नोकरी करणाऱ्या महिला—कसोटी व आव्हाने
“महिला गेल्या तीन दशकात अपूर्व संख्येने औपचारिक कामगार फौजेत दाखल झाल्या आहेत.” असा अहवाल जागतिक संशोधन संस्थेने दिला. “श्रीमंत व गरीब दोहो राष्ट्रात,” अहवाल पुढे म्हणतो, “महागाई स्त्रीयांना पगारासाठी नोकरी करण्यास प्रोत्साहन देते.” एक नायजेरियाची महिला अशी म्हणते: “आर्थिक दबाव असा आहे की मला बाहेर जाऊन काम करावेच लागते.”
पवित्रशास्त्रीय काळातील “सद्गुणी स्त्री” प्रमाणे पुष्कळ महिला त्यांच्या कुटुंबाच्या सुस्थितिसाठी आर्थिक मदत करण्यात आनंदी आहेत. (नीतिसूत्रे ३१:१०, १६, २४) कांहीना नोकरी असणे आव्हानाचे व तृप्ती देणारे वाटते. तथापि ऐहिक नोकरीचे फायदे असतानाच त्याच्या मध्ये कांही उणीवाही आहेत.
उदाहरणार्थ स्टोअर मॅनेजर असणारी एक महिला म्हणते: “मला माझी नोकरी आवडते. माझा मालक चांगला आहे, माझे ऑफिस सुंदर आहे. परंतु मी देऊ शकते त्यापेक्षा अधिक वेळ ही नोकरी घेते तेव्हा मला मोठा त्रागा वाटतो कारण घरात पत्नी व माता या नाते अजून आणखीन काम माझ्यासाठी आ वासून असते.” तरीही पुष्कळ महिला नोकरी, घर व कुटुंबाची काळजी फारच कुशलतेने घेतात व त्यासाठी त्यांची खूप प्रशंसा केली जावी.a
ऐहीक नोकऱ्या, कामावर अतुल्य अशा पुष्कळ समस्या महिलांच्या सामोऱ्या आणतात. पुष्कळासाठी तीव्र स्पर्धात्मक किंवा मन कलुषित वातावरणात काम करणे भाग पाडले जाते तेव्हा समतोल मनोवृत्ती ठेवणे आव्हान बनते. प्रगति करण्याची, इतरापुढे जाण्याच्या इच्छेने काही महिलांना त्यांची नोकरी त्यांची जीवनातील मुख्य ध्येय बनविण्यास लाविले आहे.
कांही वेळेस नोकरीचे ठिकाण नैतिक दबावाचा स्रोत आहे. मानहानिकारक भाषेच्या दैनंदिन प्रघातापुढे जाणे ही नोकरी करणाऱ्या महिलांच्या सामान्य तक्रारीतील एक आहे. यापेक्षा घृणित म्हणजे कांहीना स्वतःस वाढत्या लैंगिक त्रासाचे भक्ष्य बनल्याचे वाटते. “मी प्रथम नोकरी करण्यास प्रारंभ केला तेव्हा,” एक ख्रिस्ती महिला आठविते, “मी ऑफिसमध्ये एकटीच मुलगी होत्ये. पुरुष अश्लील भाष्य करायचे व ते मला खरोखर नकोसे करीत होते.”
या गोष्टीस दररोज तोंड देणाऱ्या व विशेषतः ख्रिस्ती दर्जा टिकविण्याची इच्छा करणाऱ्या महिलांसाठी अशा समस्या चिंतेची बाब आहेत. तरीपण त्यांच्याठायी खऱ्या मदतीचा उगम आहे हे आनंदाचे आहे.
[तळटीपा]
a “वर्किंग कपल्स—फेसिंग द चॅलेन्जेस” ही फेब्रुवारी ८, १९८५ च्या अवेक! या आमच्या जोडीच्या मासिकातील चर्चा पहा.