“ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशनातील समृद्ध आशीर्वाद
सुमारे २,७०० वर्षापूर्वी यशया संदेष्ट्याने लिहिलेः “पाहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिडकाळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” (यशया ६०:२) हे शब्द किती सत्य दिसून आले! तथापि, यहोवा प्रकाश पाडण्यास कारणीभूत झाला म्हणून कोणती तरी आशा आहे. देवाच्या प्रकाशावर प्रीती करणाऱ्यांना गत वर्षी “ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशनात उपस्थित राहण्याचे उबदार निमंत्रण दिले गेले.
अधिवेशनाचा कार्यक्रम प्रथम उत्तर अमेरिकेत जूनमध्ये सादर करण्यात आला. यानंतरच्या महिन्यात, तो पूर्व आणि पश्चिम युरोपात, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि समुद्रातील बेटावर सादर करण्यात आला. उपस्थितीतांची संख्या लाखो होती. आणि त्यांनी खरोखर किती समृद्ध आध्यात्मिक अन्नाच्या मेजवानीचा आनंद उपभोगला!
“तुम्हा सर्व ज्योती वाहकांचे स्वागत असो!”
बहुतेक ठिकाणी अधिवेशनाची सुरूवात शुक्रवारी होऊन ते रविवारी दुपारी संपले. शुक्रवारी अधिवेशन प्रतिनिधी त्यांच्या जागेवर बसले, तेव्हा या शेवटल्या काळात कशाप्रकारे यहोवाचा प्रकाश अधिक प्रखर रितीने पडत आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐकण्याचा त्यांना आनंद वाटला. यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष व्यासपीठावर आले. त्यांनी म्हटले की खऱ्या ख्रिश्चनांनी ज्योती वाहक असले पाहिजे आणि उबदारपणे म्हटलेः “तुम्हा सर्व ज्योती वाहकांचे स्वागत असो!” अधिवेशनाचा कार्यक्रम प्रतिनिधींना यहोवाचा प्रकाश कायम परावर्तित करण्यासाठी मदत करील.
प्रमुख भाषणाने संपूर्ण अधिवेशनाचा सूर जुळवला. या वक्त्याने अधिवेशन प्रतिनिधींना आठवण करून दिली की एदेन बागेत त्या वेळेपासूनच मानवजातीसाठी उज्ज्वल आशा मावळली गेली. तेव्हापासून सैतानाने मानवजातीला सत्याचा प्रकाश मिळू नये म्हणून अंधळे केले आहे. (२ करिंथकर ४:४) तथापि येशू “राष्ट्रांला प्रकाश देणारा” असा आला. (यशया ४२:१-६) त्याने धार्मिक लबाड्या उघड केल्या, वाईट कर्मे अंधकाराची कामे आहेत म्हणून सिद्ध केले, व राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला. येशूच्या अनुयायांनी असेच केले—व ते आजही करीत आहेत! (मत्तय २८:१९, २०) वक्त्याने स्पष्टपणे असे म्हटले: ‘येशूप्रमाणे आम्ही, ज्योती वाहक असले पाहिजे. आमच्या दिवसात कोणतेही काम अधिक महत्वाचे नाही. आणि कोठेही मोठा विशेषाधिकार नाही.’
अधिवेशनाचे पहिले सत्र संपत असताना एक आश्चर्य घडले. अधिवेशनाचे अध्यक्ष व्यासपीठावर पुन्हा आले व चार नव्या हस्तपत्रिकांच्या मालिकेचे त्यांनी विमोचन केले. याचे उत्साहपूर्ण जयघोषाने स्वागत झाले, आणि प्रत्येक प्रतिनिधीसाठी हस्तपत्रिकाची एक प्रत उपलब्ध केली.
शुक्रवारी दुपारी, अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये ज्योती-वाहक ख्रिश्चनांसाठी मूलभूत सल्ले दिले गेले. पहिल्या दोन भाषणाने जगाच्या अंधकाराच्या प्रभावापासून कसे दूर राहू शकतो यावर उत्तम सल्ला दिला. सैतान दिव्यदूताचे रूप घेऊ शकत असल्यामुळे, आध्यात्मिक दृष्टिकोन सांभाळणे महत्वाचे आहे जेणेकडून जगातील घाणेरड्या गोष्टी आम्हाला फसवणार नाहीत. (२ करिंथकर ११:१४) पौलाने सल्ला दिलाः “या युगाबरोबर समरुप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम गृहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे हे समजून घ्यावे.” (रोमकर १२:२) ख्रिश्चनांचे रुपांतर ही कायमची क्रिया आहे हे प्रतिनिधींनी ऐकले. देवाच्या नियमाचा अभ्यास व शिकलेल्या गोष्टींचे अवलंबन केल्याने आमच्या मनाचे सतत शुद्धीकरण होत असते व त्याला घडविले जात असते. यामुळे आम्ही येशूप्रमाणे अधिकाधिक “कृपा व सत्य यांनी परिपूर्ण” होतो.—योहान १:१४.
तरुण ज्योती वाहक
शुक्रवार दुपारनंतरचा अर्धा भाग युवकांबद्दल होता. पहिल्या भाषणाने (“युवकहो—तुम्ही कोणाचा पाठलाग करता?”) विश्वासूपणाचे उत्तम उदाहरण असणाऱ्या तरुण ख्रिश्चनांची प्रशंसा केली. परंतु सैतानाचे ते खास लक्ष्य आहेत याची त्यांना आठवणही करून दिली. एका तरबेज झालेल्या खेळाडूलादेखील जशी शिक्षकाची जरुरी लागते, त्याचप्रकारे, प्रकाशात चालण्यासाठी तरुणांना त्यांच्या पालकांची व मंडळीच्या मदतीची जरुरी आहे.
हे यहोवाच्या दृष्टीने योग्य ते करत राहणे या उत्कृष्ठ नाटकाने स्पष्ट केले, याद्वारे नंतर शुक्रवारच्या कार्यक्रमाची समाप्ती झाली. राजा योशीयाच्या उदाहरणावर प्रकाश टाकला गेला. लहान मूल असतांनाही, यहोवाची सेवा करण्याचा त्याने निश्चय केला. त्याच्याभोवती वाईट प्रभाव होते, परंतु हिल्कीया मुख्य याजकाच्या मार्गदर्शनामुळे आणि देवाच्या नियमावरील त्याच्या प्रीतीमुळे, योशीयाने यहोवाच्या दृष्टीने योग्य ते केले. तरुण ख्रिश्चन आज अशाचप्रकारे वागोत.
उजेड पडू द्या
रात्रीच्या विश्रांतीनंतर, पुढील उभारणीकारक शास्त्रवचनीय सल्ल्यासाठी प्रतिनिधी शनिवारी सकाळी अधिवेशनाला आले. त्यांची निराशा झाली नाही. दैनिक वचनाने सुरूवात करून कार्यक्रमात पुढे, विविध रितीने ख्रिश्चन आपला उजेड कसा पाडू शकतो हे परिसंवादाद्वारे स्पष्ट केले. (मत्तय ५:१४-१६) प्रचारकार्य हा प्रमुख मार्ग आहे, यासोबतच चांगले वर्तनदेखील महत्वाची भूमिका पार पाडत असते. वक्त्याने म्हटलेः “प्रचारामुळे आमचा काय विश्वास आहे हे इतरांना कळत असते, परंतु प्रीतीचे अनुकरण केल्याने आम्ही ते प्रकट करीत असतो.”
अधिवेशन प्रतिनिधींचे लक्ष प्रचाराचे महत्वाचे साहित्य—हस्तपत्रिका यांजवर केंद्रित करण्यात आले. आधीच्या दिवसाची घोषणा अजूनही तशीच लक्षात असता, हे लहान साहित्य खरोखर किती सामर्थ्यवान आहे याचे अनुभव प्रतिनिधींनी ऐकले. सर्ववेळी व सर्व प्रसंगी हस्तपत्रिकांचा साठा ठेवण्याचे प्रतिनिधींना उत्तेजन दिले गेले.
पुढील लक्ष पायनियर, पूर्णवेळेचे राज्य उद्घोषक, जे ज्योती वाहण्यासाठी अधिक परिश्रम घेतात, त्यांच्याकडे दिले गेले. आम्ही आमच्या परिश्रम घेणाऱ्या पायनियरांची किती गुणग्राहकता बाळगतो! त्यांची संख्या वाढत आहे. अशा काही देशात अलिकडेच भक्तीचे स्वातंत्र मिळाले आहे, तेथेही पायनियरांच्या संख्येत वाढ होत आहे. पायनियरांना त्यांच्या विशेषाधिकाराचा ठेवा सांभाळण्याचे उत्तेजन दिले गेले. जे अद्याप पायनियर नाहीत त्यांना त्यांची परिस्थिती पडताळण्यास आर्जविले. कदाचित ते देखील पूर्ण-वेळेच्या सेवेद्वारे त्यांचा उजेड पाडण्यासाठी त्यांच्या कामात फेरबदल करू शकतील.
ज्योती वाहक असल्यामुळे अनेकदा त्याग पत्करावा लागतो, व हे पुढील भाषणाने स्पष्ट केले, “स्वार्थत्यागी आत्म्याने यहोवाची सेवा करणे.” पौलाने विनवलेः “तुम्ही आपल्या शरीरांचा जीवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा.” (रोमकर १२:१) छळात टिकून राहिलेल्यांनी स्वार्थत्यागी आत्मा प्रदर्शित केला. पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहण्यासाठी पायनियर प्रत्येक दिवशी स्वार्थत्याग पत्करतात. खरोखर, सर्वच खरे ख्रिश्चन, स्वार्थी, जगातील भौतिक गोष्टींचा पाठलाग करण्याऐवजी स्वतःला यहोवाच्या सेवेत व्यस्त होण्याचा स्वार्थत्याग करत आहेत. अशा कामाचा परिणाम यहोवाकडून अधिक समृद्ध आशीर्वादांत मिळतो.
या भाषणाने यानंतरच्या बाप्तिस्म्याच्या भाषणासाठी योग्य प्रस्तावना दिली. “ज्योती वाहक” या प्रांतिय अधिवेशनात ज्यांचा बाप्तिस्मा झाला ते हे भाषण विसरणार नाही. त्यांचा बाप्तिस्मा त्यांच्या जीवनातील ठळक भाग असेल. त्यांना याची आठवण करून दिली की ते ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करीत आहेत, ज्याचा वयाच्या ३०व्या वर्षी बाप्तिस्मा झाला होता. आणखी, बाप्तिस्मा घेतलेल्या उमेद्वारांना याची आठवण करुन देण्यास आनंद वाटला की त्यांनी “अंधकाराची कर्मे टाकून दिली” आणि “यहोवाचा दास” होण्याचा निश्चय केला. (रोमकर १२:११; १३:१२) बाप्तिस्मा घेण्यास जाण्यापूर्वी त्यांनी अधिवेशनातील समुदायापुढे आनंदाने उभे राहून मोठ्या वाणीने जाहीर प्रकटन केले. (रोमकर १०:१०) “ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशनात ज्यांनी त्यांचे समर्पण पाण्यातील बाप्तिस्मा घेऊन दर्शवले त्यांच्यावर यहोवाचा आशीर्वाद असण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.
शनिवार दुपारची वेळ काही स्पष्ट इशाऱ्यासाठी होती व हा “लोभाचा पाश टाळा,” “कोणीतरी तुमच्या उपयुक्त सवया मोडत आहे का?” आणि “प्रत्येक प्रकारच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला संभाळा” या शिर्षकरूपी भाषणाद्वारे तो देण्यात आला. या तीन भाषणांनी एखाद्या ख्रिश्चनाला दुर्बळ करण्यासाठी सैतान वापरत असलेल्या काही युक्त्यांची ओळख स्पष्ट करून दिली. यहूदा इस्कर्योत हा प्रेषित होता, परंतु पैशासाठी त्याने येशूचा विश्वासघात केला. तरुण शमुवेलाची वाढ यहोवाच्या भक्तीच्या राष्ट्रीय केंद्रस्थानी झाली, परंतु अत्यंत वाईट संगतीचा अटळरितीने त्याला सामना करावा लागला. (१ शमुवेल २:१२, १८-२०) मूर्तीपूजेत, लैंगिक अनैतिकता व लोभ यांचाही समावेश असू शकतो. (इफिसकर ५:५; कलस्सैकर ३:५) होय, लोभ, वाईट संगती आणि मूर्तीपूजा धोकेदायक आहेत व त्यांना टाळले पाहिजे.
त्यानंतर अधिवेशनाच्या कार्यक्रमात माहितीचा प्रकार व त्याची सादर करण्याची रीत बदलली. पुढील भाषणाने आस्था वाढविणारे पवित्र शास्त्रीय प्रश्न उभे केले व त्यांना उत्तरे दिली. उदाहरणार्थ, जे लोक सत्याचा स्वीकार करीत नाहीत, पण जे मोठे संकट सुरू होण्याआधीच मृत्यू पावतील अशांना पुनरूत्थान मिळेल का याचे उत्तर तुम्ही द्याल का? एखाद्या ख्रिश्चनाला, त्याला किंवा तिला योग्य असा वैवाहिक साथीदार मिळत नसला तर त्याने काय करावे? पवित्र शास्त्राचे त्यांचे ज्ञान सखोल करण्यासाठी वॉचटावर पब्लिकेशन इन्डेक्सचा, खासपणे “वाचकांचे प्रश्न” या मथळ्याखालील माहितीचा पूर्णरितीने वापर करण्याचे त्यांना उत्तेजन दिले गेले.
ख्रिस्ताची उपस्थिती आणि प्रकटीकरण
शनिवारचा शेवटचा कार्यक्रम भविष्यवाणीकडे वळला जेथे परिसंवादाचे शिर्षक, “ख्रिस्ताची उपस्थिती व प्रकटीकरण यावर उजेड पाडणे” हे होते. येशूची उपस्थिती शाबित करणाऱ्या मुख्य “चिन्हां”चा पुनर्विचार केला गेला. (मत्तय २४:३) दुसऱ्या भागात, “विश्वासू व बुद्धिमान दासां”च्या आधुनिक दिवसातील कार्याची चर्चा केली. (मत्तय २४:४५-४७) हे दाखविले की १९१९ पासून दास वर्गाने राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे काम कशारितीने विश्वासूपणे पुढे नेले. यानंतर यहोवाचा उजेड प्रतिबिंबिंत करण्यासाठी विविध राष्ट्रातून मोठा लोकसमुदाय एकत्र झाला व अभिषिक्त ख्रिश्चनांबरोबर भाग घेण्यासाठी आला. वक्त्याने समाप्ती केलीः “विश्वासू व बद्धिमान दासाला सर्वजन आवेशाने सतत पाठिंबा देवो. केवळ असे केल्याने एके दिवशी लवकरच सर्व मेंढरासमान जन ते आनंदी शब्द ऐकू शकतीलः ‘अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले ते वतन करून घ्या.’”—मत्तय २५:३४.
शेवटच्या वक्त्याने येशूच्या प्रकटीकरणाचा अर्थ व संबंध याची चर्चा केली. (१ करिंथकर १:७) ते प्रकटीकरण किती अनुभवाचे असेल बरे! मोठ्या बाबेलचा नाश केला जाईल. ह्या व्यवस्थेच्या नाशात, सैतान, येशू व त्याच्या देवदूतांमधील मोठ्या लढाईचा परिणाम या व्यवस्थेचा अंत करण्यात होईल. शेवटी सैतानाला अगाधकूपात टाकले जाईल व त्याला निष्क्रिय केले जाईल. परंतु स्वर्गात कोकऱ्याच्या लग्नाने व नवी पृथ्वी आणल्याने देवाच्या लोकांकरता तो सुटकेचा काळ असेल. वक्त्याने त्याच्या श्रोत्यांस डज गॉड रिअली केअर अबाउट अस? या नवीन माहितीपत्रकाचे विमोचन करुन आनंदी केले. काळजी घेणारा आमचा सृष्टीकर्ता व आमच्यासाठी असलेले त्याचे उद्देश जाणणे नम्र व्यक्तींसाठी किती चांगली मदत आहे!
ख्रिस्ती घराणे
आता शेवटी, अधिवेशनाचा समाप्तीचा दिवस रविवार आला होता. परंतु, आणखी पुष्कळ सादर करावयाचे होते. दैनिक वचनाच्या चर्चेनंतर, “ख्रिस्ती घरात एकमेकांची काळजी वाहणे” या परिसंवादामार्फत ख्रिस्ती घराकडे लक्ष दिले गेले. याच्या पहिल्या भागाने अधिवेशन प्रतिनिधींना यशस्वी ख्रिस्ती कुटुंब असण्याच्या रहस्याची जाणीव करण्यास मदत केलीः आध्यात्मिक आस्था प्रथम स्थानी ठेवण्यामुळे. दुसऱ्या भागाने, सभेला उपस्थित राहण्यासाठी त्याचप्रमाणे क्षेत्रसेवा, कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यास किंवा मनोरंजन या सर्व गोष्टी कुटुंबांनी एकत्र मिळून करण्यासाठी उत्तेजन दिले. परिसंवादातील तिसऱ्या भागाने अधिवेशन प्रतिनिधींना त्यांचे विशेषाधिकार आणि वयस्करांची काळजी वाहण्याचे स्मरण करून दिले. “आमचे वयस्कर भाऊ व बहिणी मंडळीसाठी ठेवा आहेत.” असे वक्त्याने म्हटले. तर मग आपण त्यांच्या अनुभवाचा ठेवा करु व त्यांच्या सात्विकतेचे अनुकरण करु या.
“मर्यादेने” या वाक्प्रचाराच्या अर्थाचे नंतर परिक्षण केले गेले. (१ पेत्र ४:७) जो मर्यादशील असतो तो संतुलित, समंजस, समजूतदार, नम्र आणि तर्कशुद्ध असतो. तो खरे आणि खोटे, चूक आणि बरोबर यात फरक समजू शकतो. आणखी तो चांगली आध्यात्मिक स्थिती राखण्यासाठी झटत असतो.
रविवार सकाळच्या कार्यक्रमातील अंतिम भाषणाने देव आणि ख्रिस्तास आमची अधीनता यावर चर्चा केली. वक्त्याने म्हटले, “यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला आमच्या ईमानदारीच्या अधीनतेच्या महत्त्वावर आणखी जोर द्यावयास नको.” त्याने हे दाखविले की त्याचा आमच्या जीवनातील प्रत्येक दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो. अधीनतेत राहण्यासाठी आम्हाला काय मदत करील? चार गुणः प्रीती, ईश्वरी भय, विश्वास आणि विनयशीलता.
रविवार दुपार
अचानकपणे, रविवार दुपार आली, व आता अधिवेशनाच्या अंतिम कार्यक्रमाची वेळ झाली. पुष्कळांना असे वाटले की अधिवेशन नुकतेच सुरू झाले, आणि आता ते समाप्तीसही पोहचत आहे.
जाहीर व्याख्यानाचा विषय “जगाच्या प्रकाशाचे अनुकरण करा” हा होता. जीवन जगण्यासाठी नैसर्गिक प्रकाशाच्या भूमिकेची अत्यंत आकर्षक स्पष्टता उपस्थितांना दिली गेली. यानंतर वक्त्याने आध्यात्मिक प्रकाशाचे मोठे महत्त्व दाखविले. नैसर्गिक प्रकाश आम्हाला काही दशके जिवंत ठेवतो पण आध्यात्मिक प्रकाश तर आम्हाला सदासर्वकाळ जिवंत ठेवतो. या भाषणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे योहान १:१-१६च्या प्रत्येक वचनाची चर्चा, ज्यात येशूची ओळख जगाचा प्रकाश अशी केली आहे. आज, या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या समाप्तीस असताना, या भूमिकेत येशूचे अनुकरण पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे बनले आहे.
त्या आठवडी नियुक्त केलेल्या टेहळणी बुरूज अभ्यासाच्या लेखाचा सारांश झाल्यावर, समाप्तीच्या भाषणाची ती वेळ होती. अभिरुचीने, वक्त्याने हे दाखवले की येणाऱ्या दिवसात अनेक अशा गोष्टींची आम्ही अपेक्षा करून आहोत. उदाहरणार्थ, त्यांनी डुईंग गॉड्स विल वीथ झील या नाटकाच्या ऑडीओकॅसेट बद्दल घोषणा केली आणि एवढेच सर्व नव्हते. व्हिडीओ कॅसेटची नवीन मालिका द बायबल—अ बुक ऑफ फॅक्ट अँड प्रॉफेसी या नावाने होती, याचा प्रथम विषय द बायबल—ॲक्युरेट हिस्ट्री, रिलायबेल प्रॉफेसी आहे.
शेवटी, वक्त्याने १९९३ मध्ये चार दिवसाचे प्रांतिय अधिवेशन असेल याची घोषणा केली, खास आंतरराष्ट्रीय एकत्रीत येणाऱ्यात आफ्रिका, आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा समावेश असेल. “ज्योती वाहक” अधिवेशन समाप्तीला आले होते तरी देखील प्रतिनिधी पुढील वर्षासाठी योजना बनविण्यास सुरूवात करू शकत होते.
यानंतर प्रतिनिधींची घरी जाण्याची वेळ आली. खात्रीने, ह्या अधिक अंधकारमय होत चाललेल्या जगात सतत प्रकाश पाडत राहण्यासाठी त्यांनी अधिक निश्चय केला. तीन दिवसाच्या भरगच्च चांगल्या आध्यात्मिक गोष्टीनंतर, समाप्तीच्या भाषणात उद्धृत केलेल्या वचनातील शेवटच्या शब्दाने मोठी विस्मयकारकता धारण केलीः “परमेश्वर [यहोवा न्यू.व.] देव आहे त्याने आम्हांस प्रकाश दिला आहे परमेश्वराचे [यहोवा न्यू.व.] उपकारस्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.”—स्तोत्रसंहिता ११८:२७, २९.