वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. ३१
  • ख्रिस्ताद्वारे एकता निश्‍चित

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताद्वारे एकता निश्‍चित
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकता हा देवाकडील हेतू
  • एकता चेतविणाऱ्‍या गोष्टी
  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाचे कुटुंब मौल्यवान ऐक्याचा आनंद लुटते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. ३१

ख्रिस्ताद्वारे एकता निश्‍चित

इफिसकरांच्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये

प्रेषित पौलाने इफिसमध्ये इ. स. ५२ च्या आरंभाला प्रचार केला. आशिया मायनरमधील हे धनाढ्य व्यापारी शहर खोट्या धर्माचे माहेर होते. पण पौल जेव्हा इ. स. ५२/५३ च्या हिवाळ्यात पुन्हा तेथे गेला तेव्हा ख्रिस्ती धर्म बहरला. तो दररोज शाळेच्या सभागृहात भाषणे देत असे व सोबत घरोघरचे कार्य आपल्या वास्तव्यात सुमारे साडे तीन वर्षे करीत राहिला.—प्रे. कृत्ये १९:८-१०; २०:२०, २१, ३१.

आता रोममध्ये इ. स. ६०-६१ च्या दरम्यान कैदेत असताना पौलाने इफिसमधील ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले. येशू ख्रिस्तासोबत व त्याच्या द्वारे असणारी ऐक्यता हा त्याच्या पत्राचा विषय आहे. खरे म्हणजे, ‘ख्रिस्ताबरोबरील ऐक्यता’ हा शब्दप्रयोग १३ वेळा त्यात अवतरीत आहे. हा संदर्भ त्याने लिहिलेल्या इतर सर्व पत्रांपेक्षा अधिक वेळा यात आहे. इफिसकरांप्रमाणेच आम्हालाही पौलाच्या लिखाणात उल्लेखित असलेली येशूची भूमिका, अनैतिकता टाळणे व दुरात्म्यांना विरोध करण्याविषयीचा सल्ला याजकडून फायदा होईल.

एकता हा देवाकडील हेतू

पौलाने पहिल्यांदाच याचे स्पष्टीकरण दिले की, देव कशाप्रकारे ख्रिस्ताद्वारे एकता घडवून आणील. (१:१-२३) स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व काही एका “व्यवस्थेद्वारा,” (ज्याद्वारे सर्व काही सुव्यवस्थित केले जाईल असा राज्य कारभार) एकत्रित करावे. देव ख्रिस्ताद्वारेच स्वतःसोबत ज्यांना स्वर्गीय जीवनासाठी निवडण्यात आले त्यांचा आणि जे पृथ्वीवर वास्तव्यास असतील अशांचा समेट घडवून आणील. आज देवाने अभिषिक्‍त जन व “मोठा लोकसमुदाय” यांची एकता घडवून आणिली आहे; तो पृथ्वीवरील सर्व इष्ट वस्तु गोळा करीत आहे व हे, जेव्हा कबरेतील सर्व येशूची वाणी ऐकतील व बाहेर येतील तेव्हापर्यंत चालू राहील. (प्रकटीकरण ७:९; योहान ५:२८, २९) पौलाने प्रार्थना केली की इफिसकरांठायी देवाने पुरविलेल्या तरतुदींची आवड निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे आम्ही देखील कृतज्ञ राहिले पाहिजे.

यानंतर, जे पापात मेलेले होते अशा विदेश्‍यातून ख्रिस्ती झालेल्यांकडे लक्ष वळविण्यात आले. (२:१–३:२१) ख्रिस्ताद्वारे नियमशास्त्र काढून टाकण्यात आले व यहुदी आणि विदेशी यांनी एक व्हावे व जेथे देव आपल्या आत्म्याद्वारे वस्तीस असू शकेल असे मंदिर त्यांनी व्हावे यासाठी पाया घातला गेला. विदेशी ख्रिस्तामध्ये एक होऊ शकतील व त्यांना त्याच्याद्वारे देवाकडे मोकळेपणाने येता येऊ शकेल या पवित्र गूजाचे रहस्य उघड करण्याचा कारभार पौलाकडे होता. येथे परत पौल इफिसकरांविषयी प्रार्थितो की, त्यांनी विश्‍वास व प्रेम यात दृढपणे टिकून राहावे म्हणून यहोवाने त्यांना बळ द्यावे.

एकता चेतविणाऱ्‍या गोष्टी

पौलाने हे स्पष्ट केले की, देवाने एकीकरणाविषयीच्या गोष्टी पुरविलेल्या आहेत. (४:१-१६) यापैकी एक आध्यात्मिक शरीर, म्हणजे मंडळी ही आहे. हे शरीर ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली एकीमध्ये सर्व व्यवहार पार पाडते. तोच मनुष्यामध्ये दाने पुरवीत आहे की, ज्यामुळे सर्वांचे विश्‍वासातील एकीत टिकून राहण्यात साहाय्य होते.

याशिवाय यहोवाने एकीत टिकून राहण्यास शक्य करणाऱ्‍या ख्रिस्ती गुणांचे प्रदर्शन करण्याची शक्यता दिली. (४:१७–६:९) “नवे मनुष्यपण” धारण केल्यामुळे हे साहजिक आहे की, ख्रिस्तीजन हरप्रकारची अभद्र भाषा अभक्‍तपणा म्हणून तिला टाळीत असतो. ते सूज्ञपणे चालतात, ख्रिस्तास आदर व योग्य अधीनता दाखवितात.

याचप्रमाणे, आमची एकता भंग करू पाहणाऱ्‍या दुरात्मा समूहाशी सामना करावा म्हणून देव ख्रिश्‍चनांना सबळ करतो. (६:१०-२४) देवाकडील आध्यात्मिक सामग्री ते संरक्षण देते. यास्तव आपण तिचा वापर करू या, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करीत राहू या व सोबत समविश्‍वासूंबद्दलच्या याचनांचाही समावेश त्यामध्ये करू.

पौलाने इफिसकरांना केवढा उत्तम सल्ला दिला! आपणही तो, अनीतीच्या कृत्यांना टाळून व दुरात्मा समुहाला विरोध करीत राहून, पाळू या. शिवाय येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही जी एकता अनुभवीत आहोत तिजविषयी तीव्र आवड प्रदर्शित करू या.

[३१ पानावरील चौकट/चित्रं]

जळते बाण: आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत “विश्‍वासरुपी मोठी ढाल” ही अंतर्गत आहे, जिचा सैतानाचे सर्व “जळते बाण” रोकण्यास किंवा विझविण्यास उपयोग होतो. (इफिसकर ६:१६) रोमी लोक जे बाण उपयोगात आणीत त्यातील काही पोकळ नळ्यांचे असत व यांच्या टोकाला नॅपथा हे विषारी जळते द्रव भरत. ती आग विझू नये यासाठी तो बाण ते सैल धनुष्याने सोडीत. त्यांना दमट केल्यास आग वाढत असे. पण मोठ्या ढाली अशा बाणांपासून शिपायांचे रक्षण करीत असत. याचप्रमाणे यहोवावरील विश्‍वास त्याच्या सेवकांना “त्या दुष्टाचे सर्व जळते बाण” विझविण्यात साहाय्य करतो. होय, विश्‍वास हा आमचे दुरात्म्यांच्या, तसेच सर्व मोहाच्या हल्ल्यापासून रक्षण करतो व जडवादी मार्गास लागण्यापासून आणि भय व संशयापासून दूर ठेवितो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा