वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. ३०
  • ख्रिस्ती स्वातंत्र्यात स्थिर उभे राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती स्वातंत्र्यात स्थिर उभे राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौल आपल्या प्रेषितपणाचे समर्थन करतो
  • नीतीमान कसे घोषित केले जाते?
  • स्थिर उभे राहा
  • मुक्‍त पण जबाबदार लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. ३०

ख्रिस्ती स्वातंत्र्यात स्थिर उभे राहा!

गलतीकरांच्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये

यहोवा देव स्वातंत्र्याचा देव आहे. (२ करिंथकर ३:१७) त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताने म्हटलेः “तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” (योहान ८:३२) ख्रिस्ताच्या अनुकरणार्थ प्रेषित पौलाने स्वातंत्र्याची सुवार्ता घोषित केली.—रोमकर ६:१८; ८:२१.

स्वातंत्र्याचा हा संदेश घोषित करून, पौलाने गलतिया (जो आशिया मायनरमधील रोमी प्रांत होता) येथे त्याच्या पहिल्या सुवार्तिक यात्रेमध्ये (इ. स. ४७-४८ दरम्यान) मंडळी स्थापन केली. गलतीकरांना नियमन मंडळाचा तो निर्णय ठाऊक होता की, ख्रिश्‍चनांना सुंतेची गरज नाही. (प्रे. कृत्ये १५:२२-२९) पण यहुदीकर, सुंता ही झालीच पाहिजे हे बंधन राखण्यावर जोर देऊन होते. या कारणास्तव पौलाने गलतीकरांना (सुमारे ५०-५२ दरम्यान) करिंथ किंवा अरामाच्या अंत्युखियाहून लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती स्वातंत्र्यावर अधिक जोर देऊन उल्लेख केला. उदाहरणार्थ, त्याने म्हटलेः “आपणास स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले; यास्तव स्थिर उभे राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.”—गलतीकर ५:१.

पौल आपल्या प्रेषितपणाचे समर्थन करतो

पौलाने प्रथम हे दाखविले की, त्याचे प्रेषितपण हे “येशू ख्रिस्त व देवपिता यांच्याद्वारे” होते. (१:१–२:१४) मग, प्रकटीकरण झाल्यामुळे पौल (बर्णबा व तीत यांजसोबत) सुंतेचा प्रश्‍न घेऊन यरुशलेमास गेला. तेथे याकोब, केफा (पेत्र) व योहान यांनी ओळखले की, याला विदेश्‍यांकडे जाण्यासाठी प्रेषितपणाचे कृपादान प्राप्त आहे. मग, जेव्हा पेत्राने यरुशलेमाहून आलेल्या यहुदी ख्रिश्‍चनांना भिऊन अंत्युखियात विदेशी विश्‍वासधारकांपासून स्वतःला वेगळे केले तेव्हा पौलाने त्याला चांगली ताडणा दिली.

नीतीमान कसे घोषित केले जाते?

प्रेषिताने हे ठामपणे घोषित केले की, केवळ येशू ख्रिस्तावरील विश्‍वासाद्वारेच एखादा नीतीमान ठरतो. (२:१५–३:२९) गलतीकरांना नियमशास्त्रातील कर्मांनी नव्हे, तर सुवार्तेचा विश्‍वासाने स्वीकार केल्यामुळे देवाचा आत्मा प्राप्त झाला होता. अब्राहामाच्या खऱ्‍या पुत्रांपाशी विश्‍वास आहे, पण जे “नियमशास्त्रातील कर्मां”द्वारे नीतीमान ठरु इच्छितात ते “शापाधीन आहेत.” का बरे? कारण त्यांना नियमशास्त्राचे पालन पूर्णपणे करता येत नव्हते. खरे म्हणजे नियमशास्त्रानेच त्यांची पापकर्मे उघड केली व ते शास्त्र “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.”

स्थिर उभे राहा

ख्रिस्ताने आपल्या मरणाने ‘जे नियमशास्त्राधीन होते त्यांस सोडविले.’ पण त्याच्या अनुयायांनी ख्रिस्ती स्वतंत्रतेत स्थिर उभे राहिले पाहिजे. (४:१–६:१८) याकरता, गलतीकरांनी, जे कोणी त्यांना दास्यत्वाच्या जुवाखाली परत येण्याची भुरळ घालीत होते अशांना विरोध करण्याची गरज होती. याशिवाय, त्यांनी त्यांना मिळालेल्या स्वतंत्रतेचा उपहास करावयाचा नव्हता, तर सर्व प्रकारची “देहाची कर्मे” टाळून देवाच्या आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रदर्शित करणे होते. त्यांना नियमशास्त्राच्या दास्यत्वात परत लोटू इच्छिणारे “देहदृष्ट्या आढ्यता मिरविण्यासाठी,” छळणूक टाळण्यासाठी आणि अभिमान बाळगण्यासाठी तसे करीत होते. पण पौलाने हे स्पष्ट केले की, सुंता ही काही कामाची नाही आणि बेसुंता हीही काही नाही, तर “नवी उत्पत्ती हिचीच कायती योग्यता आहे.” त्याने या नव्या उत्पत्तीमध्ये असणाऱ्‍या देवाच्या इस्राएलांवर शांती व दया असावी म्हणून प्रार्थना केली.

पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्राने, त्यांना आध्यात्मिक रितीने दास्यात जखडविण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना विरोध करण्याची मदत केली. या पत्राने आमचेही आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रदर्शित करण्यात आणि ख्रिश्‍चन स्वतंत्रतेत स्थिर उभे राहण्यात साहाय्य करावे.

[३० पानावरील चौकट]

डाग खूणः “यापुढे कोणी मला त्रास न देवो. कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या दासाच्या (डाग) खूणा धारण करुन आहे.” असे पौल लिहितो. (गलतीकर ६:१७) प्राचीन काळच्या काही मूर्तिपूजकात, त्यांच्या मालकीच्या दासांची ओळख पटावी यासाठी डाग देत. वेगवेगळ्या आकाराचे ठसे किंवा नक्षीकाम त्यांच्या शरीरावर डागविले जात. पौलाला आपल्या ख्रिस्ती सेवकपणात जो शारीरिक मार मिळाला त्याचे व्रण त्याच्या शरीरावर राहिले असतील यात शंका नाही. यामुळेच तो ख्रिस्ताचा विश्‍वासू दास आहे व त्याच्यासाठी त्याने छळ सोसला आहे असा जो त्याचा दावा होता त्याला पुष्टी मिळाली. (२ करिंथकर ११:२३-२७) कदाचित ह्‍याच त्या डाग “खुणा” असाव्यात याला किंवा जे जीवन त्याने देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती व्यक्‍त करण्यात व सेवकपण करण्यात घालविले त्याला उद्देशून तो हे बोलला असावा.

[३० पानांवरील चित्रं]

रोमी दासांना आपल्या धन्याची सेवा करण्यास भाग पाडण्यात येत असे, पण पौलाने येशू ख्रिस्ताचा दास म्हणून त्याची सेवा स्वखुशीने पत्करली व त्यामध्ये तो आनंदी होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा