चोरीचे प्रमाण का वाढत आहे?
रिओ डि जानिरो—रविवार, ऑक्टोबर १८, १९९२. कोपकबना आणि इपनेम या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर गर्दी झाली आहे. अचानक युवकांच्या समुदायाने समुद्रकिनाऱ्यांवर हल्ला केला, त्यांच्यात मारामारी सुरू झाली आणि ते लोकांकडील किंमतीच्या कोणत्याही वस्तूंची चोरी करू लागले. मदतीसाठी असलेले अनेक पोलिस, बळी पडलेल्या लोकांना मदत देऊ शकत नाहीत. रिओ डि जानिरो येथील रहिवाशी तसेच पर्यटकांसाठी दिवसाढवळ्या ते एक दुःस्वप्न होते.
खरोखर, मालमत्ते बाबतचे गुन्हे आता साधारण गोष्ट बनली आहे. मोठ्या शहरात युवकांना पळवून नेणे, आणि कधीकधी तर त्यांचे स्पोर्ट शूज् मिळवण्यासाठी त्यांना मारून टाकण्यात आले आहे. लोक घरी असोत किंवा नसोत चोर त्यांच्या घरात प्रवेश करतात. अप्रामाणिक मोलकरणी, घरातील वस्तुंचे ठिकाण समजल्यावर, दागिने आणि पैशाची चोरी करून पळून जातात. जमाव दुकाने लुटतात. काही सुसंघटित जमाव लोकांना देखील चोरून नेतात, तीच गोष्ट ब्राझीलमध्ये पळवून नेण्याच्या वाढत्या प्रमाणावरून दिसते. आणि कदाचित याविषयी तुमच्या परिचयाची किंवा तुमच्या समाजात काय घडले आहे त्याची आणखी काही उदाहरणे तुम्ही देऊ शकता. परंतु चोरीचे प्रमाण इतके अधिक का वाढत चालले आहे?
लोक चोरी का करतात?
वाढत असलेले दारिद्य्र आणि अमली पदार्थ ही प्रमुख दोन कारणे असली तरी, याचे उत्तर इतके स्पष्ट नाही. द न्यू एन्साक्लोपिडिया ब्रिटानिका निरीक्षण करतो: “गुन्ह्याच्या एका कारणाचा शोध करण्याचा प्रयत्न अनेकदा व्यर्थ ठरला आहे.” तथापि, पुढे तोच एन्साक्लोपिडिया ब्रिटानिका असे सुचवितो की चोरीच्या या समस्येचा, “थेट संबंध युवकांच्या निरूपयोगीपणाच्या भावना, भौतिक गोष्टी संपादन करण्यापासून आणि सामान्य जीवनाच्या मोबदल्यापासून वंचित केल्यामुळे आलेल्या संतापाबरोबर आहे.” होय, खरेदी करण्याच्या इच्छेचा अतिशय दबाव राहात असल्यामुळे हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अनेकांना चोरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.
द वर्ल्ड बुक एन्साक्लोपिडिया चित्तवेधकपणे दर्शवते की: “त्यांचे जीवन असेच चालू राहील, असा विश्वास बाळगणाऱ्या लोकांच्या परांपरागत समाजात, गुन्ह्यांचे प्रमाण तुलनात्मकरित्या स्थिर दिसून येते. लोकांचे वस्तीस्थान, मिळकतीच्या त्यांच्या पद्धती आणि भविष्यकालिन कल्याणाबाबत त्यांना वाटणाऱ्या आशा यात आमुलाग्र बदल होत असलेल्या समाजात गुन्ह्यांचे प्रमाण जलद गतीने वाढत चालले आहे.” तो विश्वकोश यात भर टाकतो की: “युवकांना कामाची संधी फार कमी मिळते. चोरीपासून त्वरीत आणि चटकन प्राप्ती होत असल्यामुळे, उपलब्ध असलेल्या अकुशल नोकऱ्या त्यांना निरस वाटतात. तरुणांचे जीवनच असे आहे की गमावण्याजोगे त्यांच्याकडे फारसे काही नसल्यामुळे ते स्वेच्छेने अटकेची जोखीम पत्करतात.”
तथापि, दप्तरात काम करणारे आणि कारखान्यात काम करणारे कर्मचारी कामाच्या ठिकाणी जणू ते त्यांच्या पगारातील भाग समजून चोरी करत असले तरी, बेरोजगार किंवा कमी पगाराची नोकरी असलेले अनेकजण चोरी करत नाहीत. वस्तुतः काही लबाड गोष्टींसाठी एका खास सामाजिक स्थराची आवश्यकता असते. पैशाच्या प्रचंड रक्कमेच्याबाबतीत राजकीय पुढारी, सरकारी नोकर आणि व्यापारी लोक यात गोवलेले असल्याच्या लोकापवादांना तुम्ही कधी ऐकत नाही का? यात कोणताही प्रश्न नाही कारण चोरी करणे केवळ गरीबांपुरतेच मर्यादित नाही.
चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम चोरी करण्याविषयी विनोद करतात (नायक कदाचित एक चोर असतो) याची देखील आठवण करा, यामुळे चोरी करावयाला आणखी स्वीकारयोग्य बनविले जाते. यामुळे करमणूक होऊ शकते हे मान्य आहे, परंतु त्याचवेळी, चोरी कशी करावी हे प्रेक्षकांना दाखवले जाते. गुन्हा करणे योग्य आहे हे धूर्तपणे सांगत असणारी ही कल्पना नाही का? लोभ, आळशीपणा, आणि निडरपणे प्रत्येक जण तेच (चोरी) करीत आहे हा विचार, या सर्व गोष्टी चोरी करण्याच्या प्रमाणाला निश्चितच वाढवतात. आपण, स्वार्थीपणा आणि वाढत असलेले द्रव्यावरील प्रेम या भाकीत केलेल्या “शेवटल्या दिवसात” राहात आहोत हे नाकारता येणार नाही.—२ तीमथ्य ३:१-५.
तू चोरी करू नको
जगाचे मूल्य हे विपर्यस्त असले तरी, “चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये” या आज्ञेचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. (इफिसकर ४:२८) एखादा व्यक्ती मालमत्तेला किंवा सुखविलासाला उच्च स्थान देत असेल तर, चोरी करण्याची जोखीम पत्करणे योग्य आहे असे समजून स्वतःला तो फसवू शकतो. परंतु चोरी करणे देवाच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे एखाद्याची शेजाऱ्यावरील प्रीतीची उणीव दिसून येते. त्याशिवाय, क्षुल्लक चोरी एखाद्याचे हृदय कठीण करण्यास प्रवृत्त करू शकते. आणि अप्रामाणिक या दृष्टीने इतरांनी पाहीले तर काय? चोरावर कोण बरे भरवसा ठेवील? यास्तव, देवाचे वचन सुज्ञपणे म्हणते: “खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये.”—१ पेत्र ४:१५.
वाढत असलेल्या चोरीच्या प्रमाणाबद्दल निश्चितच तुम्हाला दुःख वाटत असेल, परंतु सर्वत्र गुन्हे असलेल्या क्षेत्रातील लोक त्याचा सामना कसा करीत असतील? पूर्वी चोर असलेल्या लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत कसा बदल केला? सार्वत्रिकपणे चोरी कधी संपुष्टात येईल का? “चोर नसलेले जग” या आमच्या पुढील लेखाचे वाचन करण्यास आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो.