देवाच्या भविष्यवादित वचनाकडे लक्ष द्या!
पेत्राचे दुसरे पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये
अंधाऱ्या ठिकाणी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे यहोवाचे भविष्यवादित वचन किंवा संदेश आहे आणि खऱ्या ख्रिश्चनांनी त्याच्याकडे सातत्याने लक्ष देण्यास हवे. हे, खोटे शिक्षक धर्मत्याग पसरवीत असता करणे सोपे नाही. पण ईश्वरी मदतीकरवी ते साध्य करता येईल. अत्यंत जलदगतीने येणाऱ्या यहोवाच्या दिवसामधून आपला निभाव लागायचा आहे तर आम्ही देवाच्या वचनाला चिकटून असले पाहिजे.
प्रेषित पेत्राचे दुसरे प्रेरित पत्र आपल्याला देवाच्या भविष्यवादित वचनाकडे लक्ष देण्यामध्ये मदत देते. पेत्राने आपले हे पत्र कदाचित बाबेलमधून इ. स. ६४ च्या सुमाराला लिहिले असावे. या पत्रात त्याने देवाच्या सत्याविषयीची शिफारस केली आहे, यहोवाचा चोरासारखा येणाऱ्या दिवसाविषयी समविश्वासूंना इशारा दिला आहे आणि आज्ञाभंजक लोकांच्या चुकीमध्ये सापडून वाहवून न जाण्याविषयी आपल्या वाचकांना बोध केला आहे. यहोवाचा दिवस जवळजवळ आलाच आहे त्यामुळे पेत्राच्या प्रेरित वचनांपासून आम्हाला मोठा लाभ मिळवता येईल.
भविष्यवादित वचनावर भाव
ख्रिस्ती या नात्याने आपण ईश्वरी गुण प्रदर्शित करण्यात झटले पाहिजे व भविष्यवादित वचनांकडे लक्ष दिले पाहिजे. (१:१-२१) अक्रियाक किंवा निष्फळ होऊ नये यासाठी आपण ‘आपल्या विश्वासात सात्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, ईश्वरी भक्ती, बंधुप्रेम व प्रीती यांची भर घातली पाहिजे.’ पेत्राने येशूचे झालेले रुपांतर पाहिले व त्यावेळी देवाने ख्रिस्ताविषयी केलेले भाष्य ऐकले तेव्हा भविष्यवादित वचनांची निश्चिती झाली. (मार्क ९:१-८) त्या ईश्वरप्रेरित वचनांकडे आपण लक्ष देण्यास हवे.
धर्मत्याग्यांना टाळा
देवाच्या भविष्यवादित वचनाकडे नीट लक्ष दिल्यामुळे आपल्याला धर्मत्याग्यांपासून तसेच इतर भ्रष्ट लोकांपासून दूर राहता येईल. (२:१-२२) मंडळीत खोटे शिक्षक घुसतील हे पेत्राने आधीच ताकीद देऊन म्हटले. तरीपण, यहोवा या धर्मत्याग्यांविरुद्ध प्रतिकूल दंड देणार; जसे त्याने आज्ञाभंजक देवदूतांना, नोहाच्या काळातील अभक्त जगाला आणि सदोम व गमोरा या शहरांना दंड दिला होता. खोटे शिक्षक देवाने नेमलेल्या अधिकाराची निंदा करतात आणि दुर्बळांना आपल्या चुकीच्या कर्मात येण्यासाठी मोहित करतात. अशा धर्मत्याग्यांनी “नीतीमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरविणे यापेक्षा तो न समजणे हे त्यांच्यासाठी बरे होते.”
यहोवाचा दिवस येत आहे!
या शेवटल्या दिवसात भविष्यवादित वचनांकडे लक्ष देणारे या नात्याने आम्ही स्वतःला थट्टेखोरांच्या आहारी जाऊ देऊ नये, जे यहोवाच्या येण्याविषयीच्या संदेशाचा उपहास करतात. (३:१-१८) ते हे विसरतात की, ज्या देवाने हे व्यवस्थीकरण नष्ट करण्याचे उद्देशिले आहे त्यानेच जलप्रलयापूर्वीच्या जगाचा नाश केला होता. यहोवाच्या सहनशीलतेचा मंदपणा असा अर्थ घेऊ नये, कारण लोकांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. हे व्यवस्थीकरण “यहोवाच्या दिवशी” नष्ट होईल व त्याच्या जागी “ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” यांची प्रस्थापना केली जाईल. यासाठीच, आपण “निष्कलंक व निर्दोष” असावे म्हणून होईल तितके प्रयत्न करण्यास हवेत. खोट्या शिक्षकांमार्फत वाहवून जाण्याऐवजी आपण येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढावे.
आपण पेत्राचे शब्द आपल्या अंतःकरणी लावू या. खोट्या शिक्षकांविरुद्ध आपली दक्षता सोडू नका. यहोवाचा दिवस लवकरच येईल अशी सावधगिरी बाळगून राहा. आणि देवाच्या भविष्यवादित वचनांकडे नेहमी लक्ष देत राहा.
[३१ पानावरील चौकट/चित्रं]
तार्तरसमध्ये टाकलेः “ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची [यहोवाने] गय केली नाही; तर त्यांस तार्तरसमध्ये टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले.” (२ पेत्र २:४) होमरच्या इलियड मध्ये एक भूमिगत जागा दाखवण्यात आली आहे व तेथे कमी श्रेष्ठ खोटी दैवते, क्रोनस व इतर टायटन आत्मे यांना बंदिखान्यात ठेवले असल्याचे चित्रित केले आहे. त्या दंतकथेचा तार्तरस येथे नाही. पवित्र शास्त्रीय तार्तरस म्हणजे नीचावस्था व बंदिस्त स्थिती जेथे देवाने नोहाच्या काळातील आज्ञाभंजक देवदूतांना टाकून दिले. (उत्पत्ती ६:१-८; १ पेत्र ३:१९, २०; यहूदा ६) ती “अंधकारमय” अवस्था ही त्या दूतांना देवाने आपल्या कुटुंबातून हाकून लावल्यामुळे जो आध्यात्मिक प्रकाश मिळू शकत नाही, त्यामुळे मिळाली आहे. त्यांना प्रतिकूल न्यायनिवाड्यासाठी राखून ठेवले असल्यामुळे त्यांची दृष्टी केवळ अंधकारमय बनली आहे. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीच्या आरंभाला जे अगाधकूपात टाकले जाणार आहे त्याची तार्तरस ही पूर्वसूचकता आहे. येशूची हजारवर्षीय राजवट संपल्यावर त्यांचा नाश करण्यात येईल.—मत्तय २५:४१; प्रकटीकरण २०:१-३, ७-१०, १४.
[चित्र]
दंतकथेतील तार्तरसमध्ये झेऊस कमी प्रतीच्या दैवतांना टाकतो
[चित्राचे श्रेय]
National Archaeological Museum, Athens, Greece