तुम्हाला आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे?
लोकांनी निवडून दिलेले राजकारणी पुढारी, लोकांना आनंदी करण्याचा कसून प्रयत्न करतात. सरतेशेवटी यावरच त्यांचे काम अवलंबून असते. परंतु पोलंडमध्ये “भ्रमनिरास आणि दुरावलेला मतदारसंघ,” याविषयी वार्तामासिक सांगते. संपादक अमेरिकेविषयी स्पष्टता देतो, की तो असा समाज आहे “जो आधीच्या बेभरोसी राजकीय नेत्यांनी भरला आहे.” दुसरा एक लेखक, “फ्रांसमध्ये वाढत असणाऱ्या राजकीय उदासिनतेबद्दल” आम्हांला सांगतो. असे हे औदासीन्य आणि असमाधान केवळ उद्धृत केलेल्या ह्या तीन राष्ट्रांपुरतेच मर्यादित नाही—लोकांना आनंदी बनविण्याचे राजकारणी लोकांचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत हे याद्वारे समजते.
धार्मिक नेते या जीवनात नाही, तर भविष्यासाठी तरी आनंदाचे आश्वासन देतात. मानवाला अमर किंवा देहान्तरप्राप्तीचा आत्मा आहे हा त्यांचा आधार प्रतिपादतात, ही कल्पना विविध कारणांसाठी अनेक लोक नाकारतात आणि पवित्र शास्त्र स्पष्टपणे ती चुकीचे आहे हे सिद्ध करते. रिकामी चर्चेस आणि सभासदांची घटत असणारी यादी दाखवते की, आनंदासाठी धर्माची गरज आहे असे लाखोंना वाटत नाही.—पडताळा उत्पत्ति २:७, १७; यहेज्केल १८:४, २०.
असमाधानी रुप्याचे प्रेमी
आनंद राजकारणात किंवा धर्मात नाही, तर मग कोठे मिळू शकतो? कदाचित वाणिज्याच्या क्षेत्रात का? आनंद देऊ शकण्याचा तेही दावा करते. जाहिरातीच्या माध्यमाच्या द्वारे स्पष्टपणे ते त्याचा दावा त्याच्याबाजूने सादर करते: पैशाने खरेदी करता येतील त्या सर्व भौतिक वस्तु मिळविल्याने आनंद येतो.
या मार्गाने आनंद मिळविणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडत असल्याचे दिसत आहे. काही वर्षांआधी असा अहवाल आला होता की, जर्मनीतील ५० टक्के कुटुंबे अतिशय कर्जबाजारी होती. मग यात कोणतेही आश्चर्य नाही की, प्रतिष्ठित जर्मन वर्तमानपत्र डाइ झिइटने असे अनुमान काढले की “यातील अनेक, या कर्जातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही.” त्याने स्पष्टता केली: “शिलकेपेक्षा अधिक रकमेची संधी बँक सतत पुरवित आहे—आणि लोभाच्या ऋणातून मुक्त होणे अतिशय कठीण आहे.”
अधिक उद्योगप्रदान राष्ट्रातील परिस्थिती यासारखीच आहे. न्यूयॉर्क येथील सिटी विश्वविद्यालयातील एक समाजशास्त्रज्ञ डेविड कॅपʹलोव्हिज यांनी अनुमान काढले होते की, संयुक्त राष्ट्राची दोन कोटी ते अडीच कोटीमधील कुटुंबे अतिशय कर्जबाजारी होती. “लोक ऋणामुळे चिरडून जात आहेत,” “त्यांचे जीवन अधोगतीला मिळत आहे” असे त्यांनी म्हटले.
यात आनंदाचे असे काहीच दिसून येत नाही! परंतु, मग आम्ही इतर दोन (राजकारण आणि धर्म) साध्य करू शकत नाही तर जागतिक वाणिज्य हे साध्य करील याची अपेक्षा बाळगावी का? समृद्ध राजा शलमोनाने एकदा लिहिले: “ज्याला रुपे आवडते तो रुप्याने, आणि ज्याला विपुल धन आवडते तो संपत्तीने तृप्त होणार नाही, हेही व्यर्थता आहे.”—उपदेशक ५:१०, पंडिता रमाबाई भाषांतर.
भौतिक संपत्तीद्वारे आनंद मिळविण्याचा प्रयत्न करणे हवेत महाल बांधण्यासारखे आहे. हवेत या महालाला बांधणे भावना चेतविणारे असू शकते, परंतु तुम्ही त्यात राहण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला समस्या येणार.
