वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. ३२
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • स्मारकविधीच्या काळात आपले परिक्षण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. ३२

वाचकांचे प्रश्‍न

एखाद्या ख्रिश्‍चनाला आजारपणामुळे किंवा प्रवासात असल्यामुळे स्मारकविधिला उपस्थित राहता येत नाही, तर त्याने तो एक महिन्याने साजरा करावा का?

पुरातन इस्राएलमध्ये वल्हांडण निसान (किंवा अबीब) नावाच्या पहिल्या महिन्यात साजरा केला जात होता. परंतु आम्ही गणना ९:१०, ११ मध्ये एका खास तरतुदीबद्दल वाचतो: “इस्राएल लोकांस सांगा: तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजातला कोणी प्रेतामुळे अशुचि झाला असेल किंवा दूर प्रवासात असला तर त्याने परमेश्‍वराप्रीत्यर्थ [यहोवा न्यू.व.] वल्हांडण सण पाळावा. दुसऱ्‍या महिन्याच्या [ज्याचे नाव अय्यर ,किंवा झीव] चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा आणि वल्हांडणाचा यज्ञपशू, बेखमीर भाकर, आणि कडू भाजी यांबरोबर खावा.’”

इस्राएली किंवा कोणी घराणे त्यांची निवड करण्यास, त्यांच्या सोयीनुसार वल्हांडणाच्या दोन वैकल्पिक तारखा (निसान १४ किंवा झीव १४) स्थापित झाल्या नाहीत. दुसऱ्‍या महिन्याच्या वल्हांडणाच्या भोजनाची व्यवस्था मर्यादित होती. जो इस्राएली निसान १४ला विधिनुसार अशुद्ध असेल वा नेहमी जेथे सण साजरा केला जात होता त्या ठिकाणापासून तो कोठे दूर असेल तर त्याच्यासाठी ही सूट होती.

विश्‍वासू राजा हिज्कीयाने बेखमीर भाकरीचा सण पुन: साजरा केला हीच लिखित करण्यात आलेली घटना व्याप्त प्रमाणात वापरली आहे. हा सण पहिल्या महिन्यात साजरा होण्यासाठीं कोणी तयार नव्हते (याजक व लोक जमले नव्हते,) आणि म्हणून तो दुसऱ्‍या महिन्याच्या १४व्या तारखेला साजरा केला.—२ इतिहास २९:१७; ३०:१-५.

अशा अपवादात्मक परिस्थितींशिवाय, देवाने नेमलेल्या तारखेलाच यहुदी लोक वल्हांडण साजरा करीत होते. (निर्गम १२:१७-२०, ४१, ४२; लेवी २३:५) येशू व त्याच्या शिष्यांनी सोयीस्कर तारखेनुसार नव्हे तर नियमानुसार साजरा केला. लूक अहवाल देतो: “नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारावयाचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने [येशू] पेत्र व योहान यांस असे सांगून पाठविले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.’”—लूक २२:७, ८.

त्याप्रसंगी येशूने वार्षिक विधिची स्थापना केली ज्याला ख्रिस्तीजन प्रभूचे सांज भोजन असे ओळखतात. या सांज भोजनाला ख्रिश्‍चनांनी उपस्थित राहणे यावर अधिक जोर देता येणार नाही. यहोवाच्या साक्षीदारांना वर्षात ही सर्वात मुख्य घटना आहे. येशूच्या शब्दांवरुन हे कळून येते की त्याने असे का म्हटले. तो म्हणाला: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) यास्तव, प्रत्येक यहोवाच्या साक्षीदाराने सणाचा हा दिवस कोणत्याही इतर नेमणुकींपासून मुक्‍त ठेवण्याचा प्रयत्न फार पूर्वी करावा. प्रभूचे सांज भोजन मंगळवारी एप्रिल ६, १९९३ रोजी सूर्यास्तानंतर साजरे करण्यात येईल.

काही क्वचित प्रसंगी, अनपेक्षित परिस्थितींमध्ये जसे की आजारपण, किंवा प्रवास यामुळे एखाद्या ख्रिश्‍चनाला त्याने वा तिने योजिल्यानुसार उपस्थित राहण्यास जमणार नाही. अशा परिस्थितीत काय केले जावे?

सणाच्या वेळी बेखमीर भाकर व द्राक्षारस सर्वांसमोरुन फिरवला जातो, आणि जे देवाच्या पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेले व र्स्वागातील जीवनासाठी निवडलेले आहेत हेच फक्‍त भाग घेतात. (मत्तय २६:२६-२९; लूक २२:२८-३०) जर कोणी प्रत्येक वर्षी सण साजरा करत असेल परंतु ह्‍या वर्षी बिछान्यावर आजारी असेल किंवा इस्पितळात असेल, तर स्थानिक मंडळीच्या वडिलांनी त्या आजारी व्यक्‍तिला थोडेसे द्राक्षारस व बेखमीर भाकर पाठवावी, विषयानुसार उपयुक्‍त पवित्र शास्र वचनांची चर्चा करावी, व बोधचिन्हांना समोर मांडावे. जर एखादा अभिषिक्‍त ख्रिश्‍चन त्याच्या स्थानिक मंडळीत उपस्थित नसल्यास, तो ज्या ठिकाणी त्या तारखेला आहे तेथील मंडळीत उपस्थित राहण्याची योजना करावी.

या दृष्टीकोनातून पाहता, अपवादात्मक परिस्थितीतच केवळ एक अभिषिक्‍त ख्रिश्‍चन प्रभूचे सांज भोजन गणना ९:१०, ११ आणि २ इतिहास ३०:१-३, १५ यांच्या अनुषंगाने ३० दिवसांनंतर (चांद्र मास) साजरा करु शकतो.

येशूच्या “दुसरी मेंढरे” या वर्गाचे आहेत ज्यांना पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाची आशा आहे त्यांना भाकर व द्राक्षारसाचे सेवन करण्याची आज्ञा नाही. (योहान १०:१६) ह्‍या वार्षिक सणाला उपस्थित राहण्याची गरज आहे, परंतु ते बोधचिन्हांचे सेवन करीत नाहीत. यास्तव त्यांच्यातील कोणी एक आजारी आहे वा प्रवासात आहे आणि कूठल्याही मंडळीला उपस्थित राहू शकत नाही, तर त्याने किंवा तिने उचित वचनांना व्यक्‍तिगतरित्या वाचावे (येशूने सण स्थापित केल्याचा वृत्तांत याचाही समावेश असावा) व जगव्याप्त घटनेवर यहोवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी. तथापि अशा परिस्थितीत एक महिन्यानंतर खास पवित्र शास्रीय चर्चा किंवा सभेच्या व्यवस्थेची गरज नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा