नाकतोड्यांप्रमाणे
उन्हाळ्यात तुम्ही कधी कुरणामधून फिरत गेला होता का आणि तेथे तुमच्या मार्गावर अगणित अशा उड्या मारणाऱ्या नाकतोड्यांना पाहिले होते का? जरी तुमचे त्यांच्याकडे जास्त लक्ष गेले नसेल तरी ते जणू चोहोकडे दिसत असतात. काही असले तरी, ते निरूपद्रवी आणि क्षुल्लक वाटतात.
तथापि, नाकतोड्यांचा खरा क्षुल्लकपणा मानवजातीसाठी उचित चिन्ह बनवितो. काही महत्त्वाकांक्षी लोक स्वतःला फार श्रेष्ठ समजत असतील पण आमचा सृष्टीकर्ता त्यांच्याविषयी वेगळाचा विचार करतो. त्याचा भविष्यवक्ता यशया याने म्हटले: “हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरुढ झाला आहे, तिच्यावरील रहिवाशी टोळासमान (नाकतोड्यासमान) आहेत.”—यशया ४०:२२.
मनुष्य जसा नाकतोड्यापेक्षा बुद्धीने आणि सामर्थ्याने श्रेष्ठ आहे त्याप्रमाणेच यहोवा देव त्याच्या भव्यतेत, सामर्थ्यात, आणि बुद्धीमध्ये क्षुद्र मानवजातीच्या जगापेक्षा फारच उच्च आहे. तथापि, देवाचा मोठा गुण प्रीती हा आहे. आम्ही त्याच्यावर प्रीती केली व त्याचे आज्ञापालन केले—तर तो त्याच्या अप्रतिम प्रीतीमुळे आमची काळजी घेतो, मदत करतो, आणि आम्हाला वाचवितो. आम्ही नाकतोड्याप्रमाणे क्षुल्लक असलो तरी यहोवा आमच्याबरोबर प्रेमळपणे व्यवहार करतो. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारुढ आहे, जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवितो.”—स्तोत्रसंहिता ११३:५-७.
हे स्तोत्र सांगते त्याप्रमाणेच, यहोवा कंगालासाठी प्रेमळपणे मदत पुरवितो. होय, जे नम्रपणे ‘देवाचा शोध करतात व त्याला कसेतरी प्राप्त करून घेतात’ अशांना तो मदत करतो. (प्रे. कृत्ये १७:२७) ज्यांना देव सापडला आहे—त्याची सेवा जे करतात—ते त्याच्या नजरेत मूल्यवान बनतात. (पडताळा यशया ४३:४, १०.) अशाप्रकारे, नम्र नाकतोडा आम्हाला आमचा क्षुल्लकपणा आणि जो आज्ञाधारक मानवजातीला त्याचे मित्रत्त्व आणि अपात्री कृपा देतो त्या सर्वशक्तीमान सृष्टीकर्त्याची आठवण करुन देतो. देवाच्या प्रीतीची गुणग्राहकता तुम्ही दाखवता का?