आनंद मिळवण्याजोगा आहे परंतु कशाप्रकारे?
प्रेषित पौल यहोवाला “आनंदी देव” [न्यू.व.] असे संबोधतो. (१ तीमथ्य १:११) मानवांना स्वतःच्या प्रतिरुपाचे बनवून आनंदी देवाने त्यांना आनंदी असण्याची योग्यता देखील प्रदान केली. (उत्पत्ति १:२६) परंतु त्यांचा आनंद देवाची सेवा करण्यावर आधारीत होता, स्तोत्रकर्त्याने दाखविले: “ज्या लोकांचा देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आहे ते धन्य! [आनंदी, न्यू.व.]” (स्तोत्रसंहिता १४४:१५ब) देवाची आम्ही करीत असलेली सेवा यात काय गोवलेले आहे आणि आम्ही करीत असलेली त्याची सेवा खऱ्या आनंदाकडे कशी निरविते हे आम्हाला, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये ११० ठिकाणी आलेल्या “आनंद” आणि “आनंदी” या शब्दांतील काहींचा विचार केल्याने चांगले समजू शकते.
आध्यात्मिक गरजा ओळखणे
डोंगरावरील त्याच्या प्रसिद्ध प्रवचनात, देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताने म्हटले: “आध्यात्मिक गोष्टींची जाणीव असणारे आनंदी आहेत.” (मत्तय ५:३, न्यू.व.) सुखसोयीनीं युक्त अशा वस्तुंची खरेदी केल्याने त्या आनंदासाठी पुरेशा आहेत अशा विचाराद्वारे वाणिज्याचे जग आम्हाला फसविते. ते आम्हांस सांगते की आम्हाजवळ गृह संगणक, एक व्हिडीओ कॅमेरा, एक दुरध्वनी, एक गाडी, खेळाचे आधुनिक साहित्य, फॅशनेबल कपडे असल्याने आनंद मिळतो. जगातील कोट्यावधी लोकांजवळ ह्या गोष्टी अपुऱ्या आहेत तरीसुद्धा ते दुःखी नाहीत हे आम्हाला ते सांगत नाही. जीवन अधिक आरामदायक आणि सोयीस्कर बनवीत असल्या तरी ह्या गोष्टी आनंदासाठी आवश्यक नाहीत.
पौलाने केले तसे, आध्यात्मिक गरजांची जाणीव असणारे असे म्हणतात: “आपल्याला अन्नवस्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:८) का बरे? कारण आध्यात्मिक गरजांची तृप्तीच सार्वकालिक जीवनाप्रत निरविते.—योहान १७:३.
चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आमच्याकडे पैसे असले तर त्यांचा आनंद उपभोगणे चुकीचे आहे का? कदापि नाही. तथापि, प्रत्येक लहरीचा आम्ही उपभोग न घेता किंवा ऐपत आहे म्हणून आम्ही काहीही खरेदी करावे या गोष्टी न करण्याचे शिकल्यामुळे आमची आध्यात्मिकता बळकट होते. येशूची परिस्थिती जगीक दृष्टिकोनातून पाहता चांगली नव्हती तरी त्याने टिकवले तसे समाधान आणि आनंद आम्ही मिळवून घेण्याचे शिकतो. (मत्तय ८:२०) पौलाने हे लिहिले तेव्हा तो दुःख व्यक्त करीत नव्हता की, “ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे.”—फिलिप्पैकर ४:११, १२.
यहोवावर भाव ठेवणे
आध्यात्मिक गरजा ओळखण्याद्वारे एखादा स्वेच्छेने यहोवावर भाव ठेवतो हे सूचित होते. शलमोन राजाने स्पष्ट केल्याप्रमाणे हे आनंदी बनविते: “परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेवतो तो धन्य. [आनंदी, न्यू.व.]”—नीतीसूत्रे १६:२०.
देवावर भाव ठेवण्याऐवजी अनेक लोक पैसा आणि संपत्ती यावर भाव ठेवत आहेत, ही खरी गोष्ट नाही का? ह्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, पैशापेक्षा “देवावर आम्ही भाव ठेवतो” हे ब्रीद ठळकपणे दिसण्याजोगी जागा न मिळणे अधिक दुरास्पात असेल, पण वस्तुतः अमेरिकेच्या चलनावर ते ब्रीद प्रत्यक्षात दिसते.
पैसे काही खरेदी करू शकतील अशा कोणत्याही चांगल्या वस्तुची उणीव शलमोन राजाजवळ नव्हती. भौतिक संपत्तीवर भाव ठेवल्याने कायमचा आनंद मिळू शकत नाही हे त्याने ओळखले. (उपदेशक ५:१२-१५) दिवाळखोरी किंवा महागाईमुळे बँकेतील पैसे गमावले जाऊ शकतात. वादळाच्या जोराच्या हल्ल्यामुळे खऱ्या मालमत्तेचा नाश होऊ शकतो. उतरविलेला विमा झालेल्या भौतिक नुकसानीची थोडीफार भरपाई करीत असला तरी भावनात्मक नुकसानीची भरपाई कधीही करु शकत नाही. रोखे आणि कर्जरोखे एका रात्रीच अचानक बाजारभाव उतरल्याने व्यर्थ होत असतात. इतकेच नव्हे तर भरपूर पैसे देणारे कामधंदेही अनेक कारणांमुळे तात्कालिक बनतात.
या कारणास्तव यहोवावर भाव ठेवणारा, येशूने दिलेल्या सुचनेला लक्षपूर्वक ऐकण्यात सूज्ञपणा समजतो: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत.”—मत्तय ६:१९, २०.
सर्वशक्तीमान देवावर एखाद्याने स्वतःचा भाव ठेवला आहे तो सर्वदा आपली पूरवणूक करीत आहे यापेक्षा आणखी कोणती श्रेष्ठ सुरक्षितता आणि आनंदी असण्याची भावना आहे?—स्तोत्रसंहिता ९४:१४; इब्रीयांस १३:५, ६.
ईश्वरी वाग्दंडाचा स्वीकार करणे
खऱ्या मित्राकडून प्रेमभावाने मिळालेला सल्ला किंवा शासन याचे स्वागत होते. देवाचा सेवक ईयोब याचा मित्र असल्याचा आव आणणाऱ्या ढोंग्याने एकदा त्याला म्हटले: “ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरूष धन्य [आनंदी, न्यू.व.].” हा शब्दप्रयोग जरी खरा आहे तरी, ईयोबाने काहीतरी गंभीर गोष्टीच्या बाबतीत चूक केल्याने दोषी आहे हे अलीफजचे बोलणे खरे नव्हते. किती ‘भिकार सांत्वनदाते’! यहोवाने नंतर जेव्हा प्रेमळपणे ईयोबाला वाग्दंड दिला तेव्हा त्याने नम्रतेने त्याचा स्वीकार केला आणि त्याने स्वतःला आनंदी मार्गात ठेवले.—ईयोब ५:१७; १६:२; ४२:६,१०-१७.
ईयोबासोबत जसा देव थेट बोलला त्याप्रकारे आज त्याच्या सेवकांना तो बोलत नाही, त्याऐवजी तो त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या आत्म्याने मार्गदर्शित केलेल्या संस्थेमार्फत त्यांना शासन करतो. भौतिक आस्थांच्या मागे लागणाऱ्या ख्रिश्चनांना अनेकदा नियमित पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व यहोवाची संस्था पुरवित असलेल्या सभांना उपस्थित राहण्यासाठी वेळ, त्राण आणि कलसुद्धा नसतो.
नीतीसूत्रे ३:११-१८ च्या अनुसार ज्या माणसाला देव शासन करतो, तो शासनाचा स्वीकार करण्याची सुज्ञता ओळखतो: “ज्याला ज्ञान प्राप्त होते जो सुज्ञता संपादन करतो तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतीमय आहेत. जे त्याला धरुन राहतात त्यांस ते जीवनवृक्षरुप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.”
शुद्ध आणि शांतता-प्रेमी
येशूने आनंदी लोकांचे वर्णन “अंतःकरणात शुद्ध” आणि “शांती करणारे” असे केले आहे. (मत्तय ५:८, ९) परंतु जे भौतिकवादी जीवन-शैलीचे उत्तेजन देत आहे, त्या जगात स्वार्थी, व कदाचित अशुद्ध इच्छा आमच्या हृदयात किती सहजपणे मूळ धरू शकतात! ईश्वरी बुद्धीने जर आमचे मार्गाक्रमण झाले नाही तर किती सहज आम्ही प्रश्नार्थक माध्यमाद्वारे इतरांबरोबरचे शांतीपूर्ण नातेसंबंध तोडण्यास मार्गभ्रष्ट होऊ शकतो! चांगल्या कारणास्तव पवित्र शास्त्र आम्हाला हा इशारा देते: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:१०.
पैशाचे प्रेम अहंकारीपणाला चालना देते व ते असामाधान, कृतघ्नपणा आणि लोभ यांना वाढविते. या चुकीच्या आत्म्याची वाढ होण्याचे थांबविण्यासाठी, आर्थिक निर्णय घेण्याआधी काही ख्रिश्चन स्वतःला असे प्रश्न विचारतात: मला याची खरोखर गरज आहे का? मला महागडी खरेदी किंवा लाखो लोक ज्याविना जगू शकतात, अशा अधिक वेळ-घेणाऱ्या कामाची नोकरी पाहिजे का? जागतिक प्रचारकार्याच्या कामात हातभार लावण्यामध्ये, किंवा माझ्यापेक्षा कमी सुदैवी असणाऱ्या लोकांना मदत करण्याद्वारे मी माझ्या पैशाची किंवा माझ्या वेळेची सहभागिता खऱ्या भक्तीत अधिक चांगल्यारितीने खर्च करु शकतो का?
धीर दाखवणे
ईयोबावर लादलेल्या परिक्षांमधील एक त्याला धीर धरावयास लावणारी आर्थिक हानीची होती. (ईयोब १:१४-१७) त्याचे उदाहरण दाखवते की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धीर आवश्यक आहे. काही ख्रिश्चनांना छळ; इतरांना, लोभ; तर आणखी इतरांना अस्थिर आर्थिक परिस्थितीत धीर धरावा लागतो. परंतु प्रत्येक प्रकारच्या धीरात टिकल्याने यहोवाकडून मोबदला मिळतो हे, ख्रिस्ती शिष्य याकोबाने ईयोबाचा संदर्भ घेऊन लिहिले: “ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य [आनंदी, न्यू.व.] म्हणतो.”—याकोब ५:११.
आध्यात्मिक आस्थांकडे दुर्लक्ष करुन आर्थिक परिस्थिती सुधारण्यामुळे तात्पुरता आर्थिक दिलासा मिळतो, परंतु देवाचे राज्य जी कायमचीच आर्थिक मुक्तता करील त्याबद्दल स्पष्ट दृष्टिकोन ठेवण्यास आमची ते मदत करील का? ही जोखीम घेणे उचित आहे का?—२ करिंथकर ४:१८.
आता आणि सदासर्वदासाठी आनंद मिळवणे
मानवाला काय आनंदित करील या यहोवाच्या दृष्टिकोनाबद्दल अनेक लोक वाद घालतात हे स्पष्टच दिसत आहे. लांब पल्ल्याच्या फायद्याकडे दुर्लक्ष करून, देव जो सल्ला देतो त्यात लगेचच कोणताही व्यक्तिगत फायदा त्यांना दिसून येत नाही. भौतिक गोष्टीवर भाव ठेवल्याने किती दुर्दशा होते व निराशाकडे निरविले जाते हे ओळखण्यास ते अपयशी ठरतात. पवित्र शास्त्र लेखक अगदी उचितपणे विचारतो: “संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलिकडे तिचा मालकाला काय लाभ होतो?” (उपदेशक ५:११; तसेच उपदेशक २:४-११; ७:१२ हेही पहा.) आस्था किती लवकर निस्तेज होते आणि ज्या गोष्टींची अपेक्षा केलेली असते त्या केवढया धुळीने माखल्या जातात व त्यांचा विसर पडतो!
शेजाऱ्याजवळ असलेल्या संपत्तीप्रमाणे होता होईल तेवढी आपल्याजवळ असावी ह्या दबावाला खरा ख्रिस्ती स्वतःला बळी पडू देणार नाही. त्याला हे माहीत असते की, खरी किंमत त्याच्याजवळ काय आहे यावरून नव्हे तर तो कसा आहे यावरून मोजली जाते. एखाद्याला आनंदी—खरा आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे याबाबतीत त्याच्या मनात कसलाही संदेह राहत नाही की, त्याने यहोवासोबत चांगला नातेसंबंध उपभोगणे आणि त्याच्या सेवेत व्यग्र राहणे.
[४ पानांवरील चित्रं]
केवळ भौतिक गोष्टी कायमचा आनंद कधीही आणू शकत नाहीत
[६ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्र म्हणते: “आध्यात्मिक गरजांबाबत जागृत असणारे आनंदी आहेत”