वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ६/१ पृ. ७-१२
  • स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर”
  • येशूचा स्वार्थत्यागी आत्मा वाढवा आणि त्याचा पाठपुरावा करा
  • स्वार्थत्याग समृद्ध आशीर्वाद आणतात
  • स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • निरंतर येशूला अनुसरा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आत्म-त्यागी का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ६/१ पृ. ७-१२

स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा करणे

“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”—मत्तय १६:२४.

१. येशूने त्याच्या येऊन ठेपलेल्या मृत्युविषयी त्याच्या शिष्यांना काय सांगितले?

बर्फाच्छादित हेर्मोन डोंगराच्या सान्‍निध्यात, येशू ख्रिस्त त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रगतीनिदर्शक घटनेप्रत येतो. त्याची वेळ आता एक वर्षापेक्षा कमी राहिलेली आहे. त्याला हे माहीत आहे; व त्याच्या शिष्यांना याविषयी माहीत नाही. परंतु त्यांना माहीत होण्याची वेळ आता आली आहे. खरेच, समोर येऊन ठेपलेल्या त्याच्या मृत्यूचा अप्रत्यक्ष उल्लेख येशूने आधी केला होता, परंतु उघड करण्याची ही आता पहिली वेळ होती. (मत्तय ९:१५; १२:४०) मत्तयाचा अहवाल वाचला जातो: “तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्‍यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसऱ्‍या दिवशी उठविले जावे ह्‍याचे अगत्य आहे.”—मत्तय १६:२१; मार्क ८:३१, ३२.

२. येशूला भविष्यात त्रास सहन करावा लागेल यावर पेत्राची प्रतिक्रिया कशी होती, आणि येशूने कसा प्रतिसाद दिला?

२ येशूच्या मृत्युला आता फार कमी काळ राहिला आहे. अस्वस्थ असणाऱ्‍या विचारामुळे पेत्र आता संताप प्रकट करतो. मशीहाला खरोखर मारले जाईल या गोष्टीचा तो स्वीकार करुच शकत नाही. यास्तव, पेत्र त्याच्या स्वामीला धैर्याने दटावणी देतो. चांगल्या हेतूस्तव अत्यंत उतावळ्या प्रवृत्तीने तो आर्जवतो: “प्रभुजी आपणावर दया असो. असे आपल्याला होणारच नाही.” परंतु, एखादा ज्याप्रकारे विषारी सापाचे डोके ठेचतो त्याप्रमाणेच येशू पेत्राच्या ह्‍या चुकीच्या दयेला नाकारतो. “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”—मत्तय १६:२२, २३.

३. (अ) पेत्राने स्वतःला अजाणतेत सैतानाचा प्रतिनिधी कसे बनविले? (ब) स्वार्थत्यागाच्या मार्गावर पेत्र अडखळण कसा होत होता?

३ अजाणतेत पेत्राने स्वतःला सैतानाचा प्रतिनिधी बनविले होते. अरण्यात येशूने सैतानाला दिलेले प्रत्युत्तर निर्णायक होते. राज्याधिकारात कसलाही त्रास न घेता आरामदायी जीवनाचा उपयोग करण्याचा दियाबलाने प्रयत्न केला. (मत्तय ४:१-१०) आता पेत्र त्याला स्वतःवर दया करण्याचे उत्तेजन देत होता. ही त्याच्या पित्याची इच्छा नाही हे येशूला माहीत आहे. त्याचे जीवन स्व-संतुष्ट नव्हे तर स्वार्थत्यागी असले पाहिजे. (मत्तय २०:२८) अशा कृत्यामुळे पेत्र एक अडखळण बनतो, त्याची चांगल्या उद्देशाने केलेली सहानुभूती एक पाश बनते.a येशूने ओळखले की स्वार्थत्यागापासून मुक्‍त जीवनाच्या अशा कोणत्याही कल्पनेला बाळगले तर तो सैतानाच्या पाशातील मृत्युच्या बंधनात सापडला जाऊन देवाच्या कृपापसंतीतून उतरला जाऊ शकतो.

४. येशू आणि त्याच्या अनुयायांकरीता आरामदायक चैनबाजी का नाही ?

४ यास्तव, पेत्राच्या विचारसरणीत बदल करण्याची गरज होती. येशूला म्हटलेले त्याचे बोल देवाच्या नव्हे तर मनुष्याच्या विचाराला सूचित करत होते. आरामदायी चैनबाजीचे जीवन त्रासातून बाहेर जाण्याचा सोपा मार्ग येशूसाठी नव्हता; व अशा प्रकारचे जीवन त्याच्या अनुयायांसाठीही नाही, येशूने पुढे पेत्राला व इतर शिष्यांना म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”—मत्तय १६:२४.

५. (अ) ख्रिस्ती जीवन जगण्याचे कोणते आव्हान आहे? (ब) ख्रिश्‍चनांनी कोणत्या तीन आवश्‍यक गोष्टींची तयारी केली पाहिजे?

५ पुनःपुन्हा येशू ह्‍या मुख्य विषयाकडे वळतो: ख्रिस्ती जीवन जगण्याचे आव्हान. येशूचे अनुयायी बनण्यासाठी, ख्रिश्‍चनांनी, त्यांच्या नेत्याप्रमाणे स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा केली पाहिजे. (मत्तय १०:३७-३९) ख्रिश्‍चनाने तयारी केली पाहिजे अशा तीन गोष्टी त्याने नमुद केल्या आहेत: (१) स्वतःचा त्याग करणे, (२) स्वतःचा वधस्तंभ उचलणे आणि (३) सतत त्याचे अनुकरण करणे.

“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर”

६. (अ) एखादा व्यक्‍ती स्वतःचा त्याग कसा करतो? (ब) स्वतःपेक्षा आम्ही कोणाला आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

६ एखाद्याने स्वतःचा त्याग करणे याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ एखाद्याने स्वतःला पूर्णपणे नाकारणे होय, व हा एकप्रकारे स्वतःचा मृत्यू होय. भाषांतर केलेला ग्रीक शब्द “त्याग” याचा मूळ अर्थ “नाही म्हणणे” होय; म्हणजेच “पूर्णपणे नाकारणे होय.” यास्तव जर तुम्ही ख्रिस्ती जीवनाचे आव्हान स्वीकारले तर, तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, आनंद, सुखाचा त्याग करता. थोडक्यात, यहोवा देवाला सर्ववेळेसाठी तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन देता ह्‍या गोष्टीचा यात समावेश होतो. एखाद्याने स्वतःचा त्याग करण्याचा अर्थ त्याने स्वतःच्या काही सुखाचा आता आणि भविष्यात त्याग करण्यापेक्षाही अधिक अर्थ आहे. उलटपक्षी, याचा अर्थ त्या व्यक्‍तीने स्वतःचा त्याग करुन त्याची मालकी यहोवाला दिली पाहिजे. (१ करिंथकर ६:१९, २०) ज्या व्यक्‍तीने स्वतःचा त्याग केला आहे तो स्वतःला नव्हे, तर देवाला आनंदी करण्यासाठी जगतो. (रोमकर १४:८; १५:३) याचा अर्थ, त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला तो स्वतःच्या स्वार्थी इच्छेला नाही म्हणतो आणि यहोवाला होय म्हणतो.

७. ख्रिश्‍चनांचा वधस्तंभ कोणता आहे, आणि तो ते कसे उचलून नेतात?

७ तुमचा वधस्तंभ उचलून घेणे याचा गंभीर अर्थ होतो. वधस्तंभ उचलणे हे ओझे वाहणे आणि मृत्युला सूचक आहे. येशू ख्रिस्ताचे अनुयायी झाल्यामुळे, ख्रिश्‍चनांची, जरूर असल्यास त्रास सोसण्यासाठी, किंवा लज्जा किंवा यातना भोगण्यासाठी किंवा मारले जाण्यासाठी देखील तयारी असते. येशूने म्हटले: “जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.” (मत्तय १०:३८) जे त्रास सहन करतात ते सर्वच वधस्तंभ उचलत नाहीत. दुर्जनाला पुष्कळ “दुःखे” भोगावी लागतात परंतु त्यांच्याजवळ वधस्तंभ नाही. (स्तोत्रसंहिता ३२:१०) तथापि, ख्रिश्‍चनांचे जीवन हे अशा प्रकारचे जीवन आहे ज्यात त्यांनी यहोवाला स्वार्थत्यागी सेवेचा वधस्तंभ उचलणे असते.

८. येशूने त्याच्या अनुयायांसाठी जीवनाचा कोणता नमुना ठेवला आहे?

८ येशूने सांगितलेली शेवटची अट म्हणजे आम्ही सतत त्याचे अनुकरण करणे ही होय. आम्ही, त्याने जे शिकवले त्याचा स्वीकार करून त्यावर विश्‍वासच केवळ ठेवता कामा नये तर आम्ही संपूर्ण जीवनभर जो नमुना त्याने घालून ठेवला आहे त्याचे सतत अनुकरण केले पाहिजे. त्याच्या नमुनेदार जीवनातील काही प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? त्याच्या शिष्यांना त्यांची शेवटची कामगिरी सोपविताना त्याने म्हटले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा  . . , जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) येशूने राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला व शिकवले. त्याच्या निकटच्या शिष्यांनी तसेच सुरवातीच्या पूर्ण ख्रिस्ती मंडळीनेही त्याप्रमाणेच केले. हे आवेशी कार्य व जगाचे भाग नसल्यामुळे त्यांच्यावर द्वेष व विरोध आणला गेला याच्या परिणामस्वरुपात वधस्तंभ उचलून चालणे त्यांना अधिकच जड झाले.—योहान १५:१९, २०; प्रे. कृत्ये ८:४.

९. येशूने इतर लोकांना कसे वागविले?

९ येशूने दुसऱ्‍या लोकांना कसे वागविले होते हा उल्लेखनीय नमुना त्याच्या जीवनात पाहण्यास मिळतो. तो दयाळू आणि “मनाचा सौम्य व लीन” होता. यामुळे त्याच्या श्रोत्यांना आत्म्यात नवे झाल्यासारखे वाटले आणि त्याच्या उपस्थितीमुळे त्यांना उत्तेजन मिळाले होते. (मत्तय ११:२९) त्याचे त्यांनी अनुकरण करावे यासाठी त्याने दबाव आणला नाही किंवा त्यांनी कसे करावयास हवे यासाठी त्याने त्यांच्यावर नियमावर नियम लादले नाही; किंवा त्याचे शिष्य होण्यासाठी दोषीपणाच्या भावनेचा दबावही लादला नाही. त्यांचे जीवन स्वार्थत्यागाचे असतानाही त्यांनी अस्सल आनंद पसरविला. “शेवटच्या दिवसा”चे लक्षण दाखविणारा चैनबाजीचा जगाचा आत्मा प्रदर्शित करणाऱ्‍यांच्या विरुद्ध किती मोठा फरक”!—२ तीमथ्य ३:१-४.

येशूचा स्वार्थत्यागी आत्मा वाढवा आणि त्याचा पाठपुरावा करा

१०. (अ) फिलिप्पैकर २:५-८ नुसार येशूने स्वतःचा कशाप्रकारे त्याग केला? (ब) आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असल्यास कोणती मानसिक मनोवृत्ती बाळगावी?

१० स्वतःचा त्याग करण्याच्या बाबतीत येशूने उदाहरण ठेवले. त्याने त्याचा वधस्तंभ उचलून घेतला व त्याच्या पित्याची इच्छा करण्याद्वारे तो वागविला. फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांना पौलाने लिहिले: “अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरुपाचा असूनही त्याने देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्‍त केले; म्हणजे मनुष्याच्या प्रतिरुपाचा होऊन दासाचे स्वरुप धारण केले; आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:५-८) त्यापेक्षा आणखी कोण स्वतःचा त्याग करु शकतो? तुम्ही येशू ख्रिस्ताचे असल्यास आणि त्याचे एक अनुयायी असल्यास, तुम्हीही हीच मानसिक मनोवृत्ती बाळगावी.

