण ज्या पध्दतीने झाली आहे त्याविषयीचा इश्‍वरी आदर कसा व्यक्‍त करू शकतो?

८ रक्‍ताच्या रचनेत मति गुंग करणारे आश्‍चर्यकारक सुज्ञान आढळते. उत्क्रांतीवाद्यांना अद्यापही जीवनाचा मुळारंभ सापडू शकला नाही. ते हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आमचे जीवनी रक्‍त हे कसेतरी उत्क्रांत झालेले आहे. हे किती अविश्‍वसनीय वाटते!

९ आमचे आश्‍चर्यावह रक्‍त खरेच अद्‌र्भित कार्य करते. ते शरीराच्या सर्व भागाला जीवनप्रदायक प्राणवायु तसेच पौष्टीकता पोहचविते. ते घाण काढते. रोगाशी लढत देण्यासाठी ते पांढऱ्‍या पेशी वाहून नेते तसेच छोट्या आणि मोठ्या दुखापतींच्या इलाजासाठी पोषक द्रव्ये वाहून नेते. आपल्या शरीराचे तपमान संयमित ठेवण्यास ते मदत देते. आमच्या प्रत्येकाचे रक्‍त भिन्‍न स्वरुप राखून आहे. इंग्लंडमधील वंशशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ गुन्हेगाराची ओळख व्हावी याकरता रक्‍ताच्या नमुन्यांपासून निर्मिण्यात आलेल्या “डी. एन. ए. ठशांचा” वापर करण्याची बोलणी करीत आहेत. शरीरातील विविध भागामध्ये रक्‍त हे असे अंग आहे ज्याच्याबद्दल दावीद राजाने हे आश्‍चर्यावह उद्‌गार काढले: “हे यहोवा, तू मला पारखिले आहे. तू मला ओळखितोस. भयप्रद व अद्‌भूत रितीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो”!—स्तोत्रसंहिता १३९:१, १४.

१०. (अ) रक्‍ताचा वापर कसा केला जाण्यास हवा ते कोणी ठरविले पाहिजे? (ब) देवाने नोहा व इस्त्राएल यांना कोणता स्पष्ट निर्देश दिला होता? (क) तातडीची गरज उद्‌भवली तरी रक्‍त हे पवित्र मानण्यास हवे हे कोणत्या उदाहरणावरुन दिसते?

१० तर मग, मानवजातीचा धार्मिक सृजनहार, आमच्या रक्‍ताचा रचनाकार यानेच आमच्या जीवनाचा प्रवाह कोणत्या योग्य दिशेने वापरण्यास हवा ते निश्‍चित करायला नको का? (इयोब ३६:३) हे त्याने केले आहे यात त्याने कोणतीही शंका मागे सोडली नाही. आमचा पूर्वज नोहा याला त्याने सांगितले: “रक्‍तासकट मांस खाऊ नका.” (उत्पत्ती ९:४) त्याच्या या नियमाची इस्त्राएलांना पुनरावृत्ती करताना त्याने स्पष्टपणे म्हटले: “रक्‍त मात्र मुळीच सेवन करू नये हे लक्षात ठेव. कारण रक्‍त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये. ते सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे.” (अनुवाद १२:२३, २४) दावीदाच्या तीन शिपायांनी बेथलहेमात आपले जीवन धोक्यात घालून एका विहिरीतून त्याला पिण्यासाठी पाणी आणून दिले होते त्यावेळी दावीदाला देवाची आज्ञा चांगलीच लक्षात होती असे दिसते. त्याने ते पाणी त्यांच्या जीवनी रक्‍ताचे प्रतिनिधित्व करीत होते या अर्थी “यहोवाच्या नामाने ओतिले.” (२ शमुवेल २३:१५–१७) कोणत्याहि प्रकारची तातडीची गरज उद्‌भवली तरी रक्‍ताच्या पावित्र्याविषयी दुर्लक्ष होता कामा नये.—पहा १ शमुवेल १४:३१–३४.

ख्रिस्ती मंडळीत

११, १२. (अ) पहिल्या शतकात तात्विक विषयासंबंधाने आत्म्याने मार्गदर्शित अशा कोणत्या गटाने निर्णय घेतला? (ब) रक्‍त घेणे ही गोष्ट या गटाने कोणत्या धर्मपातळीवर ठेवली? (क) रक्‍त संक्रमित करणे हे रक्‍ताचे मुखावाटे प्राशन करण्यासमान का आहे?

११ तुम्ही पहिल्या शतकातील यरुशलेमामधील एका प्रशस्त खोलीचे चित्र आपणासमोर उभे करू शकता का? येथे येशूचे प्रेषित आणि ख्रिस्ती मंडळीतील इतर वडील जमले आहेत. त्यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेचा विषय कोणता आहे? पौल व बर्णबा हे अंत्युखिया येथून आले होते व त्यांनी त्या शहरात सुंतेसंबंधाचा जो प्रश्‍न निर्माण झाला होता तो आता सर्वांपुढे मांडला होता. त्या सल्लागार मंडळाने हा निर्णय दिला की ख्रिश्‍चनांना दैहिक सुंता करून घेण्याची गरज नाही.—प्रे. कृत्ये १५:१, २, ६, १३, १४, १९, २०.

१२ हा निर्णय विदित करताना अध्यक्ष असणाऱ्‍या याकोब या वडीलाने ख्रिश्‍चनांवर अद्याप बंधनकारक असणाऱ्‍या गरजांचे स्पष्टीकरण केले. त्याने म्हटले: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी [ज्यामुळे रक्‍त थिजले जाते] व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्‌यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.” (प्रे. कृत्ये १५:२८, २९) अशाप्रकारे, मूर्तिपूजा, रक्‍त घेणे व जारकर्म या गोष्टी एकाच धर्म पातळीवर ठेवण्यात आल्या. आपली आध्यात्मिक स्थिती उत्तम राखण्यासाठी आणि देवाने दिलेल्या अभिवचनांच्या पूर्णतेत सहभागी होण्यासाठी ख्रिश्‍चनांनी या सर्व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. रक्‍तासंबंधाने पाहू जाता ते तोंडावाटे घेतले काय किंवा नसातून संक्रमित केले काय त्यात फरक पडत नाही. शरीराचे पोषण व वाढ व्हावी हा त्यात उद्देश असतो. याकोबाने स्पष्टपणे सूचित केले की रक्‍तापासून दूर राहण्याचे टाळणे हे देवाच्या नियमांचा भंग करणे आहे.

१३. (अ) रक्‍तापासून दूर राहण्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना कोणते अधिक संरक्षण मिळाले? (ब) देवाच्या इतर नियमांनीही त्याच्या लोकांचे कसे संरक्षण केले?

१३ रक्‍तामुळे एड्‌स्‌, हेपाटीटीस व इतर रोगात होत असलेली वाढ सुचविते की देवाच्या नियमांचे पालन करण्यावर उत्तम शारिरीक आरोग्य लाभू शकते. पवित्र शास्त्र काळी देवाने इस्त्राएलांना आहार, संसर्ग, आरोग्य, स्वच्छता याविषयी विशिष्ट नियम दिले होते. ते त्यांच्या अरण्यवासातील प्रयाणात अगदीच सुयुक्‍त होते. (लेवीय ११:२–८; १३:२–५; अनुवाद २३:१०–१३) या नियमांचे पालन केल्यामुळे इस्त्राएलांना आपल्या देवाबरोबर जिव्हाळ्‌याचे आध्यात्मिक नातेसंबंध राखता तर आलेच पण सोबत त्यांच्या शेजारील राष्ट्रांना ज्या व्याधींनी ग्रस्त केले होते त्यापासून त्यांचे रक्षण केले गेले. आता अलिकडेच गेल्या शतकातील वैद्यकीय गोटातील लोकांना यापैकीच्या काही नियमांमागील व्यावहारिक सूज्ञानाची जाणीव झाली आहे. याशिवाय आता कोठे पुष्कळांना देवाने रक्‍ताविषयी दिलेला नियम केवढा सार्थ आहे हे समजू लागले आहे.

१४. इस्त्राएलांनी नियम पाळले तेव्हा त्यांना कोणते आरोग्य व आशीर्वाद उपलब्ध झाले?

१४ इस्त्राएलांनी देवाची आज्ञा मानली तेव्हा देवाने त्यांच्याबाबतीत या अभिवचनाची पूर्णता केली: “तू आपला देव यहोवा ह्‌याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधि पाळशील तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही. कारण मी तुला रोगमुक्‍त करणारा यहोवा आहे.” आज्ञाधारकपणामुळे अधिक ते हे की इस्त्राएलांना भावी राज्य आशीर्वादाच्या मार्गावर ठेवण्यात आले.—निर्गम १५:२६; १९:५, ६.

१५. देवाच्या नियमांचे पालन करण्यात कसा आशीर्वाद मिळतो हे अलिकडच्याच कोणत्या उदाहरणाद्वारे चित्रित केले गेले?

१५ आधुनिक औषधोपचारामुळे प्राप्त होणाऱ्‍या फायद्यांविषयी यहोवाच्या साक्षीदारांना मोठे मोल वाटते. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी एका दहशतवाद्याच्या बॉम्बमुळे ऑस्ट्रेलियातील सिडने येथील राज्य सभागृहात स्फोट होऊन जे नुकसान झाले तेव्हा जखमी झालेल्या ५० साक्षीदारांना जवळच्या इस्पितळात नेले गेले. या इस्पितळात डॉक्टरांपाशी रक्‍ताचा अर्क नसणाऱ्‍या औषधांचा संक्रमणाकरता साठा उपलब्ध होता हे बघून खरोखर आनंद वाटला. सर्व जखमी पूर्णपणे बरे झाले. त्यांना जे संक्रमण देण्यात आले ते यहोवाच्या नियमांच्या अनुषंगाने होते म्हणून खरीच धन्यता वाटत होती. यातून आणखी एक लाभ त्यांना मिळू शकला तो हा की रक्‍त संक्रमित करण्यामुळे जे रोग उद्‌भवण्याची बाधा होते ती यांना होऊ शकली नाही.

“सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी”

१६. प्रेषित पौलाप्रमाणे आम्हीही पवित्र सेवेविषयी कोणती मनोवृत्ति दाखवावी?

१६ परंतु, आता आपण परत पहिल्या शतकाकडे वळू या. याकोबाने मूर्तिपूजा, रक्‍त व व्यभिचार याविषयी विदित केलेला मनाई कायदा पौल व बर्णबा यांनी ऐकून सात वर्षे निघून गेली होती. या काळापावेतो पौलाने आशिया मायनर व पूर्व युरोप येथे दोन सुवार्तिक यात्रा संपविल्या होत्या. आता परतीच्या प्रवासात मिलेत येथून जाताना त्याला, त्याला भेटावयास आलेल्या इफिस येथील वडीलांबरोबर बोलण्याची संधि मिळाली. त्याने बोलताना त्यांना याचे स्मरण दिले की, त्याने “फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि . . . संकटे सोशीत प्रभुची सेवा कशी केली.” आज आपणही, यहोवाच्या सेवेत आमचे सर्व काही देऊन स्वार्थत्यागी स्वरुपाचा आत्मा प्रदर्शित करतो का? आम्ही तो केलाच पाहिजे.—प्रे. कृत्ये २०:१७–१९.

१७. पौलाप्रमाणे आम्ही आमची सेवा कशी सादर करावी?

१७ पौलाने ती सेवा कशी केली? त्याला लोक जेथे आढळले तेथे, पण खासपणे त्यांच्या घरोघर जाऊन त्यांची धार्मिक पार्श्‍वभूमि कोणतीही असली तरी ती सेवा सादर केली. त्या वडीलांना बोध करण्यात त्याने कसूर केली नाही, त्यामुळेच त्याने “चार लोकात व घरोघरी” शिक्षण दिले त्यावेळी हेही त्याच्यासोबत राहिले हे उघड आहे. पौलाच्या आवेशी उपाध्यपणापासून केवळ यांनाच लाभ मिळाला असे नाही कारण प्रत्यक्षात त्याने “पश्‍चाताप करुन देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‌यासंबंधाने यहुदी व हेल्लेणी” यांना कसून साक्ष दिली होती. “कसून” या शब्दाकडे जरा लक्ष द्या. आज आपणही सर्व प्रकारच्या, सर्व वंशाच्या लोकांना साक्ष मिळत आहे याकडे जातीने लक्ष देऊन आहोत का?—प्रे. कृत्ये २०:२०, २१; प्रकटीकरण १४:६, ७.

१८. (अ) पौलाप्रमाणे आम्ही आमचा जीव देवाच्या सेवेत कसा लावावा? (ब) वाढत्या त्रासातही आम्ही पौलाप्रमाणेच कसे पुढे जात राहावे?

१८ “कसून” हा शब्द पौलाच्या पुढच्याहि विधानात दिसून येतो: “मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुध्दा करीत नाही, ह्‌यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता कसूनपणे सांगण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रे. कृत्ये २०:२४) अशाप्रकारे त्याने आपले उपाध्यपण पूर्ण केले नाही तर त्याचा जीव वा प्राणांची किंमत ती नसणार. आम्हाला आमच्या उपाध्यपणासंबंधाने असेच वाटते का? शेवटले दिवस आता संपण्याच्या बेतात असता, तसेच त्रास, छळ, आजार वा वार्धक्य ही आता आम्हाला प्राप्त होत आहे तरी देखील आम्ही “लायक” घराण्यांचा कसून शोध घेण्यात पौलासारखाच आत्मा प्रदर्शित करीत आहोत का?—मत्तय १०:१२, १३; २ तिमथ्यी २:३, ४; ४:५, ७.

१९. “मी सर्वांच्या रक्‍तासंबंधाने निर्दोषी आहे” असे पौल का म्हणू शकला?

१९ पौल त्या इफिसच्या वडीलांना परत पाहण्याचे अपेक्षित नव्हता. तथापि, पूर्ण आत्मविश्‍वासाने तो त्यांना म्हणू शकला: “आजच्या दिवशी मी तुम्हाला खातरीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे.” ते कसे काय? पौलाने तर कोणा लढाईत रक्‍त सांडले नव्हते. त्याने रक्‍ताचे सेवनही केले नव्हते. उलटपक्षी, रक्‍ताद्वारे प्रतिनिधित्व केल्या जाणाऱ्‍या लोकांच्या जीवनाबद्दल तो खूप आस्थेवाईक होता. कसून साक्ष देण्यात अपयशी ठरला या कारणास्तव देवाच्या न्यायदंडाच्या दिवशी लोकांचे जीवन नष्ट होत आहे हे पाहण्याची त्याची इच्छा नव्हती. त्या वडीलांना व इतरांना “देवाचा संपूर्ण मनोदय” सांगण्यात त्याने माघार घेतली नव्हती.—प्रे. कृत्ये २०:२६, २७.

२०. (अ) यहोवाने यहेज्केलास जी वारंवार ताकीद दिली होती ती पाहू जाता आज आम्ही आमची कोणती जबाबदारी न्याहाळली पाहिजे? (ब) आमचे व आमचे ऐकणाऱ्‍यांचे काय होईल?

२० “मोठे संकट” समीप येत असता देवाचा संपूर्ण मनोदय सर्वांना सांगण्याची गरज अधिकाधिक गंभीर रुप घेत आहे. ही परिस्थिती, मागे २,६०० वर्षांआधी यरुशलेमाचा नाश जवळ येत होता त्यासारखी सदृश्‍य आहे. यहोवाचे वचन यहेज्केल संदेष्ट्यापाशी आले व म्हणाले: “मानवपुत्रा, मी तुला इस्त्राएल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांस बजावून सांग. ‘तू खात्रीने मरशील,’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजाविले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्‍ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.” (यहेज्केल ३:१७–२१; ३३:७–९) यहोवाचे अभिषिक्‍त सेवक व त्यांचे साथीदार “मोठा लोकसमुदाय” यांच्यावरही आज अशीच जबाबदारी आहे. आमची साक्ष कसून झाली पाहिजे. मग, देवाच्या सूडाच्या दिवशी आमचा, आमचे श्रवण करणाऱ्‍या लोकांसहित बचाव होईल.—यशया २६:२०, २१; १ तिमथ्यी ४:१६; प्रकटीकरण ७:९, १४, १५.

२१. आम्ही रक्‍तासंबंधाने कोणत्या प्रकारांनी इश्‍वरी आदर व्यक्‍त करावा व याचा कोणता परिणाम होईल?

२१ ख्रिस्ती तटस्थता, रक्‍तापासून दूर राहणे, कसून साक्ष देणे आणि येशूच्या मोलवान यज्ञार्पणावर विश्‍वास राखणे या सर्वांच्या बाबतीत आपण देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याचा निर्धार राखू या. याकरवी आम्हाला स्तोत्रसंहिता ३३:१०–१२ च्या आनंदी पूर्णतेत सहभाग मिळू शकेल: “राष्ट्रांच्या मसलती यहोवाने निरर्थक केल्या आहेत; त्याने लोकांचे संकल्प निष्फळ केले आहेत. यहोवाची योजना सर्वकाळ राहील. . . . ज्या राष्ट्राचा देव यहोवा आहे . . . ते धन्य.”

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ रक्‍ताचा कोणता एकमेव वापर आशीर्वाद आणतो?

◻ रक्‍तापासून दूर राहण्यात आम्हास कसा फायदा मिळतो?

◻ आम्हास “सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी” कसे राहता येईल?

◻ कसून असण्यासंबंधीचे कोणते उदाहरण आम्ही अनुसरण्यास हवे?

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

मार्च २०, १९८६ च्या द वॉल स्ट्रीट जरनल मध्ये एका लेखाचे शिर्षक होते: “रक्‍तपेढ्या एड्‌स्‌ पासून सुरक्षित नाहीत.” या लेखाचा पहिलाच परिच्छेद म्हणतो: “रक्‍तपेढ्या आम्हास सांगतात त्यापेक्षा अमेरिकन रक्‍ताचा साठा कमी सुरक्षिततेचा वाटतो. सर्वसाधारण लोकांना रक्‍त वर्गीकरणाची जी मोठी जोखीम भासत आहे त्यापेक्षा संक्रमण पध्दत अक्वायर्ड इम्यून डिफिशियन्सी सिन्ड्रोम हा रोग पोहचविण्याचा प्रमुख मार्ग झाला आहे. एड्‌स्‌ संबंधाने उपद्रवकारक पदार्थांचा नाश करू शकणारा रक्‍तात उत्पन्‍न झालेला पदार्थ, परिक्षणामध्ये सुचवितो की, सर्वच दूषित घटक शोधून काढता येण्याची हमी नाही. यापेक्षा अधिक वाईट ते हे की संक्रमण पध्दतीची सुरक्षा सुधारण्याच्या बाबतीत योग्य ती पावले उचलण्यासंबंधाने रक्‍तपेढ्या टाळाटाळीची वृत्ती दाखवीत आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा