शांती कितपत संभवनीय?
वर्तमानपत्रात जरी असे मथळे येत असले तरी आमच्यापैकी पुष्कळ जण हे जाणून आहेत की, मानवजात खऱ्या शांतीपासून कितीतरी दूर आहे. अफगाणिस्थानातून परकीय सैन्य काढून घेतल्यावरही त्या भूमीवर शांतता नाही. फिलिपाईन्स, सूदान, इस्राएल, उत्तर आयर्लंड, लेबनन व श्रीलंका ही अशी उदाहरणादाखल राष्ट्र आहेत की जेथे ह्या ना त्या कारणांमुळे झगडे चालूच आहेत.
पुष्कळ विचारवंत लोकांना युद्धापेक्षा शांती ही हवी आहे व तरीही ही शांती का मिळू शकत नाही? राजकीय नेत्यांनी बऱ्याच शतकांपासून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून शांती आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही. का बरे? काही उदाहरणांद्वारे आपण हे पाहू या.
धर्म व कायद्याद्वारे शांती
काही जण रोमी साम्राज्याकडे शांती आणण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे म्हणून बघतात. त्याच्या वर्चस्वाखाली प्रस्थापित कायदा, लवचिक राज्यव्यवस्था, धाक बसविणाऱ्या फौजा व सुव्यवस्थित हमरस्ते यांच्या परस्परातील मेळामुळे पॅक्स रोमाना (रोमी शांती) या नावाने पश्चिम आशिया, आफ्रिका व युरोप यांच्यातील पुष्कळ भागांवर आंतरराष्ट्रीय स्थैर्य निर्माण झाले होते. परंतु अखेरीस अंतर्गत भ्रष्टाचार व बाहेरून होणारे हल्ले यांना हे रोमी साम्राज्य बळी पडले व रोमी शांती कोसळून पडली.
हे, मानवी प्रयत्नांच्या दुःखदायक सत्याचे एक उदाहरण आहे. आशादायक सुरवातीनंतर ते अधिकच बिघडतात. देवाने स्वतःच म्हटले आहेः “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासूनच दुष्ट असतात.” आणि काळाच्या ओघात या दुष्ट कल्पनांचाच विजय होतो. (उत्पत्ती ८:२१) तसेच, यिर्मया संदेष्ट्यानेही हे म्हटले आहेः “हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) मानवाबद्दल निश्चित असे काहीच सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनातील चांगला हेतू दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील हेव्यामुळे किंवा महत्त्वाकांक्षेमुळे उलथवून टाकला जातो. याचप्रमाणे उच्च तत्त्वांना मानणारा एखादा राज्यकर्ता नंतर भ्रष्टाचारी होऊ शकतो. हे सर्व पाहता, मानव कशी शांती आणू शकेल?
इ. स. पू. तिसऱ्या शतकात भारत या उपखंडातून शांतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा लक्षवेधी अहवाल सामोरा आला. तेथे अशोक या प्रबळ राज्यकर्त्याने युद्धे व रक्तपात यांच्याद्वारे एक प्रचंड साम्राज्य उभे केले होते. अहवाल सांगतो की, त्याने नंतर बौद्ध धर्माच्या तत्त्वांचा स्वीकार केला. युद्धाचा त्याग करून आपल्या प्रदेशात त्याने प्रजेने चांगले जीवन व्यतित करण्यासाठी उपदेशपर लेख कोरलेले स्तंभ उभारले. यामुळे त्याचे साम्राज्य निदान बाह्यतः शांतीमय व वैभवशाली बनले.
अशोकचा हा मार्ग शांतीकडे नेणारा ठरला का? खेदाने, नाही असे म्हणावे लागते. या सम्राटाचे निधन झाले त्याच्याबरोबरच शांतीही लयास गेली व त्याचे साम्राज्यही कोसळले. यावरुन हेच दिसते की, सद्हेतूने केलेले योग्य अशा राज्यकर्त्याचेही प्रयत्न सरतेशेवटी विफलच होतात, कारण त्याला शेवटी मरण येते. उपदेशकाच्या लेखकाने याच समस्येचा उल्लेख करताना लिहिले की, “माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणाऱ्यासाठी ठेवून जावे लागणार आहे हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. तो सूज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खचे करून ह्या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार; हेही व्यर्थच!”—उपदेशक २:१८, १९.
होय, माणसाची मरणाधीनता हे चिरकालिक शांती आणण्यात एक अनिवार्य अडखळण आहे. याबाबतीत स्तोत्रकर्त्याचा सल्ला अगदी योग्य आहे. तो म्हणतोः “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्रसंहिता १४६:३, ४.
शांतीसाठी आणखी प्रयत्न
मानवाचे शांती आणण्याचे प्रयत्न कसे अयशस्वी होतात हे आणखी एका उदाहरणाद्वारे दिसून येते. उदाहरणार्थ, १० व्या शतकात युरोपमध्ये देवाची शांती या नावाने एक चळवळ सुरु झाली होती. चर्चच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा उद्देश यामागे असल्यामुळे नंतर त्याचे अनाक्रमण करारात रुपांतर होऊन १२ व्या शतकापर्यंत युरोपमधील पुष्कळ भागात त्याचा प्रसार झाला.
आणखी एका कल्पनेचे नाव आहे, “सामर्थ्याचा समतोल.” या तत्त्वानुरुप युरोप आपल्या राज्यांमध्ये समानरुपाने सामर्थ्याचे वाटप करून युद्धाला निरुत्साही करते. एखादे बलाढ्य राष्ट्र कमी सामर्थ्याच्या राष्ट्राला धमकी देत असेल तर दुसरे बलाढ्य राष्ट्र तात्पुरत्या काळासाठी दुबळ्या राष्ट्राला मित्रत्वाचा हात देते, ज्यामुळे आक्रमक राष्ट्राचे खच्चीकरण होते. याच तत्त्वाने युरोपातील हितसंबंध नेपोलियन युद्धापासून ते १९१४ मधील पहिल्या महायुद्धापर्यंत मार्गदर्शित करण्यात आले.
या युद्धानंतर न्यायमंदिर म्हणून लिग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली, जेथे रा आपसात युद्ध करण्याऐवजी आपणातील मतभेदांवर चर्चा करतील. तथापि, दुसरे महायुद्ध सुरु होताच लिगचे काम बंद पडले. पण युद्धानंतर तिचे संयुक्त राष्ट्रसंघ या नावाने पुनरुज्जीवन झाले व तो अजूनही अस्तित्वात आहे.
तथापि, हे सर्व प्रयत्न खरी व टिकाऊ शांती आणण्यात अयशस्वी ठरले. युरोपमध्ये “देवाची शांती” ही मोहीम अस्तित्वात होती तेव्हा युरोपियन लोक मुस्लीमांसोबत रक्तरंजित धर्मयुद्धे लढत होते. तसेच सामर्थ्याचा समतोल या प्रणालीद्वारे राजकीय नेते युरोपमध्ये शांती राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते त्याचवेळी ते युद्धे करत होते व युरोपाबाहेर आपले साम्राज्य वाढवीत होते. लिग ऑफ नेशन्सला दुसरे महायुद्ध रोखून धरण्यात अपयश आले, तसेच काम्पुचियामधील कत्तल टाळण्यास व कोरिया, नायजेरिया, व्हिएतनाम व झाईर येथील झगडे थांबवण्यात संयुक्त राष्ट्रसंघ कमी पडला.
होय, आतापर्यंत तरी राजकीय नेत्यांनी शांतता आणण्यासाठी केलेले सर्वोत्तम प्रयत्न लागू पडलेले नाहीत. टिकाऊ शांती कशी आणावी हे राज्यकर्त्यांनाच स्वतःला माहीत नाही. त्यांच्यातील व इतरांमधील मानवी कमतरता व मरणाधीनता या बाबतीत अडखळण बनले आहे. पण समजा, हे अडखळण नसते तर त्यांना शांती आणता आली असती का? नाही. पण का? कारण हे दुसरे अडखळण अतिभयंकर आहे.
शांतीस रोखून धरणारी अदृश्य कार्यशक्ती
या अडखळणाविषयी सांगताना पवित्र शास्त्र म्हणतेः “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” (१ योहान ५:१९) हा दुष्ट म्हणजे दियाबल सैतान, अतिमानवी असा आत्मिक प्राणी, जो आमच्यापेक्षा कितीतरी शक्तीशाली आहे. अगदी सुरवातीपासूनच हा सैतान बंडखोरपणा, लबाडी व खून यांच्यात गुरफटलेला आहे. (उत्पत्ती ३:१-६; योहान ८:४४) जगातील घडामोडींवर त्याचे छुपे पण प्रबळ वर्चस्व इतर प्रेरित विवेचनकारांकडून सांगण्यात आले आहे. पौल त्याला “या युगाचा देव” व “अंतरिक्षातील अधिपती” असे संबोधतो. (२ करिंथकर ४:४; इफिसकर २:२) येशूने तर त्याला एकापेक्षा अधिक वेळा “या जगाचा अधिपती” असे म्हटले आहे.—योहान १२:३१; १४:३०; १६:११.
वस्तुतः सबंध जग हे सैतानाच्या अधिपत्याखाली आहे तर मग, मानवी राज्यकर्ते चिरकालिक शांती आणू शकतील हे असंभवनीय आहे. मग याचा हा अर्थ आहे का की, शांती ही केव्हाच येणार नाही? मानवाला या शांतीप्रत कोणी नेऊ शकेल का?
[५ पानांवरील चित्रं]
कोणताही राज्यकर्ता कितीही सूज्ञ व उच्च तत्वप्रणालीचा असला तरी तो शेवटी मरणाधीन आहे व मग, त्यापेक्षा कमी पात्रतेचा व कमी तत्त्वप्रणालीचा कोणी ती जागा घेतो
[६ पानांवरील चित्रं]
शांतीचे सर्वात मोठे असे एकमात्र अडखळण आहे, दियाबल सैतान