११. स्वार्थत्यागी जीवन जगण्याचा अर्थ कोणाच्या इच्छेप्रमाणे राहणे आहे?

११ येशू आमच्यासाठी त्रास सहन करून मरण पावला यास्तव, दुसरा प्रेषित, पेत्र आम्हाला सांगतो, की ख्रिस्तासारखाच आत्मा बाळगून ख्रिश्‍चनांनी पूर्ण तयारी केलेल्या सैनिकाप्रमाणे सज्ज असावे, तो लिहितो: “ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरुपी शस्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे; ह्‍यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.” (१ पेत्र ३:१८; ४:१, २) देवाची इच्छा करण्यासाठी येशूला कसे वाटले हे त्याच्या स्वार्थत्यागी कार्यावरून स्पष्ट व्यक्‍त झाले. येशू त्याच्या भक्‍तीत एकचित्त होता, सर्वदा आणि लज्जास्पद मृत्यूच्या प्रसंगीदेखील त्याने त्याच्या पित्याच्या इच्छेला स्वतःच्या इच्छेच्या पुढे ठेवले.—मत्तय ६:१०; लूक २२:४२.

१२. येशूला स्वार्थत्यागाचे जीवन अप्रिय होते का? स्पष्ट करा.

१२ येशूचे स्वार्थत्यागाचे जीवन कठीण आणि त्याला अनुकरण करण्याचा तो आव्हानात्मक मार्ग होता, परंतु त्याला तो अप्रिय वाटला नाही. उलटपक्षी, येशूने स्वतःला दैवी इच्छेच्या अधीन होण्याचा आनंद घेतला. त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचे काम त्याच्यासाठी भोजनासारखे होते. चांगल्या भोजनाद्वारे जसे एखाद्याला समाधान मिळते त्याचप्रमाणे त्याला खरे समाधान मिळाले. (मत्तय ४:४; योहान ४:३४) तुम्हाला तुमच्या जीवनात खरी तृप्ती मिळवावयाची असल्यास, येशूची मनोवृत्ती वाढवून त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यापेक्षा आणखी काही चांगले तुम्ही करु शकत नाही.

१३. स्वार्थत्यागाच्या आत्म्याला प्रीती कशारितीने चालना देणारी शक्‍ती आहे?

१३ वास्तविकपणे, स्वार्थत्यागी आत्म्याला प्रवृत्त करणारी शक्‍ती कोणती आहे? ती प्रीती या शब्दात आहे. येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर’” (मत्तय २२:३७-३९) ख्रिश्‍चनाला, त्या शब्दांचे पालन करणे व त्याचवेळी आपमतलबी राहणे जमणार नाही. यहोवा व शेजाऱ्‍यावरील प्रेमामुळे ख्रिश्‍चनाने त्याचा आनंद आणि आस्था प्रथम तसेच पुढे ताब्यात ठेवल्या पाहिजेत. येशू त्याच प्रकारे जीवन जगला आणि म्हणून तो त्याच्या अनुयायांकडून तशीच अपेक्षा करतो.

१४. (अ) इब्रीयांस १३:१५, १६ मध्ये कोणत्या जबाबदाऱ्‍या स्पष्ट केल्या आहेत? (ब) आवेशाने राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी आम्हाला काय उत्तेजन देते?

१४ प्रेषित पौलाला हा प्रीतीचा नियम समजला, त्याने लिहिले: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्याद्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’ चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्रीयांस १३:१५, १६) ख्रिस्तीजन यहोवाला प्राण्यांचे अथवा इतर गोष्टींचे अर्पण करीत नाहीत; यास्तव त्यांना भौतिक मंदिरात उपासनेत बदली काम करण्यासाठी कोणा मानवी याजकाची गरज लागत नाही. ख्रिस्त येशूच्या द्वारे आमचा स्तुतीरुपी यज्ञ अर्पिला जातो. खासपणे त्या स्तुतीरुपी बलिदानाकरवी, त्याच्या नावाची जाहीर घोषणा, याद्वारे आम्ही देवावर प्रीती प्रगट करतो. प्रेमावर आधारीत असलेला आमचा निःस्वार्थी आत्मा, आम्हाला आवेशाने राज्याचा प्रचार करण्यास प्रोत्साहन देतो, देवाला ओठांचे फळ अर्पिण्यासाठी सर्वदा तत्पर असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशारितीने आम्ही शेजाऱ्‍यांवर देखील प्रीती प्रगट करतो.

स्वार्थत्याग समृद्ध आशीर्वाद आणतात

१५. स्वार्थत्यागाविषयी आम्ही स्वतःला कोणते आत्मपरिक्षक प्रश्‍न विचारु शकतो?

१५ क्षणभर थांबा आणि पुढील प्रश्‍नांवर जरा विचार करा: सध्याचा माझ्या जीवनाचा नमुना स्वार्थत्यागाचा मार्ग व्यक्‍त करतो का? माझी ध्येये अशा जीवनाला दर्शवितात का? माझे कौटुंबिक सदस्य माझ्या उदाहरणातून काही आध्यात्मिक गोष्टी संपादन करतात का? (पडताळा १ तीमथ्य ५:८.) अनाथ आणि विधवा यांच्याविषयी काय? स्वार्थत्यागाच्या माझ्या उदाहरणामुळे त्यांना देखील फायदा होतो का? (याकोब १:२७) मी जे जाहीरपणे स्तुतीरूपी बलिदान करतो त्यासाठी मी अधिक वेळ देऊ शकतो का? मी पायनियर, बेथेल, किंवा मिशनरी सेवेच्या विशेषाधिकाराप्रत पोहचू शकतो का, किंवा राज्य प्रचारकांची अत्यंत आवश्‍यकता असणाऱ्‍या क्षेत्रात जाऊन मी सेवा करु शकतो का?

१६. स्वार्थत्यागाचे जीवन जगण्यासाठी कौशल्य आम्हाला कशी मदत करु शकते?

१६ कधीकधी स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा करण्यासाठी आमच्या पूर्ण संभवनीय गोष्टींप्रत पोहचण्यासाठी काहीसे कौशल्य लागते. उदाहरणार्थ, इक्वेडोर येथील नियमित पायनियर जानेट, प्रापंचिक पूर्ण वेळेची नोकरी करीत होती. लवकरच, नियमित पायनियरांच्या तासांच्या आवश्‍यकतेला आनंदी आत्म्याने पूर्ण करणे तिच्या आराखड्याने तिला फारच मुश्‍कीलीचे बनविले. तिने तिच्या मालकाला ती समस्या सांगण्याचे ठरविले आणि कामाच्या तासात कपात करण्याची विनंती केली. त्याने तिचे कामाचे तास कमी करण्याची इच्छा दाखविली नाही, तेव्हा तिने नंतर अर्ध-वेळ नोकरी शोधत असणाऱ्‍या मरीयेला तेथे नेले जेणेकडून ती पायनियरींग करु शकत होती. दोघींनीही पूर्ण दिवसाचे काम भरुन देण्यासाठी प्रत्येकीने अर्धा दिवस काम करण्याची तयारी दाखवली. याला मालकाने सहमती दर्शवली. आता दोन्ही बहिणी नियमित पायनियर आहेत. हा आश्‍चर्यकारक परिणाम पाहिल्यावर, कॉफॉ ही सुद्धा त्याच कंपनीत पूर्ण वेळेची नोकरी करीत होती व तीसुद्धा नोकरी सोडायच्या बेतात होती कारण तिलाही पायनियरींगसाठी वेळ काढण्यास बराच प्रयत्न करावा लागत असे, तिने देखील मॉगॉलीला सोबत घेतले व अशीच मागणी केली. ती सुद्धा मान्य केली. दोघी पूर्ण वेळेची नोकरी सोडण्याच्या बेतात असताना आता याद्वारे चार बहिणी पायनियरींग करु शकल्या. कौशल्य आणि पुढाकार घेण्याचा फायदेशीर परिणाम झाला.

१७-२१. एका विवाहीत दांपत्याने त्यांच्या जीवनातील मुल्याचे कसे पुनरावलोकन केले, आणि त्याचा परिणाम काय झाला?

१७ आणखी, मागील दहा वर्षामध्ये इव्हॉनने घेतलेल्या स्वार्थत्यागाच्या मार्गाचा विचार करा. मे १९९१ मध्ये तिने वॉचटावर सोसायटीला खालीलप्रमाणे लिहिले:

१८ “ऑक्टोबर १९८२ मध्ये, मी आणि माझे कुटुंब ब्रुकलिन बेथेलला गेलो होतो. ते पाहिल्यावर मला असे वाटले की तेथे काम करण्यासाठी मी स्वतःला उपलब्ध करावे. मी अर्ज वाचला. आणि तेथे एक लक्षवेधक प्रश्‍न होता, ‘मागील सहा महिन्यात तुमच्या प्रचारकार्यातील तासांची सरासरी किती आहे? जर सरासरी तास दहापेक्षा कमी असल्यास, का कमी आहे याचे स्पष्टीकरण द्या.’ कमी तास असण्याचे माझ्याकडे कोणतेही खास कारण नव्हते. यामुळे मी ध्येय ठेवले आणि पाच महिन्यात ते मी पूर्ण केले.

१९ “पायनियरींग न करु शकण्याच्या काही सबबींचा जरी मी विचार मांडू शकत होते तरी, जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांचे १९८३चे वार्षिक अहवाल पुस्तक मी वाचले, तेव्हा पायनियरींग करण्यासाठी इतरांनी माझ्यापेक्षाही मोठ्या अडखळणांचा सामना केला याची मला खात्री पटली. म्हणून मी एप्रिल १, १९८३ मध्ये, माझी किफायतशीर पूर्ण वेळेची नोकरी सोडली आणि सहाय्यक पायनियर झाले, आणि तदनंतर सप्टेंबर १, १९८३ पासून नियमित पायनियरींगमध्ये प्रवेश केला.

२० “एप्रिल १९८५ मध्ये एका उत्तम सेवा-सेवकासोबत विवाह करण्याचा मला आनंद लाभला. तीन वर्षानंतर, प्रांतिय अधिवेशनात पायनियरींगविषयी दिल्या गेलेल्या भाषणाने माझ्या पतीस माझ्याजवळ कुजबूज करायला लावण्यास प्रवृत्त केले. त्यांनी विचारले, ‘सप्टेंबर १ पासून मी पायनियरींग न करण्यासारखे तुला काही कारण दिसते का?’ पुढील दोन वर्षासाठी त्यांनी माझ्यासोबत हे काम केले.

२१ “माझ्या पतीने ब्रुकलिन बेथेलमध्ये दोन आठवड्यांसाठी बांधकामाचे काम करण्यासाठी स्वतःला सादर केले आणि आंतरराष्ट्रीय बांधकामाच्या कार्यक्रमात काम करण्यासाठी अर्ज भरला. यामुळे मे १९८९ मध्ये एक महिन्यासाठी आम्ही शाखा दप्तराच्या बांधकामाच्या मदतीसाठी नायजेरीयाला गेलो. उद्या आम्ही जर्मनीचा प्रवास करणार आहोत, जेथे पोलंडला जाण्यासाठी आम्हाला परवाना दिला जाणार आहे. अशा अर्थपूर्ण आणि संस्मरणीय बांधकामाच्या कामात भाग घेण्यासाठी आणि पूर्ण-वेळेच्या सेवेच्या या नव्या प्रकाराचा भाग बनण्यासाठी आम्ही खरोखर आनंदी आहोत.”

२२. (अ) आम्ही पेत्रासारखे अजाणतेत अडखळण कसे बनू शकतो? (ब) यहोवाची स्वार्थत्यागी आत्म्याने करीत असलेली सेवा कशावर अनुषंगिक नाही?

२२ तुम्हाला स्वतःला पायनियर होणे शक्य नसेल तर, जे पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत त्यांना तो विशेषाधिकार टिकवून ठेवण्यासाठी उत्तेजन आणि कदाचित ती सेवा करीत राहण्यासाठी तुम्ही मदत करता का? किंवा तुम्ही पेत्रासारखे चांगल्या परिणामांचे ध्येय बाळगणारे काही कौटुंबिक सदस्य किंवा मित्र व्हाल, जे पूर्ण-वेळेच्या सेवकाला कदाचित सांगतील की आराम करा, आणि आरामशीर राहा, स्वतःला सांभाळा, याचा विचार करीत नाही की ते एक केवढे अडखळण बनत असते? हे खरे आहे की जर पायनियरची तब्येत गंभीर संकटात असेल किंवा जर तो ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या टाळत असेल तर त्याला काही काळासाठी पूर्ण-वेळेची सेवा सोडावी लागू शकते. यहोवाची स्वार्थत्यागी आत्म्याने केलेली सेवा पायनियर, बेथेल सदस्य किंवा इतर हुद्यावर अवलंबून नाही. उलटपक्षी, आम्ही कशाप्रकारे विचार करतो, आम्ही जे काही करतो, इतरांबरोबर आम्ही कसे वर्ततो, आणि आम्ही आमचे जीवन कसे घालवतो, आम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत यावर ते अवलंबून आहे.

२३. (अ) देवाबरोबर त्याचे सहकर्मी असल्याचा कायम आनंद आम्हाला कसा मिळू शकतो? (ब) इब्रीयांस ६:१०-१२ मध्ये आम्हाला कोणती हमी मिळते?

२३ आमच्याजवळ खरोखरच स्वार्थत्यागी आत्मा असला तर, देवाबरोबर सहकर्मी असल्याचा आमच्याजवळ आनंद असेल. (१ करिंथकर ३:९) यहोवाचे हृदय आनंदीत करीत आहोत हे माहीत असल्यामुळे आम्हाला समाधान मिळेल. (नीतीसूत्रे २७:११) यहोवाला जोवर आम्ही विश्‍वासू राहू तोवर तो आम्हाला कधीही विसरणार नाही किंवा त्यागणार नाही हा आत्मविश्‍वास आम्हाठायी आहे.—इब्रीयांस ६:१०-१२.

[तळटीपा]

a ग्रीक भाषेत, “अडखळण” (σκανδαλον, स्कॅनʹडा․लोन) “पाशाच्या भागाचे नाव होते ज्यावर आमिषाला अडकविले जात होते, या कारणास्तव, ते मुळतः पाश किंवा फास याला अनुलक्षून होते.”—वाईन एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड अँड न्यू टेस्टमेंट वर्डस्‌.

तुमचे विचार काय आहेत?

▫ स्वार्थत्यागाच्या मार्गात पेत्र अजाणतेत अडखळण कसा बनला?

▫ ‘स्वतःचा त्याग’ करण्याचा काय अर्थ आहे?

▫ एखादा ख्रिस्ती त्याचा वधस्तंभ कसा उचलून घेऊ शकतो?

▫ स्वार्थत्यागी आत्मा आम्ही कसा वाढवू आणि राखू शकतो?

▫ स्वार्थत्यागी आत्म्याच्या मागे त्याला प्रवृत्त करणारी कोणती शक्‍ती आहे?

[९ पानांवरील चित्रं]

स्वतःचा वधस्तंभ उचलून आणि सतत येशूचे अनुकरण करण्यासाठी तुम्ही स्वतःचा त्याग करण्यासाठी इच्छूक आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा