एवढी निराशा का?
चांगल्या जीवनाची आशा सरतेशवेटी सफळ झाली! पूर्वी पूर्व जर्मनीत राहणाऱ्या लोकांना जेव्हा बर्लिनची भिंत नोव्हेंबर १९८९ मध्ये कोसळली तेव्हा असेच वाटले. तथापि, एक वर्षापेक्षा थोडा अधिक काळ लोटला नाही तोच, यांनी अशी तक्रार केली की, “पूर्वी बर्लिन भिंतीद्वारे संरक्षित असणाऱ्या जीवनापेक्षा हे भांडवलशाही लोकसत्ताक जगाच्या त्रासाचे जीवन अधिक कठीण वाटते आहे.” याचा परिणाम तो काय? भ्रमनिरास व वाढती निराशा.
घरगुती व मुलकी हिंसाचाराला कंटाळून लोक सुरक्षिततेसाठी आपले राहते घर सोडून दुसरीकडे स्थलांतर करतात, पण ती थोड्या लोकांनाच मिळते. काही तर बेघर होतात व अशांना शहरातील रस्त्यावर आपला डेरा द्यावा लागतो. काही देशात यापैकीच्या पुष्कळांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नियमांना तोंड द्यावे लागते. कामधंदा नाही म्हणून राहायला घर मिळू शकत नाही, आणि रस्त्यावर राहावे लागत असल्यामुळे नोकरीही नाही अशी काहींची स्थिती होते. सरकारी कल्याण योजना यांना मदत देण्याचा प्रयत्न करतात, पण समस्येचे निराकरण होण्यासाठी बराच वेळ लागतो. या कारणामुळे चिडखोरपणा व निराशा सतावत राहते.
निराशेमुळे कित्येक स्त्रियांनी धक्कादायक कृत्ये केली आहेत. विमेन ॲण्ड क्राईम इन द १९९०ज् या अहवालात डॉ. सूझन एडवर्डस् म्हणतातः “कित्येक तरुण स्त्रिया शिस्तीची उणीव किंवा कौटुंबिक पार्श्वभूमि या कारणांनी नव्हे तर पैशांची गरज लागल्यामुळे [वेश्या व्यवसायात] सहभागी होतात.” याचप्रमाणे नोकरीच्या शोधार्थ घर सोडलेल्या कित्येक युवकांना नोकरी मिळत नाही. मग, निराश होऊन हे युवक वाईट कामाला लागतात. ते अन्न व निवाऱ्यासाठी पुरुषगामी कृत्यात पडतात आणि गुन्हेगारांच्या हातचे खेळणे बनतात.
जाचक राजकीय गोष्टी, हिंसाचार, आर्थिक अडचणी या सर्व गोष्टी नैराश्य उद्भवतात. व्यावसायिक लोक देखील आपली संपन्न जीवनशैली राखण्यासाठी वाढत्या आर्थिक समस्यांना तोंड देत असता या नैराश्यापासून वेगळे असू शकत नाही. याचा परिणाम तो काय? प्राचीन काळच्या शलमोन राजाने म्हटले तसे, “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.”a (उपदेशक ७:७) खरेच, निराशा ही वाढत्या संख्येच्या लोकांना पराकोटीचा मार्ग अनुसरण्याला निरविते. आत्महत्या हा तो मार्ग होय.
मोठा खडतर मार्ग
युवकांच्या आत्महत्येची विविध प्रकरणे, ती नैराश्यांनी पछाडलेली होती हे दाखवितात. एका ब्रिटीश वार्ताहर महिलेने विचारलेः “आमच्या काळात किशोरवयीनांमधील वाढती निराशा का आहे?” विषप्राशन केल्यामुळे इस्पितळात दाखल केलेल्या ८ ते १६ वर्षे मुलांच्या अभ्यासाद्वारे लंडन इन्स्टिट्युट ऑफ सायकिॲट्रीचे डॉ. एरीक टेलर म्हणतातः “निराशा व व्यर्थता या गोष्टी एकंदर मुलात लक्षणीय होत्या.” प्राणघातकी नव्हे तरी हेतुपुरस्सर विष प्राशन करण्याची प्रतिवर्षी १,००,००० प्रकरणे ब्रिटनने कळवली आहेत, जेथे मदतीची केवढी तातडीची गरज होती हे त्या विषप्राशनाच्या कृत्याद्वारे दिसून येते.
एका ब्रिटीश धर्मादाय संस्थेने निराशीत लोकांचे सहानुभूतीने ऐकून घेण्याची मोहीम उघडली. याद्वारे, संस्थेतील सल्लागारांनी “मृत्युऐवजी इतर पर्याय” दाखवून दिल्याचा दावा केला. तरीपण, लोकांना ज्यामुळे निराशा उद्भवते त्या समस्या सोडविण्यात आपण असमर्थ आहोत हे त्यांनी कबूल केले.
आत्महत्येचे प्रमाण “समाजात मिळालेली दुराव्याची पातळी व सामाजिक अवलंबत्वाची उणीव” प्रवर्तित करते, असे द संडे कॉरस्पॉन्डंट या वृत्तपत्राने म्हटले. पण आत्महत्येची इतकी वाढती पातळी का? त्या वर्तमानपत्राने पुढे म्हटले की, “बेघरपणा, अति मद्यप्राशन, एडस्ची भीती, आणि मनोरुग्णालयातील वास्तव्य” या गोष्टी काहींना इतक्या निराशेच्या थराला आणतात की, आपल्या समस्येचा एकमेव तोडगा म्हणजे आत्महत्या हा विचार त्यांना येतो.
ही निराशा घालवून देण्याची काही आशा आहे का? होय! “नीट उभे राहा, आणि आपली डोकी वर करा,” हे येशू आवर्जून सांगतो! (लूक २१:२८) त्याचा काय अर्थ होता? कोणती आशा आहे?
[तळटीपा]
a थिऑलॉजिकल वर्डबुक ऑफ द ओल्ड टेस्टमेंट या हॅरिस, आर्चर व वॉटके यांनी संपादित केलेल्या पुस्तकानुसार “जुलूम” या शब्दाचा मूळ भाषेतील शब्द “खालच्या दर्जावरील लोकांवर भार टाकणे, पायदळी तुडविणे व चिरडणे” या अर्थाला अनुलक्षून आहे.