वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ५/१ पृ. ३०
  • विश्‍वासात दृढ राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासात दृढ राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी नियमांवर आधारलेली वागणूक
  • सहनशीलतेमुळे आशीर्वाद मिळतात
  • आपल्या मोलवान विश्‍वासाला धरून राहू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • मेकअप करण्याबद्दल आणि दागदागिने घालण्याबद्दल बायबल काय म्हणतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • “तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ५/१ पृ. ३०

विश्‍वासात दृढ राहा!

पेत्राचे पहिले पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये

यहोवाच्या साक्षीदारांना विविध छळ किंवा विश्‍वासाच्या परिक्षांना तोंड द्यावे लागत आहे. काही देशात त्यांचे राज्य प्रचाराचे कार्य हे मोठ्या छळात चालले आहे. यामागे, त्याचप्रमाणे देवावरील त्यांच्या विश्‍वासाचा नाश करण्याच्या प्रयत्नामागे दियाबल सैतान आहे. पण यात तो यशस्वी होऊ शकणार नाही, कारण यहोवा आपल्या सेवकांना सबळ, होय, विश्‍वासात दृढ करतो.

“निरनिराळ्या परिक्षांमुळे दुःख” सहन करणाऱ्‍या “भावांस स्थिर कर”ण्याचा हक्क प्रेषित पेत्राला मिळाला. (लूक २२:३२; १ पेत्र १:६, ७) हे काम त्याने आपल्या पत्राद्वारे केले, जे बाबेलातून इ. स. ६२-६४ च्या दरम्यान लिहिण्यात आले. यामध्ये पेत्राने यहुदी तसेच विदेशी ख्रिश्‍चनांना सल्ला दिला, समाधान पुरवले आणि उत्तेजन दिले; त्यांना दियाबलाच्या हल्ल्यामध्ये टिकून राहण्यासाठी आणि “विश्‍वासात दृढ” राहण्याची मदत दिली. (१ पेत्र १:१, २; ५:८, ९) सध्या दियाबलाचा वेळ फारच कमी राहिलेला आहे व त्याचे हल्ले अधिकाधिक उग्र होत आहेत हे पाहता, आज यहोवाच्या लोकांना पेत्राच्या प्रेरित शब्दांकरवी निश्‍चितपणे लाभ मिळू शकतो.

ईश्‍वरी नियमांवर आधारलेली वागणूक

आमची आशा स्वर्गीय अथवा पृथ्वीवरील असो, तिने आम्हास परिक्षांमध्ये टिकून राहण्याचे आणि ईश्‍वरी मार्गाने कृती आचरण्याचे साहाय्य द्यावे. (१:१–२:१२) स्वर्गीय वतनदारीच्या आशेमुळे अभिषिक्‍त जन छळांमध्येही हर्षित होतात. खरे म्हणजे, छळ त्यांच्या विश्‍वासाची शुद्धी करतो. ख्रिस्तावर उभारण्यात आलेले आध्यात्मिक घर या अर्थी ते देवाला स्वीकृत वाटणारी यज्ञार्पणे सादर करतात आणि आपल्या चांगल्या आचरणाद्वारे त्याला गौरव मिळवून देतात.

सर्व लोकांबरोबर आमचे दळणवळण ईश्‍वरी तत्त्वांनुरुप असण्यास हवे. (२:१३–३:१२) आम्ही मानवी अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे असे पेत्र दर्शवितो. घरच्या चाकरांनी आपल्या धन्याच्या आणि बायकांनी आपल्या पतींच्या अधीन राहिले पाहिजे. ख्रिस्ती पत्नीच्या ईश्‍वरी वागणूकीने तिच्या विश्‍वासात नसलेल्या पतीला खऱ्‍या विश्‍वासात मिळवून घेता येईल. विश्‍वासात असलेल्या पतीने ‘अधिक नाजूक पात्र या अर्थी बायकोसोबत सूज्ञतेने सहवास’ ठेवला पाहिजे. सर्व ख्रिश्‍चनांनी समसुखदुःखी, बंधूप्रेम दर्शविणारे, बरे ते करणारे आणि शांतीचा मार्ग धरणारे असावे.

सहनशीलतेमुळे आशीर्वाद मिळतात

खऱ्‍या ख्रिश्‍चनांची विश्‍वासू सहनशीलता त्यांच्या आशीर्वादास कारणीभूत होईल. (३:१३–४:१९) आम्हाला धार्मिक गोष्टींखातर त्रास होत आहे तर धन्यता वाटावी. तसेच ख्रिस्ताने आम्हाला देवाजवळ नेण्यासाठी देहामध्ये दुःख सोसले असल्यामुळे आम्ही यापुढे आपल्या दैहिक इच्छेनुरुप जगू नये. आम्ही परिक्षांचा सामना विश्‍वासूपणे केल्यास येशूच्या प्रकटीकरणाच्या वेळी आम्हाला मोठ्या आनंदात सहभागी होता येईल. ख्रिस्ताच्या नावाने किंवा त्याचे शिष्य आहोत म्हणून निंदा होणे यामुळे आम्हाला आंनद वाटावा, कारण यामुळे आम्हाठायी यहोवाचा आत्मा आहे हे सिद्ध होते. आपण देवाच्या इच्छेनुरुप सहन करीत असता स्वतःला त्याला सोपून देऊ या आणि चांगले ते करीत राहू या.

ख्रिस्ती या नात्याने आम्ही आपली कर्तव्ये विश्‍वासूपणे पार पाडण्यास हवी आणि देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्यास हवे. (५:१-१४) वडीलांनी देवाच्या कळपाचे पालन स्वेच्छेने केले पाहिजे, आणि आम्ही सर्वांनी आपल्या चिंता यहोवावर टाकाव्या, कारण तो आमची काळजी वाहतो हे आपल्याला ठाऊक आहे. याचप्रमाणे आम्ही दियाबलाविरूद्ध आपली भूमिका ग्रहण केली पाहिजे व कधीही निराश होऊ नये, कारण आमच्या बांधवांनाही आम्हासारखी दुःखे सहन करावी लागत आहेत. यहोवा देव आम्हास दृढ करील आणि विश्‍वासात दृढ राहण्यासाठी तोच आम्हास समर्थ करील हे आपण नेहमी ध्यानात असू द्यावे.

[३० पानावरील चौकट/चित्र]

स्त्रीची शोभाः पेत्राने ख्रिस्ती स्त्रियांना उपदेश देताना असे म्हटलेः “तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाक करणे ह्‍यांत बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्ठीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.” (१ पेत्र ३:३, ४) पहिल्या शतकातील विदेशी स्त्रिया खूप थाटमाट करीत; त्या आपल्या लांब केसांच्या भपकेबाज वेण्या घालीत व त्यात सोन्याचे अलंकार गुंफीत असत. पुष्कळजण निव्वळ दिखाऊपणासाठी हे करीत हे उघड आहे व हे ख्रिश्‍चनांसाठी साजेसे नाही. (१ तीमथ्य २:९, १०) तथापि, सर्व भूषणे चुकीची नाहीत, कारण पेत्र “पोषाक करणे” याचा उल्लेख करतो; आणि पोषाक हा जरुरीचा आहे. प्राचीन काळी देवाच्या सेवकांनी दागिने वापरली होती. (उत्पत्ती २४:५३; निर्गम ३:२२; २ शमुवेल १:२४; यिर्मया २:३२; लूक १५:२२) तथापि, ख्रिस्ती स्त्री निश्‍चितपणे भपकेदार अलंकार व इंद्रियोद्दीपक वस्त्रे घालणार नाही व तसेच काही सौंदर्यप्रसाधने वापरलीच तर ती माफक असतील. प्रेषिताच्या या सूचनेचा मतितार्थ हा की, तिने बाहेरील दिखाऊपणावर नव्हे तर आंतरिक सौंदर्याकडे आपले लक्ष द्यावे. खरेपणाने आकर्षक बनण्यासाठी तिने सभ्य पेहराव करावा आणि आपले आचरण देवभिरु स्त्रियांप्रमाणे ठेवावे.—नीतीसूत्रे ३१:३०; मीखा ६:८.

Israel Department of Antiquities and Museums; Israel Museum/David Harris

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा