यहोवाचे कुटुंब मौल्यवान ऐक्याचा आनंद लुटते
“पाहा! बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तोत्र १३३:१.
१. आज अनेक कुटुंबांची दशा कशी आहे?
आज कुटुंबावर आणीबाणीची वेळ आली आहे. अनेक कुटुंबांमध्ये, वैवाहिक बंधने मोडकळीस आली आहेत. घटस्फोट मोठ्या प्रमाणात सामान्य गोष्ट बनत आहे आणि घटस्फोटित जोडप्यांची अनेक मुले मोठी उदासीनता अनुभवत आहेत. कोट्यवधी कुटुंबे दुःखी व विस्कळीत आहेत. परंतु, एक असे कुटुंब आहे ज्याला खरा आनंद व अस्सल ऐक्य ठाऊक आहे. ते यहोवा देवाचे विश्वव्यापी कुटुंब आहे. त्यामध्ये, लक्षानुलक्ष अदृश्य देवदूत ईश्वरी इच्छेच्या सुसंगतेत त्यांना दिलेल्या नेमणुका पार पाडतात. (स्तोत्र १०३:२०, २१) परंतु अशाप्रकारच्या ऐक्याचा आनंद लुटणारे एखादे कुटुंब पृथ्वीवर आहे का?
२, ३. (अ) आज देवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे भाग कोण आहेत, व आजच्या यहोवाच्या सर्व साक्षीदारांची तुलना आपण कोणासोबत करू शकतो? (ब) कोणत्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत?
२ प्रेषित पौलाने लिहिले: ‘स्वर्गांतील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकतो.’ (इफिसकर ३:१४, १५) पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबांचे वंश देवाचे ऋणी आहेत कारण तो सृष्टीकर्ता आहे. स्वर्गामध्ये मानवी कुटुंबे नसली तरी, लाक्षणिकरीत्या बोलायचे झाल्यास, देवाचा त्याच्या स्वर्गीय संघटनेशी विवाह झाला आहे व येशूला त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये संयुक्त असलेली एक आध्यात्मिक वधू मिळणार आहे. (यशया ५४:५; लूक २०:३४, ३५; १ करिंथकर १५:५०; २ करिंथकर ११:२) पृथ्वीवरील विश्वासू अभिषिक्त जन आता देवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे भाग आहेत, आणि पार्थिव आशा असलेली येशूची ‘दुसरी मेंढरे’ त्या कुटुंबाचे भावी सदस्य आहेत. (योहान १०:१६; रोमकर ८:१४-१७; टेहळणी बुरूज जानेवारी १५, १९९६, पृष्ठ ३१) परंतु, आजच्या यहोवाच्या सर्व साक्षीदारांची तुलना एका संयुक्त जागतिक कुटुंबाशी करता येऊ शकते.
३ देवाच्या सेवकांच्या आश्चर्यकारक आंतरराष्ट्रीय कुटुंबाचे तुम्ही भाग आहात का? असल्यास, तुम्ही इतरांपेक्षा अधिक आशीर्वादाचा आनंद लुटत आहात. यहोवाचे जगव्याप्त कुटुंब—त्याची दृश्य संघटना—झगडे व विभक्ततेच्या जगिक वाळवंटात शांती व ऐक्याची मरुजलभूमी आहे, अशी साक्ष लाखो लोक देतील. यहोवाच्या जगव्याप्त कुटुंबाच्या ऐक्याचे वर्णन कसे केले जाऊ शकते? आणि कोणत्या कारणांमुळे अशा ऐक्याला बढती मिळते?
किती चांगले व मनोरम!
४. स्तोत्र १३३ बांधवांच्या ऐक्याबद्दल काय म्हणते ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांत कसे व्यक्त कराल?
४ स्तोत्रकर्त्या दावीदाने बांधवांच्या ऐक्याची गाढ कदर बाळगली. त्याच्याविषयी गीत गाण्यास त्याला प्रेरणा देखील मिळाली! कल्पना करा की तो त्याची वीणा घेऊन असे गात आहे: “पाहा! बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे; सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.”—स्तोत्र १३३:१-३.
५. स्तोत्र १३३:१, २ च्या आधारावर इस्राएल लोक आणि देवाचे सांप्रत सेवक यांच्यामध्ये कोणती तुलना केली जाऊ शकते?
५ हे शब्द देवाचे प्राचीन लोक, अर्थात इस्राएल लोक जे बंधूंचे ऐक्य अनुभवत होते त्याला लागू झाले. जेरूसलेममधील त्यांच्या तीन वार्षिक सणांसाठी ते ऐक्याने एकत्र राहत असत. ते वेगवेगळ्या वंशांतून आलेले असले तरी ते एकच कुटुंब होते. एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यावर सुखावह सुगंध व तजेला देणाऱ्या अभिषेकाच्या तेलाप्रमाणे हितकारक परिणाम झाला. अशा प्रकारचे तेल अहरोनाच्या मस्तकावर ओतण्यात आले तेव्हा ते त्याच्या दाढीवरून त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळले. इस्राएल लोकांकरता, एकत्र राहिल्यामुळे चांगला परिणाम झाला ज्याने एकत्रित झालेल्या सर्व लोकांना व्यापले. गैरसमज दूर करण्यात आले आणि ऐक्याला प्रवृत्त करण्यात आले. यहोवाच्या आजच्या सार्वत्रिक कुटुंबांमध्ये अशाच प्रकारचे ऐक्य आहे. नियमितरीत्या सहवास राखल्याने त्यातील सदस्यांवर हितकारक आध्यात्मिक प्रभाव पडतो. देवाच्या वचनातील सल्ला लागू केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अडीअडचणी दूर केल्या जातात. (मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७) यहोवाचे लोक, त्यांच्या बांधवांतील ऐक्यामुळे मिळणाऱ्या परस्पर उत्तेजनाची खूप कदर करतात.
६, ७. इस्राएलचे ऐक्य हर्मोन पर्वतावरील दहिवरासारखे कसे होते, आणि आज देवाचे आशीर्वाद कोठे प्राप्त केले जाऊ शकतात?
६ तसेच, इस्राएलचे एकत्र राहणे हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे कसे होते बरे? त्याचे असे आहे, या पर्वताचे शिखर समुद्रसपाटीपासून २,८०० मीटर उंचीवर असल्यामुळे ते जवळजवळ वर्षभर बर्फाच्छादित असते. हर्मोनच्या बर्फाच्छादित शिखरामुळे रात्रीची वाफ दाट होते आणि त्यामुळे मोठ्याप्रमाणात दहिवर निर्माण होते जे दीर्घ शुष्क ऋतुदरम्यान वनस्पतींचे रक्षण करते. हर्मोन रांगांतील शीत वाऱ्याचा प्रवाह अशा वाफेला दूर दक्षिणेपर्यंत, जसे की, जेरूसलेमच्या क्षेत्रापर्यंत नेऊ शकते, जेथे या वाफेचे दहिवर होते. यास्तव, “सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे” असे स्तोत्रकर्ता अगदी उचितपणे म्हणाला. यहोवाच्या उपासकांच्या कौटुंबिक ऐक्याला प्रवृत्त करणाऱ्या व तजेला देणाऱ्या प्रभावाची किती ही उत्तम स्मरणिका!
७ ख्रिस्ती मंडळीची स्थापना होण्याआधी, सीयोन अथवा जेरूसलेम खऱ्या उपासनेचे केंद्र होते. या कारणास्तव, तेथेच आशीर्वाद मिळतील अशी देवाने आज्ञा दिली होती. सर्व आशीर्वादांचा उगम प्रातिनिधीकरीत्या जेरूसलेममधील मंदिरात असल्यामुळे तेथूनच आशीर्वादांचा उगम होणार होता. परंतु आता खरी उपासना कोणत्याही विशिष्ट ठिकाणावर अवलंबून नसल्यामुळे आज देवाच्या सेवकांचे आशीर्वाद, प्रीती व ऐक्य संपूर्ण पृथ्वीवर आढळून येते. (योहान १३:३४, ३५) या ऐक्याला प्रवृत्त करणारी काही कारणे कोणती?
ऐक्याला प्रवृत्त करणारी कारणे
८. योहान १७:२०, २१ मधील ऐक्यापासून आपण काय शिकतो?
८ यहोवाच्या उपासकांचे ऐक्य, पूर्णपणे समजून घेतलेल्या देवाच्या वचनाला तसेच येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकींना मान्य करण्यावर आधारित आहे. यहोवाने आपल्या पुत्राला जगामध्ये सत्याची साक्ष देण्याकरता व बलिदानरुपी मरणाकरता पाठवल्यामुळे, संयुक्त ख्रिस्ती मंडळीची घडण होण्यासाठी मार्ग खुला झाला. (योहान ३:१६; १८:३७) तिच्या सदस्यांमध्ये खरोखरच ऐक्य असावयास हवे होते हे येशूने अशी प्रार्थना केली तेव्हा स्पष्ट झाले की, “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करितो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीहि तुझ्यामाझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा.” (योहान १७:२०, २१) देव आणि त्याचा पुत्र यांच्याप्रमाणेच येशूच्या शिष्यांनी देखील ऐक्य साधले. त्यांनी देवाच्या वचनाला आणि येशूच्या शिकवणुकींना मान्य केल्यामुळे हे असे झाले. हीच मनोवृत्ती, यहोवाच्या आजच्या जगव्याप्त कुटुंबाच्या ऐक्याचे मुख्य कारण आहे.
९. यहोवाच्या लोकांच्या ऐक्यामध्ये पवित्र आत्मा कोणती भूमिका बजावतो?
९ यहोवाच्या लोकांना संयुक्त करणारे आणखी एक कारण म्हणजे, आपल्याकडे देवाचा पवित्र आत्मा किंवा कार्यकारी शक्ती आहे. तो आपल्याला यहोवाच्या वचनाचे प्रकट सत्य समजण्यास व त्यानुसार त्याची सेवा ऐक्याने करण्यास शक्य करतो. (योहान १६:१२, १३) हा आत्मा आपल्याला, झगडे, द्वेष, राग आणि तंटा या सारखी ऐक्यभंग करणारी शारीरिक कर्मे टाळण्यास मदत करतो. त्याऐवजी, देवाचा आत्मा आपल्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता आणि आत्मसंयम या एकीकरणाच्या फळांना विकसित करण्यास शक्य करतो.—गलतीकर ५:१९-२३.
१०. (अ) संयुक्त कुटुंबात असलेली प्रीती आणि यहोवाची उपासना करणाऱ्यांमध्ये दिसणारी प्रीती या दोहोंची तुलना कशी केली जाऊ शकते? (ब) नियमन मंडळाच्या एका सदस्याने, त्यांच्या आध्यात्मिक बांधवांना भेटण्याविषयी आपले मनोगत कसे व्यक्त केले?
१० संयुक्त कुटुंबाचे सदस्य एकमेकांवर प्रीती करतात व त्यांना एकत्र राहण्यात आनंद वाटतो. तुलनात्मकरीत्या, यहोवाच्या उपासकांच्या संयुक्त कुटुंबातील सदस्य त्याच्यावर, त्याच्या पुत्रावर आणि सहविश्वासूंवर प्रीती करतात. (मार्क १२:३०; योहान २१:१५-१७; १ योहान ४:२१) ज्याप्रमाणे एखाद्या प्रेमळ स्वाभाविक कुटुंबाला एकत्र बसून भोजनाचा स्वाद घ्यावयास आवडतो त्याचप्रमाणे देवाची उपासना करणाऱ्यांना, ख्रिस्ती सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना उपस्थित राहण्यास व उत्तम सहवासातून व सर्वोत्तम आध्यात्मिक भोजनातून लाभ मिळवण्यास आनंद वाटतो. (मत्तय २४:४५-४७; इब्री लोकांस १०:२४, २५) यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या एका सदस्याने एकदा असे म्हटले: “मला वाटते की बांधवांना भेटणे जीवनातील सर्वात मोठा आनंद व उत्तेजनाचा स्रोत आहे. मला राज्यसभागृहात सर्वात पहिल्यांदा येण्यास व शक्य असल्यास सर्वात शेवटी जाण्यास फार आवडते. देवाच्या लोकांबरोबर बोलताना मला आंतरिक आनंद जाणवतो. त्यांच्याबरोबर असताना मला माझ्या कुटुंबात असल्यासारखे वाटते.” तुम्हाला देखील असेच वाटते का?—स्तोत्र २७:४.
११. यहोवाच्या साक्षीदारांना खासकरून कोणत्या कार्यात आनंद मिळतो व आपल्या जीवनाला देवाच्या सेवेचे केंद्रस्थान बनवल्याचा काय परिणाम होतो?
११ संयुक्त कुटुंबाला एकत्र मिळून कार्य करण्यामध्ये आनंद वाटतो. त्याचप्रकारे, यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचे राज्यप्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य ऐक्याने करण्यात आनंद वाटतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) यामध्ये नियमितरीत्या भाग घेतल्याने आपण यहोवाच्या इतर साक्षीदारांच्या अधिक समीप येतो. देवाच्या सेवेला आपल्या जीवनाचे केंद्रस्थान बनवल्याने व त्याच्या लोकांच्या सर्व कार्यांना पाठिंबा दिल्याने देखील कौटुंबिक आत्म्याला प्रेरणा मिळते.
ईश्वरशासित व्यवस्थेची आवश्यकता आहेच
१२. एका आनंदी व संयुक्त कुटुंबाची गुणलक्षणे कोणती आहेत व कोणत्या व्यवस्थेमुळे पहिल्या शतकाच्या मंडळ्यांमध्ये ऐक्याला बढती मिळाली?
१२ दृढ परंतु प्रेमळ नेतृत्व व व्यवस्था असलेले कुटुंब संभवतः संयुक्त व आनंदी असते. (इफिसकर ५:२२, ३३; ६:१) यहोवा, शांतीकारक व्यवस्थेचा देव आहे व त्याच्या कुटुंबातील सर्व जण त्याला ‘परात्पर देव’ असे मानतात. (दानीएल ७:१८, २२, २५, २७; १ करिंथकर १४:३३) त्याने त्याच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नियुक्त केले आहे व स्वर्ग आणि पृथ्वीवरचा अधिकार सोपवला आहे हेही ते कबूल करतात. (मत्तय २८:१८; इब्री लोकांस १:१, २) ख्रिस्त मंडळीचा मस्तक असल्यामुळे ख्रिस्ती मंडळी पद्धतशीर, संयुक्त संघटना आहे. (इफिसकर ५:२३) पहिल्या शतकातील मंडळ्यांतील कार्यांवर देखरेख करण्यासाठी प्रेषित आणि इतर प्रौढ “वडीलवर्ग” यांचे मिळून बनलेले एक नियमन मंडळ होते. प्रत्येक मंडळीने पर्यवेक्षक, किंवा वडील व सेवासेवकांना नियुक्त केले होते. (प्रेषितांची कृत्ये १५:६; फिलिप्पैकर १:१) पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहिल्याने ऐक्याला बढती मिळाली.—इब्री लोकांस १३:१७.
१३. यहोवा कशा प्रकारे लोकांना आकर्षित करतो, व त्यामुळे काय होते?
१३ परंतु यहोवाच्या उपासकांमधील ऐक्याचा संबंध ठाम, भावशून्य नेतृत्वाशी लावता येऊ शकतो, असे या सर्व आज्ञा सुचवतात का? निश्चितच नाही! देव आणि त्याच्या संघटनेविषयी कोणतीही गोष्ट प्रेमविरहीत नाही. यहोवा प्रेम दाखवून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो व प्रत्येक वर्षी लाखो लोक, देवाला त्यांनी पूर्ण अंतःकरणाने केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेऊन स्वेच्छेने व आनंदाने यहोवाच्या संघटनेचे भाग होतात. त्यांची मनोवृत्ती यहोशवासारखी आहे ज्याने इस्राएल लोकांना आर्जवले: “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; . . . मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.
१४. यहोवाची संघटना ईश्वरशासित आहे असे आपण का म्हणू शकतो?
१४ यहोवाच्या कुटुंबाचे भाग या नात्याने आपण केवळ आनंदी नव्हे तर सुरक्षित देखील आहोत. त्याची संघटना ईश्वरशासित असल्यामुळे हे असे आहे. देवाचे राज्य ईश्वरकृत (ग्रीकमध्ये देवासाठी थीऑस, आणि शासनासाठी क्रेटॉस) आहे. ते देवाचे शासन आहे, त्याने ते नेमले व स्थापिले आहे. यहोवाचे अभिषिक्त “पवित्र राष्ट्र,” त्याच्या शासनाच्या अधीन आहे आणि म्हणूनच ईश्वरशासित आहे. (१ पेत्र २:९) यहोवा, आपला महान ईश्वरसत्ताक, आपला न्यायाधीश, नियंता व राजा असल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटलेच पाहिजे. (यशया ३३:२२) तरीही, काही वादविवाद निर्माण होऊन आपला आनंद, सुरक्षितता व ऐक्य यांना धोका संभवल्यास काय?
नियमन मंडळ कार्यवाही करते
१५, १६. पहिल्या शतकामध्ये कोणता वादविषय निर्माण झाला होता, व का?
१५ कुटुंबाचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी एखादा वादविषय वेळोवेळी मिटवावा लागेल. समजा तेव्हा, सा. यु. पहिल्या शतकामध्ये देवाच्या उपासकांच्या कुटुंबातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी एखादी समस्या सोडवावी लागली असावी. मग काय? नियमन मंडळाने कार्यवाही केली व आध्यात्मिक बाबींबद्दल निर्णय घेतले. अशा कार्यहालचालीचा आपल्याकडे शास्त्रवचनीय पुरावा आहे.
१६ सा. यु. ४९ च्या सुमारास, एक गंभीर समस्या सोडवण्यासाठी व त्याद्वारे “देवाच्या घरचे” ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी नियमन मंडळ जेरूसलेममध्ये एकत्र आले. (इफिसकर २:१९) जवळजवळ १३ वर्षांआधी, प्रेषित पेत्राने कर्नेल्य याला प्रचार केला होता व पहिले विदेशी, किंवा राष्ट्रांतील लोक बाप्तिस्मा घेतलेले विश्वासू बनले होते. (प्रेषितांची कृत्ये १० वा अध्याय) पौलाच्या पहिल्या मिशनरी सफरीदरम्यान, अनेक विदेशांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. (प्रेषितांची कृत्ये १३:१-१४:२८) वास्तविक पाहता, ॲन्टीयोक, सीरिया येथे विदेशी ख्रिश्चनांची एक मंडळी स्थापन झाली होती. काही ख्रिस्ती यहुद्यांना वाटले, की विदेशी धर्मांतरित व्यक्तींनी सुंता केली पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र अनुसरले पाहिजे, परंतु इतरांनी याला सहमती दर्शवली नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:१-५) या वादविषयामुळे पूर्णपणे ऐक्यभंग झाला असता, एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या यहुदी आणि विदेशी मंडळ्या निर्माण झाल्या असत्या. यास्तव, ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी नियमन मंडळाने त्वरित कार्यहालचाल केली.
१७. प्रेषितांची कृत्ये याच्या १५ व्या अध्यायात कोणत्या सुसंगत ईश्वरशासित कार्यपद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे?
१७ प्रेषितांची कृत्ये १५:६-२२ नुसार, “प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले.” तसेच इतर व ॲन्टीयोकमधून प्रतिनिधीमंडळ देखील उपस्थित होते. पेत्राने पहिल्यांदा स्पष्ट केले की ‘त्याच्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवला.’ मग बर्णबा व पौल “ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये [किंवा विदेशांमध्ये] जी जी चिन्हे व अद्भुते केली” त्यांचे वर्णन केले तेव्हा ‘सर्व लोकांनी’ त्यांचे ऐकून घेतले. प्रश्न कसा सोडवता येईल ते याकोबाने पुढे सुचवले. नियमन मंडळाने निर्णय घेतल्यावर आपल्याला असे सांगण्यात येते: “पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे, म्हणजे बंधूजनांतील . . . ह्यांना अंत्युखियास पाठविले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.” त्या ‘निवडलेल्या माणसांनी’—यहूदा व सीला यांनी—सहविश्वासूंकरता एक प्रोत्साहनदायक पत्र सोबत नेले.
१८. मोशेच्या नियमशास्त्राचा समावेश असलेला कोणता निर्णय नियमन मंडळाने घेतला, आणि त्याचा प्रभाव यहुदी व विदेशी ख्रिश्चनांवर कसा पडला?
१८ नियमन मंडळाचा निर्णय घोषित करणाऱ्या पत्राची सुरवात अशा शब्दांनी झाली: “अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम.” इतर बांधव देखील या ऐतिहासिक सभेला उपस्थित राहिले, पण स्पष्टपणे नियमन मंडळ “प्रेषित व वडीलवर्ग” ह्यांचे मिळून बनले होते. देवाच्या आत्म्याने त्यांना मार्गदर्शित केले कारण पत्रात असे म्हटले होते: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हांवर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.” (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये १५:२३-२९) ख्रिश्चनांना सुंता करण्याची अथवा मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची गरज नव्हती. या निर्णयामुळे यहुदी व विदेशी ख्रिश्चनांना एकवाक्यतेत कार्य करण्यास व बोलण्यास मदत झाली. मंडळ्यांना आनंद झाला आणि आज यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली देवाच्या जगव्याप्त कुटुंबात आहे त्याप्रमाणेच त्यांचे मौल्यवान ऐक्य टिकून राहिले.—प्रेषितांची कृत्ये १५:३०-३५.
ईश्वरशासित ऐक्यात सेवा करणे
१९. यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबामध्ये ऐक्याची भरभराट का झाली आहे?
१९ एखाद्या कुटुंबाचे सदस्य एकमेकांना सहकार्य देतात तेव्हा ऐक्याची भरभराट होते. हीच गोष्ट यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबाबाबत खरी आहे. पहिल्या शतकाच्या मंडळीतील वडिलांनी व इतरांनी ईश्वरशासित राहून, नियमन मंडळाला पूर्ण सहकार्य देऊन व त्याच्या निर्णयांना स्वीकारुन देवाची सेवा केली. नियमन मंडळाच्या साहाय्याने वडिलांनी “वचनाची घोषणा” केली आणि सामान्यपणे मंडळीच्या सदस्यांनी ‘एकसारखी बोलणी केली.’ (२ तीमथ्य ४:१, २; १ करिंथकर १:१०) सेवेमध्ये आणि ख्रिस्ती सभांमध्ये, मग ते जेरुसलेम, ॲन्टीयोक, रोम, करिंथ किंवा इतर कोठेही असो, एकाच प्रकारची शास्त्रवचनीय सत्ये सादर करण्यात आली. आजही अशा प्रकारचे ईश्वरशासित ऐक्य अस्तित्वात आहे.
२०. आपल्या ख्रिस्ती ऐक्याला टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
२० आपले ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी, यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे भाग असणाऱ्या आपण सर्वांनी ईश्वरशासित प्रीती प्रदर्शित करण्यास झटले पाहिजे. (१ योहान ४:१६) आपण देवाच्या इच्छेच्या अंकित असले पाहिजे व ‘विश्वासू दास’ आणि नियमन मंडळाबद्दल गाढ सन्मान दाखवला पाहिजे. देवाला केलेल्या समर्पणाप्रमाणे आपले आज्ञापालन अर्थातच स्वेच्छेने व आनंदाने असते. (१ योहान ५:३) आनंद आणि आज्ञापालन यांना स्तोत्रकर्त्याने किती उचितपणे जोडले! त्याने असे गायिले: “परमेशाचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!”—स्तोत्र ११२:१.
२१. आपण स्वतःला ईश्वरशासित असल्याचे कसे शाबीत करू शकतो?
२१ येशू जो मंडळीचा मस्तक आहे तो पूर्णपणे ईश्वरशासित आहे व नेहमी आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करतो. (योहान ५:३०) यास्तव, आपणही ईश्वरशासितपणे व ऐक्याने यहोवाची इच्छा त्याच्या संघटनेसोबत पूर्ण सहकार्याने करून आपल्यासाठी असलेल्या कित्त्याचे अनुकरण करू या. मग आपणही आनंदी व कृतज्ञ अंतःकरणाने स्तोत्रकर्त्याच्या या गीताला प्रतिध्वनित करू: “पाहा! बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ आपल्या ख्रिस्ती ऐक्याचा संबंध स्तोत्र १३३ याजसोबत कसा लावता येऊ शकतो?
◻ ऐक्य वाढविणाऱ्या काही गोष्टी कोणत्या आहेत?
◻ देवाच्या लोकांच्या ऐक्यासाठी ईश्वरशासित व्यवस्था अत्यावश्यक का आहे?
◻ पहिल्या शतकातील नियमन मंडळाने ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कसे कार्य केले?
◻ ईश्वरशासित ऐक्यात सेवा करण्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
[१३ पानांवरील चित्रं]
नियमन मंडळाने ऐक्य टिकवून ठेवण्याकरता कार्यवाही केली