ख्रिस्ती महिला—नोकरीवर सचोटी टिकवितात
“कांही वेळेस [नोकरीवर] मानसिक ताण एवढा दाट असतो की तुम्ही तो जणू सुरीने कापू शकाल.” असे नोकरी करणारी एक महिला म्हणाली.a उत्पादन करण्याचा दबाव तसेच, घातकी स्पर्धा, मागणी करणारे व्यवस्थापक, सारखेपणा—या नोकरीस कंटाळवाणे बनविणाऱ्यातील केवळ कांही थोडक्या गोष्टी आहेत. थोडक्या नोकऱ्या जाहिरातीच्या माध्यमाने आकर्षता व चेतना यांचे अभिवचन देतात. परंतु तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला आहात तर तुम्ही तुमच्या नोकरीस यशवंत बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
याकडून आम्ही आर्थिक लाभास संदर्भित करीत नाही. नोकरीचे ठिकाण असा आखाडा आहे जेथे तुमची ख्रिस्ती सचोटी परिक्षिली जाते! तुम्ही तुमच्या कामावर ज्या पद्धतीने काम करता ते नाशकारक स्पर्धात्मक आत्म्यास दूर सारते व नैतिक अतिक्रमणाचा प्रतिविरोध प्रगट करील की तुम्ही इश्वरी तत्वांना समर्पित आहात. यहोवा देवाची पसंती प्राप्त करण्यासाठी नोकरीस असणाऱ्या महिलांना स्तोत्रकर्त्याने म्हटले होते त्या प्रमाणे म्हणणे शक्य झाले पाहिजे: “मी सात्विकपणे वागलो आहे.”—स्तोत्रसंहिता २६:१.
पवित्रशास्त्र तेच करण्यास तुम्हास मदत करते. उदाहरणार्थ जेव्हा स्पर्धात्मक युक्त्यांचा अवलंब करीत राहण्याचे अर्जविले जाते किंवा नोकरीस कौटुंबिक जबाबदाऱ्या, पवित्रशास्त्राभ्यास, ख्रिस्ती सभा व उपाध्यपण यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानण्याच्या मोहास बळी पडण्यास लाविले जाते तेव्हा तुम्ही राजा शलमोनाचे शब्द आठविण्यात चांगले कराल की: “मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली ही सर्व चढाओढीमुळे होतात, हा ही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.” (उपदेशक ४:४) ऐहीक नोकरीकडे अशा दृष्टीने पहाणे जळपळत्या महत्वाकांक्षाना थंड किंवा दूर करते. ते तुम्हास नोकरी बाबत योग्य दृष्टीकोन असण्यास, तिला आध्यात्मिक गोष्टीपेक्षा दुय्यम दर्जाने पहाण्यास मदत करते.—मत्तय ६:३३.
परंतु याचा अर्थ ऐहीक कामाबद्दल बेपर्वा असणे असा आहे का? क्वचितच कारण पवित्रशास्त्र आळशीपणाचा धिक्कार करते. (नीतिसूत्रे १९:१५) ते ‘तुमच्या परिश्रमी कामाचे चांगले फळ पहाणे’ याविषयी म्हणते. (उपदेशक २:२४) याशिवाय, एकाद्याने त्याच्या कुटुंबास पुरवठा करणे ईश्वर-प्रणित जबाबदारी आहे. (१ तीमथ्यी ५:८) यास्तव या कर्तव्याची पूर्ति करण्यासाठी त्रासदायक ऐहिक नोकरी करणे आहे, तर मग कलस्सैकर ३:२३ मधील पवित्रशास्त्रीय शब्दावर विचार करा: “जे कांही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका तर यहोवासाठी म्हणून जिवेभावे करा.” होय, काम करताना स्वतःस “यहोवासाठी म्हणून” करतो असे पहाणे पगार वाढ किंवा बढती मिळण्याचे प्रलोभनापेक्षा उत्पादनक्षम असण्यामागील शक्तीमान चेतना आहे.
मालकांना “संतोषविणे फार कठीण”
सॅली नावाची एक महिला म्हणते: “मला वाटते की [माझा सुपरवायझर] नेहमीच माझ्या कामाकडे पहातो तर त्याच्याजवळ कोणासाठीही कधीही चांगले शब्द नसतात.” ज्याला “संतोषविणे कठीण” किंवा शीघ्र कोपी अशा मालकाच्या देखरेखीखाली काम करणे वैफल्य आणणाऱ्या व खासकरून एकादा नोकरीवर नविन असतो तेव्हा होऊ शकते.—१ पेत्र २:१८.
नोकरी सोडल्यामुळे आर्थिकदृष्ट्या विकटपणा येतो यात काही प्रश्न नाही. यासाठी “अधीन असा” हा पवित्रशास्त्राचा उपदेश कामगारांनी—पुरुष व स्त्री—अनुसरणे चांगले ठरेल. (१ पेत्र २:१८) अनादर किंवा टोमणेबाजीने मतभेद तीव्रपणे वाढविण्याऐवजी “[धन्यांना] संतुष्ट करा, उलट बोलू नये” याचा प्रयत्न करा. (तीतास २:९) अशा प्रकारचे इंद्रियदमन तुम्हास नोकरी गमावण्यापासून दूर राखील. शलमोनाने म्हटले: “तुजवर अधिपतीचा [कोणा अधिकारी] क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.”—उपदेशक १०:४.
निर्दयी अधिकाऱ्याच्या अधिरतेस मृदुपणे व त्याच्या अवाजवी मागणीस दयाळूपणे तोंड दिल्यास त्यास खजील केले जाऊ शकेल. (नीतिसूत्रे १५:१; कलस्सैकर ४:६) तुम्ही तुमची कार्यक्षमता व विश्वस्तपणा शाबीत कराल तसे त्याची तुम्हा बाबतची मनोवृती हळूवारपणे सुधारील. जर नाही तर तुम्हास थोडकीच निवड असेल पण, देव तुमच्या ख्रिस्ती वर्तणूकीकडून संतुष्ट आहे हे जाणून “धीर दाखवा”.—याकोब ५:७, ८.
नैतिकतेत शुद्धता राखणे
सचोटी मध्ये ख्रिस्ती नैतिकपणा समाविष्ट आहे. लेडीज होम जर्नल मधील एका लेखाने इशारा दिला: “ऑफिस—जेथे प्रत्येकाने सभ्य पेहराव करून, चांगले वागण्याची एकत्रीतपणे वेळ घालवून सामान्य ध्येयाचा पाठलाग करण्याची—लैंगिकतेवर सहजपणे हल्ला करू शकेल असे वातावरण बनवू शकते!” ऑफिसच्या भानगडी सर्वसाधारण परिचयाच्या असतात. यास्तव जागृत असणे सुज्ञपणाचे आहे. पुरुषासोबतचे नातेसंबध कामावर कामापुरतेच ठेवा. कामेच्छा वाढविणारे संभाषण टाळा. “देवाची इच्छा आहे की, . . . तुम्ही जारकर्मापासून अलीप्त ठेवावे.”—१ थेस्सलनीकाकरास ४:३, ४.
तरीपण कांही वेळेस महिला जुनाट समस्येचे भक्ष्य बनतात व ती आहे: लैंगिक छेड. पवित्रशास्त्र सांगते की बवाज नावाच्या मनुष्याने त्याच्या पदरी नोकरीस असणाऱ्या तरूणांना हुकूम केला की त्याच्या शेतात काम करीत असलेल्या रूथ या महिलेला “स्पर्श करू नका.” पवित्रशास्त्र विद्वान जॉन पी. लेन्गे त्याबाबत म्हणतात: “शेत कामगार असभ्य थट्टेने कदाचीत महिलावर तुटून पडण्याच्या सवयीचे असावेत.” (रूथ २:९) सध्याच्या काळातील विशिष्ट धनी त्यांच्या महिला कामगारांना सुरक्षितता देण्याचा प्रयत्न करतात तरी अंदाजे ४० ते ८५ टक्के कामावरच्या महिला (युनायटेड स्टेट्स मध्ये) कांही प्रकारच्या लैंगिक त्रासात आहेत.
व्हेलेरिया नावांची एक युवती तिला उदाहरणार्थ घ्या, जी सचिव म्हणून काम करते. वेळा-वेळी, तिचा धनी—जो तिच्यापेक्षा तिपटीने वयस्कर आहे—तिच्या पेहराव्याविषयी अश्लील शेरे देत असे. एके वेळेस त्याने तिला अश्लील चित्रे पहाण्याच्या युक्तीत पकडण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी त्याने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तिला बजावले की, “तुला तुझी नोकरी पाहिजे असल्यास तुला माझ्या बरोबर लैंगिक सलगी करावी लागेल.” अर्थात तिने ते धुडकावले.
अशा प्रकारच्या मानखंडणेच्या वागणुकीच्या पुष्कळ पद्धती आहेत. ब्रिटीश मासिक न्यू स्टेटसमॅन म्हणते: “त्यात कामातुर दृष्टीक्षेप, चिमटे घेणे, अनावश्यक शारीरिक स्पर्श व अपशब्द असे प्रकार आहेत.” लैंगिक अनीतीमध्ये जमवून घेण्याचा दबाव बहुदा लाडक्या नावांने (प्रिये, डार्लिंग) बोलावणे इतका घातकी आहे किंवा राजरोसपणे उघड मागणी करणारा ठरतो. कांही महिला त्यांची नोकरी जाईल या भितीने ही छळणूक सहन करतात. पहाणी दाखविते की अल्पसंख्या महिला त्यांच्याकडे असे लक्ष दिल्यामुळे मानावर चढल्यासारख्या दिसतात!
विरूद्ध लिंगी व्यक्तीने दिलेले अवधान खुशामत करणारे असेल तरी फाजील सलगी शीलभ्रंश खेळाची बहुदा पहिली चाल असते. अशा प्रकारे ते तुमच्या सचोटीवर हल्ला व तुमच्या ख्रिस्ती शीलाचा उघड उपमर्द करते.—१ करिंथकर ६:१८.
प्रतिबंधात्मक उपाय
“ज्ञान तुझ्या चितात प्रवेश करील . . . विवेक स्वतः तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील.” (नीतिसूत्रे २:१०, ११) तर मग तुम्ही व्यवहार चातुर्य व समंजसपणा तुमचे रक्षण करण्यासाठी कसा उपयोगात आणू शकाल? नोकरी करणारी डीआन नावाची महिला म्हणते: “कामावर, मी यहोवाच्या साक्षीदारातील एक आहे म्हणून माहीती करून देते.” (मत्तय ५:१६ पडताळा.) तुम्हाजवळ उच्च नैतिक दर्जे आहेत असे पुरुषांना समजते तेव्हा बहुदा ते पुढे पाऊल टाकण्यात घाबरतात.
बेट्टी नावाची एक समजदार महिला अजूनही एक सावधगिरी घेते. ती म्हणते: “माझ्या सोबतीच्या कामगारांसोबत संगत राखण्यात मी फार दक्ष राहाते कारण त्यांची नैतिकता मजसारखी नाही.” (१ करिंथकर १५:३३) याचा अर्थ सोबतच्या कामगारापासून फटकून रहाणे किंवा वैर राखणे असा नाही. परंतु ते ख्रिश्चनास बाधक गोष्टींची चर्चा करतात तेव्हा तेथून निघून जाण्यात अवमान करू नका. (इफिसकर ५:३, ४) अशा प्रकारचे अनैतिक बोलणे ऐकणे कामावरील पुरुषांना त्यांच्या छेडीस तुम्ही मान्य व्हाल अशी छाप देऊ शकते.
कामानुसारची सभ्यता टिकविणे अनपेक्षित अवधानास निराशही करू शकते. पवित्रशास्त्र महिलांना उपदेश करते की “त्यांनी स्वतःस सुयोजित पेहराव व भिडस्तपणे व मर्यादेने शोभवावे.” (१ तीमथ्यी २:९; फरक पहा नीतिसूत्रे ७:१०) सेक्सूल हॅरॅसमेन्ट ऑन द जॉब पुस्तक म्हणते: “चिथावणी देणारा पेहराव—म्हणजे खूप खोल कापलेला मागचा गळा; पारदर्शक कपडे, आखूड घागरा; भडक मेक्अप्—कामाच्या ठिकाणी साजेसा नाही . . . व्यवसाईक व्यक्तीमत्व निर्माण करण्याचे तुमचे अवसर हे खासरित्या तुम्ही आकर्षक नाहीत असे पेहराव निवडाल तर सुधारील.”
सरते शेवटी, समजदार महिला हात मिळवणीचे प्रसंग टाळतात. मादक पेय प्राशन करण्याचे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसता कामाच्या वेळेनंतर थांबण्याचे निमंत्रण पाश असणार. (२ शमुवेल १३:१-१४ पडताळा.) “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून स्वतःस लपवितो” असे सुज्ञ नीतिसूत्रे म्हणते.—नीतिसूत्रे २२:३.
छळणूक थांबवणे
अर्थात कामावरील सर्व पुरुषांची विचारसरणी नीट करू शकता किंवा दुराग्रही प्रवृतीच्या कित्यांना बदलू शकता अशी कल्पना करणे बरोबरचे नाही. (यिर्मया १३:२३ पडताळा) शिवाय अधिक मित्रत्व दाखविणाऱ्या सर्वच पुरुषांचे “डोळे व्यभिचाराने भरले” आहेत असा निष्कर्ष काढणेही योग्य नाही. (२ पेत्र २:१४) यास्तव कांही वेळेस संशयाचा फायदा देणे उचित आहे.
परंतु फाजील सलगी सुस्पष्ट अशी समाविष्ट आहे तर खंबीर भूमिका घ्या. शलमोनाने एका युवतीकडे अनावश्यक फेरफटके घातले तरी ती डळमळली नाही. त्याने केलेल्या स्तुतीला तिने अढळ प्रेमाच्या बोलाने, विनयशील मेंढपाळ युवकास प्रतिसाद दिला. तिने शलमोनाची पुढची चाल धिक्कारली हे पहाता ती म्हणू शकली, “मी तटासारखी आहे.”—गीतरत्ने ८:१०.
अशीच भक्कमता दाखवा. बहुदा असे म्हणून छेड मुळातूनच उपटली जाऊ शकते: “कृपया स्पर्श करू नका;” “मला माझ्या नावाने बोलवा;” किंवा “मला अशा प्रकारचे हास्य विनोद आवडत नाहीत.” एका ख्रिस्ती महिलेने सहजगत्या एका पेक्षा अधिक वेळ म्हटले “ते थांबवा!” काही झाले तरी तुमचे नाही म्हणजे नाही हे स्पष्ट करा! (मत्तय ५:३७ पडताळा.) दुर्बळ व निर्बल प्रतिसाद छेड काढणाऱ्यास अधिक पराकाष्टा वाढविण्यास उत्तेजीत करतो.
तुम्ही विवाहीत आहात तर तुमच्या भावनांची सहभागिता तुमच्या पतीसोबत करा. त्यांच्या जवळ परिस्थीती कशी हाताळावी याबाबत कांही व्यवहारी युक्त्या असतील. नोकरी बदलणे हेच बरे दिसते तर देवाचे अभिवचन “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही” हे लक्षात घ्या.—इब्रीयांस १३:५.
तुमची नोकरी व तुमची सचोटी
बहुदा ऐहीक नोकरी जरूरीची असली तरी ती कांही प्रकरणात तुमच्या ख्रिश्चन सचोटीला धमकी भरते. यामुळेच मत्तय १०:१६ मधील येशूचे शब्द अगदी समयोचित आहेत: “तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद असे शाबीत करा.”
नोकरीच्या ठिकाणी ख्रिस्ती सचोटी टिकविणे सोपी गोष्ट नाही पण ती टिकविली जाऊ शकते. पवित्रशास्त्र सूचनांच्या अवलंबनाने यहोवाच्या साक्षीदारातील हजारो महिला ते करीत आहेत. त्या स्वतःस पवित्रशास्त्राभ्यास, प्रार्थना, ख्रिस्ती सभा, राज्य प्रचार कार्य व इतर ईश्वरी कार्य हालचालीच्या सहाय्याने अध्यात्मिकतेत सबळ राखतात. परिणामतः त्या पगार देऊ शकत नाही अशा गोष्टीचा आनंद लुटतात. आपल्याला यहोवाची कृपापसंती आहे याची जाणीव त्यांना तृप्ती देते; कारण त्याचे वचन असे अभिवचन देते की: “सचोटीने चालणारा निर्भय राहतो.”—नीतिसूत्रे १०:९.
[तळटीपा]
a येथे प्रापंचिक नोकरी करणाऱ्यांचे वर्णन आहे. अर्थात गृहिणी, माता व इतर महिलाही काम करतात.
[७ पानांवरील चित्रं]
नोकरीच्या ठिकाणी सचोटी टिकविण्यासाठी:
1 सोबतीच्या कामगारांसोबत सामाजिक सहवास राखण्यात जागृती राखा
2 विनयशील पेहराव्याने स्वतःस सजवा
3 तुम्हाजवळ उच्च नैतिक दर्जे आहेत ते कळवा.