वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. ३-४
  • अपोकलीप्स—ते काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अपोकलीप्स—ते काय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते खरोखरी काय आहे
  • अपोकलीप्स केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • प्रकटीकरणाचा संदेश—भीतीदायक की आशादायक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • विश्‍वविनाशाची भीती कशाला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पोप आणि अपोकलीप्स
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. ३-४

अपोकलीप्स—ते काय आहे?

“अपोकलीप्स!” हा शब्दप्रयोग ऐकताना तुमच्या मनात काय येते? तो जगाच्या विनाशाचा दिवस आहे का? संपूर्ण विनाश? तिसरे महायुध्द? जगाचा शेवट? असे चित्र तुमच्या मनात उभे राहते तर तसे चित्र पाहणारे तुम्ही एकटेच नाहीत. विज्ञान व वृत्त माध्यमाने मानवाचे भवितव्य अंधकारमय असे रेखाटले आहे. यास्तव, पुष्कळजण अपोकलीप्सची साम्यता काही महासंकटाने मानवजातीचा नाश यासोबत करतात यात काही आश्‍चर्य आहे का?

“आज अपोकलीप्स काही केवळ पवित्र शास्त्रीय शब्दचित्र नसून ते खरोखरची शक्यता बनले आहे,” असा इशारा युनोचे सचिव जनरल जाविर पेरेझ डी क्यूलर यांनी त्यांच्या उद्‌घाटन समारंभाच्या भाषणात काढले. “यापूर्वी मानवाने कधीही अनुभवले नाही अशा महासंकट व बचाव ह्‌या दोहोंच्या मधील सुळक्यावर आम्हास ठेवलेले आहे.” ते येथे काय संदर्भित करीत होते? ते सध्याच्या शस्त्रास्त्र स्पर्धेच्या चढाओढीत उडणाऱ्‍या अण्वस्त्र भडक्याविषयी बोलत होते. संयुक्‍त राष्ट्र संघास अधिक प्रभावी इशारा करताना त्यांनी म्हटले की, “जगभरात सुमारे ५,००,००० शास्त्रज्ञ त्यांचे ज्ञान अधिक उच्च दर्जाची व अधिक नाशकारक शस्त्रास्त्रे शोधून काढण्यास खर्ची घालत आहेत.”

इतर सुध्दा सध्याच्या तणावाबद्दल जागृत आहेत. न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च येथील तत्वज्ञानाचे प्राध्यापक हॅन्स जोन्स म्हणाले की, माझे मुख्य भय “औद्योगिक लोकांनी शक्‍तीचा अहेतुक उपयोगाच्या प्रकारामुळे येणाऱ्‍या महासकंटाची धमकी आहे.” ते अपोकलीप्सची जोड ‘विनाश, प्रदुषण, ग्रहाचा नाश, त्याचप्रमाणे अणुबॉम्बकडून आकस्मितरित्या नाशाचे भय’ यासोबत करतात.

याचप्रमाणे इतिहासकार गोलो मान यांनी म्हटले: “आम्हास आणखीन एक जागतिक महायुध्द असू शकणार नाही. युध्द हा चुकीचा शब्द आहे. आम्ही ‘तिसरे महायुध्द’ या शब्दप्रयोगावर बंदी घालून त्याऐवजी महासंकट किंवा विनाश म्हणावे.”—हॅम्बर्ग यांचे डाय झेइट, ऑगस्ट ३०, १९८५.

होय, मानव हे जाणतो की तो स्व–नाशाच्या तोफेच्या तोंडाजवळ आहे. पण काय तो महासंकटाची (अपोकलीप्स) कळ ओढील का? नाही, पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्वसमर्थ यहोवा देव”–मानव नव्हे–“पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील. (प्रकटीकरण ११:१७, १८) यास्तव, पवित्र शास्त्रानुसार अपोकलीप्स काय आहे हे जाणणे कदाचित तुम्हास वेगळाच, संपूर्णतः नवीन व उज्वल असा दृष्टिकोण देईल.

ते खरोखरी काय आहे

थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या पत्रात अपोकलीप्सचे वर्णन आहे. तेथे प्रेषित पौल लिहितो: “. . . संकट आणणाऱ्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे व संकट सहन करणाऱ्‍या तुम्हास आम्हाबरोबर विश्राम देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभु येशूच्या प्रकटीकरण [किंवा, अपोकलीप्स] च्या समयी ते होईल, तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्नीज्वालेसहित प्रगट होईल, तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. हे सर्वजण न्याय शिक्षा सार्वकालिक नाश भोगतील.”—२ थेस्सलनीकाकरांस १:६–१०.

यास्तव अपोकलीप्स हे “मोठ्या संकटा”च्या काळा दरम्यान येशूचे प्रकट होणे आहे. (मत्तय २४:२१) डब्ल्यू. ई. वाईन यांच्या ॲन एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्ड्‌स अनुसार ग्रीक शब्द अ.पोक’लिप्सीस हा “ज्यावेळी प्रभु येशू ख्रिस्त देवाचा न्याय बजावण्यास येतो” त्यास संदर्भित करतो. पवित्र शास्त्र यास प्रकटीकरण अथवा महासंकट म्हणजेच आर्मगिद्दोन येथील “सर्वसमर्थ देवाची मोठ्या दिवसाची लढाई” यास संदर्भित करते.—प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११–२१a

अपोकलीप्स बाबतीत आम्ही हे पाहिले आहेच की पवित्र शास्त्र “संकट” “सूड” व “शिक्षा” म्हणते. तरी देखील, ते जे, निरपराधी जन संकटे सहन करतात त्यांच्या “मुक्‍तते”विषयी सुध्दा बोलते. देवाचे वचन आम्हास अभिवचन देते की, “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल.” (स्तोत्रसंहिता ३७:१०) यास्तव अपोकलीप्स मानवजातीला दुष्ट प्रभावापासून मुक्‍त करील. ते नम्र जनांसाठी चांगल्या परिस्थितीकडे निरविणारे असेल–त्यांना भयजनक अशी घटना नसणार.

अशाप्रकारे, संपूर्णतः सर्वांचे उच्चाटन किंवा नाशाऐवजी अपोकलीप्स हे मानवजातीच्या समस्यांचा नीतीमान पर्याय असणार. नव्या युगात म्हणजेच नीतीमत्वतेच्या शांती व समाधानपर युगात जीवन कंठणे हे तुम्हास व तुमच्या परिवारास आर्जवीत नाही का?

परंतु आम्ही पवित्रशास्त्रीय अपोकलीप्सच्या निकट पोहोचत आहोत का? होय तर आम्हास त्याचा अचूक समय जाणण्यास काही मार्ग आहे का?

[तळटीपा]

a  टेहळणी बुरुज मार्च १९८७ च्या अंकातील मगिद्दो ह्‌यावरील लेख पहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा