वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. ३२
  • पोवळ्यांपेक्षा बहुमोल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पोवळ्यांपेक्षा बहुमोल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. ३२

पोवळ्यांपेक्षा बहुमोल

वाढत असलेल्या पाहुण्यांची संख्या, तांबड्या समुद्राच्या पाण्यातील या गोष्टींकडे पाहून रोमांचित झाली.

मेघधनुष्याच्या रंगाचे व त्या रंगाची छटा असलेले असंख्य मासे, नितळ पाण्यात पोहणाऱ्‍यांना भुरळ पाडणारे आहेत. परंतु हेही नीट लक्ष देऊन पाहा की, येथे दिसणाऱ्‍या रंगीबेरंगी माश्‍यांच्या भोवती, समुद्राखालच्या इतर आश्‍चर्यांमध्ये नजरकैद करणाऱ्‍या आणखी गोष्टी आहेत ज्यामध्ये तेजस्वी रंगीत पोवळ्यांचा समावेश आहे.

हे शोभिवंत पोवळे, अनेक आकारांमध्ये आणि रंगांमध्ये सापडतात. तुम्ही कल्पना करू शकता त्याप्रमाणे, प्राचीन काळातही भडक रंगाचे पोवळ्यांचे तुकडे अत्यंत महाग होते. कारागिरांनी त्या पोवळ्यांचे लावण्यपूर्ण दागदागिने बनवले, आणि पवित्र शास्त्र लेखकांनी सोने, चांदी आणि माणिक यांच्यासोबत, देखील पोवळ्यांचा उल्लेख केला आहे. (नीतिसूत्रे ३:१४, १५; यहेज्केल २७:१६) परंतु, हे लेखक आम्हाला पोवळ्यांतील सौंदर्याच्या आणि किंमतीच्या पलिकडे पाहण्यास मदत करतात.

त्यांनी ठळकपणे हे सांगितले की, काही गोष्टी इतक्या मौल्यवान आहेत आणि आम्हाला त्यांचे अतिशय मोल वाटले पाहिजे. त्यातील एक, सद्‌गुणी स्त्री आहे, कारण आम्ही असे वाचतो: “सद्‌गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून [पोवळ्यांहून, NW] अधिक आहे.” (नीतिसूत्रे ३१:१०) तुम्ही एक विवाहीत पुरूष आहात का? पुन्हा एकदा या अत्यंत सुंदर पोवळ्यांकडे पाहा, आणि मग तुम्ही तुमच्या पत्नीची ती ज्या योग्यतेची आहे तशी प्रशंसा करता का यावर विचार करा.

आम्ही पुरूष असो की स्त्री, विवाहीत असो की अविवाहीत, भव्य पोवळ्यांवर दृष्टी टाकल्याने, ईश्‍वरी बुद्धी, समज आणि ज्ञान यांचे मूल्य त्याहूनही किती अधिक आहे, याची गुणग्राहकता बाळगण्यास आम्हाला मदत होते. देवाचे वचन म्हणते: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रूप्याच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही.”—नीतिसूत्रे ३:१३-१५; ८:११.

याकारणास्तव, आपण स्वतः पोहताना किंवा फोटोग्राफीतून त्यांना पाहताना, तांबड्या समुद्राच्या पोवळ्यांनी आम्हाला, सौंदर्य आणि लाभदायक चिंतनासाठी साहित्य या दोन्ही गोष्टी कळविल्या पाहिजेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा