वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ३/१ पृ. २८-३०
  • स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दयाशील याजक व राजे
  • आत्म्याची साक्ष
  • ते सहभागी का होऊ शकतात?
  • चुकीच्या विचारधारणा का?
  • काळजीपूर्वक परिक्षण महत्त्वाचे
  • निवड कोण करतो ते लक्षात घ्या
  • प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘मी तुम्हाला राज्य नेमून देतो’
    उपासनेतील ऐक्य
  • लवकरच देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाचा आत्मा स्वतः आपल्याला साक्ष देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ३/१ पृ. २८-३०

स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे?

यहोवा देव मानवी वंशावर प्रेम करतो. हे प्रेम इतके अगाध आहे की, त्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला, आदामाने जे गमावले होते ते मुक्‍त करण्यासाठी खंडणी म्हणून अर्पण केला! ते काय होते? सर्व हक्क व आशादायक असे चिरकालिक व पूर्णत्व असलेले मानवी जीवन. (योहान ३:१६) ही खंडणी येशूच्या मानवजातीवरील प्रेमाचे प्रतिक होती.—मत्तय २०:२८.

येशूच्या खंडणीच्या त्यागावर आधारीत असलेल्या देवाने प्रस्तुत केलेल्या दोन प्रकारातील आशांद्वारे ही ईश्‍वरी प्रीती दर्शविण्यात आली आहे. (१ योहान २:१, २) येशू मनुष्य या नात्याने मरण पावण्यापूर्वी ईश्‍वरी पसंतीस उतरलेल्यांना एकच आशा उपलब्ध होती व ती म्हणजे पृथ्वीवरील नंदनवनातील जीवन. (लूक २३:४३) तथापि, इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टनंतर यहोवा देवाने “लहान कळप” यासाठी स्वर्गीय आशा दिली. (लूक १२:३२) परंतु अलिकडील काळात काय घडले आहे? १९३१ पासून राज्याच्या या संदेशाने “दुसरी मेंढरे” यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे व १९३५ पासून देव मेंढरासमान असणाऱ्‍या या “मोठ्या लोकसमुदाया”स ख्रिस्ताद्वारे एकत्रित करीत आहे. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) यांच्या अंतःकरणात देवाने पृथ्वीवरील नंदनवनातील चिरकालिक जीवनाची आशा रुजवली आहे. त्यांना पूर्णांन्‍न खावयास पाहिजे, प्राण्यांवर प्रेमळ सत्ता गाजवायची आहे व नीतीमान सहकाऱ्‍यांबरोबर चिरकाल संबंध ठेवायचे आहेत.

दयाशील याजक व राजे

प्रीतीमुळेच येशूने त्याचे जीवन खंडणी म्हणून दिले आहे तर नक्कीच तो एक प्रेमळ स्वर्गीय राजा असेल. परंतु या हजार वर्षांच्या राज्याच्या कारकिर्दीत मानवाला पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केवळ एकटा येशूच करणार नाही. यहोवाने इतर प्रेमळ राजांची स्वर्गामध्ये तरतूद केली आहे. होय, ते “देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर हजार वर्षे राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:१-६.

येशूबरोबर किती राज्यकर्ते असतील व या भव्य विशेषाधिकारासाठी त्यांची निवड कशी केली आहे? प्रेषित योहानाने स्वर्गीय सियोन पर्वतावर कोकरा येशू ख्रिस्त याच्याबरोबर १,४४,००० जन पाहिले. “मानवजातीतून विकत” घेतल्यामुळे परिक्षांना तोंड देण्याचा अनुभव, अपूर्णत्वाची ओझी वाहणे, दुःख सहन करणे व मानव म्हणून मरण पावणे या सर्वांचा अर्थ काय हे त्यांना समजण्याजोगे आहे. (प्रकटीकरण १४:१-५; ईयोब १४:१) मग, ते कोणत्या रितीने दयापूर्ण राजे व याजक असतील?

आत्म्याची साक्ष

या १,४४,००० जणांचा यहोवा या “पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे.” (१ योहान २:२०) ते स्वर्गीय आशेसाठी अभिषिक्‍त होणे आहे. देवाने त्यांच्यावर ‘शिक्काही केला व त्यांच्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला.’—२ करिंथकर १:२१, २२.

होय, स्वर्गीय हाक असणाऱ्‍यांना देवाचा आत्मा साक्षी आहे. हे विचारात घेऊन पौल रोमकरांना ८:१५-१७ मध्ये लिहितोः “कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले तर वारीसही आहोत; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगीत असलो तरच.” हे अभिषिक्‍त देवाच्या आत्म्याद्वारे किंवा त्याच्या कार्यकारी शक्‍तीद्वारे “अब्बा, बापा” अशी साद घालतात.

एखाद्या व्यक्‍तीला स्वर्गीय जीवनाची हाक आहे हे समजण्याचा प्रमुख पुरावा म्हणजे आत्मा किंवा पुत्र या नात्याचे प्रभावी वर्चस्व. (गलती ४:६, ७) अशी व्यक्‍ती याबाबतीत पूर्ण खात्री बाळगून असते की, स्वर्गीय राज्याचे जे १,४४,००० वारीस आहेत त्यातील एक आध्यात्मिक पुत्र म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्याची स्वर्गीय आशा ही केवळ त्याने बाळगलेली किंवा कल्पिलेली इच्छा नाही याचे त्याने परिक्षण केले पाहिजे व त्याला समजले पाहिजे की, ती यहोवाकडून आहे व देवाच्या आत्म्याची त्याच्याबाबत झालेली ती हालचाल आहे.—१ पेत्र १:३, ४.

देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली अभिषिक्‍ताचा आत्मा किंवा प्रबळ विचार शक्‍ती जोरदार वेगाने कार्य करते. त्यामुळे स्वर्गीय आशेविषयी देवाचा शब्द जे काही सांगतो त्याला होकारात्मक प्रतिसाद ते देतात. पवित्र आत्म्याद्वारे यहोवाने त्यांच्याशी ज्या वाटाघाटी केल्या आहेत, त्यालाही ते सकारात्मक प्रतिसाद देतात व त्यांची खात्री आहे की, ते देवाची आध्यात्मिक मुले व वारीस आहेत.

जेव्हा अभिषिक्‍त, देवाचे वचन त्याच्या आध्यात्मिक मुलांबाबत व स्वर्गीय आशेबाबत काय म्हणते हे वाचतात तेव्हा स्वयंप्रेरित उत्स्फुर्ततेने ते स्वतःशी म्हणतातः ‘होय, तो मीच आहे!’ होय, जेव्हा पित्याचा शब्द स्वर्गीय बक्षिसाचे वचन देतो तेव्हा ते आनंदाने प्रत्त्युतर देतात. जेव्हा ते वाचतातः “प्रियजनहो, आता आपण देवाची मुले आहोत,” तेव्हा ते उद्‌गारतात: ‘होय, तो मीच आहे.’ (याकोब १:१८) त्यांचा “येशू ख्रिस्तामध्ये” व त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झालेला आहे हे त्यांना माहीत आहे. (रोमकर ६:३) येशूच्या आध्यात्मिक शरीराचा ते एक भाग आहेत अशी त्यांची निश्‍चित खात्री आहे व त्याच्या मरणासारखेच मरण येणार व स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले जाणार या गोष्टीमध्ये ते आनंद दर्शवितात.

हे स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी या अभिषिक्‍तांनी “त्यांना झालेले पाचारण व त्यांची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न” केले पाहिजेत. (२ पेत्र १:५-११) ते विश्‍वासाने चालतात व पृथ्वीवरील जीवनाची आशा असणाऱ्‍यांप्रमाणेच आध्यात्मिकतेत प्रगतीशील राहतात. मग, आत्म्याच्या साक्षीसाठी अजून दुसरे काय आहे?

ते सहभागी का होऊ शकतात?

वर्तमान काळातील या पृथ्वीवरील जीवनाबद्दल असंतुष्ट असल्याने या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात जावेसे वाटते असे नाही. (पडताळा यहूदा ३, ४, १६) उलट, पवित्र आत्मा त्यांच्या आत्म्याशी साक्ष देतो की, ती देवाची मुले आहेत. नवीन करारात त्यांना समाविष्ट केलेले आहे ह्‍याची त्यांना खात्री आहे. या कराराचे दोन पक्ष आहेत: एक यहोवा देव व दुसरा आध्यात्मिक इस्राएल. (यिर्मया ३१:३१-३४; गलतीकर ६:१५, १६; इब्रीयांस १२:२२-२४) हा करार—जो येशूच्या सांडलेल्या रक्‍ताने कार्यरत झालेला आहे—तो यहोवाच्या नावासाठी लोकांना पाचारण करतो व या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना अब्राहामाच्या “संतती”चा हिस्सा बनवतो. हा नवीन करार तोपर्यंत कार्यरत राहील जोपर्यंत सर्व आध्यात्मिक इस्राएली लोक अमर अशा स्वर्गीय जीवनासाठी उठवले जातील.

पुढे हेही कळते की, ज्यांना स्वर्गीय साद खरोखरच दिली गेली आहे, त्यांना निःसंशये स्वर्गीय राज्याच्या करारातही भाग आहे. येशूने हा करार त्याच्यात व त्याच्या सहकाऱ्‍यांमध्ये आहे, जेव्हा तो म्हणालाः “माझ्या परिक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो. ह्‍यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.” (लूक २२:२८-३०) इ. स. ३३ मधील पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक होऊन येशूच्या प्रेषितांसाठी हे उद्‌घाटन करण्यात आले व हे येशू व त्याचे सहकारी राजे यांच्यात सर्वकाळ कार्यान्वित होत राहील.

ज्यांना स्वर्गीय पाचारण करण्यात आल आहे त्यांना विश्‍वास आहे की ते नवीन करार व राज्याचा करार या दोन्हीतही सहभागी आहेत. म्हणूनच प्रभूचे सांज भोजन किंवा येशू ख्रिस्ताच्या मृत्यु स्मरणप्रसंगाच्या वार्षिक स्मरणोत्सवात ते योग्य पद्धतीने सहभागी होतात व लाक्षणिक भाकरी व द्राक्षारस यांचा स्वीकार करतात. बेखमीर भाकरी येशूच्या पापविरहीत मानवी शरीराचे प्रतिनिधित्व करते व द्राक्षारस मरणापर्यंत ओतल्या गेलेल्या त्याच्या पूर्णत्व असलेल्या रक्‍ताचे प्रतिनिधित्व करते व त्यामुळे नवीन करारास अधिकच मजबूती प्राप्त होते.—१ करिंथकर ११:२३-२६.

जर यहोवाने तुमच्यामध्ये ती निर्विवाद अशी स्वर्गीय जीवनाची आशा रुजवली आहे तर तुम्ही तिच्यावर अवलंबून राहू शकता. त्या आशेसाठी तुम्ही प्रार्थना करु शकता. त्यात तुम्ही तल्लीन होता व मग त्या रचनेतून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. त्या उत्कट इच्छेचे तुम्ही सेवन करत राहता. परंतु तुम्ही जर चंचल व अनिश्‍चित असाल तर तुम्ही प्रभूच्या सांजभोजनाच्या चिन्हांमध्ये मुळीच भाग घेऊ नये.

चुकीच्या विचारधारणा का?

काहीजण अयोग्यपणे या स्मरणविधीत भाग घेतात कारण त्यांना हे खरेच माहीत नसते की, “इच्छा बाळगणाऱ्‍यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्‍यांवर नव्हे, तर देवावर अवलंबून आहे.” (रोमकर ९:१६) नवीन करारात समाविष्ट होणे व येशूच्या स्वर्गीय राज्याचे सहवारीस बनणे याबद्दल निर्णय घेण्याचे त्याच्यावर किंवा तिच्यावर अवलंबून नसते. या ठिकाणी यहोवाची निवड महत्त्वाची असते. प्राचीन इस्राएलामध्ये यहोवाने त्याची सेवा करण्यासाठी याजक निवडले होते व अहरोनाच्या घराण्याला दिलेले याजकपण उद्धटपणे हिसकावून घेण्याच्या प्रयत्नामुळे कोरहला त्याने मरणदंड दिला. (निर्गम २८:१; गणना १६:४-११, ३१-३५; २ इतिहास २६:१८; इब्रीयांस ५:४, ५)

याचप्रमाणे, देवाने पाचारण केलेले नसताही एखादी व्यक्‍ती स्वतःला पाचारण झालेली व स्वर्गीय राजे व याजक यातील एक असल्याचे सादर करेल तर ते यहोवाला नाराज करणारे असेल.—पडताळा १ तीमथ्य ५:२४, २५.

एखाद्या व्यक्‍तीने चुकीने स्वर्गीय पाचारण झाल्याचे गृहीत धरले असेल तर त्याचे कारण असेल, कठीण समस्यांमुळे उचंबळलेल्या तीव्र भावना. सोबत्याचा मृत्यु किंवा दुसरी एखादी शोकांतिका यामुळे ती व्यक्‍ती पृथ्वीवरील जीवनातील रस गमावत असेल. किंवा जवळचा एखादा सहकारी अभिषिक्‍त असल्याचा आव आणीत असेल व मग त्या व्यक्‍तीलाही आपल्या जीवनात असेच असावे असे वाटू लागते व हे घटक स्वर्गीय जीवन आपल्यासाठीच आहे असे भासविण्यास उद्युक्‍त करतील. परंतु पुत्रत्वाचा आत्मा देण्याची ही देवाची पद्धत नाही.

पृथ्वीवरील जीवनाशी संबंधित असलेल्या भावनिक दुःखामुळे किंवा नकोशा झालेल्या परिस्थितीमुळे एखादा स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगतो तर त्याचे हे वागणे यहोवाचा पृथ्वीवरील जीवनाचा जो उद्देश आहे त्याबद्दल त्याला कृतज्ञता वाटत नाही हे दर्शवील.

पूर्वीपासून असलेल्या धार्मिक दृष्टीकोणांमुळेही एखादी व्यक्‍ती ही चुकीची समजूत करून घेईल की, त्याला स्वर्गीय पाचारण आहे. विश्‍वासूंसाठी केवळ स्वर्गीय जीवनाची आशा आहे असे मत असणाऱ्‍या खोट्या धर्माशी तो पूर्वी निगडीत असेल. व म्हणून भावनेच्या भरात वाहवून जाण्याविरुद्ध व पूर्वींच्या चुकीच्या समजूतींबाबत दक्ष राहण्याची खऱ्‍या ख्रिश्‍चनाला जरुरी आहे.

काळजीपूर्वक परिक्षण महत्त्वाचे

प्रेषित पौलाने अतिशय अर्थपूर्ण मुद्दा मांडताना असे लिहिलेः “जो कोणी अयोग्य रितीने ही भाकर खाईल अथवा प्रभूच्या प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्‍त यासंबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरिक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.” (१ करिंथकर ११:२७-२९) यास्तव, बाप्तिस्मा झालेल्या ज्या ख्रिश्‍चनाला अलिकडे असे वाटायला लागले आहे की, मला स्वर्गीय पाचारण झाले आहे, त्याने या प्रकारावर अतिशय काळजीपूर्वक व प्रार्थनेद्वारे विचार केला पाहिजे.

अशी व्यक्‍ती स्वतःला विचारु शकतेः स्वर्गीय जीवनाची कल्पना मनात रुजविण्यासाठी इतरांनी मला प्रभावित केले आहे काय? हे अयोग्य ठरेल कारण या विशेष अधिकारास पात्र ठरविण्यासाठी देवाने दुसऱ्‍या कोणाची नेमणूक केलेली नाही. कल्पनेकडे कल असणे हे देवाकडून अभिषिक्‍त होण्याचे चिन्ह नाही. संदेशाद्वारे आवाज ऐकवून तो त्यांना राज्याचे वारीस म्हणून अभिषिक्‍त करीत नाही.

काही स्वतःला हे विचारु शकतीलः ‘ख्रिस्ती होण्याआधी मी मादक द्रव्याच्या व्यसनाधीन होतो का? मी अधिकच औषधांचे प्राशन करतो का की, ज्यामुळे भावनांवर परिणाम केला जातो? मी मानसिक वा भावनिक समस्यांवर उपचार केला आहे का?’ काहींनी म्हटले आहे की, त्यांनी, त्यांना स्वर्गीय आशेबद्दल आधी जे वाटले होते त्याच्याविरुद्ध लढा दिला. इतरांनी म्हटले की, देवाने त्यांच्याकडून काही काळासाठी पृथ्वीवरील आशा काढून घेतली व मग त्यांना शेवटी स्वर्गीय आशा बहाल केली. पण अशी ही पद्धत ईश्‍वरी व्यवहाराविरुद्ध आहे. शिवाय विश्‍वास हा काही अनिश्‍चित नाही; तो खात्रीचा असतो.—इब्रीयांस ११:६.

एखादा व्यक्‍ती स्वतःला असेही विचारु शकेलः ‘मला प्राधान्य मिळावे असे वाटते का? मला सध्या अधिकाराचा दर्जा मिळावा किंवा ख्रिस्तासोबत राजे व याजक म्हणून अधिकार मिळावा असे वाटते का?’ पहिल्या शतकात जेव्हा स्वर्गीय राज्यासाठी प्रवेश मिळविण्याचे सर्वसाधारण निमंत्रण दिले गेले तेव्हा सर्व अभिषिक्‍त ख्रिस्ती नियमन मंडळ किंवा वडील वा उपाध्य सेवक या जबाबदार पदावर नव्हते. यापैकी पुष्कळ स्त्रिया होत्या, ज्यांना खास अधिकार नव्हते; तसेच आत्म्याने अभिषिक्‍त होणे देवाच्या वचनाची अपूर्व समज बहाल प्रदान करून देत नाही, कारण पौलाला विशिष्ठ अभिषिक्‍त जनांना सूचना व सल्ला देणे जरुरीचे वाटले. (१ करिंथकर ३:१-३; इब्रीयांस ५:११-१४) ज्यांना स्वर्गीय आशा आहे ते लोक स्वतःला प्रतिष्ठित व्यक्‍ती समजत नाहीत. उलट, ते नम्रभाव प्रदर्शित करतात, जो “ख्रिस्ताचे मन” असणाऱ्‍यांच्या बाबतीत उचितार्थाने अपेक्षित आहे. (१ करिंथकर २:१६) शिवाय त्यांना याचीही जाणीव आहे की, देवाचे नीतीमान दर्जे सर्व ख्रिश्‍चनांनी, मग त्यांची आशा स्वर्गीय असो की पृथ्वीवरील, पूर्ण करण्यास हवेत.

आपल्याला स्वर्गीय पाचारण आहे असा दावा करणे एखाद्याला खास प्रकटीकरणे पुरवीत नाही. देवाला आपल्या पृथ्वीवरील संघटनेला आध्यात्मिक अन्‍न देण्याचे दळणवळणाचे माध्यम आहे. (मत्तय २४:४५-४७) यासाठी, कोणीही असे समजू नये की, मी अभिषिक्‍त ख्रिस्ती आहे म्हणून मला पृथ्वीवरील अशा असणाऱ्‍या “मोठ्या लोकसमुदाया”पेक्षा अधिक श्रेष्ठ स्वरुपाचे ज्ञान आहे. (प्रकटीकरण ७:९) आत्म्याने अभिषिक्‍त होणे कुशल साक्षीकार्य, शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे देणे किंवा पवित्र शास्त्रीय भाषणे देणे याद्वारे दिसत नाही, कारण पृथ्वीवरील आशा राखणारे जनही या बाबतीत अधिक निपुणता दाखवून आहेत. अभिषिक्‍त जनांप्रमाणे हेही उदाहरणशील ख्रिस्ती जीवन जगत आहेत. या कारणामुळेच शमशोन व या सारख्या इतर ख्रिस्ती युगापूर्वी माणसांना देवाचा आत्मा मिळाला होता व ते आवेश व समज यांनी भरले होते. तरीही, त्या ‘साक्षीरुपी मोठ्या मेघा’पैकी कोणालाही स्वर्गीय आशा नव्हती.—इब्रीयांस ११:३२-३८; १२:१; निर्गम ३५:३०, ३१; शास्ते १४:६, १९; १५:१४; १ शमुवेल १६:१३; यहेज्केल २:२.

निवड कोण करतो ते लक्षात घ्या

कोणा समविश्‍वासू जनाने स्वर्गीय पाचारणाबद्दल विचारणा केल्यास नियुक्‍त वडील किंवा इतर प्रौढ ख्रिस्तीजन त्याच्याबरोबर या प्रकरणाची चर्चा करू शकतील. पण कोणी व्यक्‍ती दुसऱ्‍यासाठी निर्णय घेऊ शकणार नाही. कारण ही स्वर्गीय आशा यहोवा स्वतः प्रदान करीत असतो. एखाद्या विशिष्ठाला खरेच स्वर्गीय पाचारण आहे तर त्याला दुसऱ्‍या ख्रिश्‍चनाला याबाबतीत विचारणा करण्याची गरजच राहणार नाही अभिषिक्‍त जनांना ‘नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्‍या वचनापासून जन्म मिळालेला असतो.’ (१ पेत्र १:२३) आपला आत्मा व वचन याद्वारे देव ते “बीज” पेरतो व त्या विशिष्ठाला स्वर्गीय आशा बहाल करून “नवी उत्पत्ती” बनवितो. (२ करिंथकर ५:१७) होय, यहोवा ही निवड करीत असतो.

या कारणास्तव, नव्या लोकांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत असताना त्यांना स्वर्गीय आशा आहे का हे त्यांनी तपासून बघावे हा प्रस्ताव न मांडणे चांगले. पण, एखादा अभिषिक्‍त ख्रिस्ती अविश्‍वासू बनला आणि त्याच्या जागी बदली म्हणून कोणाची गरज असली तर काय? तर याबाबतीत, ज्याने स्वर्गीय पाचारण दिले आहे तो देवच, ज्याने कित्येक वर्षापासून आमच्या स्वर्गीय पित्याची विश्‍वासूपणे सेवा केली आहे त्यामधून कोणाचीही निवड करू शकेल हे अपेक्षिणे रास्त आहे.

आज, देवाच्या संदेशाचा प्रमुख रोख लोकांनी ख्रिस्ताची स्वर्गीय वधूचे सदस्य बनण्यासाठी निवड करण्याकडे नाही. उलटपक्षी, “आत्मा व वधू म्हणत आहेत: ‘ये!’” हे पृथ्वीवरील नंदनवनात जीवनप्राप्ती मिळविण्याचे निमंत्रण आहे. (प्रकटीकरण २२:१, २, १७) अभिषिक्‍त जन या कार्यात पुढाकार घेत असता ते “पूर्ण नम्रतेने” वागतील आणि ‘आपल्या पाचारणाच्या आशेची खात्री करीत राहतील.’—इफिसकर ४:१-३; २ पेत्र १:५-११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा