कुटुंब नियोजन ख्रिस्ती दृष्टिकोन
जागतिक लोकसंख्येच्या पहिल्या परिषदेने, १९७४ मध्ये, १४० राष्ट्रांनी औपचारिकपणे घोषित केले की सर्व जोडप्यांना “स्वतंत्रपणे आणि जबाबदारपणे त्यांना मुले किती असली पाहिजे आणि त्यांच्यात किती अंतर असावे तसेच शिक्षणाचा, व त्यांच्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा मुलभूत हक्क आहे.”
अनेकांनी या प्रस्तावाला चांगले मानले. हे सत्य आहे की देवाने आदाम आणि हव्वेला व त्यानंतर नोहाच्या कुटुंबाला, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका” असे सांगितले होते, परंतु अशी कोणतीही आज्ञा ख्रिश्चनांना दिलेली नाही. (उत्पत्ती १:२८; ९:१) शास्त्रवचने जोडप्यांना मुले होण्याचे किंवा ती न होण्याविषयीचेही प्रोत्साहन देत नाहीत. मुले असावीत की नाही हे त्यांनी मुले असण्याची योजना केल्यास, किती हवीत आणि कधी हवीत याचा निर्णय विवाहित जोडपे स्वतः घेऊ शकतात.
देवाने दिलेली जबाबदारी
जागतिक लोकसंख्येच्या परिषदेत मुत्सद्याने, “मुले किती असावीत आणि त्यांच्यात किती अंतर ठेवावे ही जबाबदारी” जोडप्याची आहे असे जे सांगितले त्याकडे तुम्ही लक्ष दिले आहे का? जबाबदारीचे हे तत्त्व पवित्र शास्त्राच्या अनुरूप आहे. मुले देवाकडील एक मोलवान देणगी आहे, तरी देणगीसोबतच जबाबदारी देखील येत असते हे ख्रिस्ती पालकांनी ओळखले पाहिजे.
सर्वात प्रथम, भौतिकरित्या मुलांची काळजी घेणे ही जबाबदारी आहे. पवित्र शास्त्र म्हणते: “जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास; नाकारला आहे तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.
कुटुंबाच्या तरतुदी पुरविण्यात केवळ मेजावर जेवण ठेवणे, बील भरणे हे जरी मोठे काम असले तरी याच गोष्टी केवळ त्यात समाविष्ट नसतात. जबाबदार ख्रिस्ती जोडपे, त्यांच्या कुटुंबात किती सदस्य असतील याचा विचार करताना, ते मातेच्या शारीरिक आरोग्याचा, याचप्रमाणे तिच्या भावनात्मक, मानसिक, आणि आध्यात्मिक हिताचा देखील विचार करतात. मुलांची काळजी घेण्यासाठी बराच वेळ जातो, आणि जेव्हा एकानंतर दुसरी मुले होतात, तेव्हा मातांना केवळ स्वतःचा आराम, मनोरंजन, वैयक्तिक वाढ, आणि ख्रिस्ती कार्याचाच नव्हे तर त्यांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा देखील त्याग करावा लागतो.
जबाबदार ख्रिस्ती पालक त्यांच्या मुलांच्या गरजांचाही विचार करतात. द स्टेट ऑफ द वर्ल्डस् पॉप्युलेशन १९९१ म्हणते: “मुलांच्या जन्मामध्ये कमी अंतर असणाऱ्या कुटुंबात, भावाभावात आणि बहिणीत अन्नासाठी, कपड्यासाठी आणि पालकांच्या ममतेबद्दल चढाओढ लागते. ते संसर्गाला चटकन बळी पडणारे असू शकतात. सहज भेद करता येत नाही अशा बालपणाच्या वर्षात ही मुले जगत असताना, त्यांची वाढ खुंटण्याची जास्त शक्यता असते, तसेच त्यांची बौद्धिक वाढ कमजोर होत असते. प्रौढत्वात या मुलांचे भवितव्य अतिशय कमी होत असते.” सर्वच मोठ्या कुटुंबाच्या बाबतीत ही गोष्ट नाही, परंतु मुले किती असावीत याची योजना करताना ख्रिस्ती जोडप्याने याचा विचार जरूर करावा.
पवित्र शास्त्र आज्ञा देते, त्याप्रमाणे ख्रिस्ती पालकांनी त्यांच्या मुलांच्या आध्यात्मिकतेची काळजी घेतली पाहिजे: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.
नायजेरीयामध्ये कायदा शिकविणाऱ्या एमीका नावाच्या ख्रिश्चनाच्या विवाहाला एक वर्ष होत आले होते तरी मोठ्या कुटुंबाचा पिता बनण्याची त्याला घाई नाही. “मी व माझ्या पत्नीने आम्हाला मुले किती पाहिजे याची चर्चा केली. पाच असावीत असा आम्ही विचार केला परंतु तीन असण्याचा निर्णय घेतला. दोन चांगले असतील असे आम्ही ठरवले. पवित्र शास्त्रीय तत्त्वानुरूप मुलांची वाढ करणे हे कठीण आहे. ही मोठी जबाबदारी आहे.”
देवाची सेवा करण्यात पूर्ण वेळ घालण्यासाठी काही ख्रिश्चन जोडप्यांनी मुले होऊ न देण्याचे ठरविले आहे. आफ्रिकेतील एका मिशनरीने निपुत्रिक राहण्याविषयी तिच्या पतीला सहमती दिली. ती म्हणते: “मुलांना जन्म न दिल्यामुळे, माझे काही हिरावून घेतले आहे असे मला मुळीच वाटत नाही. मी व माझ्या पतीने पालकत्वाचा आनंद जरी अनुभवला नाही, तरी आमच्या जीवनात इतर अनेक आनंद आहेत. पवित्र शास्त्राचे सत्य शिकण्यात इतरांना मदत केल्यामुळे, जगात अनेक ठिकाणी आमची आध्यात्मिक मुले आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो तसेच तेही आमच्यावर करतात. आम्हामध्ये खास असे बंधन आहे. प्रेषित पौलाने आध्यात्मिकतेत ज्यांना मदत केली अशांबरोबर स्वतःची तुलना लालनपालन करणाऱ्या व सौम्य वृत्ती दाखवणाऱ्या दाईसोबत केली ते अगदी उचित आहे.”—१ थेस्सलनीकाकर २:७, ८.
संतती प्रतिबंधक
पवित्र शास्त्र संतती प्रतिबंधकाचा निषेध करते का? नाही, ते करीत नाही. त्याची निवड करणे जोडप्यावर अवलंबून आहे. विवाहित जोडपे जर संतती प्रतिबंधक वापरण्याचे ठरवितील तर, संतती प्रतिबंधकाची ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे. तथापि, ख्रिस्ती जोडप्याने निवडलेली संतती प्रतिबंधक पद्धत जीवनाला पावित्र्य दाखवित आहे यावर आधारीत असली पाहिजे. पवित्र शास्त्र म्हणते की एका व्यक्तिचे जीवन गर्भधारणेतच सुरू होत असते, यामुळे गर्भपात घडवून आणणाऱ्या किंवा वाढ होत असलेल्या मुलाच्या जीवनाचा अंत करणाऱ्या संतती प्रतिबंधक पद्धती ख्रिश्चनांनी टाळल्या पाहिजेत.—स्तोत्रसंहिता १३९:१६; पडताळा निर्गम २१:२२, २३; यिर्मया १:५.
अशाप्रकारे, कुटुंब नियोजन यासंबंधाने जोडप्याने उचितपणे वेगळ्या निवडी केल्या पाहिजेत. काहीजन कमी मुले असावीत अशी इच्छा बाळगतील. इतर, संतती प्रतिबंधकाच्या पद्धतीचा वापर करून एकही मूल नको असे ठरवू शकतील. संतती प्रतिबंधकाच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, त्या प्रत्येकात फायदे आणि तोटे आहेत. कोणती पद्धत त्यांच्यासाठी योग्य आहे हे ठरवताना, काही पद्धती दुसऱ्यापेक्षा अधिक कार्यक्षम आहेत हे जोडप्याने आठवणीत ठेवावे. होणाऱ्या अनिष्ट परिणामांची देखील त्यांनी विचारणा केली पाहिजे. संतती प्रतिबंधक उपाययोजना याविषयीचा सल्ला तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करु शकेल अशा पद्धतीची निवड करण्यासाठी डॉक्टर तसेच कुटुंब नियोजन दवाखाने जोडप्यांना मदत देण्यासाठी तयार असतात.
मुले अधिक, कमी, किंवा अजिबात नसणे ही जोडप्याची व्यक्तिगत बाब आहे. दूरगामी परिणाम घडवून आणणारा हा महत्त्वाचा निर्णय होय. विवाहित जोडप्याने ह्या गोष्टीचा काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक विचार करावा. (g93 2⁄22)
[८, ९ पानांवरील चौकट]
लोकप्रिय संतती-प्रतिबंधक उपाययोजना
संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया
पुरूषांत: पुरुषाच्या स्क्रोटमला लहान चीर देतात त्यामुळे शुक्रवाहिनीचा लहान तुकडा काढण्यात येतो ही सोपी शस्त्रक्रिया आहे.
स्त्रीयांत: अंडनलिकेचा लहान तुकडा कापला किंवा बांधला जातो यामुळे अंडपेशीचा गर्भाशयात जाण्याचा मार्ग खुंटतो.
फायदे: संतती प्रतिबंधक उपाययोजनेत शस्त्रक्रिया ही सर्वात प्रभावकारी पद्धत आहे.
तोटे: कायमची असू शकते. शस्त्रक्रियेमुळे पुरूष आणि स्त्रीयात जननक्षमता पुनः प्राप्त झाली आहे, परंतु याची शाश्वती देता येत नाही.a
गर्भ-निरोधक गोळ्या
ह्यात केवळ प्रोजेस्टीन लहान गोळीचा समावेश आहे. हे स्त्रीयांच्या नैसर्गिक अंतस्त्रावाच्या पातळीत अडथळा आणते यामुळे अंडकोषातून अंडाणु पक्व होण्यास आणि बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला जातो.b
फायदे: गर्भधारणा टाळण्याची ही अति परिणामकारक पद्धत आहे.
तोटे: काही दुय्यम परिणाम, परंतु चाळीस वयाच्या आतील धुम्रपान न करणाऱ्या सुदृढ व्यक्तित याचे प्रमाण कमी असते.
डायफ्रॅम आणि शुक्रबीजनाशक
डायफ्रॅम ही लवचिक कड्यावर ताणून बसवलेली पातळ रबराची टोपी असते. जेली किंवा शुक्रबीजनाशक मलम लावल्यानंतर, योनीमार्गातून गर्भाशयाच्या मुखावर बसवली जाते.
फायदे: योग्यरितीने वापरल्यास हे गर्भ प्रतिबंधक सुरक्षित व खात्रीशीर वापरावयाचे साधन आहे.
तोटे: लैंगिक समागमाच्या प्रत्येक वेळी जोडप्याने याचा वापर केला पाहिजे. हे साधन योग्य रितीने आत घालण्यासाठी कुशलता लागते, आणि हे समागमापूर्वी आत टाकावे व त्यानंतर सहा ते आठ तास ठेवावे.
गर्भाशयाच्या तोंडावर बसणारी टोपी
डायफ्रॅमसारखे हे प्लास्टिकचे किंवा रबराचे टोपीसमान पण लहान साधन असते. डायफ्रॅमसारखे याला गर्भाशयाच्या तोंडावर बसविले जाते परंतु ते अधिक घट्ट बसते आणि यास शुक्रबीजनाशक मलम किंवा जेलीची गरज कमी प्रमाणात असते.
फायदे: परिणामकारकतेच्या बाबतीत टोपी डायफ्रेमसारखीच आहे, आणि ती गर्भाशयात ४८ तासांकरता राहू शकते. पुनः-पुन्हा केल्या जाणाऱ्या समागमाकरिता शुक्रबीजनाशक लावण्याची जरूरी नसते.
तोटे: आत बसविण्यास डायफ्रॅमपेक्षा हे अधिक अवघड आहे, प्रत्येक समागमाच्या अगोदर आणि नंतर गर्भाशयाच्या तोंडावर ते आहे याची तपासणी केली पाहिजे. गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाला संक्रमित होण्याचा धोका असतो. ही टोपी स्तनाग्राच्या परिक्षेनंतरच स्त्रीने घातली पाहिजे.
स्पंज (फेस गोळ्या)
शुक्रबीजनाशकात पॉलियुरेथिन स्पंज हा योनीमार्गातून गर्भाशयाचे तोंड बंद करण्यासाठी घातला जातो, यामुळे पुंबीजांस शारीरिक आणि रासायनिक प्रतिबंध होतो. वापरल्यावर याचा नाश करावा.
फायदे: स्पंज २४ तासांकरता आत ठेवता येऊ शकतो, या वेळेमध्ये समागम पुनःपुन्हा करण्यासाठी तो प्रभावकारी असतो.
तोटे: अलर्जीच्या प्रतिक्रिया आणि काही शरीरात विष पसरणे, चक्कर येणे इत्यादि आजारांच्या तक्रारी आल्या आहेत.
गर्भाशयात ठेवावयाची साधने
लूप किंवा कॉइल (तांबी) अशी धातु किंवा प्लास्टिकची साधने गर्भाशयात बसविली जातात. ती कशाप्रकारे कार्य करते याची जरी पूर्ण समज नसली तरी डॉक्टरांची अशी समज आहे की अनेक मार्गाने ही जननक्षमतेला प्रतिबंध घालते. यातला एक मार्ग म्हणजे, अंडाणूला गर्भाच्या पडद्याला चिकटण्यास प्रतिबंध घालते.
फायदे: खात्रीशीर संतती-प्रतिबंधक पद्धत.
तोटे: कधीकधी रक्तस्त्राव आणि वेदना आणि कधी गर्भपातासारखेच ते कार्य करते.c
निरोध
ही रबरी पिशवी असून पुरुषाच्या इंद्रियावर बसते त्यामुळे पुंबीजे स्त्रीयोनीमार्गात शिरण्यास प्रतिबंध होतो.
फायदे: सुरक्षित, संतती प्रतिबंधासाठी खात्रीची पद्धत. यामुळे एड्स व इतर लैंगिक संक्रमणापासून पसरणारे रोग टाळले जातात.
तोटे: याच्या वापरामुळे संभोगसुखात व्यत्यय आणला जात असल्यामुळे काहींना याची नापसंती आहे.
अपूर्ण समागम
वीर्यपतनापूर्वी योनीमार्गातून इंद्रिय बाहेर काढले जाते.
फायदे: तयारी किंवा बाह्य इतर साधनांचा काहीही खर्च येत नाही.
तोटे: लैंगिकरित्या समाधान करीत नाही, आत्मसंयमाची मोठी आवश्यकता लागते आणि खात्रीलायक नाही.
सुरक्षित काळ पद्धत
स्त्री जेव्हा फलन करण्यास योग्य बनलेली असते तेव्हा तिच्या मासिक पाळीच्या वेळी जोडपे समागमापासून परावृत्त राहतात कारण त्यावेळी तिच्या अंडपेशी परिपक्व असतात.
फायदे: सुरक्षित, कोणताही हानीकारक परिणाम होत नाही, समागमाच्या वेळी कोणत्याही कृत्याची आवश्यकता लागत नाही.
तोटे: मुले न होण्याचे जोडप्याने ठरविले असेल, आणि या पद्धतीचा वापर केला तर गर्भधारणा टाळण्यासाठी ही एवढी खात्रीची पद्धत नाही.
स्त्रावाचे रोपन करणे
संतती प्रतिबंधकाची ही अगदी नवीनच पद्धत आहे. स्त्रीच्या हाताच्या खालील त्वचेत अनेक सुक्ष्म मूलद्रव्यांचे रोपन केले जाते. पाच वर्षापर्यंत, अल्प प्रमाणात सतत स्त्रावाच्या रुपात हे रक्तवाहिन्यांत सोडले जाते. या काळादरम्यान गरोदर राहण्यापासून तिला सुरक्षित ठेवले जाते.
फायदे: अतिशय प्रभावकारी, रोपन काढल्यावर जननक्षमता पूर्ववत येऊ शकते.
तोटे: कमी. केवळ-प्रोजेस्टिन संतती प्रतिबंधक लहान गोळीप्रमाणेच. केवळ-प्रोजेस्टिन वापरल्यानंतर, गर्भपाताच्या माध्यमाद्वारे गर्भधारणा टाळली जाऊ शकते.d
[तळटीपा]
a गर्भ प्रतिबंधक गोळ्या गर्भधारणा होण्याचे कसे टाळतात ते जून १५, १९८९, पृष्ठ २९ च्या द वॉचटावर मध्ये सापडते. (g93 2/22)
b संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया ख्रिस्ती तत्त्वाशी जुळणारी आहे का याविषयीची माहिती द वॉचटावर मे १, १९८५ च्या अंकात पृष्ठ ३१ वर मिळते.
c गर्भ प्रतिबंधक गोळ्या गर्भ राहण्यापासून कसा प्रतिबंध करतात याविषयीची माहिती जून १५, १९८९ च्या द वॉचटावर पृष्ठ २९ वर सापडते.
d गर्भाशयात ठेवावयाची साधने ख्रिस्ती तत्त्वाशी जुळणारी आहेत का याविषयीची माहिती द वॉचटावर मे १५, १९७९ पृष्ठे ३०-१ वर मिळते.