वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. ८-९
  • यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेशी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेशी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेश
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशू पृथ्वीवर का आला
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • येशू पृथ्वीवर का आला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेशी

काना येथील लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर येशू गालील समुद्रानजीक असलेल्या कफर्णहुम शहराकडे जातो. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य, त्याची आई व त्याचे भाऊ याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे देखील आहेत. हा पुढचा प्रवास करण्याआधी आवश्‍यक वस्तु बरोबर घेण्यासाठी ते प्रथम नासारेथ येथील येशूच्या घरी थांबतात.

पण काना, नासारेथ तसेच गालीलमधील डोंगराळ प्रदेशात आपले उपाध्यपण चालू ठेवण्याऐवजी येशू कफर्णहुमास का चालला आहे? एक गोष्ट म्हणजे कफर्णहुम हे प्रसिध्द ठिकाण व मोठे शहर आहे. शिवाय येशूला मिळालेले नवीन शिष्य हे कफर्णहुमात आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहणारे होते. याकरता शिक्षण घेण्यासाठी त्यांना आपली घरे सोडून येण्याची गरज नव्हती.

येशू कफर्णहुमातील वास्तव्यात पुष्कळ अद्‌र्भित कृत्ये करुन दाखवितो. याचीच ग्वाही तो नंतर काही महिन्यांनी देतो. पण आता येशू व त्याचे सोबती परत मार्गाला लागतात. हा वसंत ऋतु आहे आणि ते इ. स. ३० च्या वल्हांडण सणाला हजर राहण्यासाठी यरुशलेमाकडे जात आहेत. तेथे शिष्य येशूच्या बाबतीत एक गोष्ट पाहतात जी त्यांनी पूर्वी कधीही पाहिली नव्हती.

देवाच्या नियमानुसार इस्त्राएलांना प्राण्यांचे अर्पण द्यावे लागत असे. त्यामुळे सोयीसाठी व्यापारी तेथे प्राणी व पक्षी विकत असत. पण ते हा व्यापार थेट मंदिरामध्येच करीत व खूप किंमतीने लोकांना लुबाडत असत.

अतिशय संतापाने संतापून येशू दोऱ्‍यांचा कोरडा घेतो व व्यापाऱ्‍यांना मंदिराबाहेर घालवितो. तसेच तो सराफांचा खुर्दा व चौरंग पालथे करतो. “ही घाण येथून काढून घ्या!” असे तो कबुतरे विकणाऱ्‍यांना म्हणतो, “माझ्या बापाचे घर व्यापारी केन्द्र करु नका!”

येशूचे शिष्य जेव्हा हे पाहतात तेव्हा देवाच्या पुत्रासंबंधीचा शास्त्रलेख त्यांना आठवतो: “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.” पण यहुदी विचारतात: “तुम्ही हे करता तर आम्हाला कोणते चिन्ह तुम्हाला दाखवावयाचे आहे?” येशू त्यांना उत्तर देतो: “तुम्ही हे मंदिर मोडून टाका, मी तीन दिवसात ते उभारीन.”

यहुद्यांना वाटते की तो खरोखरच्या मंदिराविषयी बोलत आहे, पण येशू तर आपल्या शरीररुपी मंदिरासंबंधी बोलत होता. आणि तीन वर्षानंतर येशू मृतातून उठल्यावर त्याचे हे म्हणणे त्याच्या शिष्यांना आठवते. योहान २:१२–२२; मत्तय १३:५५; लूक ४:२३.

◆ काना येथील लग्नानंतर येशू कोणत्या ठिकाणी प्रवास करतो?

◆ येशू का संतापतो आणि तो काय करतो?

◆ त्याची ती कृति पाहून त्याच्या शिष्यांना काय आठवते?

◆ “हे मंदिर” या बद्दल येशू काय बोलला व त्याचा अर्थ काय होत होता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा