वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. ४-६
  • अपोकलीप्स केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अपोकलीप्स केव्हा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पुष्कळांना वाटते त्यापेक्षा जवळ
  • १९१४ ची पिढी
  • “रात्रीचा चोर”
  • घटनातील बदल
  • अपोकलीप्स–नंदनवनाची प्राथमिकता
  • अपोकलीप्स—ते काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • प्रकटीकरणाचा संदेश—भीतीदायक की आशादायक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • विश्‍वविनाशाची भीती कशाला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पोप आणि अपोकलीप्स
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. ४-६

अपोकलीप्स केव्हा?

हे अलिकडील वृत्तपत्र वाचण्यासारखे आहे ज्यात युध्दे, भूकंप, साथीचे रोग, आजार, दुष्काळ, गुन्हे व भय यासारखे वृत्त आहे! ही सर्व स्थिती व याहून अधिकाचा भविष्यवाद पवित्र शास्त्र करते. ते आम्ही ज्या दिवसात राहतो त्यास “शेवटले दिवस” म्हणून निर्देश करतात. याचा अर्थ हे युग संकटाकडे किंवा अभिवचन दिलेल्या अपोकलीप्सकडे निरवीत आहे. तुम्ही त्याबद्दल कसे खात्रीदायक असू शकता?

सध्या पूर्ण होत असलेल्या पवित्रशास्त्र भविष्यवादांची तुम्ही साक्ष देत आहात. “तुम्ही या वस्तुस्थितीला तोंड दिलेच पाहिजे की,” पवित्र शास्त्र म्हणते, “या जगाच्या शेवटच्या काळात कठीण समय येतील. मनुष्य स्वार्थी व इतर कशाचे नव्हे तर धनाचे लोभी असतील; बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, पालकांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन; ते . . . चांगल्यावर प्रेम न बाळगणारी . . . स्वाभिमानाने फुगलेली असतील. देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, धार्मिकतेचा आव आणणारी पण तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील.” (२ तिमथ्यी ३:१–५ द न्यू इंग्लीश बायबल) तुम्ही सर्व ठिकाणी हीच परिस्थिती अवलोकीत नाही का?

आज जिवंत असणाऱ्‍या पुष्कळांना, कदाचित तुम्हासही, असा काळ आठवत असेल जेव्हा सध्याच्या इतकी वाईट परिस्थिती नव्हती. लोक दुसऱ्‍याबाबत फारच विचारी होते. मुले त्यांचे पालक व वृध्दाबाबत आदरशील होते. पुरुष, स्त्रिया व लेकरे रात्रीसुध्दा रस्त्यावरुन फिरण्यास एवढी घाबरत नव्हती. परंतु काळ वेगाने बदलत आहे. कदाचित यातील कोणतीही परिस्थिती तुमच्या विभागात आहे असे वाटत नसले तरी खात्रीने, स्वामित्वाकरता मानवाच्या मगरुर वांच्छेमुळे उद्‌भवलेली अण्वस्त्र युध्दाची शक्यता, आम्हातील प्रत्येकावर प्रभाव करते.

होय, देव त्याचा शब्द, पवित्र शास्त्र याद्वारे “या जगाच्या शेवटच्या काळा”बाबत जसे अगदी स्पष्टपणे भाकित करतो तसेच त्याने आम्हास अपोकलीप्स म्हणजे जेव्हा येशू न्याय बजाविण्यास येईल त्या समयाविषयीची माहिती पुरविली आहे.

पुष्कळांना वाटते त्यापेक्षा जवळ

“नव्या गोष्टी मी विदित करतो,” असे देव म्हणतो, “त्या घडण्यापूर्वी मी त्या तुम्हास सांगतो.” (यशया ४२:९ द जरुसलेम बायबल) होय. त्याने अपोकलीप्सच्या आधी ज्या महत्वपूर्ण घटना घडणार त्याची रुपरेषा पवित्र शास्त्रात दिली आहे.

उदाहरणार्थ, येशूने म्हटले जगभरात संदेश दिला जाईल व त्यास अपोकलीप्ससोबत जोडले. तो म्हणाला: “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात साक्षीसाठी म्हणून गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) या “शेवटा”त अपोकलीप्स समाविष्ट आहे. आज यहोवाचे साक्षीदार जगभरात २०० पेक्षा अधिक राष्ट्रात, शक्य त्या सर्व मार्गाने घरोघरी जाऊन राज्याची सुवार्ता परिश्रमाने गाजविण्यात हजारो तास खर्च करीत आहेत.

त्याच्या अनुयायांच्या फायद्यासाठी लक्षवेधक दाखला देऊन येशूने अपोकलीप्सकडे निरविणाऱ्‍या समयाची तुलना नोहाच्या दिवसातील जलप्रलयापूर्वीच्या दिवसासोबत केली. नोहाच्या दिवसात लोक खाणे पिणे करण्यात व मौजमजेत एवढे गुरफटलेले होते की त्यांनी नोहाने वदविलेल्या आकस्मित येणाऱ्‍या नाशाविषयीच्या संदेशाची “दखल घेतली नाही.” ते त्याच्या इशाऱ्‍याबद्दल बेपर्वा होते.—मत्तय २४:३७–३९.

आमचे दिवस हे जलप्रलयापूर्वीच्या परिस्थितीसोबत केवढे तंतोतंत जुळतात बरे! लोक त्यांच्या दैनंदिन व्यवहारात एवढे गढले आहेत की धोक्याच्या इशाऱ्‍याकडे व अपोकलीप्स येत आहे याच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

तथापि, पुष्कळांना वाटते त्यापेक्षा अपोकलीप्स जवळ आहे. शेवटच्या दिवसाच्या चिन्हाविषयी येशूने घोषित केले की “या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.” (मत्तय २४:३४) येशू कोणत्या पिढीविषयी बोलत होता?

१९१४ ची पिढी

“ग्रेट ब्रिटनच्या शांतीदायक व भरभराटीच्या व्हिक्टोरियन युगास” संदर्भित करताना भुतपूर्व पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन म्हणाले की, ‘ते ज्या युगात जन्मले’ ते “चांगले, अधिक चांगले” बनेल असे समजून होते. परंतु, “अनपेक्षितपणे अकस्मात १९१४च्या एका प्रभाती ते सर्व मातीमोल झाले.” त्यास “१०० वर्षांची शांती व प्रगती”चा अंत असे संबोधून मॅकमिलन यांनी पहिल्या महायुध्दाने “एका युगाची समाप्ती” व “गोंधळाची सुरुवात जे अजून सुरु आहे” याचा इशारा कसा दिला त्याची आठवण दिली. पुष्कळजण खासकरुन जे १९१४ मध्ये होते व अजूनही आहेत त्यांना ते सत्य असल्याचे ठाऊक आहे.

होय, या मासिकाने, येशू ज्या पिढीविषयी बोलत होता ती १९१४च्या पिढीकडे अंगुली दर्शविते ही गोष्ट पुष्कळ वर्षापासून त्याच्या वाचकांच्या सामोरी आणली आहे.a अशाप्रकारे, “ही पिढी ह्‌या सर्व गोष्टी [ज्यात अपोकलीप्सही समाविष्ट आहे] पाहिल्याशिवाय नाहीशी होणार नाही.”

१९१४ पासून ७० पेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत तरी सुध्दा त्या काळात जिवंत होते असे पुष्कळ लोक अजुनही जिवंत आहेत. द अमेरिकन लिजन मॅगजीन डिसेंबर १९८४नुसार युनायटेड स्टेटमध्ये सुमारे २,७२,००० लोक पहिले महायुध्द प्रत्यक्ष अनुभवलेले अजूनही जिवंत आहेत, हेच इतर देशाबाबत सत्य आहे. तथापि, ही संख्या फार जलदगतिने कमी होत आहे. यास्तव पहिले महायुध्द प्रत्यक्ष अनुभवलेले किती जण शेवटपर्यंत इतिहासात केवढ्या लांबवर कूच करणार?

ही आकडेवारी १९१४ च्या पिढीच्या अंतिम घटकेकडे आपले लक्ष वेधते, मग अपोकलीप्सच्या अचूक वेळेबद्दल आम्ही केवढे निश्‍चिंत असू शकतो?

“रात्रीचा चोर”

पवित्र शास्त्र अगाऊ सूचना देते: “काळ व समय या विषयी, . . . तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येईल.” (१ थेस्सलनीकाकर ५:१, २) कोणी चोर तुम्हास तुमचे घर केव्हा फोडणार याची योजना आखीत आहे हे तारेने कळवावे अशी तुम्ही अपेक्षा कराल का?

या कारणास्तव, येशूने उचितपणे त्या घटकेविषयी आम्हास सूचना दिली: “सावध असा, जागे रहा, कारण तो नेमलेला समय केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मार्क १३:३२–३७) येशूने वर्णिलेल्या बऱ्‍याच घटना १९१४ च्या पिढीकडे संकेत करतात याची आम्ही दखल घेतली आहे. पवित्र शास्त्र आकस्मिक अपोकलीप्सचा संकेत देणारी भावी चिन्हे वर्णिते. आम्ही काय अपेक्षू शकतो?

घटनातील बदल

प्रेषित पौल म्हणाला: “शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, व ते निभावणारच नाहीत.” (१ थेस्सलनीकाकर ५:३) यास्तव, आम्ही या “शेवटच्या दिवसाच्या” अंतिम पर्वात जाऊ तेव्हा पौलाच्या शब्दाच्या पुर्णतेत आम्ही “शांती व निर्भयता” याकडे उल्लेखनीय लक्ष दिले जाण्याची अपेक्षा करु शकतो. पण, त्यानंतर काय?

पवित्र शास्त्र भविष्यवाद निदर्शित करतात की “मोठी बाबेल” याअर्थी वर्णिण्यात आलेल्या जागतिक धर्म यावर पृथ्वीवरील राजकीय सत्ता एकाएकी हल्ला चढवितील व तो अनपेक्षितपणे नाश पावेल! (प्रकटीकरण १७:५, १६; १८:१०, १७) ही गोष्ट “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत कधीही आले नाही असे मोठे संकट” याच्या सुरुवातीस चिन्हांकित करील. (मत्तय २४:२१) पण जे “जागृत आहेत” व अपोकलीप्सकडे अवधान पुरवून आहेत त्यांच्यावर हे कसा परिणाम करते?

यहोवा त्यांना सोडवील याविषयी खरे ख्रिश्‍चन खात्रीदायक असू शकतात. (२ पेत्र २:९) होय, यहोवा देवाची जाण ते राखतात व जोपर्यंत निस्वार्थपणे त्याची सेवा करतात तोपर्यंत त्यांना देव व ख्रिस्त आर्मगिदोनचे युध्द लढण्यास पुढे येतात तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही.—प्रकटीकरण ११:१७, १८; १६:१४, १६.

त्यानंतर अपोकलीप्स दियाबल सैतान व त्याच्या दुरात्मिक शक्‍तींना मानवजातीपासून विभक्‍त करील. (प्रकटीकरण २०:२, ३) होय, हा क्रोध पृथ्वीवरील लोक जे देवाची सेवा स्वईच्छेने करीत नाहीत त्याही पुढे जाईल. (२ थेस्सलनीकाकर १:६–९) याचा अर्थ अपोकलीप्सतून बचावून राहणाऱ्‍यास चिरकालिक आशीर्वाद मिळेल.

अपोकलीप्स–नंदनवनाची प्राथमिकता

पृथ्वीवरील रहिवाश्‍यांबाबत प्रकटीकरण (द अपोकलीप्स, डुवी) आम्हास सांगते की देव “त्यांच्या डोळ्‌यांचे सर्व अश्रू पुसून टाकील, तेथे दुःख, कष्ट, मरण नसणार. जुने व्यवस्थीकरण निघून गेले असणार.” (प्रकटीकरण २१:४, न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन) अपोकलीप्सचे स्वरुप अंधःकारमय असण्याऐवजी पवित्र शास्त्र प्रकट करते की मनुष्य नंदनवनात जीवन कंठण्यास लायक असेल.—स्तोत्रसंहिता ३७:९–११, २९.

नंदनवन? पृथ्वीवर चिरकालिक जीवन? सर्व वंशातील आनंदी लोक सुदृढ शरीरप्रकृतीत जीवनाचा पूर्ण आनंद लुटीत आहेत असा विचार करा! तुम्ही विचाराल, ‘हा अपोकलीप्सचा परिणाम कसा असू शकेल?’ देवाने त्याचा शब्द दिला आहे. तो, इस्त्राएलासोबतच्या देवाच्या व्यवहारात होता तसाच असेल की, “यहोवाने सांगितलेली कोणतीही चांगली गोष्ट उणी पडली नाही. . . . त्या सर्व सिध्दीस गेल्या.”—यहोशवा २१:४५.

यास्तव महासंकटाची अथवा अपोकलीप्सची नेमकी घटका व दिवस कोणासही ठाऊक नाही, परंतु पुरावे दाखवितात की आम्ही महासंकटाच्या घटकेत जगत आहोत. ते तडाका देईल तेव्हा आम्ही “जागृत असे आढळू या.” “जग व त्यातली वासना नाहीतशी होतात पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—मार्क १३:३३, ३७; १ योहान २:१७; मत्तय २४:३६.

[तळटीपा]

a  १९१४विषयीच्या सविस्तर माहितीसाठी “तुझे राज्य येवो” या, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क ने प्रसिध्द केलेल्या पुस्तकाचा १४ वा अध्याय पहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा