दुष्काळी काळात जीवन राखणे
१. सुबत्तेच्या वर्षांत योसेफाने कोणती सुज्ञ हालचाल अनुसरली आणि कोणत्या परिणामासह?
अन्न व्यवस्थापक म्हणून नेमणूक होताच योसेफाने सबंध मिसर देशाचा दौरा केला. सुबत्तेच्या वर्षाना प्रारंभ होण्याआधीच्या काळात त्याने सर्व गोष्टींचे पद्धतशीर संघटन केले. आता भूमी तिचा उपज विपुलतेत देऊ लागली! प्रत्येक नगरांसभोवताली जी सर्व शेते होती त्यांचे पीक तो गोळा करू लागला व ते त्याच नगरातील कोठारात साठवू लागला. त्याने “समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेविला; त्याने ते गणावयाचे सोडिले, कारण ते अगणित होते.”—उत्पति ४१:४६-४९.
२. कोणत्या वैयक्तिक त्यागाद्वारे लोक स्वतःकरिता अन्न मिळवू शकले?
२ सुबत्तेची सात वर्षे संपली, मग यहोवाने भाकित केल्यानुसार दुष्काळी काळास सुरुवात झाली—हा दुष्काळ केवळ मिसरापुरताच नव्हता तर “साऱ्या पृथ्वीभर भारी कडक दुष्काळ पडला होता.” मिसरातील दुष्काळग्रस्त लोकांनी जेव्हा फारोपाशी येऊन अन्न अन्नाची ओरड केली तेव्हा फारो त्यास म्हणाला: “योसेफाकडे जा; तो तुम्हास सांगेल ते करा.” मिसरी लोकाजवळील पैसा संपेपर्यंत योसेफाने त्यांना धान्य विकले. त्यानंतर त्याने गुरांचा दाम, या अर्थी स्विकार केला. सरतेशेवटी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले: “आम्ही व आमच्या जमिनी यांस विकत घेऊन आम्हास अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी यांजवर फारोची मालकी होवो.” ह्याप्रमाणे योसेफाने मिसऱ्यांची सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली.—उत्पति ४१:५३-५७; ४७:१३-२०.
आध्यात्मिक भरवणूकीची तरतूद
३. यथाकाळी अन्न पुरविण्याकरिता येशूने कोणत्या कारभाऱ्याचे भाकीत केले?
३ जसे योसेफाने केलेले अन्नवाटप मिसरी लोकांकरिता जीवदान ठरले, तसेच खरे आत्मिक अन्न, जे, सर्व थोर योसेफ, येशू ख्रिस्ता द्वारा यहोवास स्वतःचे समर्पण करून त्याचे गुलाम बनतात अशा ख्रिस्तीजनांच्या बचावाकरिता अत्यंत जरूरीचे आहे. पृथ्वीवरील त्याच्या सेवकपणाच्या काळात येशूने भाकित केले होते की, त्याचे अभिषिक्त अनुयायी हा अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी संभाळतील. त्याने विचारणा केली: “आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाला देण्यास ज्याला धन्याने त्याजवर नेमिले असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल, तो धन्य.”—मत्तय २४:४५, ४६.
४. “दास” वर्गाकरवी आज जी जीवनसमग्री पुरविली जाते ती योसेफाच्या काळातील कोणत्या योजने समान आहे?
४ या “विश्वासू व बुद्धिमान दास,” मधून आज जे विश्वासू शेष हयात आहेत ते, यहोवाच्या समर्पित साक्षीदारांस तसेच जगातील आस्थेवाईक लोकास, हे जीवन वाचविणारे आध्यात्मिक अन्न मिळावे म्हणून, शास्त्रवचनांच्या संशोधनात खोलवर जात असतात. ही ठेव एक पवित्र कामगिरी म्हणून ओळखली जाते आणि यहोवाकरिता केलेली पवित्र सेवा आहे. अधिक असे, या “दास” वर्गाने मंडळ्यांचे संघटन केले आणि त्यांना पवित्र शास्त्रावर आधारित साहित्य एवढ्या भरपूर प्रमाणात पुरवित आहेत की त्यांचेपाशी त्यांना नेमून दिलेल्या अधिकृत क्षेत्रावर राज्याचे “बी,” पेरणीस मुबलकतेत आहे. ही अनुरुपता योसेफाच्या दिवसासमान आहे जेव्हा की त्याने लोकांस नगरात जमा केले व त्यांना केवळ निर्वाहाकरिताच नव्हे तर भावी पिकाचा हंगाम दृष्टीत बाळगून बियाणे दिली.—उत्पति ४७:२१-२५; मार्क ४:१४, २०; मत्तय २८:१९, २०.
५. (अ) आपत्ति काळात हा “दास” वर्ग, जे घरचे त्यांच्याकडे कोणत्या खास प्रकारे लक्ष पुरवितो? (ब) कशाप्रकारे १९८६ मधील आध्यात्मिक जीवनसामग्रीच्या “मुबलकतेची” योसेफाच्या काळांतील अन्नवाटपासोबत समानता होते?
५ जेव्हा, जाहीर प्रचार कार्यावर बंदी असते, तसेच यहोवाच्या साक्षीदारांचा छळ होतो त्यातहि हे आध्यात्मिक अन्न पुरवीत राहणे ही एक पवित्र ठेव आहे असाच दृष्टिकोन हा विश्वासू दास” बाळगून असतो. (प्रे. कृत्ये ५:२९, ४१, ४२; १४:१९-२२) जेव्हा एखादी आपत्ती, तुफान, महापूर किंवा धरणीकंप रूपाने येते अशावेळी “दास” याकडे जातीने लक्ष पुरवितात की देवाच्या कुटुंबियांना जशी शारिरिक तशीच आध्यात्मिक मदतहि पुरविली जावी. एवढेच काय पण जे सर्व राजकीय बंद्यांच्या छावण्यात होते त्यांनाही नियमीतपणे छापील साहित्य पुरविले गेले. ज्यांना आध्यात्मिक अन्नाची गरज आहे अशाप्रत त्यांचा लोंढा वाहात असता कोणतीहि राष्ट्रसीमा त्याला थोपवू शकली नाही. सतत पुरवठा करीत राहण्यास धाडस लागते, यहोवावरील पूर्ण विश्वास आणि चातुर्य वेळोवेळी पणास लागते. १९८६च्या वर्षभरात जगात चोहोकडे, “दास” वर्गाने ४,३९,५८,३०३ प.शास्त्र प्रती आणि पुस्तके तसेच ५५,०२,१६,४५५ मासिके छापून वितरीत केली, हा खरोखरी: “समुद्राच्या वाळू सरखा . . . महामूर संचय,” होता.
सूड, शासन, किंवा दया?
६, ७. (अ) कशाप्रकारे दुष्काळाने दहा सावत्र भावांना योसेफासमोर दंडवत घालण्यास लाविले? (ब) कोणत्या मार्गी आता योसेफ स्वतः परिक्षणात होता?
६ ओघाओघाने कनान प्रांतातहि दुष्काळाने प्रवेश केला. धान्य खरेदीसाठी याकोबाने योसेफाच्या दहा सावत्र भावांना मिसरास पाठविले. पण योसेफाचा सख्खा भाऊ बन्यामिनास त्याने पाठविले नाही ते, त्याने भय प्रकट केल्यानुसार की: “न जाणो त्याला एखादा अपाय व्हावयाचा.” योसेफ स्वतः धान्य विक्री करी म्हणून त्याच्या भावांनी त्याच्या समोर येऊन जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. त्यांनी जरी आपल्या भावास ओळखले नाही तरी योसेफाने त्यांना ओळखले.—उत्पति ४२:१-७.
७ त्याच वेळी योसेफास त्यांच्याबद्दल त्याला जे स्वप्न पडले होते त्याची आठवण आली. पण मग त्याने काय करणे होते? सूड ध्यावा का? त्यांचेवरील अशा आणीबाणीच्या काळात, त्यांनी त्याला जसे वागाविले होते, त्याबद्दल क्षमा करावी का? त्याच्या बापास जो तीव्र खेद झाला त्याबद्दल काय? ते सर्व विसरावे का? त्यांनी जो एवढा घोर अन्याय केला होता त्याबद्दल त्याच्या भावांना काय वाटत होते? या प्रकरणात योसेफ स्वतः कसास लागला होता. त्याची प्रतिक्रिया, जो भावी थोर योसेफ, येशू ख्रिस्त, याच्या धोरणासमान असेल का, जे त्याने नंतरच्या काळी प्रदर्शित केले व ज्याचा उल्लेख १ पेत्र २:२२, २३ मध्ये असा आढळतो: “त्याने पाप केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख सोशीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपवून दिले.”
८. योसेफाचे कशाद्वारे मार्गदर्शन झाले; व त्यातच येशूचे व त्याच्या शिष्यांचे कसले उदाहरण दिसले?
८ ज्या सर्व घटना घडल्या त्यात यहोवाचा हस्तक्षेप असल्याचे दिसून आल्यावर योसेफ देवाकडील आदेश आणि तत्वे पाळून चालण्यात दक्ष राहू लागला. याच प्रकारे येशूहि नेहमी जे सर्व ‘त्याजवर विश्वास ठेवतील अशा सर्वांस सार्वकालिक जीवन प्रदान करणार’ असल्यामुळे ‘त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे’ करण्यात तत्पर असे. (योहान ६:३७-४०) “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करिताना त्याचे अभिषिक्त शिष्यहि, त्यांचेपाशी जी, “या जीवनाची सर्व वचने लोकांस” सांगण्याची ठेव होती तिची पूर्तता करितात.—२ करिंथकर ५:२०; प्रे. कृत्ये ५:२०.
९, १०. (अ) योसेफाने आता कोणता मार्ग अनुसरला आणि का? (ब) येशू दाखविणार त्या तुलनेतील कोणता कनवाळूपणा योसेफाने प्रदर्शित केला?
९ योसेफाने, त्याच्या भावांना तत्काळ आपली ओळख दिली नाही. याउलट त्याने एका अनुवादकाद्वारे त्यांच्याशी कठोरपणाने बोलणी करून म्हटले: “तुम्ही हेरच आहात.” त्यांना धाकटा भाऊ असल्याचा त्यांनी उल्लेख केल्यावर, त्यांचे साळसूदपण शाबीत करण्यास त्याला मिसरास घेऊन येण्याची योसेफाने मागणी केली. योसेफाने, त्यांचे पश्चतापी अतःकरणाने एकमेकांसोबतचे बोलणे ऐकले की, आम्ही त्याला, योसेफाला, गुलामगिरीत विकले म्हणून हे संकट आपणावर ओढवले आहे. बाजूस जाऊन योसेफ रडला. तरी त्याने ओलीस म्हणून शिमोनास, त्यांनी बन्यामिनास सोबत आणावे म्हणून, बांधून ठेविले.—उत्पति ४२:९-२४.
१० योसेफ, त्याजवरील अन्यायाबद्दल सूड घेत नव्हता. तर तो हे निश्चित करू इच्छित होता की त्यांचा पश्चाताप खरा व अंतर्यामापासूनचा आहे, की ज्यामुळे त्यांच्यावर दया प्रकट करता येईल. (मलाखी ३:७; याकोब ४:८) येशू नंतरच्या काळात प्रदर्शित करणार होता, तशा दयावंत अंतःकरणाने, योसेफाने त्या प्रत्येकाच्या गोणीत फक्त धान्य नव्हे तर त्यांचा पैकाहि टाकिला. शिवाय वाटेसाठी शिधाहि दिला.—उत्पत्ति ४२:२५-३५; मत्तय ११:२८-३० सोबत पडताळा.
११. (अ) समयानुसार याकोबावर काय करण्याची पाळी आली आणि सरतेशेवटी तो का राजी झाला? (ब) कशाप्रकारे, रोमकर ८:३२ आणि १ ले योहान ४:१० त्याचप्रकारच्या देवाकडिल प्रीतीची शाश्वती देतात?
