वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • विल्यम व्हिस्टन पाखंडी की प्रामाणिक प्रामाण्य?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • चांगली आणि वाईट—फळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ईश्‍वरी शिक्षण विजय मिळवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे वाचन करण्यास तुम्हाला आवडले का? जर होय तर, पुढील मुद्यांची आठवण करण्यास तुम्हाला कुतूहलजनक वाटेल:

▫ इस्त्राएली हेरांनी रहाब वेश्‍येच्या घरात राहण्याचे का निवडले?

इस्त्राएली हेर यहोवाच्या नियमशास्त्रानुसार वागणारे होते, यास्तव ते रहाबच्या घरी अनैतिक कारणासाठी राहिले नाहीत. त्यांनी कदाचित असा तर्क केला असावा की कलावंतीणीच्या घरातील त्यांच्या उपस्थितीमुळे, शहरातील लोक इतका संशय घेऊ शकणार नाहीत. शिवाय तिचे घर गावकुसाला लागून असल्यामुळे त्यांना तेथून पळ काढण्यास सोपे होणार होते. परंतु याहूनही अधिक म्हणजे, यहोवाने त्यांना या पापी व्यक्‍तिकडे जाण्यास निरविले कारण तिच्या हृदयावर इस्त्राएली लोकांसोबतच्या ईश्‍वरी वागणूकीविषयीच्या अहवालांचा इतका अनुकूल प्रभाव झाला होता की, तिने पश्‍चाताप केला आणि तिचे मार्ग बदलले.—wE१२/१५, पृष्ठ २४-५.

▫ क्रोध आमच्या प्रकृतीवर परिणाम कसा करतो?

संशोधनांनी सूचित केले की क्रोधामुळे स्ट्रेस ग्रंथी उत्पन्‍न होतात. क्रोधाच्या वारंवार उद्रेकामुळे, कोलेस्टेरॉलच्या सुरक्षित आणि हानीकारक प्रकारांमध्ये समतोलपणाचा अभाव निर्माण होऊ शकतो, व आम्हाला कार्डीओवासकुलर आजार होण्याचा धोका असू शकतो.—wE१२/१५, पृष्ठ ३२.

▫ वॉचटावर आणि अवेक! नियतकालिकांचे आमचे वितरण वाढवण्यासाठी कोणत्या सूचना आम्हाला मदत करतील?

वॉचटावर आणि अवेक!ची जाणीव राखा; सरळ सादरता करा; काही संक्षिप्त सादरतेची तयारी करून लवचिक असा; व्यक्‍तिगत ध्येय ठेवा.—१/१, पृष्ठ २०-१.

▫ मोशे हा, आम्ही अनुकरण करण्याकरता एक उत्तम ईश्‍वरशासित उदाहरण का आहे?

मोशेने सर्व बाबतीत यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने व्यक्‍तिगत महत्त्वकांक्षा कधीच ठेवल्या नाहीत, तर त्याला यहोवाच्या गौरवाची चिंता होती. त्याचा भक्कम विश्‍वास होता आणि यहोवा, इस्त्राएल राष्ट्राचा शासक आहे हे तो कदापि विसरला नाही.—१/१, पृष्ठ २३.

▫ ईश्‍वरी शिक्षण कोणत्या काही मार्गांमध्ये विजय मिळवते?

यहोवाच्या लोकांना सत्याची प्रगतीशील समज देऊन ईश्‍वरी शिक्षण विजय मिळवते. ते लोकांना आध्यात्मिक प्रकाशात आणते, व देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” कशी करावी हे ते नम्र लोकांना दाखवते. (योहान ४:२४) ईश्‍वरी शिक्षण परीक्षा आणि या दुष्ट जगावर देखील विजय मिळवते.—२/१, पृष्ठ ७-१२.

▫ यशस्वी सल्ला देण्याची गुरूकिल्ली काय आहे?

दुसऱ्‍या व्यक्‍तिबद्दल योग्य आदर आणि माननीय पद्धतीने त्याला वागवण्याचा त्याचा हक्क ही गुरूकिल्ली आहे. यास्तव, ख्रिस्ती सल्लागाराने दयाळू व अढळ असले पाहिजे, परंतु प्राप्तकर्त्याला मान द्यावा.—wE२/१, पृष्ठ २८.

▫ रोमन कॅथोलिक चर्चने मरियेच्या अंगीकाराला एक तत्त्वप्रणाली म्हणून स्वीकारण्यास कशी सुरवात केली?

येशूच्या मृत्युनंतरच्या पहिल्या शतकांत, स्वर्गामध्ये मरियेच्या अंगीकाराची कल्पना, ख्रिस्ती जनांसाठी पूर्णपणे नवी अशी होती. तथापि, त्रैक्याची शिकवण अधिकृत चर्च तत्त्वप्रणाली झाल्यावर, मरियेला प्रमाणापेक्षाही अधिक महत्त्वाची भूमिका दिली जाऊ लागली. अंगीकाराचे हे तत्त्व, विशिष्ट शिकवण म्हणून तोपर्यंत स्वीकारले नव्हते जोपर्यंत, पोप पायस १२ वे यांनी नोव्हेंबर १, १९५० रोजी ही घोषणा केली की: “ही शिकवण देवाने प्रकट केल्याचे आम्ही स्पष्ट करतो.”—मुनीफीसेनटीससीमस डीयस.—wE२/१५, पृष्ठ २६-७.

▫ यिर्मयाच्या २४ व्या अध्यायात, चांगले आणि वाईट अंजिरांच्या दोन टोपल्यांनी काय सूचित केले?

चांगले अंजिर त्या यहूद्यांना सूचित करते ज्यांना प्रथम बंदिवान करून नेले, व यांच्यामधून काही शेष लोक यहूदाला परत येणार होते. वाईट अंजीर सिद्‌कीया राजा आणि त्याच्यासोबत देवाच्या नावाने निष्ठेची शपथ घेतल्यावरही नबुखद्‌नेस्सर राजाविरूद्ध बंड केलेल्यांना ते चित्रित करतात. तुलनात्मकरीत्या, आधुनिक काळात आध्यात्मिक इस्त्राएलच्या शेषांनी त्यांच्या जीवनात चांगली फळे उत्पन्‍न केली आहेत व त्यांच्या उलटपक्षी ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाने, नासकी फळे उत्पन्‍न केली आहेत.—३/१, पृष्ठ १४-१६

▫ चौदावा दिवस पाळणारे कोण होते, व आज ते ख्रिश्‍चनांच्या अधिक आस्थेचे का आहेत?

प्रेषितांच्या काळानंतर, प्रेषितीय नमुन्याचे अनुकरण करून, प्रत्येक वर्षी निसान १४ या दिवशी प्रभूचे सांज भोजन साजरा करणारे काही होते. त्यांना चौदावा दिवस पाळणारे असे म्हणण्यात येऊ लागले. हे आज आस्थेचे आहे कारण, ते दाखवते की प्रेषितांच्या मृत्युनंतरही, वर्षांतून एकदाच निसान १४ या दिवशी येशूच्या मृत्युचे स्मारक योग्यप्रकारे साजरा करणारे काही जण होते.—३/१५, पृष्ठ ४-५

▫ विल्यम व्हिस्टन कोण होते?

ते, १८ व्या शतकात इंग्लंड मधील एक बुद्धिमान विद्वान, सर आयझक न्यूटनचे सहयोगी होते. व्हिस्टनने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर केले, त्रैक्य शिकवणीला उघडपणे धिक्कारले, खगोलशास्त्र व गणितशास्त्राचे अधिव्याख्याता होते. परंतु व्हिस्टन यांना, यहूदी इतिहासकार फ्लेवियस जोसेफसच्या लिखाणांचे इंग्रजीत भाषांतर केल्यामुळे अधिक ओळखले जाते.—३/१५, पृष्ठ २६-८

▫ मनुष्याला देवाच्या प्रतिरूपाचे कसे बनवले गेले? (उत्पत्ती १:२७)

मनुष्याला देवाचे उल्लेखनीय गुण जसे की, प्रेम, न्याय, बुद्धी आणि शक्‍ती—तसेच इतर गुणांचा वापर करण्याच्या क्षमतेसह बनवण्यात आले होते.—४/१, पृष्ठ २५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा