वाचकांचे प्रश्न
◼ विवाहीत ख्रिस्ती दांपत्याने संतति-नियमनाच्या गोळ्या वापरणे हे पवित्र शास्त्रीय तत्त्वांशी सुसंगत आहे का?
ख्रिस्ती दांपत्याला मुले असलीच पाहिजे व असल्यास ती किती असावीत याबद्दल शास्त्रवचने स्पष्ट रुपात काही सांगत नाही. यास्तव, प्रत्येक जोडप्याने खाजगी रितीने व स्वतःच्या जबाबदारीने, आपल्या कुटुंबाचे नियमन करावे की नाही ते ठरवले पाहिजे. त्यांनी संतति नियमन स्वीकारले तर मग, कोणती गर्भधारणाप्रतिबंधक उपाय योजना निवडावी ही देखील त्यांची खाजगी बाब असेल. तरीसुद्धा, त्यांनी, त्यांना पवित्र शास्त्राविषयी मिळालेली समज आणि निष्पण्ण होणारे परिणाम याच्या अनुषंगाने वापरण्यात येणारी पद्धत ही जीवनाच्या पावित्र्याविषयी आदर दाखवणारी आहे का याबद्दलही विचार केला पाहिजे.
माणसाचे जीवन हे गर्भधारणेपासून सुरु होते असे पवित्र शास्त्र सूचित करते. ज्याची गर्भधारणा झाली आहे त्या जीवनाकडे आणि गर्भात वाढणाऱ्या “पिंडा”कडेही जीवनदाता लक्ष देत असतो. (स्तोत्रसंहिता १३९:१६; निर्गम २१:२२, २३a; यिर्मया १:५) यासाठी, ज्याचे गर्भधारण झाले आहे ते जीवन नष्ट करण्याचा कसलाही प्रयत्न होता कामा नये. असे करणे हे गर्भपात करण्यासारखे असेल.
संतति-नियमनाच्या गोळ्या जगभर प्रचारात आहेत. त्यामुळे मुलाचा जन्म कसा रोखला जातो? या गोळ्यात दोन प्रमुख प्रकार आहेत—संयुक्त गोळी आणि केवळ प्रोजस्टीन गोळी (लहान गोळी). जन्म घडू देण्यात अडथळा निर्माण करण्याविषयी या गोळ्यांचे संशोधन झाले आहे.
संयुक्त गोळीमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजस्टीन ग्रंथींचा समावेश असतो. यु. एस. फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या मते या संयुक्त गोळीची “मूलभूत यंत्रणा” “रजोगोलास प्रतिबंध” करण्याची असते. असे दिसते की, ही गोळी नित्याने घेत राहिल्यास ती बीजकोशातील अंडे बाहेर पडण्यास अडथळा निर्मिते. जेथे अंडे किंवा रजोगोल निघत नाही तेथे गर्भाशयास जोडलेल्या नलिकेमध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही. ही गोळी उदरातील आवरणात बदल घडवीत असते (ज्यामुळे प्रवेशाची शक्यता कमी होते,) त्यामुळे ही दुय्यम यंत्रणा समजण्यात येते.
याचे दुसरे अनिष्ट परिणाम उद्भवू नयेत म्हणून संयुक्त गोळीत सध्या एस्ट्रोजनचे कमी पातळीचे प्रमाण वापरले जाते. या कमी पातळीचे प्रमाण असणाऱ्या गोळ्या बीजकोशात अधिक हालचाली घडवितात. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या काँट्रॅसेप्टीव्ह डेव्हलपमेंट ब्रांचचे प्रमुख डॉ. गॅब्रिएल बैली म्हणतातः “प्राधान्य स्वरुपाचा विज्ञानशास्त्रीय पुरावा सुचवितो की, एस्ट्रोजनचे कमी प्रमाण असलेली गोळी अंडपेशीला प्रतिबंध करते, जरी १०० टक्के नाही तरी साधारण ९५ टक्के. या पेशीची निर्मिती होते म्हणजे ती पेशी फलित होते असे म्हणता येत नाही.”
कोणा स्त्रीने संयुक्त गोळी ठरविलेल्या प्रमाणात घेण्याचे चुकविले तरी दुसरी कार्यप्रणाली जन्म घडविण्याचे टाळण्याचे काम करू शकते. ज्या स्त्रियांनी कमी पातळी असलेल्या गोळ्या घेण्याचे चुकविले त्यांचा अभ्यास दाखवितो की, ३६ टक्के पेशींचे कार्यवहन ‘चुकविले’ गेले. अशा प्रकरणात काँट्रॅसेप्शन हे प्रकाशन सांगते की, “या गोळ्यांचा परिणाम गर्भाशयाच्या आवरणावर होतो व त्यातील द्रव गर्भधारणा घडण्यापासून संरक्षण देतो.”
पण मग, केवळ प्रोजस्टीन असणारी गोळी (लहान गोळी) आपले कार्य कसे करते? ड्रग इव्हॅल्यूएशन्स (१९८६) कळवतेः “गर्भनिरोधाची केवळ प्रोजस्टीन असणारी लहान गोळी अंडपेशींना रोखून धरणे हे प्रधान काम करीत नाही. गोळ्यातील घटक जाड आवरण तयार करतात जे शुक्राणूस तुलनात्मकरित्या अभेद्य असते; ते कदाचित गर्भाशयाच्या नलिकेतील वहनाची वेळ वाढवू शकेल आणि उदराच्या आवरणात फलितपणा थांबवू शकेल [जे फलित असलेल्या बीजाची देखील वाढ खुंटविते].”
काही संशोधकांचा असा दावा आहे की, केवळ प्रोजस्टीन गोळीमार्फत “वापरणाऱ्यात ४० टक्के अंडबीजांचे वहन सर्वसाधारणपणे होते.” अशाप्रकारे ही गोळी वेळोवेळी अंडबीजांच्या वहनाचे कार्य घडवू शकते. जे जाड आवरण तयार केले जाते ते शुक्राणुची वाट अडवते आणि गर्भधारणा होऊ देत नाही; किंवा या गोळीमुळे जे प्रतिकूल वातावरण निर्माण केले जाते ते फलित बीजास पुढे वाढण्यापासून रोखते.
याद्वारे हे दिसते की, संतति नियमनासाठी नियमित रुपाने वापर केल्यास बहुतेक प्रकरणात या गोळ्यांमुळे गर्भधारणा चुकविली जाते व गर्भपात घडत नाही. पण, केवळ प्रोजस्टीन गोळी (लहान गोळी) ही साधारणपणे अंडबीजाचे वहन होण्यास वाव देत असल्यामुळे अशी शक्यता आहे की, उदरात जे बीज फलित झालेले आहे त्याची ती पुढची वाढ खुंटविण्यामध्ये अडथळा उत्पन्न करते. वैज्ञानिक अभ्यास दाखवितात की, साधारणपणे (ज्यावर संतति नियमनाच्या गोळ्यांचा परिणाम झाला नाही अशा उदरात) “पहिली पाळी चुकविण्याच्या आत . . . साठ टक्के फलित झालेली अंडी नष्ट होतात.” हे जेव्हा घडते तेव्हा ते संतति नियमनाच्या गोळ्यांचा वापर करून फलित बीजास नष्ट केले जाते त्यापेक्षा वेगळे असते.
या कारणास्तव, एखाद्या जोडप्याने कोणा डॉक्टरांकडे संतति नियमनाच्या गोळ्या वापरण्याचा परामर्श घेतल्यास, काही निश्चित अशा नैतिक धोरणांचाही विचार केला जाण्यास हवा. आमचा देव व जीवन-दाता याजसमोर “पूर्ण विवेकाने” राहण्यासाठी ख्रिश्चनांनी खाजगी व व्यक्तीगत प्रश्नांचे निश्चित धोरण ठेवले पाहिजे.—प्रे. कृत्ये २३:१; गलतीकर ६:५.
[तळटीपा]
a पहा द वॉचटावर, ऑगस्ट १, १९७७, पृष्ठे ४७८-८०.