११ कालांतराने, त्यांनी मिसराहून आणलेले धान्य संपले. तेव्हा याकोब नऊ भावांना म्हणाला, परत जाऊन अन्न सामग्री खरेदी करून आणा. पूर्वीच त्याने बन्यामिनाबद्दल कळकळीने विनविण्यात म्हटले होते: “माझ्या मुलास मी तुम्हाबरोबर पाठविणार नाही. कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या मार्गाने तुम्ही जात आहा त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला शोकमग्न करून हे माझे पिकलेले केस लवकरच अधोलोकी उतरावयास कारण व्हाल.” मग, बरीच मनधरणी केल्यावर आणि यहुदाने बन्यामिनाबद्दल वैय्यक्तिक हमी दिल्यावर, याकोब नाखुशीनेच मुलास त्यांच्याबरोबर पाठविण्यास तयार झाला.—उत्पत्ति ४२:३६-४३;१४.
१२, १३. (अ) आपल्या भावांच्या मनाचा कल प्रकट व्हावा म्हणून योसेफाने त्यांच्यावर कोणती कसोटी लादली? (ब) तिच्या परिणामाने योसेफास दया दाखविण्याचा कसा आधार दिला?
१२ जेव्हा योसेफाने पाहिले की आपल्या भावांसोबत बन्यामीन आला आहे तेव्हा त्याने त्यांना त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले, जेथे त्याने मेजवानी दिली. पण बन्यामिनास इतरांच्या पांचपट वाढिले. मग योसेफाने आपल्या भावांची शेवटली परिक्षा घेण्याचे ठरविले. परत त्याने त्यांचा सर्व पैसा ज्याच्या त्याच्या गोणीत ठेविला आणि त्याचा स्वतःचा चांदीचा प्याला बन्यामिनाच्या गोणीत ठेविण्याचा आदेश दिला. ते तेथून रवाना झाल्यावर योसेफाने आपल्या घरकारभाऱ्यास त्यांना गाठून त्याच्या पेल्याकरिता त्यांची झडती घेण्यास व चोरीचा आरोप ठेविण्यास त्यांच्या मागे पाठविले. जेव्हा प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला तेव्हा त्यांनी आपली वस्रे फाडली. योसेफासमोर उभे राहण्यास त्यांना परत आणले. यहुदाने, दयेकरिता कळकळीची विनंती करून, म्हटले की बन्यामिनाऐवजी आपणाला गुलाम गिरीत ठेवावे, ते अशासाठी की तो मुलगा आपल्या बापाकडे परत जाऊ शकेल.—उत्पत्ति ४३:१५-४४:३४.
१३ आता, आपल्या भावांठायी खरोखरी हृदयपालट झालेला आहे ही खात्री झाल्यावर योसेफास आपल्या उचंबळलेल्या मनोभावनांवर ताबा ठेवणे असह्य झाले. तेथील इतर सर्व लोकांस बाहेर जाण्याचा आदेश दिल्यावर, योसेफ मोठ्याने म्हणाला: “मी तुमचा भाऊ योसेफ आहे, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकिले तो मीच. आता काही पस्तावा करू नका. तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल संताप करून घेऊ नका; कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. . . . की तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष राहावे आणि तुम्हास जिवंत” राखावे. मग त्याने आपल्या भावांस म्हटले: “तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा, आणि त्याला सांगा . . . मजकडे निघून या, विलंब करू नका. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून रहावे . . . कारण पांच वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे. तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार भिकेस लागणार नाही.”—उत्पत्ति ४५:४-१५.
१४. याकोबास कोणती आनंदविणारी वार्ता दिली गेली?
१४ जेव्हा फारोने योसेफाच्या भावांबद्दल ऐकले तेव्हा त्याने योसेफास आज्ञा दिली की त्याच्या बापास कुटुंबियासह मिसरास आणण्याकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जाव्या कारण ते इकडे देशातील जे उत्कृष्ठ, त्याचा उपभोग घेतील. जे सर्व घडले ते ऐकून याकोबाचा आत्मा आनंदाने बेभान झाला आणि तो म्हणाला: “पुरे झाले, माझा पुत्र योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी त्याला मरण्यापूर्वी जाऊन पाहीन.”—उत्पत्ति ४५:१६-२८.
मुबलकतेतील आध्यात्मिक अन्न
१५. आध्यात्मिक उपाजिविकेकरिता आम्ही कोणाकडे दृष्टी लावितो; आणि त्याच्या मुबलकतेची खात्री आम्हास कशी होते?
१५ या सर्व गोष्टींचा आम्हाकरिता आज काय अर्थ होतो? आमच्या आध्यात्मिक गरजेची सतत जाणीव राखून आम्ही योसेफाच्या काळातील दयाळू फारोपक्षा अती थोर अशा कोणाकडे तरी दृष्टी लावतो. तो सार्वभौम प्रभू यहोवा आहे ज्याने या अंधकारमय काळात पवित्र शास्त्र सत्याकरिता जे हे जग भूकेले आहे त्यास पोषक अन्न आणि मार्गदर्शन पुरविले आहे. त्याच्या राज्याकरिता आम्ही परिश्रम केलेत याचा अर्थ त्याच्या कोठारांत जणू आमचा दशमांश साठविला. केवढ्या उदारतेत तो आम्हाकरिता “आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” वर्षवित आहे!—मलाखी ३:१०.
१६. (अ) आज, हे जीवनरक्षक “अन्न” केवळ कोठे प्राप्त होऊ शकते? (ब) दुष्काळपीडित मानवजातीकरिता “बी”चे पेरणे विस्तारीत कसे केले?
१६ यहोवाच्या उजव्या हातास त्याचा अन्न व्यवस्थापक, आता सिंहासनाधिष्ट राजा व गौरवप्राप्त येशू आहे. (प्रे. कृत्ये २:३४-३६) जिवंत राहण्याकरिता जसे त्याकाळी लोकांनी स्वतःस गुलाम बनवून विकले, तसे आज, जे सर्व स्वतःस जिवंत ठेऊ इच्छितात, अशांनी येशूकडे, देवास समर्पित असे त्याचे शिष्य बनून आले पाहिजे. (लूक ९:२३, २४) जसे याकोबाने अन्नाकरिता त्याच्या मुलांना योसेफाकडे जाण्यास सांगितले, तसेच, यहोवा पश्चातापी मनुष्यांस त्यांचा प्रिय पुत्र, येशू ख्रिस्त, याजकडे आकर्षितो. (योहान ६:४४, ४८–५१) येशू, त्याच्या अनुयायांना, नगरासमान मंडळयांत—आज जगभर ज्यांची संख्या ५२ हजारांपेक्षा अधीक आहे—त्यात एकत्रित जमवितो—जेथे त्यांना आध्यात्मिक अन्नाच्या सुबत्तेतून भरविले जाते; आणि “धान्या”चा मुबलक पुरवठा होत असल्याने, ते क्षेत्रावरहि “बी” म्हणून पेरिले जाते. (उत्पत्ति ४७:२३, २४; मत्तय १३:४-९, १८–२३) यहोवाचे साक्षीदार स्वखुशीने काम करणारे कामकरी आहेत! त्यांच्यापैकी अनेक आहेत जे सर्व वेळची पायनियर सेवा स्वेच्छेने करण्यात सहभागी होतात व गतसाली अशांची संख्या ५,९५,८९६ एवढी होती. म्हणजेच प्रत्येक मंडळीत सरासरी ११ पायनियर सेवेस होते.
१७. योसेफाचे त्याच्या दहा सावत्र भावांशी जे पुनर्मिलन झाले त्याबद्दल कोणता दुसरा भविष्यवादित अहवाल साम्यतेत आहे?
१७ हे लक्षात घेण्याजोगे आहे की, योसेफाचे दहा सावत्र भाऊ, जे आता पूर्वीच्या वृति व कृती बद्दल पश्चातापी होते, ते त्या मिसरात त्याचे संगतीत होते जे सदोमासह, जेथे येशूला वधस्तंभी खिळले त्या जगाचे प्रतिरूप होते. (प्रकटीकरण ११:८) हे आम्हासं जखर्या ८:२०-२३ आठवण देते, जे आपल्या शेवटांत त्या “दहा जण” लोकांचा उल्लेख करते जे म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो”, म्हणजेच यहोवाच्या अभिषिक्त लोकांबरोबर येतो, ज्यांचेपैकींचे शेष अद्यापि पृथ्वीवर आपली सेवा करीत आहेत.
१८. बन्यामिनास जी खास कृपादृष्टी दाखविली ती आधुनिक काळात कशाशी अनुरूप आहे?
१८ तथापि, बन्यामिन, ज्याच्या जन्माने याकोबाच्या प्रिय पत्नीचा बळी घेतला होता, त्या योसेफाच्या सख्या भावाबद्दल काय? बन्यामिनावर योसेफाची खास मर्जी होती, आणि तो त्याच्या सख्ख्या आईचा मुलगा असल्यामुळे त्याला अधिक प्रीय वाटे. यामुळेच कदाचित, जेव्हा पहिल्या वेळी १२ भाऊ योसेफाच्या घरी मेजवानीस एकत्रित जमले होते तेव्हा बन्यामिनास इतरांच्या पाचपट वाढिले होते. मग बन्यामिन, हा आज अभिषिक्त साक्षीदारांतील जे शेष त्यांचे हुबेहुब चित्र ठरतो ना, खासकरून त्यांचेपैकी जे आज हयात आहेत व ज्यांची १९१९ पासून प्रभूच्या बाजूला येण्यात निवड केली गेली? हा “बन्यामिन” वर्ग वास्तविकतेत यहोवाकडून खास निधी मिळवून आहे की त्याचा ‘आत्मा स्वतः त्यांच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो.’ (रोम. ८:१६) प्रभूची “मेंढरे” यांची सेवा करीत असता, त्यांचेहि सत्व परिक्षण झाले.—मत्तय २५:३४-४०.
१९. इस्राएलाचे घरकुल गोशेन प्रांती स्थलांतर होणे आणि या काळात देवाच्या लोकांचे एकत्रित जमणे यात कोणती समानता नजरेस येते?
१९ हे चित्तवेधक आहे की जेव्हा फारोने याकोब व त्याच्या घराण्याची मिसरास आणण्याची तरतूद केली तेव्हा सर्व मिळून “जीं (पुरुष) मुनष्यें” तेथे वस्तीस गेली त्यांची संख्या ७० होती, ७ आणि १०च्या पटीतील होती. (उत्पत्ति ४६:२६, २७) हे दोन आकडे शास्त्रवचनात चोहोकडे अर्थबोधकपणे वापरलेले आहेत. “७” वेळोवेळी स्वर्गिय आणि “१०” पृथ्वी बाबतच्या पूर्णतेत आहेत. (प्रकटीकरण १:४, १२, १६; २:१०; १७:१२) हे आजच्या परिस्थितीच्या अगदी समांतर आहे, जेव्हा की आम्ही अपेक्षितो, यहोवा त्याच्या “देशांत,” ज्यात आज आम्ही सर्व आनंदाने जयघोष करीत आहोत, त्या आध्यात्मिक नंदनवनांत त्याच्या साक्षीदारांच्या घराण्यातील एकूण एकास गोळा करील. (इफिसकर १:१० पडताळा.) “यहोवा, आपले जे आहेत त्यांस ओळखतो.” एवढेच काय पण आताहि तो त्यांना फारोच्या राज्यातील गोशेन प्रांतासाख्या “उत्तम भागी” वसवीत आहे.—उत्पत्ति ४७:५, ६; २ तिमथ्यी २:१९.
२०. आज आध्यात्मिक दुष्काळ पसरलेला असताहि, आम्ही आनंद का करावा?
२० योसेफाच्या काळात, दुष्काळाची वर्षे, सुबत्तेची वर्षे संपल्यावर आली. आज ती एकमेकांबरोबर वाटचाल करीत आहेत. यहोवाच्या मर्जीबाहेरील देशांत पसरलेल्या आध्यात्मिक दुष्काळाच्या विरूद्धतेत यहोवाच्या भक्तिस्थानांत आध्यात्मिक अन्नाची रेलचेल आहे. (यशया २५:६-९; प्रकटीकरण ७:१६, १७) होय, जरी ख्रिस्ती धर्मराज्यात आमोसने भाकीत केल्यानुसार यहोवाचे वचन ऐकण्याचा दुष्काळ असला तरी स्वर्गीय यरूशलेमातून यहोवाचे वचन नेटाने आपले मार्गक्रमण करीत आहे. ते आम्हास केवढे आनंदीत करते!—आमोस ८:११; यशया २:२, ३; ६५:१७, १८.
२१. (अ) आज आम्ही कोणत्या मोठ्या हक्काचा आनंद लुटीत आहोत? (ब) कोणत्या गोष्टीकरिता आम्ही कृतज्ञ असावे व आम्ही आमचे आभार कसे व्यक्त करावेत?
२१ आज, थोर योसेफ, येशू ख्रिस्त, याच्या व्यवस्थापनाखाली नगरासमान मंडळ्यात संघटित होण्याची मोठी संधी आम्हाकरता आहे. तेथे आम्ही मुबलकतेतील आध्यात्मिक मिष्ठान्नाची मेजवानी करतो तसेच सत्याचे वचन पेरितो आणि ही सुवार्ता गाजवितो की आध्यात्मिक अन्न उपलब्ध आहे. हे आम्ही त्या सर्वांकरिता करतो, जे, सार्वभौम सत्ताधारी यहोवा याने आपल्या वात्सल्याने उपलब्ध केलेल्या तरतूदी त्याच्या अटीवर स्विकारतील. आम्ही आमच्या देवाचे केवढे कृतज्ञ आहोत, ज्याने आम्हाकरिता आपला पुत्र, थोर योसेफाचे दान दिले, जो आज आध्यात्मिक अन्न वाटपाचा सुज्ञ व्यवस्थापक आहे. या आध्यात्मिक दुष्काळाच्या काळात यहोवाने त्याची जीवन रक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. या, आम्हापैकी प्रत्येकजण त्याचे उदाहरण समोर ठेऊन त्याच्या नेतृत्वाखाली पवित्र सेवा करण्यात कार्यमग्न होऊ.
आपणास समांतरता दिसते का?
◻ अन्न व्यवस्थापक म्हणून योसेफाची येशूशी साम्यता कशी होते?
◻ योसेफाच्या नाटयात असे कोणते साम्य होते जे, समर्पणाद्वारे देवाचे दास्य स्विकारण्यासमान होते?
◻ योसेफ आणि येशू यांनी कोणते गुण दाखविले जे आज आम्हाकरिता उदाहरणीय आहेत?
◻ योसेफाच्या काळासमान, अन्न वितरणाच्या संबंधात आज कोणती योजना तिच्या पूर्णतेत राबविली जाते?
◻ या नाट्याचा आम्ही जो विचार विनिमय केला त्याने आम्हास काय करण्यास प्रवृत करावे?
[८ पानांवरील चित्रं]
आध्यात्मिक दुष्काळाने वेढलेल्या या जगात थोर योसेफ त्याच्याकडे विश्वासाने येणाऱ्या सर्वांना मुबलकपणे पुरवितो
दहा सावत्र भावांनी योसेफापुढे लीनता दाखविली त्याप्रमाणे मोठा लोकसमुदास ख्रिस्ताचा आता स्वीकार करतो
[९ पानांवरील चित्रं]
याकोबाच्या घरच्या ७० जीवांप्रमाणेच, यहोवाच्या “मेंढरां”ची पूर्ण संख्या चांगल्या “देशी”—आज आम्ही अनुभवीत असलेल्या आध्यात्मिक नंदनवनात—येतात
[१० पानांवरील चित्रं]
आधुनिक काळच्या बन्यामिनी वर्गास ख्रिस्ताने खास कृपापसंती दाखविली आहे; त्याल मुबलक रूपात “यथाकाळी अन्न” मिळते