वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. ३१-३२
  • अलंकार मत्तयाच्या शुभवर्तमानातील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अलंकार मत्तयाच्या शुभवर्तमानातील
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जन्म व सुरवातीचे उपाध्यपण
  • येशू—प्रभावी शिक्षक
  • देवाच्या पुत्राची सूचना ऐका
  • आमचा कित्ता—एक सचोटीरक्षक
  • उपासाविषयक प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • अलंकार लूकच्या शुभवर्तमानातील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. ३१-३२

अलंकार मत्तयाच्या शुभवर्तमानातील

यहोवा देवाने मत्तय या माजी जकातदाराला येशू ख्रिस्ताचा जन्म, आयुष्य, मरण आणि पुनरुत्थान याचा रोमांचकारी वृत्तांत लिहिण्यास प्रेरित केले. दहाव्या शतकानंतरच्या पुष्कळ हस्तलिखाणातील लेख हे म्हणतात की हे शुभवर्तमान येशूच्या स्वर्गारोहणानंतर सुमारे आठ वर्षांनी (इ.स. ४१ च्या सुमारास) लिहिले गेले. ही गोष्ट अंतर्गत पुराव्यासोबत तफावत निर्माण करीत नाही, कारण ह्‍या वृत्तांताचा समारोप इ.स. ३३ मध्ये येशूने शिष्य बनविण्याच्या आदेश आपल्या शिष्यांना देण्याच्या घटनेने होतो व तो इ.स. ७० मध्ये रोमी सैन्याकरवी घडलेल्या यरुशलेमाच्या नाशाविषयी काहीएक सांगत नाही.

चवथ्या शतकातील इतिहासकार युसेबीयस आपल्या हिस्टोरिआ एक्लेसिआस्टिका (मंडळीविषयीचा इतिहास) मध्ये दुसऱ्‍या शतकातील पापीआस व इरेन्युअस आणि तिसऱ्‍या शतकातील ओरिजन याचा उल्लेख करतो व म्हणतो की, हे सर्व या शुभवर्तमानाचे श्रेय मत्तयास देतात व ते त्याने इब्री भाषेत लिहिले असल्याचे सांगतात. ते खरोखरी अरामिक होते का? नाही. जॉर्जिया विश्‍वविद्यालयाचे धर्माचे प्राध्यापक जॉर्ज हावर्ड यांनी लिहिलेल्या लिखाणाच्या मते तसे नाही. त्यांनी लिहिलेः “येशूच्या काळी पॅलेस्टाईनमध्ये इब्री भाषा बोलली जात नव्हती तर तिची जागा अरामिक भाषेने घेतली होती ही समजूत प्रचलित बनल्यामुळे तसे मानण्यात येते. तथापि, मृत समुद्र गुंडाळीच्या अधिक संशोधनामुळे, ज्यापैकीच्या बहुतेक इब्री लिखाणाच्या आहेत तसेच येशूच्या काळातील पॅलेस्टाईनमधील सर्वसाधारण इब्री लिखाणाच्या शोधामुळे आता हे दिसून येते की, पहिल्या शतकात देखील इब्री भाषा जिवंत होती व प्रचलित होती.” तद्वत, मत्तयाने आपले लिखाण इब्री ख्रिश्‍चनांच्या लाभास्तव केले असावे, जे त्याने नंतर सर्वसाधारण ग्रीक भाषेत अनुवादित केले असावे.

आम्ही तुम्हाला मत्तयाच्या शुभवर्तमानाचे वाचन करण्याचे आर्जवितो. त्यात असणाऱ्‍या अलंकारापैकी काहींचे परिक्षण करीत असता तो वृत्तांत स्पष्ट करणाऱ्‍या पार्श्‍वभूमीच्या साहित्याची दखल घ्या.

जन्म व सुरवातीचे उपाध्यपण

मत्तयाचे शुभवर्तमान वंशावळी व येशूच्या जन्माने सुरु होते. मरीया गरोदर असल्याचे आढळते तेव्हा तिचा वाग्दत्त असलेला वर योसेफ “तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार करतो.” (१:१९) पण त्यांचा तर केवळ वांड्‌निश्‍चय झाला होता, तेव्हा ते कसे जमू शकत होते? यहुद्यांमध्ये वाग्दत्त स्त्रीवर वैवाहिक स्त्रीवर असणारी बंधने असत. तिने कोणा दुसऱ्‍यासोबत लैंगिक समागम केला तर तिला जारकर्मी ठरवून दगडमार करीत. (अनुवाद २२:२३-२९) वाग्दत्त असण्याच्या बंधनकारक स्वरुपामुळेच, जरी कोणा समारंभाने या दोघांना विधिपूर्वक एक केले नव्हते तरी, मरीयेला सोडण्याचा त्याने विचार केला होता.

मत्तयाच्या शुभवर्तमानाचे सुरवातीचे अध्याय येशूचे डोंगरावरील प्रवचन सामावून आहे. यामध्ये ख्रिस्त हा इशारा देतो की, कोणी आपल्या भावास “तिरस्काराने वाईट बोलेल” तो “वरिष्ठ न्यायालया”च्या शिक्षेस पात्र होईल. (५:२२) अशा संभाषणाकरवी तो भाऊ बुद्धीहीन आहे असा आरोप केला जात असे.

पण हे “वरिष्ठ न्यायालय” काय होते? ते यरुशलेमातील ७१ सदस्यांचे सन्हेद्रीन होते. त्याचे सभासद बनण्यासाठी कोणती पात्रता असण्याची गरज होती? मॅक्लीनटॉक व स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ म्हणतोः “उमेदवाराने नैतिक व शारीरिकदृष्ट्या अदूष्य असण्यास हवे होते. तो मध्यमवयीन, उंच, देखणा, श्रीमंत व शिकलेला असावयास हवा होता. . . . त्याला विविध भाषा येण्याची जरुरी होती . . . फारच वृद्ध, धर्मांतरीत, षंढ आणि नेथिनीम लोक त्यांच्या स्वभाववैचित्र्यामुळे रद्दबातल ठरत. यांना मुले नसल्यामुळे त्यांना घरगुती प्रकरणाविषयी सहानुभूति व्यक्‍त करता येत नव्हती म्हणून त्यांची निवड केली जात नसे . . . ; तसेच जे कोणी याजक, लेवी, किंवा इस्राएल यांची कायदेशीर मुले आहेत हे सिद्ध करु शकत नव्हते तेही नाहीत. . . . वरिष्ठ सन्हेद्रीनच्या उमेदवारास सर्वप्रथम त्याच्या जन्मगावी न्यायाधीश होणे; तदनंतर लहान सन्हेद्रीनमध्ये बदली होणे . . . , त्यानंतर बढती पावून दुय्यम लहान सन्हेद्रीनला येणे जरुरीचे होते; तेव्हाच त्याला एकाहत्तर सदस्यात स्विकारण्यात येई.”

यास्तव, येशूने, “जो कोणी आपल्या भावास तिरस्काराने वाईट बोलेल” असे म्हटले तेव्हा ती चूक यहुद्यांच्या वरिष्ठ न्यायालयाने सुनावणी करुन मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यासमान होते. आम्ही आमच्या बांधवांच्या विरुद्ध द्वेषयुक्‍त शब्द उच्चारु नये याबद्दल केवढा हा धोक्याचा इशारा! यासाठीच, “पृथ्वीचा न्यायाधिपती” यहोवासमोरील सर्वोच्च न्यायलयात तीव्र नापसंती मिळू नये म्हणून आपण आपल्या जिभेस लगाम घालू या.—उत्पत्ती १८:२५; याकोब ३:२-१२.

येशू—प्रभावी शिक्षक

हे शुभवर्तमान येशूला प्रश्‍नांची कौशल्याने उत्तरे देणारा शिक्षक असे दाखविते. उदाहरणार्थ, एका प्रश्‍नाचे उत्तर देताना आपले शिष्य का उपास करीत नाहीत ते त्याने स्पष्ट केले. (९:१४-१७) तो जिवंत असताना त्यांनी उपवास करण्याचे कसलेही कारण नव्हते. तरीपण त्याने भाकित केल्याप्रमाणे जेव्हा त्याचा मृत्यु घडला तेव्हा, त्याच्या मृत्युस का परवानगी देण्यात आली हे न समजून त्यांनी उपास व शोक केला. तथापि, पेंटेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्मा मिळाल्यावर त्यांना पुन्हा प्रज्वलित करण्यात आले; त्यामुळे दुःखाने उपास करण्याची गरज राहिली नाही.

अजूनही याविषयी बोलताना येशूने ही पुष्टी जोडली की, कोणीही नव्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावीत नाहीत, कारण त्याचा पोत फाटलेल्यास अधिक जीर्ण करतो. त्याने असेही म्हटले की, नवीन द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाही. बुधली ही जनावरांच्या कमावलेल्या कातड्यापासून तयार करीत व त्याच्या पायांचा भाग शिवून टाकीत. नवा द्राक्षारस आंबविताना तो कर्बद्विप्राणिल वायु उत्पन्‍न करतो व त्याच्या जोरामुळे बुधला फुटतो. या तुलनेनुरुप ख्रिस्ताने शिकविलेले सत्य जुन्या ताठर यहुदी धर्मापेक्षा फारच शक्‍तीशाली होते. तसेच तो कोणत्याही जीर्ण झालेल्या धार्मिक पद्धती, उपास प्रथा आणि इतर विधि यांजद्वारे ठिगळ लावण्याचा प्रयत्न करीत नव्हता. त्याऐवजी, देवाने येशूचा नवी भक्‍ती पद्धत आरंभिण्यासाठी वापर केला. तद्वत, आम्ही खोट्या धर्मास किंवा धर्मभ्रष्ट हालचालींना पाठिंबा देण्यासाठी काहीएक करु नये.

देवाच्या पुत्राची सूचना ऐका

मत्तयाने रुपांतराविषयी दिलेल्या अहवालानुसार देवाने येशूस त्याचा मान्यवर पुत्र संबोधले व आम्ही त्याचे ऐकावे असे त्याने म्हटले. (१७:५) यास्तव आम्ही ख्रिस्ताने दिलेल्या सर्व सूचना ग्रहण केल्या पाहिजेत. यापैकीची एक सूचना आहे की, जो व्यक्‍ती दुसऱ्‍याला येशूवर विश्‍वास ठेवण्यास अडखळवितो अशाला त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे. (१८:६) ही कोणत्या प्रकारची तळी होती? ही तळी लहान नव्हती तर येथे येशूच्या मनात जात्यावर फिरणारा चार ते पाच फूट परिघ असलेला दगड होता. या दगडास जात्यावर फिरविण्यास जनावराची ताकद लागे. इतका मोठा दगड कोणाच्या गळ्यात बांधला तर तो समुद्रात कदापि वाचू शकणार नाही. तेव्हा याद्वारे येशू याची शिकवण देत होता की, आम्ही त्याच्या अनुयायांपैकी कोणालाही अडखळविण्याचा दोष आपणावर येऊ देऊ नये. अशाच अर्थाने पौलाने लिहिलेः “मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे व जेणेकरुन तुझा भाऊ ठेचाळतो ते न करणे हे चांगले.”—रोमकर १४:२१.

देवाच्या पुत्राने शास्त्री व परुशी यांच्याविषयी धिक्कार व्यक्‍त केला आणि म्हटले की, ते चुना लावलेल्या कबरांसारखे आहेत तेव्हा त्याने अप्रत्यक्षरित्या सूचना प्रस्तुत केली. (२३:२७, २८) कबरा व थडी यांना चुना लावण्याची रुढ पद्धत त्या काळी होती ते अशासाठी की, त्यांना लोकांचा नकळत स्पर्श होऊ नये व याकरवी ते अशुद्ध होऊ नये. या पद्धतीचा निर्देश करुन येशूने दाखविले की, शास्त्री व परुशी हे बाहेरुन धार्मिक दिसतात, पण आतून मात्र “पूर्ण ढोंगाने व अनीतीने भरले” आहेत. या सूचनेमागील अवलंब आम्ही ग्रहण केल्यास आम्हास विपरीत मार्ग सोडण्यास व “निष्कपट विश्‍वासा”ने चालण्याचे कारण मिळेल.—१ तीमथ्य १:५; नीतीसूत्रे ३:३२; २ तीमथ्य १:५.

आमचा कित्ता—एक सचोटीरक्षक

येशूने ‘त्याच्या उपस्थिती’विषयी केलेल्या भविष्यवादाची माहिती दिल्यावर मत्तय ख्रिस्ताचा विश्‍वासघात, धरपकड, चौकशी व मृत्यु याविषयीची माहिती देतो. वधस्तंभावर येशू गुंगी आणणारा पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्याचे नाकारतो. (२७:३४) असा हा द्राक्षारस गुन्हेगाराला त्याच्या वधस्तंभावरील वेदना मृतवत करण्यासाठी स्त्रिया देत असत. मार्क १५:२३ म्हणते की, तो द्राक्षारस “बोळमिश्रित” होता, ज्यामुळे गुंगी अधिक वाढली असती. असे दिसते की, येशूने नाकारलेल्या द्राक्षारसात पित्त आणि बोळ या दोहोंचे मिश्रण होते. आपल्या पार्थिव जीवनाक्रमणाच्या उच्चांकाला आलेले असताना आपण गुंगीत वा धुंदीत असावे अशी येशूची इच्छा नव्हती. आपले मरण विश्‍वासात व्हावे यासाठी आपल्या सर्व इंद्रियांवर पूर्ण ताबा ठेवण्याची त्याची इच्छा होती. आम्हास कित्ता घालून देणाऱ्‍या येशूप्रमाणे आम्हीही यहोवाला आपली सचोटी दाखविण्यासाठी सतत दक्ष रहावे.—स्तोत्रसंहिता २६:१, ११. (w89 7/15)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा